Skip to main content

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

लेखक उडन खटोला यांनी शुक्रवार, 04/12/2015 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963… मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

वाचने 66781
प्रतिक्रिया 384

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

पुर्तुगीज लोकही तसेच इंग्रजी विकिपीडियावर पोर्तुगाल विषयक लेखात त्यांच्या कॉलोनीला पास्टटेन्स एवजी प्रेझेंट टेन्स मध्ये अट्टाहासाने वापरला जात होता. (सध्याची स्थिती माहित नाही)

In reply to by कपिलमुनी

मला अनुभव आहे, रेड डोअर होस्टेल अंजुना …तिथे राहण्यासाठी पासपोर्ट ची कॉपी ठेवावी लागली…भारतातल्या भारतात

In reply to by प्रीत-मोहर

अगदी बरोबर,झेवियर ने संभाजीराजांपासून गोवा वाचवला अशी धारणा होती , लोकगीते सुद्धा होती … अजूनही असावीत म्हणून गमतीने म्हणालो . छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याचं राज्य पादाक्रांत केलं नव्हतं, फक्त मोठ्या प्रमाणावर आक्रमण केलं होतं. स्थानिक कर्तुत्ववान व्यक्तीचं नाव देणं जास्त योग्य ठरेल . 'मारियो मिरांडा' सुद्धा चालू शकेल

पुणे विद्यापीठाचे नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले त्याने काय फरक पडला कोण जाणे ? बाकी नामांतर करायचे झाले की शाहू , फुले , आंबेडकर , शिवाजी महाराज , संभाजी महाराज आणि खपलेले राजकारणी एवढेच आठवतात. उद्योजक, खेळाडू यांची नावे आठवत नाहीत हे दुर्दैव!

In reply to by कपिलमुनी

आणि एक शंका, वरील थोर व्य्क्तींची नावं दिल्यानं काय होणारै? ज्या त्या ठिकाणाला आपण भौगोलिक नावं का नाही ठेवत आपल्याकडं? जसं की पुणे विद्यापीठ, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, मराठवाडा विद्यापीठ, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे (याला दोन नावं आहेत म्हणे.. एक पु.ल. देशपांडे आणि एक यशवंतराव चव्हाण)

http://www.rediff.com/news/dec/26goa.htm वर प्रदीपजींनी जे सांगितलंय त्या संदर्भातला दुवा. हा वाद आजचा नाहीये. या बातमीतील संघाचे प्रतिनिधी म्हणून उल्लेख केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर कुणाही मागणी करणार्‍याचा संघाशी/भाजपाशी संबंध नाही. शशिकलाताईंच्या काळातपण ही मागणी होतीच, पण तिला केंद्राने मान्यता दिली नाही असे दिसते. मगोपने 'कदंबनगर' वगैरेच्या ऐवजी 'संभाजी नगर' करायची मागणी करणे समजू शकतेच. बाकी त्यातल्यात्यात मागच्या काही वर्षांत झालेला बदल म्हणजे 'वास्को-दि-गामा' ऐवजी 'वास्को' एवढाच उल्लेख केला जातो, रेल्वे स्टेशनांवर वगैरे. (हजरत निजामुद्दिन-वास्को दि गामा गोवा एक्स्प्रेस म्हणेपर्यंत ट्रेन सुटायची वेळ यायची ;)) औरंगाबाद असा जनरल उल्लेख केल्यावर कुणाच्या डोक्यात औरंगजेब आणि गुलामीच्या खुणा काही लगेच येत नाहीत (नसाव्यात), तसंच वास्को म्हटल्यावर एक गोमंतकीय म्हणून मलातरी वास्को-दि-गामा आठवत नाही. पण त्याचे नाव बदलायचेच असल्यास त्याला एखाद्या गोवा मुक्ती संग्रामातील व्यक्तीचे नाव द्यावे असे वाटते. 'संभाजीनगर' उगाच आपलं!
पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने
बरं. -शुद्ध भारतीय पुणेरी सोवळ्या नवीन पिढीला रोज पाहणारी, पिशी

In reply to by पिशी अबोली

दुव्याबद्दल. आता ह्यात भाजपाचा हात आहे, म्हणणार्‍या मंडळीचा आवाज थोडा कमी होईल.

आमेरीकेत पुर्वी कोलंबस डे साजरा होत असे तोच आजकाल नेटीव्ह आमेरीकन दिवस म्हणुन साजरा केला जाऊ लागला आहे असे वृत्तांवरून दिसते. बाकी चालु द्या.

In reply to by माहितगार

बरोबर आहे कारण या कोलंबसाने अमेरिका शोधुन काढण्यापुर्वी तिथे केवळ आदिवासी राहत होते. त्यामुळे अमेरिका आज ज्या स्थानावर पोचली आहे त्याचे श्रेय कोलंबस आणि त्यानंतर त्याच्यापाठोपाठ तिथे पोचलेल्या गोर्‍यांना जाते. त्यांना कोलंबसाचे कौतुक वाटणे साहजिक आहे. तो त्यांचा माणूस होता. वास्को डि गामा आणि गोवा यांच्याबद्दल दुर्दैवाने असे म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोलंबस डे वेगळा आणि नेटिव्ह अमेरिकन डे वेगळा. नेटिव्ह अमेरिकन डे काही ठराविक राज्यात साजरा करतात आणि तो देखील वेगवेगळ्या दिवशी. नेटिव्ह अमेरिकन डे ची तारीख ठरलेली नसते तर दिवस ठरलेला असतो. कोलंबस डे बाय डिफॉल्ट १२ ऑक्टोबरलाच असतो आणि तो मला वाटते फेडरल हॉलिडे आहे. कर्मधर्म संयोगाने कधीकधी हे दोन्ही दिवस कधीतरी एकाच दिवशी येत असतील तर माहिती नाही. बाकी चालु द्या.

In reply to by माहितगार

जसा विण्टर सॉल्स्टिसच्या प्रसंगी साजरा केला जाणारा पेगन सण पुढे ख्रिसमस म्हणून साजरा केला जाऊ लागला तसेच... बाञदवे ते ख्रिसमस ट्री वगैरे मूळ ख्रिश्चॅनिटीत कुठे आहे? हे सगळे जर्मानिक-नॉर्डिक लोकांचे घुसलेले प्रक्षिप्त प्रकार आहेत. येशू ख्रिस्त जन्मला आणि मरणही पावला इस्राएलमध्ये, तिथे बर्फ कुठून पडायला (एक्काकाका अता सौदीतले बर्फाचे फटू दाखवू नका बरे)? मूळ व्हर्जन साजरी करायची तर खजुराचे झाड पाहिजे होते तिथे.

In reply to by बॅटमॅन

ख्रिसमस ट्री वगैरे मूळ ख्रिश्चॅनिटीत कुठे आहे?
बरोबर, ख्रिसमस ट्री इझ्रायलात नव्हताच शिवाय त्यांच्या तत्वज्ञातही त्याला वस्तुतः स्थान असू शकत नाही.

In reply to by बॅटमॅन

मूळ व्हर्जन साजरी करायची तर खजुराचे झाड पाहिजे होते तिथे.
वृक्षपुजेला अथवा प्रतिकांना त्यांच्या तत्वज्ञानात स्थान असू शकत नाही. (सेलिब्रेशन मध्ये ख्रिसमस ट्री मनोभावे वापरणारे -भाव असेल तर- आपोआपच हिंदू होतात :) ह. घ्या.)

एक चित्रपट शारुक आणी शरद कपुर होता. शारुक ची ईगल गॅंग आणी शरद ची बिच्छु गॅंग.. त्यात शरद शारुकला "ये वास्को शहर तेरे बाप का है क्या?" अस विचारतो. लेखातील वास्को शहर तेच आहे का ?

In reply to by कपिलमुनी

अजुन एक पर्याय. शर्दकपूर (जसे पंढरपूर नागपूर ). तसे हे नाव संस्क्रुत म्हणुन ही खपून जाईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

हा हा हा, एकच नंबर. लय अवडले. बाकी शर्दक या संस्कृत शब्दातून (अर्थ? ते काय असतं?) शाहरुख हा यावनी शब्द आला अशीही मलमपट्टी करता येईल ते वेगळेच. =))

वाचतेय.

महाराजांचे वारस सगळ्या प्रॉपर्टींचा उपभोग घेत मजेत असतील. आण इते बाकीचे लोक डोस्की फोडत आहेत. ..... डोस्को दि गामा

In reply to by मोगा

जसे तुमचे काका ओंरंग्या आणी निजामाचे वारस मज्या करत आहेत.. आणी तुमी वारंवारडु आयडी घेऊन स्वत:चे हसे करत आहात.. भोस्कु दे आता-जेपी

In reply to by जेपी

भगवदगीतेत लिवलय ! " हे राजा ! युद्धात तू जिंकलास तर इथले राज्य भोगशील आणि मेलास तर स्वर्गाचे राज्य भोगशील ! " हे सगळं राजाला बरं का ! सामान्य तानाजी युद्धात जिंकला तर तो कुठलं सुख भोगणार आणि तो मेला तर तो कुठल्या स्वर्गात जाणार , त्याच्या घरचा रायबा तूरडाळ कशी विकत घेणार ? हे गीताच काय कोणत्याच पुस्तकात नाही.. ( तानाजीऐवजी कसाब लिवलं तरी चालेल ! ) ..... त्यामुळे कोण कुठला राजा बायकोला सोडवायला कसा लढला आणि कोण कुठल्या धर्मासाठी मेला , आम्हाला कोणत्याच गोष्टीत स्वारस्य नाही... सर्व राजे व त्यांचे परिवार यांच्या दृष्टीने युद्धे जिंकणे व हरणे ही विन विन सिचुएशनच होती. मग त्यांचं इतकं कौतुक कशाला ? ...... जेंव्हा मोघल सत्ता होती तेंव्हा आमचा खापरपणजोबा मोघलाना कर देत होता आणि जेंव्हा स्वराज्य आले तेंव्हा हिंदू महाराजाना देत होता. आमचा खापरपणजोबाही गेला आणि तेही गेले ! आता आमच्या डोस्क्याला नस्ता ताप कशाला ? गावाचे नाव संभाजीनगर / महमदापूर / वास्कोपूर / अशोकनगर / बाहुबलीनगर .... काइ का ठेवेना !

In reply to by मोगा

"सर्व राजे व त्यांचे परिवार यांच्या दृष्टीने युद्धे जिंकणे व हरणे ही विन विन सिचुएशनच होती" काय म्हणता? औरंगजेबाचे मांडलिकत्व न पत्करता संभाजीराजे त्याचाशी लढत राहिले, त्याच्या तावडीत सापडले. त्यानंतर राजांचे जे हाल झाले ते विन विन होते? राजांची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू औरंगजेबाच्या कैदेत पडले, ते ही विन विन?

In reply to by मोगा

हे राजा
माझ्यामते असे संबोधन भगवद्गीतेत कुठेही आले नसावे. तसाही अर्जुन हा राजा नव्हताच. युधिष्ठीर हा राजा होता. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या विविध नावांनी संबोधले आहे.(जसे पार्थ,धनंजय,गुडाकेश,सव्यसाची वगैरे.) ह्या तर्कानुसार अर्जुन सुध्दा राजाऐवजी एक सैनिकच वाटतो.

In reply to by मोगा

मोगा,
>> गावाचे नाव संभाजीनगर / महमदापूर / वास्कोपूर / अशोकनगर / बाहुबलीनगर .... काइ का ठेवेना !
तुमच्याशी सहमत. नेमक्या याच कारणासाठी तुम्ही या धाग्यावर येऊ नये ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by मोगा

भगवदगीतेत लिवलय ! " हे राजा ! युद्धात तू जिंकलास तर इथले राज्य भोगशील आणि मेलास तर स्वर्गाचे राज्य भोगशील !
याबद्दल बोलताय ना भाउ? - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम| तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः|| गीता २,३७ यात कुठे "हे राजा" असं म्हणलंय? हा श्लोक कौन्तेय म्हणजे अर्जुनाला उद्देशून म्हणलाय. आणि राजा तर कुठेच असल्याचं आठवत नाही मला. क्षत्रिय असं मात्र म्हणलंय. त्यात राजा येतो तसे सैनिक पण येतात.

In reply to by मोगा

शिवाजी महाराज सबंध रयतेचे राजे होते, त्यांनी राज्य रयतेच्या हितासाठी चालवले आपल्या वारसदारांसाठी चालवले नाही, वतनदारी बंद करण्यासाठी त्यांनी आप्तस्वकीयांशीही वैर घेतले, शिवाजी महाराज आणि हिंदूत्व हा वाद थोड्या वेळासाठी बाजूस ठेवला ते जे काही होते परधर्मीयांवर अन्याय केले नाहीत, त्यांच्याशी धर्माच्या कारणावरून दुजाभाव ठेवला नाह परधर्मीयांना सौजन्याने वागवले. शिवाजी महाराजांनी राज्य स्वतःच्या वारसदारांसाठी नव्हे रयतेसाठीच चालवले हे त्यांच्या इतिहासाच्या प्रत्येक कृतीतून अक्षरातून शब्दातून सिद्ध होते. शिवाजी महाराजांचे खरे वारस भारतीय जनता आहे. शिवाजी महाराजांची तुलना धार्मीक भेदभाव बाळगणार्‍या तत्कालीन पोर्तुगीज किंवा औरंगजेबाशी मुळीच होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जनतेचा राजा होता आणि त्यांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनताच आहे. हे आमचे मत. असो.

In reply to by माहितगार

शिवाजी महाराज जनतेचा राजा होता आणि त्यांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनताच आहे. क्या बात! मोगा साहेबांना उत्तर मिळालं असेल.

अशा वैचारिक जनतेच्या क ल्याणाच्या धाग्याचा रोजचा आढावा ( अधिवेशनातल्या कामकाजाचा करतात तसा ) इथे आणि खरडफळ्यावर प्रकाशित करणयात यावा.

प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यातील सन्माननीय व्यक्तींच्या नावाचा वापर करणेच योग्य आहे. उद्या कुणी छञपती शिवाजी टर्मिनसचं नाव बदलुन एखाद्या कानडी सन्माननीय व्यक्तीचं नाव ठेवलं तर ते आपल्या महाराष्र्टीयन्सना कीतपत पटेल?? आंदोलनं आणि तोडफोड होण्याची शक्यताच जास्त.

In reply to by कविता१९७८

एकदम बरोबर कविता तै, धागा लेखास आलेल्या बहुतेक प्रतिसादकांना वास्को द गामाच्या नावा बाबत हेच म्हणायच असाव बहुतेक प्रतिसादकांचा संभाजी महाराजांचे नाव असावा असा आग्रह नाही पण 'वास्को द गामा' भारतीय नव्हता भारतासाठी एक आक्रमक होता स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही एवढ्या वर्षांनी त्याचे नाव गळ्यात बांधून फिरण्याचेही फारसे प्रयोजन दिसत नाही.

In reply to by कविता१९७८

संभाजी राजांचा गोव्याशी खूप मोठा संबंध आहे. त्यांनी गोव्यावर स्वारी करून जवळ जवळ सर्व गोवा पोर्तुगीझांकडून मुक्त केला होत. पोर्तुगीज केवळ तीस गावांच्या समूहावरच्या जागेवर राहिले होते. त्यानंतर राजांना स्वारी पूर्ण करून पोर्तुगीझांना पूर्णपणे हाकलणे जमले नाही. तरी, गोव्याच्या पोर्तुगीझानविरुद्धच्या संग्रामातील एक महत्त्वपूर्ण सेनानी म्हणून संभाजी राजांचे योगदान acknowledge केले तर ती चांगलीच गोष्ट आहे.

म्हात्माजी, न्हेरू, इंद्राजी, रजीव... या सर्वांच्या नावानं खूप काही झालंय, त्या बिच्च्चार्‍या राहुलबाळाच्या नावानं मात्र काही नाही. तस्मात वास्को गावाला राहुल नगर हे नाव अगोदरच देऊन टाकायला हवे होते, आता (सध्यातरी) उशीर झालाय म्हणायचा. कदाचित त्याचेही अच्छे दिन येतील, कुणी सांगावे ? असे केले, की गोवेकरांमधे भारतीयत्व रुजलेच समाजा.

In reply to by चित्रगुप्त

अच्छे दिन येतील तेव्हा सोनिया नगर 1. राहुलबाबा पेक्षा शिनेर, वहिवाटे नुसार 2. नवीन नाव ख्रिश्चन असल्याने, धार्मिक रंग देता येणार नाही. (halu ghene)

मी मोबाईल वरून काही लिंक देऊ शकत नाहीये. आमच्या टीम गोवाच्या "आमचे गोंय" मालिकेचे इंक्विझिशन वास्को आणि मराठी साम्राज्याचे भाग वाचा बघू. गोव्याशी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा काय संबंध होता याची निदान कल्पना येईल. २ दिवसांनी धागा वर राहिला तर येते परत. बाकी फोरमवर वाकडे तिकडे बोलणारे लोक सगळीकडेच असतात. इथेही सापडतील. त्यावरून बहुसंख्य गोवेकर किंवा एखाद्या particular धर्माचे लोक तसे असतील असे मत बनवू नका. गोव्यात सरकारतर्फे शिवजयंती साजरी होते. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीच हजर असतात. ते उगीच नव्हे. त्या जुन्या राजवटींच्या काळात गोवा हे वेगळे राज्य समजले जात नव्हते. तेव्हा शिवाजी संभाजी राजे फक्त महाराष्ट्राचे हे गृहितक आधी डोक्यातून काढा.

In reply to by पैसा

पै तै आल्या नंतर नेमका दुवा देतील तो पर्यंत जिज्ञासूंसाठी टिम गोवाचे दोन दुवे देतो आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही टिम गोवा यांचे सर्व लेखन त्या जुन्या राजवटींच्या काळात गोवा हे वेगळे राज्य समजले जात नव्हते. तेव्हा शिवाजी संभाजी राजे फक्त महाराष्ट्राचे हे गृहितक आधी डोक्यातून काढा. हा मुद्दा आणि शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचे गोवा परकीय सत्तेपासून स्वतंत्र करण्यासाठीचे योगदान सुस्पष्ट दिसत असताना ते नाकारणे म्हणजे गोव्याच्या प्रथम स्वांतत्र्य सेनानींचा शुद्ध अपमान आहे. इतरांच्या नियमाने शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंचा प्रभाव मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र कोकण असा असता विदर्भ आणि मराठवाड्याने नाकारावयास हवे पण विदर्भ किंवा मराठवाड्यातील लोकांच्या मनी मानसी ही असे कदापी येत नाही मग गोव्याच्या जनतेने असे मनात का आणावे ? लोकमान्य टिळक म्हणतात तसे खरेतर शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतेही बंदीस्त करता येत नाही शिवाजी महाराज सर्व अर्थाने आदर्श राष्ट्रपुरुष होते. नेहरुंच्या आणि इंदिरागांधिंच्या नावाच्या गोष्टी राष्ट्रीय नेते म्हणून गोव्यात असू शकतील तसे तत्कालीन स्वांतत्र्यासाठी झगडणारे राष्ट्रीय नेते याच नात्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे ही गोव्यावर तेवढाच आधीकार बनत असावा असे वाटते. असो.

In reply to by माहितगार

गोव्यात राहणाऱ्या प्रतिसाद वाचला आता त्यामुळे प्रतिवाद घालत नाही. गोवा टीम मुळे मिपाकरांना गोव्याचा इतिहास मराठेशाहीचा संबंध लक्षात आला. अवांतर मद्रास चे चेन्नई नामांतर लोकांच्या जिभेवर रुळले मात्र बॉंबे चे मुंबई का नाही रुळत.

In reply to by निनाद मुक्काम …

मुंबईतील मराठी आणी गुजराती लोक आधीपासूनच मुंबई म्हणत आले आहेत.कोकणातही लोक मुंबईच म्हणतात. मुंबई बाहेरचे लोकच (यात पुणेकरही आले) आपण "सॉफिस्टीकेटेड" आहोत हे दाखविण्यासाठी "बॉम्बे" म्हणतात. यात मुम्बईतील अर्धआंग्ल आणि RNI( RESIDENT NONINDIANS निवासी अभारतीय) सुद्धा समाविष्ट आहेत. सर्व शासकीय पत्रके आणी अधिकृत भाषा यात उल्लेख मुंबईच आहे. एस ती वर सुद्धा पाट्या मुंबई - रत्नागिरी मुंबई कोल्हापूर अशाच असतात.

In reply to by सुबोध खरे

पुण्याचा उल्लेख आला म्हणुन सांगतो, पुणेकर मुंबईला मुंबईच म्हणतो. बॉम्बे म्हणुन मुंबईला अजुन तुच्छ लेखता आले असते तर कदाचित पुणेकरांनी विचार केला असता पण त्यामुळे काही फरक पडणार नसल्याने मूळ नावाने संबोधणे पुणेकरांना योग्य वाटते. माझे ठाण्यात राहणारे काही मित्र मात अजुन बॉम्बे म्हणतात ब्वॉ.

In reply to by सुबोध खरे

अहो एवन पाकिस्तानी प्रसार माध्यमे भारताच्या विरुद्ध गरळ ओकातांना मुंबई असा उल्लेख करतात. आंतराष्ट्रीय स्तरावर मुंबई असा उल्लेख असतो बर काही अमराठी दीडशहाणे मात्र बॉंबे म्हणतात त्यात तो आयुष्मान खुराणा सारखे अग्रेसर आहेत.

In reply to by सुबोध खरे

मुंबईला बॉम्बे म्हणणे हे कुठल्या गावाची मक्तेदारी नसून मराठी माणसाच्या कणाहीन पुचाटपणाचे प्रतीक आहे. असे लोक सगळ्याच ठिकाणी आढळतात. दादरमध्ये राहणार्‍या आणि ठाकरे-बिकरेंना देवासमान मानणार्‍या मराठी माणसाला 'बॉम्बे' म्हणताना ऐकले आहे. सहसा या लोकांना 'मुंबई' म्हणणे हे काहीतरी बावळटासारखे वाटते. 'मराठी' हा शब्द तरी किती मराठी लोक वापरतात? त्याऐवजी ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घेतील. कारण महारष्ट्रियन म्हणजे काहीतरी कूल वाटते. मला तर हा शब्द ऐकल्यावर हसू आवरत नाही. अरे गाढवांनो कूल व्हायचंय तर निदान योग्य शब्द तरी वापरा ना!!!... 'महाराष्ट्रिया' नावाचा कुठलाही प्रांत नाही. म्हणायचंच झालं तर 'महाराष्ट्रन्स' म्हणवून घ्या. 'आय ॲम फ्लाईंग टू बॉम्बे ॲंड फ्रॉम देअर टू चेन्नई' असे म्हणणारे मद्रासडे पण ऐकले आहेत. अरे XXXनो चेन्नईच्या आधी मुंबई झाले होते हे तुम्हाला माहीत नाही का? असे म्हणावेसे वाटते पण आपलंच नाणं खोटं तर काय बोलणार. खुन्नस म्हणून मी यापुढे 'मद्रास' आणि प्रत्येक साऊथवाल्याला मद्रासीच म्हणायच ठरवलं आहे. या प्रकाराला कंटाळून अलिकडेच एका अमेरिकन माणसाशी बोलताना I am from Bombay म्हणालो (याने 'मुंबई' नाव कधी ऐकलं नसेल म्हणून) तर 'You mean Mumbai?' असं म्हणून त्यानेच मला सुधारलं.

In reply to by सायकलस्वार

'मराठी' हा शब्द तरी किती मराठी लोक वापरतात? त्याऐवजी ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घेतील. कारण महारष्ट्रियन म्हणजे काहीतरी कूल वाटते. मला तर हा शब्द ऐकल्यावर हसू आवरत नाही. अरे गाढवांनो कूल व्हायचंय तर निदान योग्य शब्द तरी वापरा ना!!!... 'महाराष्ट्रिया' नावाचा कुठलाही प्रांत नाही. म्हणायचंच झालं तर 'महाराष्ट्रन्स' म्हणवून घ्या.
हा शब्द माझ्याही डोक्यात जातो. अनेक नॉर्थ इंड्यन्स ऐतिहासिक पेपर्समध्येही हाच शब्द अट्टाहासाने वापरतात. लै **** आहेत साले.

In reply to by सायकलस्वार

पण आपलंच नाणं खोटं तर काय बोलणार.
ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्राच्या राजधानीला 'बॉम्बे' आणि तामिळनाडूच्या राजधानीला 'चेन्नई' म्हणणारे मराठी लोकही आहेतच की. तसे असेल तर "आय ॲम फ्लाईंग टू बॉम्बे ॲंड फ्रॉम देअर टू चेन्नई" असे म्हणणार्‍या दाक्षिणात्यांना कोणत्या तोंडाने शिव्या घालायच्या?

In reply to by पैसा

गोव्यात सरकारतर्फे शिवजयंती साजरी होते. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीच हजर असतात.
वाचून आनंद वाटला, मुख्यमंत्र्यांवरून आठवले गोव्याचे ६ वेळचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे छत्रपती घराण्याचे जवळचे नातेवाईक आहेत.
तेव्हा शिवाजी संभाजी राजे फक्त महाराष्ट्राचे हे गृहितक आधी डोक्यातून काढा.
गोव्यातील अनेक मोठी मंदिरे छत्रपतींनी बांधून घेतली आहेत उदा. शांतादुर्गा मंदिर - शिवरायांचे नातू आणि संभाजीपुत्र शाहूंनी हे मंदिर उभारले आणि या मंदिराला ५ गावांचा सरंजाम तसेच सोन्याची पालखी दिलेली. बांदोडे येथील नागेशी मंदिराची पुनर्बांधणी हि त्यांनी करून घेतली. इतर अनेक लहानसहान मंदिरांचे जीर्णोद्धार शिवराय,संभाजी,शाहू यांच्या काळात झाल्या

पुण्यात शिवाजीनगरला कुठेतरी न. ता. वाडी आहे. पीएमटीच्या पाटयांवरील ते न. ता. वाडी वाचून बरेच दिवस मला काही उलगडा झाला नव्हता.

In reply to by सतिश गावडे

वाकडेवाडीच्या भुयारी मार्गातून कृषी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता आहे, त्या भागाला न.ता.वाडी म्हणतात. तिथे पीएमटी (पीएमपीएमएल) चे आगार (डेपो) आहे, म्हणून तिथे जाणार्‍या बशींच्या पाट्यांवर न.ता. वाडी असे लिहिलेले असते.

In reply to by उडन खटोला

गोव्याच्या इतिहासात व हिन्दु संस्क्रुतिरक्षणात छत्रपति सम्भाजीराजान्चे फार मोठे योगदान असून मला वाटते त्याबद्दल गोवा सरकारने व्यापक जनप्रबोधन करणे गरजेचे आहे .

एक सर्वसाधारण निरीक्षण असे की आजची गोव्यातली तरुण पिढी (महाराष्ट्रातल्या शहरांप्रमाणेच) इंग्लिश माध्यमातून शिकते. मराठी संस्कृतीशी त्यांना फारसे देणेघेणे नाही. गोवामुक्तीनंतर स्वतंत्र राज्य की महाराष्ट्रात विलीनीकरण असा पर्याय होता, आणि स्वतंत्र राहाणे कुणालाही आवडण्याजोगे असल्याने तोच पर्याय मान्य झाला. त्यावेळचे गोमंतकीय हे महाराष्ट्राकडे थोरल्या भावासारखे पाहात. धार्मिक आरत्या, पूजाअर्चा, जुनी आख्याने (आणि गोवामुक्तीसाठी महाराष्ट्राचे भरीव योगदान) वगैरे मराठीतून असल्याने हा भ्रातृभाव काही काळ टिकला. पण हळू हळू महाराष्ट्र हा हात पिरगळणार्‍या मोठ्या भावाच्या दादागिरीने वागत असल्याचा समज वाढू लागला. मराठी सांस्कृतिक विस्तारवाद भयप्रद किंवा नकोसा वाटू लागला आणि एक सूक्ष्म तिरस्कार निर्माण होऊ लागला. त्यात भाषावादाची भर पडली. बा. भ. बोरकरांना मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद ते कोंकणी आहेत यास्तव नाकारले गेले. त्या आधीच शणै गोंयबाब (वामनराव वर्दे वालावलीकर) यांनी 'कोंकणी भाशेचें जैत' या पुस्तकात कोंकणी ही मराठीहून वेगळी कशी याचा आवेशपूर्ण उहापोह केला होता. सांस्कृतिक दृष्ट्या गोव्याचे नाते महाराष्ट्रातल्या फक्त छोटासा सिंधुदुर्ग आणि किंचितसे अतिदक्षिण रत्नागिरी या इवल्याश्या प्रदेशाशी आहे. उर्वरित महाराष्ट्राशी फारसे नाही. त्याउलट कर्नाटकातल्या कारवार- (उत्तर कन्नड आणि थोडे दक्षिण कन्नड)-या भागाशी जवळपास सारख्या भाषेमुळे अधिक जवळिकीचे आहे. कदंबांचे राज्य कारवार आणि गोव्यावर एकत्रितपणे साधारण पावणेदोनशे वर्षे होते. गोव्याची स्वतंत्र अस्मिता वाढती आहे आणि महाराष्ट्रातली प्रतीके, मानचिह्ने यासंबंधी फारसा आपलेपणा राहिलेला नाही. आता सध्या ज्यांना शक्य आहे ते गोव्याचे लोक पुण्यामुंबईत स्थायिक होण्यापेक्षा परदेशी जाणे अधिक पसंत करतील. हेही इतर भारतीय/महाराष्ट्रीयांसारखेच. मला वाटते बांदोडकरांनी (ते कट्टर महाराष्ट्रवादी गोमंतकीय) होते प्रथम panjim (उच्चार पोण्ज्यें) चे स्पेलिंग panaji केले. त्याचा उच्चार बाहेरच्यांकडून काही काळ पण्जी असा न होता पानाजी असा होऊ लागला. त्यानंतर वास्कोच्या एका भागाच्या संभाजी या नामकरणाचा प्रस्ताव ठेवला गेला होता किंवा ते केले होते. पण हे नागरिकांना अजिबात पसंत पडले नव्हते. पानाजी सारखेच संभाजी असे गोव्याचे 'जीजी' होणार काय असा प्रश्न गमतीने तेव्हाच्या छापील माध्यमांतून उपस्थित झाला होता. या बाबतीत अट्टाहास करण्यात अर्थ नाही आणि महाराष्ट्राने त्यात पडू नये असे मला वाटते. शिवाय राजकीय पक्षदेखील कुरघोडीच्या राजकारणात वन अप्मनशिप दाखवताना प्रतिस्पर्ध्याला शह म्हणून असे सवंग निर्णय घेतात. कारण हे त्यांनी नाही केले तर त्यांचा प्रतिस्पर्धी ते अंमलात आणून श्रेय घेणार असतो.