Skip to main content

-*******हॅप्पी न्यु इयर*******-------

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 24/12/2008 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
-*******हॅप्पी न्यु इयर*******------- ३१ डिसेंबरची बेभान रात्र आहे आसमंतावर गुलाबी थंडीची चादर आहे सारे वातावरण आनंदाने भरले आहे. मधुर संगीत चालु आहे, हास्य विनोद होत आहेत आज प्याला काठोकाठ भरलेला आहे, फेस पण ओसांडुन वहात आहे कर प्राशन अन हो स्वार त्या वारुणीवर विसरुन जा सा~या काळज्या, अन कटकटी जुन्या वर्षाला निरोप दे ..... अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर जुन्या मित्रांची आठवण कर सा~यावर शुभेछ्यांचा वर्षाव कर नविन मित्रांचे स्वागत कर मैत्रीचें एक नविन पर्व चालु कर चषकातली सुरा प्राशन कर. अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर आज ग्रुप मधे "ति" पण आली आहे, जुने गिले,शिकवे विसरुन जा. गालावर, चुंबनाने प्रेम व्यक्त कर, नविन तारा पुन्हा जुळु देत आज ३१ डिसेंबर ची रात्र आहे तुला आज १०० गुन्हे माफ आहेत नव्याने प्रेमाचा अध्याय चालु कर अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर मागे गेला असेल महिना/दिवस खराब ते आठवुन नाराज होऊ नकोस नविन वर्षात यश,समृध्धीची बरसात आहे, त्या यशासाठी प्रयत्नांचा संकल्प कर एक गल्लास पोटांत रीचव मित्रा.. अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर मित्रा आजची रात्र निराळी आहे, जल्लोशाची आहे, बेभान होण्याची आहे, टाक झटकुन कंटाळा, अन तो निरुत्साह जा प्रिय मित्रांच्या घोळक्यात, त्या मधे फक्त तुझीच कमी आहे. ग्लासास ग्लास टेकव, हसुन चिअर्स कर दोन घोट मित्रा, शांभविचे रीचव जुन्या वर्षाला निरोप दे ..... अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर अविनाश --------*******-------******--------
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3696
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

शांभवी म्हणजे पार्वती असा माझा समज होता.. असो.. कविता ही केवळ दारू ढोस इतकाच संदेश देते आहे. आणि ते करण्यासाठी न्यू यर चीच रात्र कशाला...? कधीही करा... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

असो.. कविता ही केवळ दारू ढोस इतकाच संदेश देते आहे. आणि ते करण्यासाठी न्यू यर चीच रात्र कशाला...? कधीही करा... :-D अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत. हे एकदम भारी बरका :-))

शांभवी म्हणजे पार्वती असा माझा समज होता.. मूळ शब्द शंभू. शांभवी हे पार्वतीचेच नाव. शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत. ही खास मिपाची स्पेशियालिटी!! कविता चांगली आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तस रोजच जेवतो..सणाच जेवण निराळे तस नेहमिच पितो.गटारिच पिण निराळ...३१ दिसेम्बर्च पिण पण निराळ.. अहो पिने वालोको बहाना चाहिये..... ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......ओके चिअर्स......

कविता छानच आहे. हॅपि न्यु इयर टु ऑल ! ( प्या पण जरा जपुन )

असो.. कविता ही केवळ दारू ढोस इतकाच संदेश देते आहे. आणि ते करण्यासाठी न्यू यर चीच रात्र कशाला...? कधीही करा... जबरदस्त प्रतीसाद ---नि३.

हेप्पी न्यु इयर सर्वाना....... ( प्या पण जरा जपुन ) त्यापेक्षा ढोसा पन जरा जपून.. हे कस वाटतये...