Skip to main content

आस्तिक वैज्ञानिक

लेखक यनावाला यांनी मंगळवार, 01/12/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:- पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या. ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो." काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात. ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्‍या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.

वाचने 69674
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

In reply to by राही

निषेध जागच्या जागी नोंदवला नाही तर साय्लेंट मेजॉरिटीला काही अर्थच राहात नाही. केवळ म्हणून. निषेध नोंदवण्याची निकड लक्षात आणुन देण्यासाठी धन्यवाद ! पुर्णपणे सहमत आहे यनावाला विरोधी विचार मांडत आहे जे आवश्यक आहे. सतत एकांगी विचारांचा मारा झाल्याने विरोधी विचार जणु अस्तित्वात नाहीच अशी काहीशी धारणा तयार होते. कम्युनिस्ट शासनात काही ठीकाणी जसं विरोधी मत व्यक्त करणंच फार मोठं पाप मानल जायच अस काहीसं वातावरण निर्माण करणं फार चुक आहे. हे विचार बीजपेरणी या द्रुष्टीने महत्वाचे आहेत. एक विरोधी विचार मनासमोर आल्यावर जरी त्याला बळजबरीने विना तर्क भावनिकतेने च उडवुन लावला तरी तो कुठेतरी अंतर्मनात खोलवर जाऊन रुजलेला असतोच. तो नंतर अनुभव चिंतन आदीत पुन्हा उफाळुन वर येत असतो. विचार-बीज रुजवणं महत्वाचं ते काम यनावाला उत्तम संयत शैलीत करत आहेत. त्यांना प्रतिवाद न करता सतत व्यक्तीगत हल्ले करण्यातुन तो त्यांचा विचार कीती आतपर्यंत रुजलाय व अस्वस्थ करतोय. हे दिसुन येत आहे. पुर्वीचे प्रतिवाद काही किमान काही तरी मुळ मुद्द्याच्या जवळपास तरी होते. आता तर एक नविनच असंबद्ध कीती असावा प्रतिसाद याचा एकेक उच्चांक बघायला मिळतोय. यनावाला यांना दिल्या जात असलेल्या व्यक्तीगत व असंबद्ध प्रतिसादांचा निसंदिग्ध निषेध नोंदवतो. यनावाला तुम्ही लिहीत रहावे ही विनंती.

In reply to by मारवा

मारवाजी लिहितात,
"हे विचार बीजपेरणी या दृष्टीने महत्वाचे आहेत. एक विरोधी विचार मनासमोर आल्यावर जरी त्याला बळजबरीने विनातर्क भावनिकतेनेच उडवुन लावला तरी तो कुठेतरी अंतर्मनात खोलवर जाऊन रुजलेला असतोच. तो नंतर अनुभव चिंतन आदीत पुन्हा उफाळुन वर येत असतो........त्यांचा प्रतिवाद न करता सतत व्यक्तीगत हल्ले करण्यातुन तो त्यांचा विचार कीती आतपर्यंत रुजलाय व अस्वस्थ करतोय.हे दिसुन येत आहे."
हे अगदी खरे आहे हे दिसतेच. धन्यवाद मारवाजी. तुम्ही केलेले विश्लेषण मूलभूत आणि मार्मिक आहे. तुम्हाला या विषयाचे नेमके आकलन झाले आहे.

In reply to by यनावाला

आम्हालाही झालेच आहे हो! स्वमतांध दांभिक यापेक्षा जास्त विचार करत नाहीत ते. तुमच्या मनातले आम्ही पेरेलेले विरोधी विचार कधी उफाळून वर येतील आणि त्याचा आपण योग्य तो प्रतिवाद कराल याची वाट पाहतोय.

In reply to by राही

>>>>> जालीय नवनवी पिढी खरंय. शालेय अभ्यासक्रमासारखं नवीन सदस्याना एक एक टॉपिक देऊन अनुषंगानं येणारे तेच विषय frequently asked questions म्हणून एका सामान्य माहिती आणि उत्तरांसह (उत्तर काय असावं याबाबत अनेक पर्याय असू शकतात पण तिथं एक विषयाला सुसंगत उत्तरांचा साठा तयार होईल) दिले गेले पाहिजेत. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न तिथंच उपस्थित व्हावेत त्याची उत्तरं देता यावीत. नवीन सदस्यांना नवीन वाचकांना आपल्या डोक्यात आलेला विषय हा आपल्यालाच प्रथम सुचलेला आहे असा समज असतो. कधीतरी थोडा मोठेपना वाटत देखील असतो. सात आठ वर्षातले चर्चान्चे पॅटर्न बघता प्रत्येकाला आपल्याच विचारात काही बदल झालेले समजून येतील. ठामपणं एखाद्या गोष्टीचं समर्थन करणारा विरोधक झालेला असू शकतो. आणि उलट देखील.

In reply to by राही

म्हणून जालीय नवनवी पिढी या विषयांवरचे लेखन थांबवते का?
नव्या पिढीनी लिहीले तर चालेल ना, पण इथे पुराणकाळातील आजोबा त्याच त्याच जिलब्या नव्या जोमाने पाडतायत. वर सर्वांना त्या आवडल्याच पाहिजेत असा अट्टाहास पण आहे.

In reply to by अभिजित - १

लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे, त्याच्यावर वैयक्तिक टिप्पणी करणे हे प्रकार हास्यास्पद आणि बालिश आहेत! (माझे हेच मत मोदींना फेकू, राहुल ला पप्पू आणि इतर नावे पडणार्यांच्या बाबतीतही आहे, उगाच तुम्हालाच बोलतोय असे नाही) जर तुमच्याकडे प्रतिवाद करायला मुद्दे असतील तर त्यावर बोला, संदर्भ द्या! बाकी 'US जे मानतो ते आम्ही पण मानणार' किंवा 'आधी "त्यांना" सांगा मग आम्हाला' हे असली वाक्य बिनकामाची आहेत. या लेखात तरी त्यांनी आस्तिक असलेल्या लोकांना मूर्ख महामूर्ख म्हटलेले दिसले नाही मग हा मुद्दा इथे का यावा?

In reply to by शब्दबम्बाळ

मला वाटलं मिपा वरील आयडी आहे. क्षमा असावी यनावाला आणि धन्स शब्दबम्बाळ. नावाची खिल्ली उडवायला माझा पण विरोध आहे.

जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
मजाच म्हणायची. एक गोष्ट समजत नाही.या नास्तिक लोकांना आपण नास्तिक असल्याचा इतका अभिमान का असतो?या असल्यांच्या अभिमानापुढे अमुक जातीत किंवा धर्मात जन्माला आल्याचा अभिमान धरणाऱ्या हजार लोकांचे अभिमान कमीच पडतील. मला वाटत होते की आस्तिक किंवा नास्तिक असणे ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे. एखाद्या वैयक्तिक गोष्टीसाठी माणूस जगप्रसिध्द वगैरे होतो?

In reply to by गॅरी ट्रुमन

एखाद्या वैयक्तिक गोष्टीसाठी माणूस जगप्रसिध्द वगैरे होतो? अभिमान बाळगणे चुकच या तुमच्या मुद्द्याशी पुर्णपणे सहमत आहे. आस्तिक वा नास्तिक वा कोणती विचारधारा असल्याचा अभिमान बाळगणे चुकच आहे यात काहीच शंका नाही. आता ते रीचर्ड डॉकीन्स जगप्रसिध्द नास्तिक म्हणत आहेत ते अशासाठी की रीचर्ड डॉकीन्स एक शास्त्रज्ञ म्हणुन एक अनेक विख्यात ग्रंथांचा लेखक म्हणून अनेक जाहीर वाद विवादांत विशीष्ट विचारसरणीच्या बाजुने मते मांडण्यासाठी खरोखरच प्रसिद्ध आहे. ते अ‍ॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट मांडले तर गैर काय ? ती नुसती वैयक्तीक बाब त्याच्यासाठी नाही तो एक वैचारीक लढा आहे. जो तो अनेक वर्षांपासुन लढतोय.

इतर धाग्यांवरील प्रतिसादांवर प्रतिवाद न करता डायरेक्ट नवीन धागा. याला पण उत्तर द्या की जरा. परत तुम्ही संस्कार आणि प्रथा यांची सरमिसळ करताय. कुठल्या प्रथा पाळायच्या किंवा नाही हे संस्कारातून शिकता येतं. देवाला नमस्कार करायचा की नाही हे वैयक्तीक आहे. पण पूर्णपणे कर्मकांडांच्या मागे लागू नये हेही तितकाच खरं. मुलांना संस्कार देऊ नयेत असं आपलं म्हणणं नसावं अशी आशा करतो. आत्ता आपल्याला माहीत असलेलं विज्ञान हे परिपूर्ण आहे अशी आपली समजूत आहे का? डार्विनने सिद्धांत मांडला त्यावर आपण अजून विश्वास ठेवून चाललोय. पण त्यालाही प्रतिवाद आहेतच. ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी झाली म्हणताय पण म्हणून मानवाच्या मनातून कशी होईल? यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) हे तत्व फक्त इतके जैववैविध्य कसे आहे हे सांगते. का आहे कसे झाले हे सांगते का? का सगळी माणसे एकसारखी नाहीत याचे स्पष्टीकरण आहे का? सध्या चेन्नई मध्ये पडत असलेला तुफान पाऊस कश्यामुळे पडतोय ते माहीत आहे का? इतर नैसर्गिक उत्पात जे होत आहेत ते खरंच कश्यामुळे होतात आणि ते थांबवायचं सामर्थ्य आपल्यात आहे का? जसे तुम्ही फक्त नास्तिक लोकांची उदाहरणे देताय त्याप्रमाणे आस्तिक लोक पण आहेतच. सगळेच आस्तिक फक्त कर्मकांड करत बसतात का? का आस्तिकांच्यातले १०% लोक पण उच्चशिक्षण घेतलेले नाहीत?

दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही सर खरंच सांगा, हायपोथेसिस किंवा सिंपल एन्युमरेशन या वैज्ञानिक पद्धतीपण हेच तत्व गृहित धरतात की. मी तुमच्या पहिल्या लेखापासून तुम्हाला हाच प्रश्न विचारत आलोय. पण तुम्ही काय उत्तरच देत नै सर!

In reply to by मांत्रिक

इथेच तर थिअरम मार खातो. कारण मग रिग्रेशननी : `नियम करणार्‍याला कुणी निर्माण केलं' असा प्रश्न केला की खेळ खलास!

बाकी सगळं जाऊं दे. खुद्द आपण नेमके कश्यामुळे प्रकट झालो या गोष्टीचा कधी सखोल विचार करुन पाहा! आणि वाट्टेल तो शास्त्रज्ञ आणा घंटा उत्तर मिळणार नाही.

In reply to by विवेक ठाकूर

तुम्ही उत्क्रांतीविषयी काही वाचलेलं नाहीये का? अज्ञानाचं इतकं उघड प्रदर्शन करायला मी तरी लाजलो असतो बुवा. थोडं गूगललं तर ज्ञानाचं भांडार मिळतं. माणसाची उत्क्रांती कशी झाली... http://humanorigins.si.edu/education/intro-human-evolution https://en.wikipedia.org/wiki/Timeline_of_human_evolution उत्क्रांती म्हणजे काय? हे समजावून देणारे तर इतके संदर्भ आहेत की मी नुसतं गूगल सर्चचं पेज देतो आहे. https://www.google.com/search?q=what+is+evolution%3F&ie=utf-8&oe=utf-8

In reply to by संदीप डांगे

अरे वा, केंट होविंड!! अहो तो म्हणतो की पृथ्वी सहा हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली! आणि त्याच्या भंपक युक्तिवादांवर त्याचे समविचारीही विश्वास ठेवत नाहीत. Kent E. Hovind (born January 15, 1953) is an American Christian fundamentalist evangelist and tax protester. He is a controversial figure in the Young Earth creationist movement and his ministry focuses on attempting to convince listeners to deny scientific theories including evolution, geophysics, and cosmology in favor of a literalist interpretation of the Genesis creation narrative found in the Bible. Hovind's views, which combine elements of creation science and conspiracy theory, are dismissed by the scientific community as fringe theory and pseudo-scholarship. Moreover, he has been criticized by Young Earth Creationist organizations like Answers in Genesis for his continued use of discredited arguments that have been abandoned by others in the movement. तुम्हाला मी चांगले संदर्भ दिले, त्यात तुम्हाला उत्तरं सापडतील अशी आशा होती. तर ती उत्तरं शोधण्यापेक्षा कोणीतरी वायझेड माणूस काय म्हणतो आहे याच्या लिका काय देताय मला? तुम्हाला उत्तरं सापडल्याने अधिक आनंद होईल की काही न तपासता यनावालांचं म्हणणं खोडायचंच म्हणून खोडण्यात आनंद मिळेल?

In reply to by मांत्रिक

केंट हॉविंडला मी जरूर वायझेड म्हणेन. सहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली यावर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का? बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचं? एकंदरीत तुम्हाला उत्तरं शोधण्यात आनंद आहे की व्यक्तिगत हल्ले करण्यात आनंद आहे ते कळलं. धन्यवाद. आणि हो, मी दिलेल्या लिंका कृपा करून जरा नजरेखालून तरी घाला हो.

In reply to by राजेश घासकडवी

साहेब केंट हाविड आमचा आदर्श नाहीये. एक उदाहरण दिलं गेलं असेल. जौ देत. आमचा आदर्श ज्ञानोबा तुकोबा नामया हेच आहेत. हे तीन ग्रेट सोल्स काय म्हणले हे तुम्हाला कळत नसेल तर तुमची जिणगाणी व्यर्थच म्हणेन. नीट वाचा त्यांना. बाकी तुमची हिंदु धर्माविषयी संस्कृतीविषयी पुराणी मळमळ जळजळ माहितेच.

In reply to by मांत्रिक

त्यांनी उत्क्रांतीविषयी काय लिहिलेलं होतं ते वाचायला आवडेल. आणि यात हिंदू धर्माचा काय संबंध आला? तुम्ही विचारलं की 'घंटा एकाही शास्त्रज्ञाला माणूस कसा झाला हे माहीत नाही.' मी म्हटलं नाही, हे चुकीचं आहे - आणि ते सांगणाऱ्या लिंका दिल्या. त्या मुकाट्याने वाचून प्रतिवाद करण्याऐवजी कोणीतरी यडपट त्याला होक्स म्हणतो हे सांगितलं. नंतर तुमचीच लाल, हिंदू धर्माविषयी मळमळ, जळजळ वगैरे काहीतरी निरर्थक बडबड करत आहात. असो. तुमच्यासमोर गीता वाचायची नाही असं ठरवलं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

त्यांनी उत्क्रांतीविषयी काय लिहिलेलं होतं ते वाचायला आवडेल. त्यांनी उत्क्रांतीविषयी का लिहावं. ज्ञानोबाला तुकोबाला जो विषय समजत होता त्याविषयी त्यांनी लिहिलं. त्यात चुकिचं काय? तसंही ज्यातील आपल्याला काय कळत नाही त्यावर लिहायला ते स्वमतांध दांभिक नाहीत....

In reply to by मांत्रिक

एकंदरीत तुम्हाला उत्तरं शोधण्यात आनंद आहे की व्यक्तिगत हल्ले करण्यात आनंद आहे ते कळलं. धन्यवाद. सर तुम्ही किती व्यक्तिगत हल्ले केले व त्यावर काय काय भयानक प्रतिसाद दिले गेले हे चांगलंच माहिते. तुमी तरी दुसर्याला व्यक्तिगत हल्ले करणारा म्हणू नये!!!

In reply to by मांत्रिक

आपण दुसरी बाजु वाचण्याचीही गरज समजत नाही ठीक आहे. आपण वरील ज्या संतांची नावी सांगितली त्या संदर्भात आपली चर्चेची तयारी आहे का ? म्हणजे मी आपणास असे सांगुन उपयोग नाही की आपण गॉड डेल्युजन वाचावं म्हणुन मी म्हणतोय ठीक आहे तुमच्या निर्देशीत केलेल्या वरील संताच्या संदर्भातुन चर्चा करण्याची आपली तयारी आहे का? तुम्हाला प्रश्न ही कमीत कमी विचारतो सरळ विधाने मांडतो तुम्ही त्यावर काय भुमिका आहे ती मांडावी. आहे तुम्हाला खरोखर गंभीरपणे रस ? मला तुमच्याविषयी अजुनही पुर्ण खात्री आहे की तुम्ही अजुनही एका सकारात्मक दिशेने चर्चा कराल कदाचित तुम्ही मला एखादा नविन विचारही देऊ शकता यावीषयी देखील माझ्या मनात शंका नाही हे प्रामाणिकपणे सांगतो. अजुन एक आवर्जुन सांगतो राजेशजी तुमच्याशी अत्यंत पोटतिडीकीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना व्यक्तीगत ओळखत नाही मी त्यांना तुमच्याइतकाच केवळ आंतरजालीय वावरातुनच ओळखतो त्यावरुन सांगतो त्यांचा उत्क्रांती या विषयाचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे. तुम्ही किमान एकदा तरी त्यांनी दिलेल्या लिंका संदर्भ तपासुन पाहण्याची तसदी घेतली असती तर कदाचित तुम्हाला एक नविन विचार मिळू शकला असता. अजुन एक मी कधीही असे म्हणत नाही की तुम्ही माझ्याच विचारांशी सहमत व्हाच कधीच नाही मात्र मी असे म्हणतो की तुम्ही किमान एका सकारात्मक रीतीने असंबद्धता व्यक्तीगतता टाळून गंभीरतेने वरील प्रकारच्या विषयांवर संवाद अ‍ॅक्टीव्हली तरी साधावा म्हणजे अशी नम्रपणे सुचवणी करतो. तुम्ही असहमत पुर्णपणे झाला अशा चर्चेअंती तरी त्याने काहीच फरक पडत नाही म्हणजे त्यात काहीही गैर नाही, मात्र एकदा स्वतंत्रपणे तुम्ही विषयाला भिडुन तर बघा असे सुचवितो मांत्रिक जी मी तुम्हाला वेगळा किंवा शत्रु कींवा आस्तिक गटातला यापैकी काहीही समजत नाही. मला तुमच्याविषयी आस्था एक व्यक्ती म्हणुन आहे. आणि राहील तुमची कुठलीका विचारधारा असेना.

In reply to by राजेश घासकडवी

बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचंयातूनच कळतं की तुम्ही पवित्र बायबलच्या गहन गूढ अर्थावर विश्वास ठेवता. मग भगवान येशू ख्रिस्त म्हणाला कीः 'अहो कष्टी व भाराक्रांत जनहो! तुम्ही मजकडे या! मी तुम्हाला विसावा देईन!!!' हे वाक्य कुठलाही स्वमतांध दांभिक विज्ञानी म्हणेल काय? नाही! तो म्हणणार की प्रत्येक जीव डीएनए अनुसार भिन्नच आहे. मी त्याला आपला का म्हणू????? ही बात आहे सर. विज्ञान बरोबर असून पण भेदभाव निर्माण करते तर अध्यात्म त्या भेदभावाला कवेत घेऊ बघते!!!

In reply to by मांत्रिक

भगवान कृष्ण म्हणतो: अनन्याश्चिंतयतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम् योगक्षेमम् वहाम्यहम्!!! हे आश्वासन स्वमतांध दांभिक विवेकवादी, विज्ञानवादी किंवा त्यांचे हिरवे चिल्लेपिल्ले, आपल्यासारखे, देऊ शकतात? खरंच सांगा?

In reply to by राजेश घासकडवी

श्री.रा.रा.रा.घासकडवी, तुमचे खालील म्हणणे योग्य आहे.
सहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली यावर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का? बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचं?
वास्तविक जग समुद्रमंथनाच्या वेळी तयार झालंय. चौदा रत्नं म्हणजे मूळ चौदा जीवजाती. तुम्ही समुद्रमंथनाचा अभ्यास केलाय का? नसल्यास आधी करुन या आणि मग बघू. उगीच सगळीकडे उत्क्रांती उत्क्रांती करत असता. सोडा ही आंधळी डार्विनपूजा.

In reply to by राजेश घासकडवी

अहो सर. मी फक्त एक मुद्दा मांडला आहे. तुम्ही ज्या लिंका दिल्यात त्याविरोधातही काही आहे हे सांगण्यासाठी. बाकी डिटेलमधे चर्चा करायला एक वेगळा धागा हवा असे मीच म्हटले आहे. मी विडियो दिला म्हणजे मला त्याचे सगळेच दावे मान्य आहेत असे नाही. पण बिगबँग थेरी व हुमन एम्ब्रायो बद्दल आहे तो एक विचारात घेण्यासारखा मुद्दा तर आहे की नाही. तो पृथ्विचं वय सहा हजार वर्षे सांगतो म्हणून त्याचे सगळेच विचार नाकारले पाहिजेत का? हजार वाक्यातले दोन तर ग्राह्य असतीलच की. मी फक्त चर्चेसाठी मुद्दा दिलाय. त्यात अधिक अभ्यास करून विस्तृत लेख लिहिता येइलच. आजवर इवॉल्युशन थेरी हीच नेहमी समोर येत राहिली आहे. त्या विरोधात विचार आहेत (भले ते चुकीचे, बरोबर कसेही) हे कधी सांगितल्या जात नाहीत. निदान शाळेत तरी. इवॉल्युशन थेरीचा विरोध करणारे अनेक आहेत, त्यांचेही अभ्यासपूर्ण दावे आहेत हे आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत कधी पोचले नाहीत. त्यांच्या दाव्यांचा मी अभ्यास करत आहे. काही समजलं अन् जमलं तर लेख टाकेन. नेहमीच इवॉल्युशन थेरी तोंडावर फेकून मारणारे पाहिलेत पण त्याच्यातही लूपहोल्स आहेत असे सांगणारे, त्यावर चर्चा करणारे आजवर कुणी भेटले नाही. म्हटलं आपण करुया सुरुवात. तर वैज्ञानिक विचारसरणीचे लोक लगेच वायझेड म्हणून मोकळे होतात. बाकी, कुणाला वायझेड म्हणायचे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मी तरी कुणालाच वायझेड म्हणत नाही. अस्तिक असो वा नास्तिक. वैज्ञानिक असो वा सामान्य. असो.

In reply to by संदीप डांगे

जरूर. असं करूया, मी एक उत्क्रांतीविषयी लेखमाला लिहितो, तुम्ही उत्क्रांतीतली लूपहोल्स सांगणारी लेखमाला लिहा. आपली जी चर्चा होईल त्यातून अनेकांना शिकायला मिळेल. पण कृपया त्यासाठी केंट होविंड वगैरेंसारख्या बोगस लोकांचे आधार घेण्याची गरज नाही. उत्क्रांतीवादाचं सध्याचं स्वरूप असं आहे की त्यातल्या मूलभूत तथ्याला कोणीच विरोध करत नाही. काही बारीकसारीक गोष्टी नक्की कशा घडल्या असाव्यात याबद्दल वाद आहे - आणि अशा वादांतूनच कुठचंही ज्ञान हळूहळू पुढे जातं, थियरी फाइन ट्यून होत जाते. पण आत्तापर्यंत उत्क्रांतीवादाला इतके प्रचंड आणि भक्कम पुरावे आहेत की उत्क्रांती झाली हे नाकारणं अशक्य आहे. मूळ मुद्दा असा आहे की 'वैज्ञानिकहो, तुम्ही एवढे शहाणे समजता, तर याचं उत्तर द्या पाहू!' अशा आव्हानांना बहुतेक वेळा अर्थ नसतो. कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत हेही लोकांना माहीत नसतं. उत्तरं शोधण्यापेक्षा त्या प्रश्नांच्या गूढपणातच वावरायला आवडतं. हे मी तुमच्याविषयी नाही, तर काही लोकांमध्ये दिसणाऱ्या प्रवृत्तीविषयी बोलतो आहे. तीनशे वर्षांपूर्वी माणूस कसा निर्माण झाला, उत्क्रांत झाला हे कोणाला माहीत नव्हतं. त्यावेळी कोणी न्यूटनला म्हटलं असतं 'आलाय मोठा शहाणा आम्हाला गुरुत्वाकर्षण शिकवायला. म्हणे सूर्याभोवती पृथ्वी फिरते! अरे भल्या माणसा, आधी तुझा जन्म कसा झाला ते सांग. नाही येत ना सांगता, मग तुझ्या विज्ञानाला काय अर्थ आहे? यावरून देवच श्रेष्ठ आहे, त्यानेच सूर्यचंद्रपृथ्वी बनवले आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हेच सिद्ध होतं' पण या युक्तिवादाला अर्थ आहे का? त्याने त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खोटा ठरतो का? असो. स्वतंत्र लेखनच होऊन जाऊदेत या विषयांवर.

In reply to by राजेश घासकडवी

लिहाच तुम्ही, विज्ञान हे माणसाला प्रश्न विचारायला शिकवत आणि त्याची उत्तरे शोधायला प्रवृत्त करते. पण धर्म मात्र जणू प्रश्न विचारण्यालाच आक्षेप घेतो (इथे धर्मापेक्षा त्याचे 'रखवालदार' असे म्हणणे योग्य ठरेल) माणसाला सृष्टीविषयी सगळी माहिती नक्कीच नाही पण ज्या गोष्टीविषयी माहिती नाही अशा गोष्टींची माहिती मिळवण्याची धडपड वैज्ञानिकांनी थांबवलेली नाही. वेगवेगळी प्रमेय सिद्धांत मांडले जातात त्यांवर चर्चा होते, काही टिकतात तर काही कालबाह्य होतात. आणि हाच मोठा फरक आहे! विज्ञान कालबाह्य झालेल्या गोष्टीना सोडून देण्यास मागेपुढे पहात नाही. समोर दिसणाऱ्या सिध्द झालेल्या सत्याला स्वीकारण्याची त्याची वृत्ती आहे. Conspiracy theories ना सत्य मानणारेदेखील बरेच असतील आणि त्याकडे दुर्लक्ष्यदेखील करता येत नाही कारण जोपर्यंत एखादी गोष्ट नाही हे सिध्द होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याकडे दुर्लक्ष्य करू शकत नाही. म्हणूनच आस्तिक-नास्तिक वाद अजूनही आहे. आणि वाद असण्यात काहीच गैर नाही पण आपण नकळत सत्याला नाकारून केवळ धर्म संरक्षण तर करत नाही ना हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण केवळ धर्म संरक्षणासाठी चर्चनी गलिलेओचे हाल हाल केले आणि धर्माच्या पगड्यामुळे लोकांनीही विरोध केला नाही. तब्बल ४०० वर्षांनी चर्चनी माफी मागितली! परंतु इतकी वर्ष त्याच्या महत्वाच्या लेखनाला प्रसिद्धी न मिळाल्याने माणसाचेच नुकसान झाले...

In reply to by शब्दबम्बाळ

जोपर्यंत एखादी गोष्ट नाही हे सिध्द होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याकडे दुर्लक्ष्य करू शकत नाही. म्हणूनच आस्तिक-नास्तिक वाद अजूनही आहे.
जोरदार सहमत.. आणि म्हणूनच मी अजून आस्तिक आहे.

In reply to by शब्दबम्बाळ

विज्ञान हे माणसाला प्रश्न विचारायला शिकवत आणि त्याची उत्तरे शोधायला प्रवृत्त करते. बरोबर. माझेही हेच मत आहे. पण काही लोक प्रश्नच चुकीचे आहेत हे सिद्ध करण्याच्या मागे असतात. पण धर्म मात्र जणू प्रश्न विचारण्यालाच आक्षेप घेतो (इथे धर्मापेक्षा त्याचे 'रखवालदार' असे म्हणणे योग्य ठरेल) धर्म विचार करण्याच्या प्रक्रियेलाच आक्षेप घेतो. कारण कळप सांभाळण्याची गरज धर्माच्या रखवालदारांना असते. आणी असा कळप टिकून राहण्याची गरज कळपातल्या मेंढ्यांना असते. माणसाला सृष्टीविषयी सगळी माहिती नक्कीच नाही पण ज्या गोष्टीविषयी माहिती नाही अशा गोष्टींची माहिती मिळवण्याची धडपड वैज्ञानिकांनी थांबवलेली नाही. वेगवेगळी प्रमेय सिद्धांत मांडले जातात त्यांवर चर्चा होते, काही टिकतात तर काही कालबाह्य होतात. माणसाच्या आकलनाला मर्यादा आहेत. पुराव्यांचे इंटरप्रीटेशन करून सिद्धांत/प्रमेये मांडल्या जातात. काही टिकतात, काही टिकत नाहीत याचा अर्थच हा आहे की इंटरप्रीटेशनवर सिद्धांत अवलंबून आहेत. पुराव्यांवर नाही. कारण पुराव्यांना मर्यादा पडतात. कुठल्याही थेरीला नाकारतांना त्यात झालेली नवी संशोधने पुर्वीच्या संशोधनातल्या पुराव्यांच्या उणिवा शोधून काढतात. जरी एखादी थेरी प्रयोग करून निष्कर्ष काढून कितीही समर्थ दिसत असली तरी ती त्या विवक्षित वेळेपुरती समर्थ असते. पुढचे वेगळी संशोधने तिला बाद करतात. हेच विज्ञान आहे. त्यामुळे विज्ञानात कुठलाही शब्द अंतिम नसतो. आणि हाच मोठा फरक आहे! विज्ञान कालबाह्य झालेल्या गोष्टीना सोडून देण्यास मागेपुढे पहात नाही. समोर दिसणाऱ्या सिध्द झालेल्या सत्याला स्वीकारण्याची त्याची वृत्ती आहे. बरोबर, धर्म आणि विज्ञानात फरक आहेच. पण लोक धर्म आणि विज्ञान ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेच मान्य करत नाहीत. बदलत्या काळानुसार लोकांची धार्मिक आचरणं व त्यामागचे विचार बदलत आहेत. यश न देणार्‍या खुळचट मान्यतांच्या मागे न लागता लोक विज्ञानावर आधी विश्वास ठेवतात. पण जिथे विज्ञान उत्तर देऊ शकत नाही तिथे त्यांना धार्मिक आधार लागतोच. पण काही विज्ञानवादी हे समजून न घेता विचित्र वागतात.

In reply to by राजेश घासकडवी

या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! माझेही काहीसे असेच मत उलट प्रकारे आहे. असो. आस्तिकांच्या घट्ट धर्मसंकल्पना, विश्वाबद्दलच्या संकल्पना ह्या मुळापासून उखडण्याचा प्रयत्न झाल्याने हा झगडा उभा राहिला आहे. हा विषय मोठा आहे. एक दोन प्रतिसादात एवढा पसारा मांडणे शक्य नाही. तसेच, बोगसपणाबद्दल म्हणाल तर उत्क्रांतीवाद्यांनीही बराच बोगसपणा केलाय. विस्तृत माहितीपूर्ण लेखांतून चर्चा आवश्यक आहे. याविषयावर मिपावर आधी चर्चा झालेली असेल तर कृपया लिंक द्यावी.

In reply to by राजेश घासकडवी

ही थेरीही बाद झाली म्हणे. cc शाळेत आजवर लाखो मुलांना जे शिकवले गेले ते परत करेक्ट केले का शास्त्रज्ञांनी? कारण मला ही थेरी बाद झालीये हे आजच कळते आहे. माझ्यासारख्या करोडोंना तर गंधही नसेल. वैज्ञानिक विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या स्वयंघोषित विज्ञानपंडीतांनी ह्याबद्दल खरेतर योग्य ती माहिती प्रसाराचे हे काम करणे इतर गोष्टींपेक्षा जास्त आवश्यक आहे.

In reply to by संदीप डांगे

एकुणच एव्होल्युशन ची एकपेशीय जीवा पासुन हळु कळु माणसा पर्यंत चे जीव निर्माण झाली ही थियरी ज्यांना पटते ते चांगलेच अंधश्रद्ध आहेत असे माझे मत आहे. तो सर्व प्रकार म्हणजे कोडेच आहे आणि अजुन तरी त्याला लॉजिकल्/रॅशनल उत्तर सापडले आहे असे मला तरी वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

Evolution च्या वरील चित्रामुळे अशा शंका काढल्या जातात. मुळात Evolution हे एकरेषीय पद्धतीने झालेले नाही, त्यामुळे एकपेशीय पासून पुढे अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी (अमिबा) अजुनही अस्तित्वात आहेच की.

In reply to by मार्मिक गोडसे

now we are challenging our knowledge about things we learned. इथे दोन गोष्टी आहेत. माझ्या माहितीनुसार: १. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून सजीव उत्क्रांत होत गेले. २. अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी अजुनही अस्तित्वात आहे वरच्या पैकी कोणतेही एक वाक्य सत्य असू शकेल. जर परिस्थितीशी जुळवून घ्यायचे तर अमिबा राहणारच नाही. अमिबाही राहत असेल तर परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज का भासावी? अकरावी सायन्सला येईपर्यंत माझा पक्का समज होता की अमीबा ही एक्स्टिंक्ट स्पीसीज आहे. कारण त्याच्यापासूनच आपण उत्क्रांत झालोना? नंतर कळले की असे काही नाही, अमिबा आहे आणि त्यामुळे काही आजारही होतात. ;-) (ही चर्चा ह्याव धाग्यावर करायची की कुणी जाणकार वेगळा धागा काढण्याची कृपा करेल?)

In reply to by संदीप डांगे

इव्हॉल्युशन हे रॉ मटेरीयलवर प्रक्रिया करुन प्रॉडक्ट बनवण्यासारखं नाहि. बीज->अंकुर->रोपटं->ओंबी->गहु->कणिक->पोळी असं त्यात होत नाहि. ते झाडाच्या मुळासारखं असतं. एखाद्या सजीव शरीतात १० क्वालिटी असतील. त्यातल्या ४ नवीन परिस्थितीशी जुळवुन घ्यायला म्हणुन बदलतील. किंवा मूळ सजीव शरीर त्या ४ क्वालिटी रद्द करेल. म्हणजे या तीन संभावना - मूळ शरीर, ४ क्वालिटी बदललेलं शरीर, ४ क्वालिटी रद्द केलेले शरीर - स्वतंत्र शरीर रचना म्हणुन पुढे टिकुन राहायला धडपडतील. स्थल, काल, परिस्थिती आणि शरीर रचनेच्या अनंत कॉम्बीनेशन्स आणि प्रकियांचा परिपाक म्हणजे आज दिसतय तसं सजीव शरीर. अर्थात, हे फार ढोबळ मानाने सुलभीकरण झालं. अवांतराबद्दल क्षमस्व.

In reply to by संदीप डांगे

१. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून सजीव उत्क्रांत होत गेले. २. अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी अजुनही अस्तित्वात आहे
दोन्ही वाक्ये सत्य आहेत. कारण पहिले वाक्य आशयाच्या दृष्टीने अर्धे आहे. ते १. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून काही सजीव उत्क्रांत होत गेले. असे पाहिजे. उत्क्रांती काही स्विच फिरवून झालेली नाही. विशिष्ट प्रजातींमधील काही जीव बदलत्या परिस्थितीला जसे सामोरे गेले त्यावर त्यांची काय आणि कशी उत्क्रांंती झाले हे अवलंबून असते. आता मला सांगा. तुम्ही आणि मी. तुम्ही नाशिकला राहता. मी पुण्यात राहतो. उद्या समजा (समजा हं कारण अवास्तव उदाहरण आहे) पुण्यात पूर आला, आणि मला ४ दिवस पाण्याखाली रहावे लागले, तर माझ्या शरीरात काहीतरी म्युटेशन्स होतील, आणि माणसाअची नवीन प्रजाती तयार होईल. पण म्हणून सगळी मानवजातच नष्ट होईल असे नाही. पण जर माझी म्युटेशन्स फारच वेगळी निघाली आणि जर मी जाऊन बाकी सगळ्यांना मारून टाकले, किंवा जगबुडी आली आणि सगळेच मेले तर मग मात्र मानवजात नष्ट होईल आणि ही नवीन प्रजातच शिल्लक राहील. सगळा प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे हो. मुळात उत्क्रांती म्हणजे परम्युटेशन्स असतात. त्यामुळे एखादा अंतरिम सिद्धांत असा केवळ हायपोथिसिसवर काढणे शक्य नसते.

In reply to by आनन्दा

आहे हो, भरपूर गोंधळ आहे. निदान माझ्या मनात तरी. ह्या विरुद्ध बाजूने विचार आणि अभ्यास करायला सुरुवात आता आता केली आहे. आधी उत्क्रांतीवाद नीट पूर्णपणे समजून घ्यायला लागेल, नंतर त्याचे लूपहोल्स. शाळेत असतांना जेवढे शिकलो तेवढंच माहित असतं. आणि शाळेत कुठे पूर्ण थेरी शिकवतात? डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे असे आहे म्हटले की संपले, चिकित्सा नको, प्रश्न नको. बराच काळ तर 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' म्हणजे 'बलवान असतात तेच टिकतात' असा चुकीचा अर्थ असलेलं वाक्य जनमान्य होतं. आता 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' ह्या थेरीमधेही बराच गोंधळ आहे असं जाणवतं. असो. ह्या चर्चेसाठी वेगळा धागाच लागेल असं दिसतंय.

In reply to by आनन्दा

मुळात उत्क्रांती म्हणजे परम्युटेशन्स असतात
. अगदी योग्य शब्द. तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही. ज्यांचे मुळ पुर्वज एकच आहे असे आपल्या अवती भवती मल्टी ड्रग रेझिस्टंस असलेले व मल्टी ड्रग रेझिस्टंस नसलेले अनेक टी.बी चे जिवाणू एकाचवेळी आढळतात हे कोणाला खटकत का नाही?

In reply to by मार्मिक गोडसे

आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.
प्रश्न हा आहे की खूप पूर्वीचे आणि आत्ताचे "हे" जर अजुन अस्तीत्वात आहेत तर मधल्या काळातले "हे" कसे गायब झाले? कोणी जेलीबीन ची कीटकॅट ऑपोऑप होताना बघितली आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.
नीट समजून घ्या

दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे.
हे आवडलं.

बाकी सगळे जाऊ दे. मला माझ्या २ प्रश्नांची समर्पक उत्तरे द्या म्हणजे मी सुटलो.. १. या ठिकाणी लिहिलेल्या अनुभवांचा कार्यकारणभाव स्पष्ट करा. वर लिहिलेले अनुभव १००% सत्य आहेत, आणि जखमेत किडे पडणे म्हणजे नेमका कोणता आजार आहे हे एखाद्या गावाकडच्याला विचारा. तो त्या आजारचे गांभीर्य सांगेल. एखाद्या बैलाच्या अंडकोषात झालेल्या जखमेत किडे पडले तर त्यावर काय उपचार करतात ते ही विचारा. २. माणूस संमोहित नेमक्या कोणत्या कारणाने होतो? मोठ्या सभागृहात संमोहनाचे प्रयोग करणारे नेमकी कोणती वैज्ञानिक क्रिया वापरतात? आणि जाता जाता अजून एक प्रश्न, संमोहनाला आपण अंधश्रद्धा मानता का? हो तर का? नाही तर का? हो असेल तर मग त्याच संमोहनाचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन करणारे श्रद्धाळूंवर आरोप का करतात?

बाकी सगळे ठीक आहे. पण तुम्ही विशेषत" भौतिकशास्त्रज्ञांबद्दल लिहिले आहे म्हणुन विचारतो "God does not play dice with the universe.” असे कोण म्हणाले होते? ;) शिवाय खालचे वाक्य कोणाचे आहे ते देखील सांगा आणि हा माणूस डार्विनच्या आधीचा की नंतरचा ते पण सांगा. “I want to know how God created this world. I am not interested in this or that phenomenon, in the spectrum of this or that element. I want to know His thoughts; the rest are details.” असले काही बोलणार्‍या माणसाला भौतिकशास्त्राबद्दल फार काही माहिती नसणार असेच आपले मत असेल अशी अपेक्षा करतो.

In reply to by मृत्युन्जय

"God does not play dice with the universe.”
याचा अर्थ आइन्स्टाइन देवावर विश्वास ठेवणारा होता असा घेता येत नाही. खालील चर्चा वाचा. https://www.quora.com/What-did-Einstein-mean-by-God-does-not-play-dice-…

आपल्या लेखात काही गृहितके आहेत जी कदाचित बरोबर नाहीत. उदा. पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते.याचा अध्यारुथ अर्थ असा आहे कि आता माणसाला निसर्ग नियमांबद्दल "बरेच"( सर्व शब्द टाळला आहे) काही माहित आहे. दुर्दैवाने ( दैव मनात असतील त्यांच्यासाठी ) आजही विज्ञानाला ९९.९९ % निसर्गातील गोष्टी माहित नाहीत. जे ज्ञान आहे(असे वाटते) ते बरेचसे वरवरचे आहे. यामुळे कितीही वैज्ञानिक झाला तरी तो एका विशिष्ट टप्प्यावर येतो तेंव्हा त्याची मती कुंठीत होते आणि मग तो एखाद्या अमानवी शक्तीला शरण जातो. मग त्याला तुम्ही जग नियंता म्हणा परमेश्वर म्हणा किंवा अल्ला म्हणा. उदा. चंद्र पृथ्वी भोवती फिरतो याचे कारण गुरुत्वाकर्षण आहे. पण हे गुरुत्व आकर्षणच का?अपकर्षण का नाही? मी जन्माला का आलो? माझे जवळचे नातेवाईक मृत्युमुखी पडले म्हणजे काय झाले. पार्थिव तेथेच आहे पण त्यातील "प्राण" गेला. हा प्राण गेला म्हणजे काय? आपल्या जन्माच्या आधी काय होते? आणि आपले मृत्युच्या नंतर काय होते ? हा शेवटचा प्रश्न तर सर्वानाच भयाकारी वाटतो. अतिशय बुद्धीप्रामाण्यवादी आणि पराकोटीचे नास्तिक असे एक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आपल्या बायपास शल्यक्रियेनंतर आय सी यु मध्ये ventilator वर होते तेंव्हा त्यांचे हृदय नीट चालत नव्हते हृदयाची क्षमता २५ %(ejection fraction) होती. तेंव्हा मी त्यांच्या छातीत पाणी झालेले काढण्यासाठी गेलो होतो. त्याच्या अगोदर त्यांच्या पत्नीने त्यांना कोणत्या तरी गुरूचा अंगारा लावला त्यानंतर त्यांनी भक्तिभावाने त्या गुरुना( किंवा ईश्वराला) नमस्कार केला. आता आता मी त्यांना परत "असहिष्णुता आणि निधार्मिकतेवर" हिरीरीने वादावाद करताना पाहिले. म्हणजे शेवटी स्वतः वर पाळी आली कि असंख्य नास्तिक लोक "आस्तिक" होतात कि नाही ते माहित नाही पण "अगतिक" होताना मात्र पाहिले आहे. नाही देखिले पंचानना तोवरी जंबुक करी गर्जना