टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)
कोणाच्या व्यवसायाबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या पोटापाण्याचा मार्ग असू शकतो.
माझ्या मते या रेम्या डोक्याच्या सिरियल्स समाजाला मानसिकदृष्ट्या अधु करण्याचे काम करत आहेत; मराठी-हिंदी- बहुतेक सगळ्याच. समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच.
महिनोंमहिने वा वर्षानुवर्षे हे दळण दळत राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे असे वाटते. चांगला विषय घेऊन मोजक्या वेळेत तो पूर्ण करणे असे असायला हवे. पण त्याऐवजी प्रेक्षकांना व्यसन लावण्याचे आणि निर्बुद्ध बनवण्याचे काम केले जाते या मतिमंद मालिकांमुळे.
तेव्हा टीआरपी हे तांत्रिक वा आर्थिक कारण असो की इतर काही, हे स्वत:ला विकलेले लेखकच या प्रकाराला जबाबदार आहेत यात शंका नाही.
एरवी कोणतेच काम कमी दर्जाचे नसते. पण हे पांढरपेशे लेखक (खरे तर लेखक म्हणायला हे नालायक - पाट्या टाकणा-या या जातीला समर्पक काहीतरी नवा शब्द हवा. उदा. पोभपाटालेखक - पोटभरूपाट्याटाकणारे लेखक).
मनोरंजनाच्या नावाखाली सतत दुस-याचा मत्सर, कटकारस्थाने, बटबटीतपणा, अतिसोशिकपणा, अचकटविचकट विनोद या गोष्टींचा मारा करत असतात. त्यांना खरोखरच लेखनाची आवड असती तर त्यांनी असे कचरा लेखन केले असते का? त्यामुळे असे विकले जाण्यास त्यांनाच जबाबदार धरायला हवे.
चांगले कार्यक्रम दिले तर कोणाला नको आहेत? टीव्ही पाहण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही वा करायची इच्छा नाही, अशा लोकांनी तो कार्यक्रम पाहिला काय आणि न पाहिला काय, काय फरक पडतो?
वर्तमानपत्रात जे विकते ते छापणा-यांना आपण माफ करतो का? अशांना पोटभरू पत्रकारच म्हणतो ना! क्रिकेटच्या मैदानात केवळ चॅनलला किंवा स्पर्धेच्या आयोजकांना सामना रंगतदार व्हायला हवा म्हणून नको त्या गोष्टी केल्या तर आपण त्या सहन करू का? (मॅच फिक्स्ड की काय हे कळायला सहसा मार्ग नसतो ही गोष्ट वेगळी). प्रत्येकाने आपले काम दर्जा राखून करणेच अपेक्षित असायला हवे ना? तेव्हा हे समाजात उजळ माथ्याने वावरणारे हे समाजद्रोही निव्वळ पोटभरूच आहेत आणि त्यांच्यातले काही जेव्हा उठसुट विविध पुरस्कार स्विकारायला जातात तेव्हा त्या पुरस्काराचे नावही पोटभरू आणि विकला गेलेल्यासाठीचा पुरस्कार असेच हवे.
टीआरपीच्या नावाखाली चॅनलला हवे ते द्यायला यांचे डोके तरी यांच्याकडेच असते ना!
व्यावसायिकता म्हणजे स्वत:ला असे विकणे असे तरी अपेक्षित नको.
कोणी म्हणेल, की दाखवतात ते न पाहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. मात्र ते सोयीस्करपणे विसरतात की जे सुबुद्ध आहेत ते हे टाळू शकतील, किंबहुना पाहिले तरी विसरून जाऊ शकतील. मात्र येथे बहुसंख्य प्रेक्षक तेवढे सुबुद्ध नसतात. यात कोण किती श्रीमंत, किती शिकलेला किंवा अडाणी, कोणत्या समाजातला, हे अध्याहृत नाही. हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा प्रश्न आहे. तेव्हा असेच लोक बहुसंख्येने असतात. अमेरिकेसह अनेक देशांमधील सामाजिक अभ्यासांवरून लक्षात आलेले आहे की अशा मालिका समाजाला निर्बुद्ध, मठ्ठ बनवतात, स्वत:ची विचारशक्ती गमवायला भाग पाडतात, दुस-याचा हेवा, मत्सर, द्वेष करायला शिकवतात. तेव्हा कोणाला या वरकरणी हार्मलेस प्रकार वाटत असेल तर त्यामागचे सत्य हे आहे. तेव्हा यांचे पोट भरावे म्हणून कामाच्या दर्जात तडजोड करणारे हे लोक समाजाचे गुन्हेगारच आहेत.
जे मनापासून वाटते ते लिहीले.
शीर्षकातील लेखक या शब्दापुढील प्रश्नचिन्ह यांना लेखक म्हणावे तरी कसे यासाठी आहे.
आता धडाडू देत तोफा.....मी यापूर्वी ऐकलेले प्रतिवाद....लिहिणारे लिहितात, पाहणारे पाहतात, माझे काय जाते, टीव्हीचा रिमोट तरी आपल्याकडेच असतो ना...तू नॅशनल जिओग्राफिक पहा, तुला कोणी थांबवलेले अाहे.....यात लेखकाचा/लेखिकेचा दोष नसतो, का तर ते जाहिरातदारांच्या म्हणजे टीआरपीच्या रेट्यामुळे मालिकानिर्मात्यांच्या दबावामुळे तसे लिहितात..........वगैरे. तेव्हा यापेक्षा वेगळा प्रतिवाद पहण्यास आवडेल.
वाचने
12230
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर सुखसारक वटी जास्तच गेलिये
मी कधी घेत नाही हो. कमी जास्त
In reply to सर सुखसारक वटी जास्तच गेलिये by स्पा
@सर सुखसारक वटी जास्तच गेलिये
In reply to सर सुखसारक वटी जास्तच गेलिये by स्पा
चांगलंय !!
राकु साहेब
अभ्यासू प्रतिसाद विजुभाऊ!
In reply to राकु साहेब by विजुभाऊ
त्याचा उल्लेख केलाच आहे. पण
In reply to राकु साहेब by विजुभाऊ
सहमत
In reply to राकु साहेब by विजुभाऊ
फार मनाला लावून घेता बॉ
वैयक्तिक (टीकात्मक?) प्रतिसाद
In reply to फार मनाला लावून घेता बॉ by संदीप डांगे
हाताला लागेल असा मुद्दा द्या
In reply to वैयक्तिक (टीकात्मक?) प्रतिसाद by हतोळकरांचा प्रसाद
त्रोटक प्रतिसादातूनही काही
In reply to हाताला लागेल असा मुद्दा द्या by संदीप डांगे
त्याचा उल्लेख केलाच आहे. पण
तर मग स्वातंत्र्य नसलेले काम
तर मग स्वातंत्र्य नसलेले काम करायला हे काही मिलिटरीचे काम नाही. तेथे आदेश पाळावे लागतात.हल्ली कोणलाच कामात स्वातन्त्र्य नसते. गिर्हाईकाची अपेक्षा हाच आदेश असतो.यातून अगदी अमिताभ बच्चन किंवा पंतप्रधान सुद्धा सुटलेले नाहीत.तेव्हा यामागची कारणे न पाहता या वास्तवावर व त्याच्या परिणामांवर भाष्य करणे योग्य.या काँमेन्टवर नक्की काय प्रतिक्रीया द्यावी हे उमगत नाहिय्ये. इतक्या पोकळ विचारावर हसावे की तुम्हाला कारणे न जाणून घेता केवळ फुटकळ प्रतिक्रीयेतून लेखकाना दोषी ठरवून सुळी देण्यात स्वारस्य आहे हे जाणून रडावे हे समजत नाहिय्ये. असो.......... एकूणातच तुम्हाला कुठल्याच बाबीचा खोलवर उहापोह नको आहे हे जाणवले. आता फक्त झाड शोधून पॉपकॉर्न आणतो.........माझ्या होला तुम्ही हो म्हणावे
In reply to तर मग स्वातंत्र्य नसलेले काम by विजुभाऊ
खरं आहे.
In reply to तर मग स्वातंत्र्य नसलेले काम by विजुभाऊ
मुळात पब्लिक दहा-दहा वर्षे या
या धाग्याला भेट द्यावी...
राजेशजी
मी यासंदर्भात आणखी एक-दोन
In reply to राजेशजी by बोका-ए-आझम
ते काहीही असू दे. तुमच्या
अहो तो नावाचा परिणाम आहे.
In reply to ते काहीही असू दे. तुमच्या by संदीप डांगे
भावी
In reply to ते काहीही असू दे. तुमच्या by संदीप डांगे
या
राकु..राकु..राकु..!!!!
एक विचार
टाइमपास म्हणजे प्रत्येकवेळी
In reply to एक विचार by तिमा
अरे आवरा यांना कुणी तरी
सुशमय, एवढे अस्वस्थ होऊ नका.
In reply to अरे आवरा यांना कुणी तरी by धनावडे
मतिमंद म्हणजे काय ?
मंद बुद्धि
In reply to मतिमंद म्हणजे काय ? by मितान
ओह्ह आय सी !!!
In reply to मंद बुद्धि by मयुरMK
=))
In reply to ओह्ह आय सी !!! by मितान
+१
In reply to =)) by अजया
=)) =))
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
बरं, ते तथाकथित लेखक दळभद्री
चर्चा
In reply to बरं, ते तथाकथित लेखक दळभद्री by जव्हेरगंज
चर्चा
अहो, मालिकांमुळे लेखकूच्या
मी या दुष्टचक्रावर एक उपाय
In reply to अहो, मालिकांमुळे लेखकूच्या by विवेकपटाईत
@विषय पुढे जाईल>> काय गरज
In reply to मी या दुष्टचक्रावर एक उपाय by राजेश कुलकर्णी
मस्त
In reply to मी या दुष्टचक्रावर एक उपाय by राजेश कुलकर्णी
राजेश जी
धन्यवाद.
In reply to राजेश जी by मारवा
थिल्लर असल्या तरी अशा मालिका
In reply to धन्यवाद. by राजेश कुलकर्णी
सोशल साईट वर व्यक्त होणे
In reply to थिल्लर असल्या तरी अशा मालिका by कविता१९७८
राजेश जी
In reply to धन्यवाद. by राजेश कुलकर्णी
+१११
In reply to राजेश जी by मारवा
@राकू
वॉव!
राजेश कुलकर्णी सर,
In reply to वॉव! by परिकथेतील राजकुमार
अण्णा? दाऊद? दोघेही नाहीत?...........
अनैसर्गिक...
In reply to अण्णा? दाऊद? दोघेही नाहीत?........... by सर्वसाक्षी
हे काय ! सर अजून शांतच ! उपाय
अगदी वाईट्ट आहेत ही लोक्क्,
In reply to हे काय ! सर अजून शांतच ! उपाय by मितान
राजेशजी
जन हो
सर्वसाक्षी / परा / पेठकर काका
अरे हो विचारायचंच राहिले.
हि मलिका भयानक आहे
.
In reply to हि मलिका भयानक आहे by अविनाशकुलकर्णी
हिराॅइनच.
In reply to . by अन्नू
अगदी खरंय तुमचे
मालिकेची मलिका भयानक आहे!
खरोखरच भयानक आहे. वस्तूतः खर्
रमेश भाटकर वेडा झाला हिच्या
In reply to खरोखरच भयानक आहे. वस्तूतः खर् by पाषाणभेद
हल्ली झी वरच्या मालिकांचा दर्जा ढासळत आहे.