- डॉ. सुधीर रा. देवरे
आपण काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. अमूक एका समूहाच्या लोकांनी आमच्या वस्तीत स्वत:चं घर बांधूनच नव्हे तर भाड्याच्या खोलीतही राहू नये असं कोणी ठरवणार असेल तर भयावह आहे. अमूक खाणार्यांनी आमच्या वस्तीत येऊ नये असा फतवा निघणार असेल तर ते त्याहूनही भयंकर आहे. आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही. आपण नेमके आज मानवी समाजात राहतो का आपापल्या जाती- धर्माच्या कळपात राहतो. मानवी समाजात निधर्मी सहजीवन जगता जगता आपण अंतर्गत पातळीवर आपल्या माणसांच्या हिंसक टोळ्या जमवायला लागलोत की काय?
शाकाहार म्हणजे काय? मांसाहार म्हणजे नेमकं काय? अजून कुठूनतरी शुध्द शाकाहार अशीही व्याख्या ऐकू येते. शुध्द शाकाहारी असल्याचा दावा करणार्या जागोजागी हॉटेल्सही दिसतात. हा काय प्रकार आहे? भारतातल्या सर्व जनतेने मांसाहार (मासे, चिकन, मटण आदी) खाणे बंद केले तर भाजीपाला कोणालाच खायला मिळणार नाही. भाजीपाला उपलब्ध झाला तरी गरीबालाच काय मध्यमवर्गीय माणसालाही विकत घ्यायला परवडणार नाही. एकविसाव्या शतकाच्या आणि जगात महासत्ता होण्याच्या गमजा मारणार्या देशात मांसाहार करणार्यांचा व्देष करणे हा रानटीपणा आहे. मांसाहार करणार्यांकडे तुच्छतेने पाहणे हा सुसंस्कृतपणा असू शकतो का?
मनुष्यप्राणी हा मिस्त्र आहारी प्राणी आहे. म्हणजे जो शाकाहार करू शकतो आणि मांसाहारही. माणसांच्या दातांची रचनाही मिश्रआहारी आहे. खरं तर कोणी कितीही दावा करत असलं तरी ते शुध्द शाकाहारी आहेत असं म्हणणं आज धारिष्ट्याचं ठरेल. शाकाहार करण्यामागे कोणत्याही जीवाची हत्त्या करू नये हा विचार असेल तर शाकाहारी लोक भ्रमात आहेत. आपण ज्या हिरव्या भाज्या (वनस्पती) खातो त्याही जीवंत असतात. त्यांच्या जीवाचा बळी देऊन आपण भाज्या खात असतो. प्राण्यांमध्ये जसं लाल रंगाचं रक्त असतं तसं वनस्पतींमध्ये हिरव्या रंगाचं हरितद्रव्य असतं. म्हणून रक्त आणि हरितद्रव्य यांच्याकडे एकाच दृष्टीने पहावं लागेल. रक्ताला पाहून आपण हळहळतो तसे हिरव्या हरितद्रव्याला पाहूनही आपण हळहळायला हवं. सृष्टीत भाज्या वा फळे आपल्यासाठी उगवत नाहीत. आपण त्यांचा खाण्यासाठी वापर करतो. गहू, बाजरी, तांदूळ आदींसह सर्व प्रकारच्या डाळी देणारे धान्यही बीज स्वरूपात असते. या सर्व प्रकारच्या धान्यांपासून जमिनीत रूजून नवीन जीव तयार होणार असतो. त्या बीजाला दळून- भरडून आपण पोळ्या आणि भाकर्यांसाठी पीठ तयार करतो. ही सुध्दा क्रूर हिंसाच आहे. आता कोणी म्हणेल की सृष्टीने वा देवाने भाजीपाला आणि धान्य आपल्याला खाण्यासाठीच उगवले आहे, तर मग इतर प्राण्यांकडेही त्याच दृष्टीने पहावे लागेल. शेवटी फिरून निसर्गाच्या अन्नसाखळीकडेच आपण येतो. दूधाला तरी आज शुध्द शाकाहार म्हणता येईल का? विज्ञान सांगतं, आजचं दूध शाकाहारी नाही. (भाकड वनस्पती आणि भाकड प्राणी यांचं काय करायचं याचा प्रश्न सृष्टीला कधीच पडला नाही. पण भाकड माणसांनी आज जो उच्छाद मांडला आहे तो मात्र नक्कीच चिंताजनक आहे.)
आता प्रश्न उरतो तो अध्यात्मिक आणि धार्मिकतेचा. खरं तर हा आज धार्मिक प्रश्न उरलाच नाही, हा सरळ सरळ राजकीय प्रश्न आहे. माणसं मारायची आणि त्यांच्यावर राजकारण खेळायचं ही मध्ययुगीन पाताळयंत्री व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे, असं नाईलाजाने म्हणावं लागतं. मध्ययुगीन हुकुमशहा राजे- राजवाड्यांनीही इतक्या टोकाचा धर्माचा गैरवापर कधीही केलेला नाही, तितका आज लोकशाही राज्य व्यवस्थेत सत्तेत येण्यासाठी धर्माचा अधर्म केला जातोय.
सात आठ वर्षांपूर्वी ‘बोंबीलचा वास’ नावाची कथा मी लिहून ठेवली आहे. ह्या कथेत बोंबीलच्या वासावरून मैत्री तुटते, हे वाचकांना पटणार नाही असं वाटल्यामुळे ती कथा मी बाजूला ठेऊन दिली होती. (आता रोखठोक 2015 च्या दिवाळी अंकात प्रकाशित.) पण आज मुंबईपासून संपूर्ण देशभर जे काही चाललंय, ते पाहून ही कथा वास्तवापेक्षा फारच गुळमुळीत आहे असं लक्षात आलं. ‘बोंबीलचा वास’ ही कथा आणि ‘देव हातात हात घालून’ ही कविता हे दोन्हीही माझे कलाविष्कार तसे जुनेच. पण जुन्या कथा कवितांना असे नवे दिवस या हिंस्त्र पार्श्वभूमीवर यावेत हे दु:खदायकच. पैकी ‘देव हातात हात घालून’ या कवितेने या लेखाचा शेवट करतो:
आधी डुक्कर मरतं
मग माणसं
अथवा
आधी गाय मरते
मग माणसं.
आधी भगवा जळतो
मग माणसं
अथवा
आधी हिरवा जळतो
मग माणसं.
केव्हा हा ईश्वर हसतो
केव्हा तो देव टाळ्या वाजवतो.
दंगलीची मॅच संपताच
दोन्ही देव खिलाडू वृत्तीने
चेंडूंसारखी माणसं लाथाडून
हातात हात घालून
निघून जातात
आपापल्या पोथ्या पुराणात...
- माणसं
अशा देवांना कवटाळत
कडेकोट घरात लपून बसतात, की
एका अफवेच्या काडीने
घरांतल्या जीवंत माणसांसह आख्खं गाव
जसं होतं की नव्हतंच
बेचिराख...
(दिनांक 15-10-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स – नाशिक विभाग- मध्ये प्रकाशित झालेला लेख सर्वांसाठी पुन्हा देतोय. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
वाचने
22495
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
"माणसांच्या दातांची रचनाही
डॉक्टरसाहेब,
In reply to "माणसांच्या दातांची रचनाही by सुबोध खरे
डॉ.साहेब,
In reply to "माणसांच्या दातांची रचनाही by सुबोध खरे
१. मनुष्यात व्हेस्टिजिअल /
In reply to डॉ.साहेब, by आनंदी गोपाळ
Ketone body utilization
In reply to १. मनुष्यात व्हेस्टिजिअल / by सुबोध खरे
याला काय अर्थ आहे डॉक्टरसाहेब
In reply to "माणसांच्या दातांची रचनाही by सुबोध खरे
लेखात मोदींचा राजीनामा
मोदकराव
In reply to लेखात मोदींचा राजीनामा by मोदक
खिक्क.
In reply to लेखात मोदींचा राजीनामा by मोदक
भौगोलिक रचनेचा
एकाच प्रकारच्या स्पीसीज
In reply to भौगोलिक रचनेचा by मार्मिक गोडसे
वाघ सिंह बिबळ्या आणी चित्ता
In reply to एकाच प्रकारच्या स्पीसीज by संदीप डांगे
भारत हा उष्ण प्रदेश आहे. येथे
In reply to वाघ सिंह बिबळ्या आणी चित्ता by सुबोध खरे
दक्षिणेत थंडीत सुद्धा तसा
In reply to भारत हा उष्ण प्रदेश आहे. येथे by बॅटमॅन
उत्तम प्रतिसाद. धन्यवाद.
In reply to वाघ सिंह बिबळ्या आणी चित्ता by सुबोध खरे
लाल मांस हे हानिकारक आहे
In reply to उत्तम प्रतिसाद. धन्यवाद. by गवि
रेड मीट
In reply to लाल मांस हे हानिकारक आहे by ट्रेड मार्क
लाल मांस म्हणजे नेमके कुठल्या
In reply to लाल मांस हे हानिकारक आहे by ट्रेड मार्क
लाल मांस
In reply to लाल मांस म्हणजे नेमके कुठल्या by बॅटमॅन
धन्यवाद, हे खरेच माहिती
In reply to लाल मांस by सुनील
लेखामधल्या मतांबद्दल काही मत
आहाराचा माणसाच्या
जराशी गडबड झालीये
जैन लोक काही कमी नाहीत
In reply to जराशी गडबड झालीये by ट्रेड मार्क
एवढेच कशाला, मांसाहार करतात
In reply to जैन लोक काही कमी नाहीत by बाजीप्रभू
मारत म्हणजे ठार मारत नाहीत
In reply to एवढेच कशाला, मांसाहार करतात by बॅटमॅन
हिटलर हा पिव्वर व्हेज होता
In reply to मारत म्हणजे ठार मारत नाहीत by ट्रेड मार्क
आणी गांधीजी सुद्धा पुअर व्हेज
In reply to हिटलर हा पिव्वर व्हेज होता by बॅटमॅन
मोदीसुद्धा
In reply to आणी गांधीजी सुद्धा पुअर व्हेज by मृत्युन्जय
संक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा
धन्यवाद डॉक्टरसाहेब
In reply to संक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा by सुबोध खरे
एक निरीक्षण
अहो...ब्लॉगच्या जाहिराती
In reply to एक निरीक्षण by ट्रेड मार्क
डॉ लाख मोलाची बात
lokshahitil rajkaran
‘बोंबीलचा वास’ ही कथा आणि
काय काय माकडं पन पक्षांची
सर्वच माकडे शाकाहारी नसतात.
In reply to काय काय माकडं पन पक्षांची by भीमराव
https://www.youtube.com/watch
In reply to सर्वच माकडे शाकाहारी नसतात. by सुबोध खरे
विरोधाभास?
In reply to सर्वच माकडे शाकाहारी नसतात. by सुबोध खरे
https://www.google.com/search
In reply to विरोधाभास? by पिवळा डांबिस
माहिती नसेल तर विचारा हो!
In reply to https://www.google.com/search by सुबोध खरे
पि डां साहेब
In reply to माहिती नसेल तर विचारा हो! by पिवळा डांबिस
मी स्वतः मांसाहार करतो पण
In reply to पि डां साहेब by सुबोध खरे
हा आक्षेप बरोबर आहे. जो जे
In reply to मी स्वतः मांसाहार करतो पण by पिवळा डांबिस
रच्याकने-- मी मांसाहार करतो
In reply to हा आक्षेप बरोबर आहे. जो जे by सुबोध खरे
पण मांसाहारी लोक पण शाकाहारी
In reply to हा आक्षेप बरोबर आहे. जो जे by सुबोध खरे
तुम्ही सारस्वत आहात का? (
In reply to पण मांसाहारी लोक पण शाकाहारी by पिवळा डांबिस
आरोग्यासाठी सर्वात चांगला
In reply to तुम्ही सारस्वत आहात का? ( by सुबोध खरे
मासा अन्नसाखळीत जितका वर
In reply to आरोग्यासाठी सर्वात चांगला by सुबोध खरे
नाही पुण्याची मोजणी...
In reply to तुम्ही सारस्वत आहात का? ( by सुबोध खरे
पण मी काय म्हणतो काका की सगळे
डॉक्टर राजार महोदय
डॉ साहेब एक प्रश्न की आपण जे
ते काही खावु शकतात आणि
In reply to डॉ साहेब एक प्रश्न की आपण जे by प्रमोद देर्देकर
प्रमोद राव
In reply to डॉ साहेब एक प्रश्न की आपण जे by प्रमोद देर्देकर
काय काय माकडं पन पक्षांची
शास्त्रज्ञांच्या मते
आफ्रिकेत कीटक खातातच लोक.
In reply to शास्त्रज्ञांच्या मते by ट्रेड मार्क
आत्ता कीटक खाणं सरसकट नाहीये
In reply to आफ्रिकेत कीटक खातातच लोक. by बोका-ए-आझम
बाकी किडेबिडे जाऊद्यात, पण
In reply to आफ्रिकेत कीटक खातातच लोक. by बोका-ए-आझम
बस्तरमधले
In reply to बाकी किडेबिडे जाऊद्यात, पण by बॅटमॅन
येस्स्स!!!!!!!!!!! तो एपिसोड
In reply to बस्तरमधले by बोका-ए-आझम
काहीही वाईट नाही त्यात..
In reply to शास्त्रज्ञांच्या मते by ट्रेड मार्क
मी तर फक्त माहिती दिली.
In reply to काहीही वाईट नाही त्यात.. by चिगो
कीटक हे तसेच न देता त्यांचे
In reply to मी तर फक्त माहिती दिली. by ट्रेड मार्क
North east मध्ये ना?
In reply to काहीही वाईट नाही त्यात.. by चिगो
रच्याकने
In reply to North east मध्ये ना? by बोका-ए-आझम
फिरंगी खातात ना?
In reply to रच्याकने by बॅटमॅन
बरोबर..
In reply to North east मध्ये ना? by बोका-ए-आझम