✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुटलेल्या पोटाची कहाणी -१

A
Anand More यांनी
Fri, 12/04/2015 - 16:53  ·  लेख
लेख
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन. --------------- हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो. त्यांच्या कामगिरीचे फोटो बिटो काढले आणि मग सरांबरोबर फोटो काढूया अशी कल्पना एकीच्या सुपीक डोक्यातून निघाली. (डोके नेहमी सुपीकच का असते कुणास ठावूक? एकही नापीक, दुष्काळी, गेला बाजार कोरडवाहू वगैरे का नसावे ? असो इथे कंस थांबवतो, उगाच तुम्हाला माझ्या डोक्याला कुठली विशेषणे द्यायची त्याची यादी मीच करून द्यायला नको) दिवाळीच्या आनंदाच्या भरात मी देखील या कल्पनेला हो म्हणून, फोटो काढायला मागे उभ्या असलेल्या या मुलींसमोर बसलो. आणि घात झाला. “जे न देखे रवी ते देखे कवी”, च्या चालीवर मला नवीन साक्षात्कार झाला. "जे न दाखवी आरसा ते ठळकपणे दाखवी कँमेरा फोनचा". इतके दिवस माझ्या नाकाखाली, माझ्या नकळत, सुगरण बायकोने (ती इथे आणि फेसबुकवर आहे. चांगली active आहे. त्यामुळे ती सुगरण आहे इतकंच सत्य मी उघड करू शकतो) बनवलेल्या आणि अंमळ जास्तच आवडीने खालेल्ल्या सर्व अन्नामुळे, मी कमावलेल्या आणि एकही गोष्ट वाया न घालवण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेने वाचवून ठेवलेल्या कॅलरीज, चरबीच्या रूपाने माझ्या मूळच्या सपाट पोटावर घेराव देऊन बसल्या होत्या. पोरी फोटो बघून खूष झाल्या. त्यांच्या खुशीचे कारण त्यांचे छान आलेले फोटो की सरांपेक्षा आपण कित्ती बारीक आहोत याचा स्क्रीनवर दिसणारा पुरावा होता, हे मला अजून कळले नाही. आणि मग सुपीक डोक्याच्या मुलीच्या डोक्यातून अजून एक पीक निघाले की ऑफिस च्या whatsapp ग्रुप ला हा फोटो डी पी म्हणून ठेवायचा. मी कसनुसा हसत होकार दिला. झुक्या बाबाने whatsapp घेतल्यावर डी पी क्रॉप करायची सोय काढली नाही म्हणून त्याचे आभार मानत केवळ हसरा चेहरा दिसेल इतपत फोटो ठेवून बाकीचा अनावश्यक सत्याचा भाग कापून, ऑफिस मध्ये दिवाळी साजरी केली. घरी यंदा बायकोने फराळाचे वेगवेगळे १२ पदार्थ केलेले असल्याने आणि मी आज्ञाधारक नवरा असल्याने गपचूप सर्व पदार्थ खावेच लागले. त्यात पुन्हा आमच्या सोसायटीतले शेजारी अजूनही फराळ देण्याघेण्याच्या गतकालीन सवयी मोडायला तयार नसल्याने, पदार्थांची संख्या वाढली नसली तरी खाण्याचे प्रमाण वाढले. मी डी पी त लपवलेल्या पोटाचा विचार करीत दिवाळीचा फराळ हाणत होतो. अपूर्ण … पुढे चालू ठेवता येईल अशी आशा … भाग २
  • सुटलेल्या पोटाची कहाणी -२
  • सुटलेल्या पोटाची कहाणी -३
  • सुटलेल्या पोटाची कहाणी -४
  • सुटलेल्या पोटाची कहाणी -५

Book traversal links for सुटलेल्या पोटाची कहाणी -१

  • सुटलेल्या पोटाची कहाणी -२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18356 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

हा हा हा , मस्त लिखाण

कविता१९७८
Fri, 12/04/2015 - 16:57 नवीन
हा हा हा , मस्त लिखाण
  • Log in or register to post comments

:-)

Anand More
Fri, 12/04/2015 - 17:04 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

:)

टवाळ कार्टा
Fri, 12/04/2015 - 17:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments

;)

Anand More
Fri, 12/04/2015 - 17:29 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ही ही !!

नीलमोहर
Fri, 12/04/2015 - 17:10 नवीन
काढा अजून फोटो :)
  • Log in or register to post comments

जले पे नमक … जास्त मीठ

Anand More
Fri, 12/04/2015 - 17:13 नवीन
जले पे नमक … जास्त मीठ खाल्ल्याने पण जाडा होतो मनुष्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

सांताक्लॉज

कपिलमुनी
Fri, 12/04/2015 - 17:17 नवीन
तुमच्या ऑफिसमधल्या ख्रिसमस पार्टीला तुम्हाला सांता म्हणून उभे करणार
  • Log in or register to post comments

ख्रिसमस ट्री

Anand More
Fri, 12/04/2015 - 17:22 नवीन
नाही ते ख्रिसमस ट्री साठी शोधत होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हा हा हा.. दोन्ही भाग आवडले.

स्रुजा
Sat, 12/05/2015 - 21:40 नवीन
हा हा हा.. दोन्ही भाग आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

धमाल लिहिलंय! पुभाप्र.

अजया
Fri, 12/04/2015 - 17:17 नवीन
धमाल लिहिलंय! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

:-)

Anand More
Fri, 12/04/2015 - 17:29 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

खुसखुशीत !

सस्नेह
Fri, 12/04/2015 - 17:24 नवीन
जरा मोठे भाग चालतील.
  • Log in or register to post comments

तुम्ही खूप धाडसी आहात

Anand More
Fri, 12/04/2015 - 17:28 नवीन
तुम्ही खूप धाडसी आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

व्हॉट?

जातवेद
Fri, 12/04/2015 - 18:08 नवीन
व्हॉट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

हो ना !

सस्नेह
Fri, 12/04/2015 - 19:10 नवीन
तुमचा धागा आणि सर्व प्रतिसाद वाचले म्हणजे धाडसीच की ! ( ह घ्या) बाकी, एडिट काय करायचे आहे ते व्यनि करू शकता. व्यनि माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

(ती इथे फेसबुकवर आहे...

खेडूत
Fri, 12/04/2015 - 17:33 नवीन
(ती इथे फेसबुकवर आहे...
  • Log in or register to post comments

लक्ष बारीक आहे. इथे एडीट कसं

Anand More
Fri, 12/04/2015 - 17:37 नवीन
लक्ष बारीक आहे. इथे एडीट कसं करायचं ते काळात नाहीये. खेडूत मदत करतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

एक मिपाकर...

चांदणे संदीप
Fri, 12/04/2015 - 17:51 नवीन
एक मिपाकर... सवा लाख बराबर! अस काहीस आहे बघा, नजरेतून सुटण शक्यच नाही! प्रत्यक्ष अनुभव हीच खात्री! ;-) बाकी, सुटलेल्या पोटाची कहाणी(ण्या) येऊद्या अजून, मस्त आहे! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

अहो मिपाकर जर मदत करा. भिडू

Anand More
Fri, 12/04/2015 - 17:56 नवीन
अहो मिपाकर जर मदत करा. भिडू नवीन आहे. एडीट कसं करायचं ते सांगा की राव. कुठल्या तरी धाग्याची लिंक तरी द्या. जंग जंग पछाडतोय मी. कसं करू एडीट ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

ते शक्य नाही!

चांदणे संदीप
Fri, 12/04/2015 - 18:06 नवीन
संपादकांना व्यनितून विनंती करावी लागेल दुरुस्तीसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

धन्यवाद

Anand More
Fri, 12/04/2015 - 18:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हे वाचा

चांदणे संदीप
Fri, 12/04/2015 - 18:09 नवीन
हे आणि हे वाचले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

पुनश्च धन्यवाद :-)

Anand More
Fri, 12/04/2015 - 18:14 नवीन
पुनश्च धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

छान ! पुभाप्र ...

उगा काहितरीच
Fri, 12/04/2015 - 18:03 नवीन
छान ! पुभाप्र ...
  • Log in or register to post comments

:-)

Anand More
Fri, 12/04/2015 - 18:14 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

मस्तं लिहिलंय. पु.भा.प्र.

पद्मावति
Fri, 12/04/2015 - 18:11 नवीन
मस्तं लिहिलंय. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

छांन लेखनशैली.

जातवेद
Fri, 12/04/2015 - 18:14 नवीन
छांन लेखनशैली. तुम्ही ज्युसाहारासाठी योग्य कॅंडिडेट आहात :) (ऑफिस मधल्या पोरिंच्या (फोटोच्या) प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments

बायको केवळ फेसबुकवर आणि

Anand More
Fri, 12/04/2015 - 18:19 नवीन
बायको केवळ फेसबुकवर आणि मिपावरच नव्हे तर घरातही active आहे. आणि माझ्या फोनची तपासणी हे तिचे नैमित्तिक कार्य असल्याने सर्व महत्वाच्या गोष्टी नाशिवंत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

हम्म

जातवेद
Fri, 12/04/2015 - 19:02 नवीन
काळजी घ्या. सज्जनहो, बघताय ना कोनाडयाची गरज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

पोटाचा प्रश्न सुटला कि

सुबोध खरे
Fri, 12/04/2015 - 18:17 नवीन
पोटाचा प्रश्न सुटला कि सुटणाऱ्या पोटाचा प्रश्न चालू होतो. सुटणाऱ्या पोटावर चढणारी चरबी हि सरकारी सबसिडी सारखी असते. कमी करणे फार फार कठीण. सुरेख लेख.
  • Log in or register to post comments

मस्त सुरवात

मी-सौरभ
Fri, 12/04/2015 - 18:22 नवीन
आपण छान लिहिता :) फक्त प्रत्येक प्रतिसादाला ऊपप्रतिसाद देणे टाळा.
  • Log in or register to post comments

बरं … लक्षात ठेवीन. अरे चुकलो

Anand More
Fri, 12/04/2015 - 18:37 नवीन
बरं … लक्षात ठेवीन. अरे चुकलो वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मस्त लिहिलंय!

यशोधरा
Fri, 12/04/2015 - 18:26 नवीन
मस्त लिहिलंय!
  • Log in or register to post comments

लेख आवडला

मित्रहो
Fri, 12/04/2015 - 18:33 नवीन
पुढचे भाग येऊ द्या लवकर. आम्हाला आम्हीच लिहिलेले सुटण्याचे प्रयोग आठवले.
  • Log in or register to post comments

इथे इतिहास अधुनमधून डोके वर

कंजूस
Fri, 12/04/2015 - 18:37 नवीन
इथे इतिहास अधुनमधून डोके वर काढतो हा फरक आहे इथला आणि फेसबुकातला. बाकी ओफिसातल्या सर्व महिलांना मुली म्हणण्याचा प्रघात पाळलात त्यामुळे एक सोडून सर्वांना बरं वाटेल.where are all the girls? हा प्रश्न ऐकून मला अजूनही बुचकुळ्यात पडायला होतं ते त्याचं ग्रामर न कळल्याने.लिहित रहा, संपादक मागच्या गाडीने येतीलच इतक्यात.
  • Log in or register to post comments

वा सुटलेल्या ढेरीची कहाणी

पियुशा
Fri, 12/04/2015 - 18:56 नवीन
वा सुटलेल्या ढेरीची कहाणी मोरे साब की ज़ुबानी येउ दया पु भा प्र
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

रेवती
Fri, 12/04/2015 - 19:42 नवीन
लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

कहाणी आवडली.

दमामि
Fri, 12/04/2015 - 19:56 नवीन
कहाणी आवडली.
  • Log in or register to post comments

जमळ णा...

बाबा योगिराज
Fri, 12/04/2015 - 20:08 नवीन
लै म्हणजे लगे लैच जिव्हळ्याचा ईशाय हाय ह्यो.... कोनाडा कुठै?? चिंतातुर बाबा
  • Log in or register to post comments

आवडल. पुभाप्र. :)

रातराणी
Sat, 12/05/2015 - 04:52 नवीन
आवडल. पुभाप्र. :)
  • Log in or register to post comments

वा वा! पुभाप्र!

बोका-ए-आझम
Sat, 12/05/2015 - 10:41 नवीन
(गेली तीन वर्षे हाच प्राॅब्लेम असलेला) बोका-ए-आझम!
  • Log in or register to post comments

तेवढा ..

रिम झिम
Sat, 12/05/2015 - 10:56 नवीन
तेवढा, तुमचा तो फोटोपण टा़का ना... (जाहिरात - आम्ही येथे लिहीतो)
  • Log in or register to post comments

वाह!!

सूड
Mon, 12/07/2015 - 19:00 नवीन
वाह!!
  • Log in or register to post comments

मजेशीर!

पैसा
Tue, 12/08/2015 - 10:35 नवीन
खूप मजेशीर लिहिलंय!
  • Log in or register to post comments

+१ मस्त लिहिलय अगदि!

इशा१२३
Tue, 12/08/2015 - 11:44 नवीन
+१ मस्त लिहिलय अगदि!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा