काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:-
पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या.
ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात.
ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे.
ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.
वर्गीकरण
वाचने
69541
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे हे....
In reply to नाही देखिले पंचानना (End Of Day), by पगला गजोधर
अध्यारुथ की अध्याहृत?
In reply to आपल्या लेखात काही गृहितके by सुबोध खरे
मुळात निसर्गनियमांविषयी
In reply to आपल्या लेखात काही गृहितके by सुबोध खरे
काय भारी सांगितलंत!! (म्हणजे
In reply to मुळात निसर्गनियमांविषयी by शब्दबम्बाळ
फंडा क्लिअर ठेवा !
In reply to काय भारी सांगितलंत!! (म्हणजे by असंका
इतक्या आत्मविश्वासाने आपण हे
In reply to फंडा क्लिअर ठेवा ! by विवेक ठाकूर
तुम्ही वेळ आहे हे गृहित धरून चाललात!
In reply to इतक्या आत्मविश्वासाने आपण हे by शब्दबम्बाळ
तुमचा प्रचंड मोठा घोळ होतोय!
In reply to तुम्ही वेळ आहे हे गृहित धरून चाललात! by विवेक ठाकूर
तुम्ही वेळेविषयी बोला
In reply to तुमचा प्रचंड मोठा घोळ होतोय! by शब्दबम्बाळ
तुम्हाला खरच चर्चा करायची आहे
In reply to तुम्ही वेळेविषयी बोला by विवेक ठाकूर
तुम्ही वेळ घालवतायं!
In reply to तुम्हाला खरच चर्चा करायची आहे by शब्दबम्बाळ
हाहा मज्जा आहे बुवा!
In reply to तुम्ही वेळ घालवतायं! by विवेक ठाकूर
प्रिन्सिपल ऑफ़ लीस्ट एक्शन
In reply to तुम्ही वेळ घालवतायं! by विवेक ठाकूर
तुला नाहि भास होत ??
In reply to प्रिन्सिपल ऑफ़ लीस्ट एक्शन by कवितानागेश
लेख
मी बोलू का?
+1
In reply to मी बोलू का? by पैसा
लेख आवडला.
अर्थपूर्ण कविता
In reply to लेख आवडला. by मितभाषी
तुमचा दावा हिन्दू धर्मीय देव
In reply to अर्थपूर्ण कविता by यनावाला
त्यांना बाकी काही दिसत नसावं,
In reply to तुमचा दावा हिन्दू धर्मीय देव by pacificready
हे विषयांतर आवडलं
In reply to तुमचा दावा हिन्दू धर्मीय देव by pacificready
देव आणि धर्म या दोन्हीला विष
In reply to हे विषयांतर आवडलं by मारवा
आयला!
In reply to देव आणि धर्म या दोन्हीला विष by pacificready
परिवर्तनवादी किंवा दलित
In reply to आयला! by विवेक ठाकूर
हम्म
In reply to देव आणि धर्म या दोन्हीला विष by pacificready
धन्यवाद सर.
In reply to अर्थपूर्ण कविता by यनावाला
स्वयंघोषित विवेकवादी सभ्य
In reply to धन्यवाद सर. by मितभाषी
संदर्भ
काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतातयातील काही सर्वेक्षणांचा संदर्भ मिळेल का? सर्वेक्षणाची पद्धत, सॅम्पल साईज इत्यादी माहिती मिळाल्याविना सर्वेक्षणाचे निष्कर्ष स्वीकारणं माझ्यासाठी बहुधा अवैज्ञानिक ठरेल.याच्यासाठी कशाला हवाय सर्व्हे
In reply to संदर्भ by आतिवास
यक्षप्रश्न ?
In reply to संदर्भ by आतिवास
यनावाला सर साध्या साध्या
In reply to यक्षप्रश्न ? by मारवा
मी याबाबत थोडा शोध घेतला तर
In reply to संदर्भ by आतिवास
धन्यवाद. थोडक्यात म्हणजे
In reply to मी याबाबत थोडा शोध घेतला तर by राजेश घासकडवी
+१००००००
In reply to धन्यवाद. थोडक्यात म्हणजे by मृत्युन्जय
आताही गेल्या पंधरावीस वर्षात
In reply to +१०००००० by संदीप डांगे
मंदिरातली गर्दी अचानक
In reply to आताही गेल्या पंधरावीस वर्षात by मृत्युन्जय
मन्दिरआत जाणाऱ्या वरुन आणि
In reply to मंदिरातली गर्दी अचानक by संदीप डांगे
थोडक्यात म्हणजे यनावाला
In reply to धन्यवाद. थोडक्यात म्हणजे by मृत्युन्जय
मी इतक्या टोकाचं विधान करणार
In reply to थोडक्यात म्हणजे यनावाला by राजेश घासकडवी
यू ट्युबवरील व्हि.डी.ओ.
In reply to मी इतक्या टोकाचं विधान करणार by मृत्युन्जय
प्रबोधनाने हे धार्मिकतेचे
In reply to यू ट्युबवरील व्हि.डी.ओ. by यनावाला
माझा अनुभव
In reply to यू ट्युबवरील व्हि.डी.ओ. by यनावाला
;-)
In reply to माझा अनुभव by चौकटराजा
All you guys are just
In reply to मी याबाबत थोडा शोध घेतला तर by राजेश घासकडवी
उत्तम लेख आवडला
मागे म्हणल्या प्रमाणे
त्यांची डिक्शनरी लै मोठी आहे.
In reply to मागे म्हणल्या प्रमाणे by प्रसाद१९७१
संसदीय भाषा आहे हो ती.. पण
In reply to त्यांची डिक्शनरी लै मोठी आहे. by मोदक
थांबा.. तुम्हाला नक्की माहिती
In reply to संसदीय भाषा आहे हो ती.. पण by आनन्दा
नास्तिक व्हाय्चा असेल तर
तुमचा पूर्वावतार कुठल्या
In reply to नास्तिक व्हाय्चा असेल तर by काकासाहेब केंजळे
ह्याट राव. काय बी बोलू नका.
In reply to नास्तिक व्हाय्चा असेल तर by काकासाहेब केंजळे
माईच्या नाना गोंधळाला ये रे!!
किंचित भर
In reply to माईच्या नाना गोंधळाला ये रे!! by मांत्रिक
@उजेडपण्ती तेलगाळू गोंधळाला
In reply to किंचित भर by नाखु
नक्की काय सुरुये?
नक्की काय सुरुये?
In reply to नक्की काय सुरुये? by कवितानागेश
आता त्याचा विज्ञानावतार आलाय.
In reply to नक्की काय सुरुये? by अर्धवटराव
एकत्र कट्टा करुयात! सगळे
In reply to आता त्याचा विज्ञानावतार आलाय. by प्रसाद गोडबोले
आस्ति धर्म
पावर आहे !
चला मग आता याचा समेट देवुळ
एकंदरीत पहाता
गाळलेली कविता पूर्ण करा:
:)
In reply to गाळलेली कविता पूर्ण करा: by निराकार गाढव
वाचतोय...
याच का दुसर्या कुठल्यातरी
खरा शास्त्रज्ञ नकारज्ञ नसतो
हा प्रतिसाद अप्रतिम आहे !
In reply to खरा शास्त्रज्ञ नकारज्ञ नसतो by प्रकाश घाटपांडे