-*******हॅप्पी न्यु इयर*******-------
-*******हॅप्पी न्यु इयर*******-------
३१ डिसेंबरची बेभान रात्र आहे
आसमंतावर गुलाबी थंडीची चादर आहे
सारे वातावरण आनंदाने भरले आहे.
मधुर संगीत चालु आहे, हास्य विनोद होत आहेत
आज प्याला काठोकाठ भरलेला आहे,
फेस पण ओसांडुन वहात आहे
कर प्राशन अन हो स्वार त्या वारुणीवर
विसरुन जा सा~या काळज्या, अन कटकटी
जुन्या वर्षाला निरोप दे .....
अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर
जुन्या मित्रांची आठवण कर
सा~यावर शुभेछ्यांचा वर्षाव कर
नविन मित्रांचे स्वागत कर
मैत्रीचें एक नविन पर्व चालु कर
चषकातली सुरा प्राशन कर.
अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर
आज ग्रुप मधे "ति" पण आली आहे,
जुने गिले,शिकवे विसरुन जा.
गालावर, चुंबनाने प्रेम व्यक्त कर,
नविन तारा पुन्हा जुळु देत
आज ३१ डिसेंबर ची रात्र आहे
तुला आज १०० गुन्हे माफ आहेत
नव्याने प्रेमाचा अध्याय चालु कर
अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर
मागे गेला असेल महिना/दिवस खराब
ते आठवुन नाराज होऊ नकोस
नविन वर्षात यश,समृध्धीची बरसात आहे,
त्या यशासाठी प्रयत्नांचा संकल्प कर
एक गल्लास पोटांत रीचव मित्रा..
अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर
मित्रा आजची रात्र निराळी आहे,
जल्लोशाची आहे, बेभान होण्याची आहे,
टाक झटकुन कंटाळा, अन तो निरुत्साह
जा प्रिय मित्रांच्या घोळक्यात,
त्या मधे फक्त तुझीच कमी आहे.
ग्लासास ग्लास टेकव, हसुन चिअर्स कर
दोन घोट मित्रा, शांभविचे रीचव
जुन्या वर्षाला निरोप दे .....
अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर
अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर
अविनाश
--------*******-------******--------
वर्गीकरण
शांभवी??
In reply to शांभवी?? by प्राजु
असो.. कविता
In reply to असो.. कविता by ३_१४ विक्षिप्त अदिती
दारु पिण्यासाठी..
चांगली
तस रोजच
कविता छानच
दारु..
हेप्पी