Skip to main content

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 23/11/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

वाचने 448129
प्रतिक्रिया 716

प्रतिक्रिया

In reply to by सुहास झेले

हे OTG supported फोन असला तर -- १)फोनच्या मेमरीमधून पेन् ड्राइववर केबल जोडून डेटा पाठवता येतो का? अथवा/आणि २)पेन ड्राइवचा डेटा थेट फोन मेमरीत घेता येतो का? ३)समजा असं करता येत असेल तर फोन मेमरी करप्ट होण्याचा धोका वाढतो का?

In reply to by कंजूस

हो दोन्ही प्रकारे डेटा ट्रान्स्फर करता येतो.... पेन ड्राईव्ह वायरस स्कॅन केलेला असेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही... फोनमध्ये ही वायरस असू शकतो त्याचीही काळजी घेतलेली बरी :)

मिपावर सर्वाधिक प्रतिसाद संख्येचे पहिले तीन धागे: काल पर्यंत क्र. २ वर हा व काश्मीरचा धागा होता. आज काश्मीरच्या धाग्याला मागे टाकले. अर्थात काश्मीरच्या धाग्याला सक्तीची निवॄत्ती दिली गेली नसती तर चित्र वेगळे असते. या विक्रमाबद्दल धागाकर्ते सुहास झेले, सर्व प्रतिसादकर्ते व मिपावरील सर्व अ‍ॅन्ड्रॉइडप्रेमींचे हार्दिक अभिनंदन अन पंचशतकासाठी शुभेच्छा. बाकी मिपावर ब्लॅकबेरी १० वापरकर्ते एवढे वाढावेत की त्यासाठी स्वतंत्र धागा निघावा अशी इश्वरचरणी प्रार्थना :-) .

In reply to by सुहास झेले

अभिनंदन सुहाससेठ हा धागा मी खुपच इंजॉय केला. मला अँड्राईड काय आहे हे मला माहितीच नव्हतं तेव्हा याच धाग्यावर अँड्रॉइडची ओळख झाली. नोकीया हे पहिलं प्रेम होतं. त्यातही सीस फायली खटपट करुन कष्टम रोम टाकायचो. पण अँड्राईडने मला खुप समृद्ध केलं. चोथा केला अ‍ॅप्लीकेशन्सचा, मोबाईल अनेकदा हँग झाला. रात्र रात्र जागावं लागलं, फोन कंपनीची सर्वीस चांगली होती म्हणुन कधी कधी फोन सॉफ्टवेअर सर्वीस स्टेशनला टाकून मिळाले. काही हँडसेट म्हणजे किमान तीन कंपनीलाही झेपले नाही इतके कोमात गेले. काही रिप्लेस करुन दिले. एकुणच खुप मजा आली. देहभान हरवुन तांत्रिक युगात वावरायला मजा आली. थॅक्स..सुहाससेठ. >>>>> लवकरच ब्लॅकबेरी अ‍ॅन्ड्रॉईड फोन लौंच करत आहेत :) नही, नही, नही.....! असेच असेल तर आम्हीही या धाग्यावरुन रजा घेतो. :( कर चले हम फिदा... -दिलीप बिरुटे

१) लुमिया विंडोज मोबाईलः बिल्ट-इन जे मॅप्स अ‍ॅप्लिकेशन दिले आहे, त्यात प्रीलोडेड मॅप्स येतात. जरी जुन्या वर्जन मध्ये नसले तरी, महाराष्ट्र+गोवा मॅप्स ~२५० एम्बी मध्ये डाऊनलोड होतात. प्रत्येक राज्यासाठी वेगळे पॅकेज आहे. काही राज्यांचे तर ५० एम्बी आहे. २) अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलः याच्यावर जे अ‍ॅप आहे ते मला लई आवडलंय. "Sygic" सर्व देशांसाठी वेगवेगळे मॅप्स घ्यावे लागतात. आधी सर्वच देशांचे मॅप्स विकत मिळायचे. पण भारतातून (कदाचित) शून्य प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी भारताचे मॅप्स फुकट उपलब्ध करून दिलेत. प्रॉब्लेम एकच आहे. ते राज्यांचे स्वतंत्र मॅप्स देत नाहीत. पूर्ण भारताचा नकाशा डाऊनलोड करावा लागतो. त्यामुळे साईझ जवळ जवळ ८०० एम्बी आहे. सिजिकचे मॅप्स, युजर इंटरफेस, नॅविगेशन इ सर्व उच्च दर्जाचे आहे. लुमियाचे बरेच बेसिक आहे. पण वरील दोन्ही सुद्धा ऑफलाईन चालतात. (मोबाईलची २जी/३जी रेंज जाऊद्या, सिम कार्ड नसलं तरी चालतात. डायरेक्ट आभाळाखाली असल्यास २-३ सेकंदात जीपीएस लॉक होऊन आपण नकाशावर दिसतो. चालत्या कारमध्ये १ मिनिटापर्यंत वेळ लागू शकतो.

“इतिहासमित्र” हे इतिहासाचा अभ्यास करणार्‍या तरुणांकरीता बनवलेले अ‍ॅप असून, यामध्ये निरनिराळ्या हिंदू आणि मुसलमानी कालगणना, मोडी लिपीचा इतिहास, इतिहासाचा अभ्यास कसा करावा, शिवचरित्राची कालसूची, छत्रपती आणि पेशव्यांच्या मुद्रा, १२ महाल आणि १८ कारखाने, ऐतिहासिक आकडेमोड आणि त्याशिवाय कठीण शब्दांचे अर्थ दिले आहेत. हे अ‍ॅप माझे मित्र कौस्तुभ कस्तुरे ह्यांनी बनवले आहे. ज्यांचा उल्लेख राजवाडेंच्या लेखात केला होता. डाउनलोड लिंक - Itihaas Mitra

अॅपसंबंधी प्रश्न ( फक्त android app बद्दल नाही) न्युज पेपरची त्यांनीच बनवलेली अॅप एवढी चांगली का नसतात?उदाहरणार्थ: TOI ,The Hindu वगैरे .बातम्या लवकर आणि सर्व नाही येत. परंतू यांचे bookmark करून refresh करणे सोयीचे पडते!! दोष अॅपच्या कोडमध्ये असेल अथवा पेपरवालेच अॅप ला माहिती feed करत नाहीत?

In reply to by कंजूस

TOI, ndtv बद्दल तरी काही प्रॉब्लेम जाणवला नाही..एकदा अॅपडेटा डिलीट करून बघा सेटिंग्जमधून किंवा फ्रेश इंस्टॉलेशन करून बघा...

Titanium Backup प्रो व्हर्जन फुकट आहे का कुठे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते नंतर!!! आधी, नाबाद 500... हे धत्ताड तत्ताड तत्ताड तत्ताड! सत्काराला या हो जे पी ssssss :-\

In reply to by अत्रुप्त आत्मा

मिपाच्या संपूर्ण इतिहासात कुठलाही वादग्रस्त विषय नसताना पंचशतक केलेला हा पहिलाच धागा आहे. अत्यंत उपयुक्त माहितीने भरलेला हा धागा अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो व या प्रकारच्या धाग्यांसाठी नवे मापदंड प्रस्थापित करो ही आकाशातल्या देवाकडे प्रार्थना. सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन.

In reply to by सुहास झेले

धन्स...! जमलंय. :) मंडळी, वाट्सअ‍ॅप प्लस कुठे मिळेल, सावन क्रॅक व्हर्जन कुठे मिळेल, ओला कॅब अ‍ॅप्लीकेशन टाकल्यावर १२५ रुपये फुकट जमा होतात. या आणि अशा गोष्टी मिळविण्यासाठी 'तुमच्या अँड्राईडसाठी' आमच्या सुहाससेठचा धाग्यावर लक्ष ठेवा आणि वाचत राहा. लिंक लवकरच देण्यात येईल. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओला कॅब टाकतांना कुणाचा ओला रेफरल कोड टाकला तर रू. ३००/- चे कुपन मिळते जे पहिल्या राईड साठी वापरता येते. (माझा कोड M0AN3R)

एंड्रॉइड ऍप बाबतित प्रो म्हणजे काय हो ? जे ऍपस मोफत मिळतं नाही ते का ? म्हणजेच जे सशुल्क आहेत ते का? तसेच गण्यांची प्लेलिस्ट सहज बनवता येईल आणि इतर ऍप वापरताना बैकग्राउंडला वाजत राहील असा एखादा म्युझिक प्लेयर सुचवा .(मोफत)

In reply to by देव मासा

>>>> एंड्रॉइड ऍप बाबतित प्रो म्हणजे काय हो ? प्रो म्हणजे अधिक फिचर्स असलेले विकत मिळणारे अ‍ॅप्लीकेशन. >>> जे ऍपस मोफत मिळतं नाही ते का ? हो. >>> म्हणजेच जे सशुल्क आहेत ते का ? हो. >>>> बैकग्राउंडला वाजत राहील असा एखादा म्युझिक प्लेयर सुचवा मी Winamp वापरलं आहे. काही एमपीथ्री प्लेयर मोबाईल स्क्रीन लॉक केलं की मागे वाजणारी गाणी बंद होऊन जातात. आता असे हे प्लेयर कोणकोणत्या हँड्सेट्सला सपोर्ट करते ते मला माहिती नाही. असे प्लेयर वापरणा-यांनीच ती माहिती इथे शेअर केली पाहिजे.

In reply to by महेश-मया

किंग रुट हे मोबाईल अ‍ॅप्लीकेशन वापरा त्याने फोन रुट नाहीच झाला तर व्ही रुट, आय रुट हे संगणकावर चालणारे अ‍ॅप्लीकेशनस वापरा फोन रुट नाहीच झाला तर जरुर सांगा, आपला फोन रुट करुनच राहु, हाय काय अन नाय काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किंगरुट या मोबाईल अ‍ॅप्लीकेशनचा पत्ता. आणि संगणकावर चालणारं अ‍ॅप्लीकेशन आय रुटचा हा पत्ता. शेठ फोन रुट केल्यावर काय काय करणार ते जरुर सांगा. कस्टम रोम टाकणार असाल तर स्टेबल रोम कोणती, कोणत्या कंपनीच्या हँडसेटला या रोम चालतात, असं काही करणार असेल तर जरुर सांगा. वाट पाहतोय. कष्टम रोम सर्वच हँससेट्सना चालत नाही, हँडसेट डेड होऊ शकतो तेव्हा अशी खटपट करणा-यांनी सर्व सावधानता बाळगुनच हा खटाटोप करावा. -दिलीप बिरुटे

माझ्याकडे micromax A ११६ canvas HD मोबाईल आहे. मी तो रुट करण्याच्या विचारात आहे. कोणी केला आहे का ? कोणाला माहीत असल्यास कृपया सविस्तर माहिती द्यावी. तसेच रुट केल्यानंतर पुढे काय काय व कसे कसे इन्स्टॉल करावे याची कृपया इत्यंभूत माहिती द्यावी. मी पूर्णता अनभिद्न्य आहे. धन्यवाद.

In reply to by arun jaykar

मायक्रोमॅक्स मी वापरत नाही, तो रुट केला नाही. आत्ताच वर एका प्रतिसादात फोन रुट करण्याची माहिती दिली आहे त्याने फोन रुट होईल. फोन रुट करण्याचा फायदा हेही १)दुवे चाळावेत. २) दुवा एकदा फोन रुट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते नक्की ठरवा. फोन रुट करणे म्हणजे फोनची वारंटी घालविणे आहे. फोन अनरुटही करता येतो तो भाग वेगळा. रुट केल्यानंतर फाँट बदलता येणे, कष्टमरोम टाकता येणे, काही अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करण्यासाठी फोन रुट आवश्यक असतो त्यासाठी मदत होते. होम लॉन्चर बदलता येते, अजून बरंच काही पण तुम्ही पूर्ण अनभिज्ञ असाल तर एकदमच मोठा प्रयोग करु नका जसे रोम टाकणे वगैरे हँडसेट डेड होऊ शकतो. -दिलीप बिरुटे

माझ्याकडे micromax A ११६ canvas HD मोबाईल आहे. मी तो आता रुट करण्याच्या विचारात आहे. कोणी केला आहे का ? कोणाला माहित असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. रुट केल्यानंतर पुढे काय काय करावे. त्यानंतर काय काय इन्स्टॉल करावे व कसे करावे याची इत्यंभूत माहिती द्यावी

बिरुटेसाहेब, मला फोन रुट करुन त्याची फोन मेमोरी वाढवायची आहे व त्यामधे जास्त व रुटेड फोनमधेच इन्स्टॉल होणारी काही apps टाकायची आहेत. माझी फोन मेमोरी ४ जीबी असूनही कंपनीने फक्त १ जीबी जागा ओ एस व apps इन्स्टॉल करण्याकरिता वापरली आहे.२ जीबी जागा intetnal sd card व १ जीबी जागा गायब आहे. त्यामुळे नवीन app instal करताना phone memory full असा मेसेज येते. मला os साठी व app install करण्यासाठी फोन मेमोरीमधे पार्टीशन करुन os साठी व apps install करण्यासाठी जागा वाढवायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद...

In reply to by arun jaykar

फोन रुट करून मेमरी वाढविता येणार नाही, पण फोन रूट केल्यामुळे इंटरनर मेमरीवर असलेले फारसे उपयोगात नसलेले एप्लीकेशन्स काढून टाकता येतील फोन मेमरीतील जागा रिकामी करता येईल. धाग्याच्या सुरुवातीला कुठे तरी मेमरी कार्डला पार्टीशन करून फोन मेमरीवर इनस्टॉल होणारी एप्लीकेशन्स एस डी कार्डवर इनस्टॉल करता येतात थोड़ी जागा होते असा अनुभव आहे. -दिलीप बिरुटे

बिरुटेसाहेब, आपण कॉम्प्युटरमधे जसे एकूण हार्डडिस्कमधील हवी तेवढी जागा पार्टीशन करुन os साठी व apps install करण्यासाठी "C" ड्राईव्हच्या रुपात वापरतो तशी फोन मेमोरीची ४ जीबी जागा (हार्ड डिस्कची) आपल्याला हवी त्या साईजमधे पार्टीशन करता येत नाही का ?

In reply to by arun jaykar

हवी तेवढी जागा पार्टीशन करुन apps install करण्यासाठी "C" ड्राईव्हच्या रुपात वापरतो तशी sd मेमोरी कार्डची आपल्याला हवी त्या साईजमधे पार्टीशन करता येते.

जुना आहे 'सामसूम गॅलॅक्सी एस'. अँड्रॉईड वर्जन २.३.६ मराठी फाँट दिसत नाही. मराठी कळफलक दिसतो परंतु मराठी अक्षरे स्क्रीन्वरती उमटलेली सगळी दिसत नाहीत बर्‍याच अक्षरांऐवजी चौकोन दिसतात. काय केले म्हणजे हा प्रश्न सोडवता येईल?

In reply to by चतुरंग

फोन रूट करा त्यानंतर रूट एक्सप्लोलर एप्लीकेशन टाका. Droidhindi.ttf किंवा devnagari.ttf फॉण्ट इंस्टाल करा. रुट एक्सप्लोलर उघडून फ़ोन सिष्टिम मधे फॉण्ट या फोल्डर मधे वरील फॉण्ट टाका. आणि एक्सप्लोलर मधून बाहेर पडल्यावर फोन रिस्टार्ट करा. चौकोनी डबे जाऊन मराठी शब्द दिसायला लागतील. शुभेच्छा रंगासेठ. -दिलीप बिरुटे

ठीक आहे. मी तसेच करतो. आता रुट कसा करु ते सांगा.

करु की नको करता करता शेवटी मी माझा micromax A116 रुट केलाच. तोही सहजपणे. वापरले framaroot app. आता आणखी काय काय करु शकतो ? धाग्यावर अशी शांतता का ? तुटला की काय ?

इथे रुट करणे ह्यावर फार चर्चा झालेली दिसतेय मान्यवरांनी माझेही शंका निरसन करावे! जुलै मध्ये नवर्‍याने US मध्ये Amazon वरुन Lenovo K3 Note मागवला. आता सध्या मी तो वापरतेय. त्याला कधी काही त्रास झाला नाही. मला मात्र खालील प्रॉब्लेम्स येत आहेत. १. बारिक सारिक गोष्टी चीनी भाषेत आहेत. कुणाचाही नंबर डायल केला की सिटीचे नाव चायनीज मध्ये. कॉन्टेक्ट्स मध्ये यल्लो पेजेसचा टॅब चायनीज. काही अ‍ॅप्सची नावं (क्लिन मास्टर) चायनीज. डीफॉल्ट भाषा इंग्लिश आहे तरीही. २. ह्या नंतर त्रास सुरु झाला ते अ‍ॅटोमॅटिक अ‍ॅप्स डाऊनलोड होण्याचा त्रास. कुठलेही चित्र विचित्र चायनीज अ‍ॅप्स (त्यात अश्लील अ‍ॅप्सही येतात मध्येच) आपोआप येतात. मी ते कितीही वेळा उडवले तरी परत हजर. रोज नव नवे अ‍ॅप्स येतात. कधी इंग्लिशही असतात. ३. क्रोम उघडलं की आपोआप एकामागे एक ३-४ साईट्स ओपन होतात. गुगल प्ले स्टॉअरची साईट ओपन होऊन अ‍ॅप्स दिसतात. ४. चेपु ओपन केलं की खाली चायनीज अ‍ॅड्स येत आहेत. ५. मोबाईलमध्ये जो इन्स्टॉल्ड अ‍ॅण्टीव्हायरस आहे तो म्हणतो की कंपनीने आधीच डालो करुन दिलेले थीम सेंट्र्स, ट्विटर हे मालवेअर आहेत. आम्ही उडवु शकत नाही. काही तरी "रुट" करण्या विषयी येतं. नेट्वर शोध घेतला तर अनेकांना हा त्रास आहे आणि तो मोबाईल "रुट" करुन काही प्रमाणात दुर झालाय. एक अ‍ॅप आहे लिनोव्होचं (|लेनोवो कंपॅनियन) त्यात मोबाईल डायग्नोस्टीक होते. त्यात मोबाईल रुटेड - येस असं दिसतं. मला ह्या मोबाईलवर अजिबात खात्री नाही. माझा डेटा सेफ आहे असं वाटत नाही. काय करावे? (रुट करणे म्हणजे काय असावे ह्या विचारात) पिरा

In reply to by पिलीयन रायडर

इतके सगळे प्रॉब्लेम आहेत...म्हणजेच ओरिजिनल फोनमध्येच गडबड असावी किंवा फोन रूट केला गेला असावा आणि नवीन ओएस गंडली असावी. पुन्हा एकदा रूट करायचा प्रयत्न करून बघा. रूट केल्याने तुम्हाला फोनच्या सिस्टीमचा पूर्णपणे एक्सेस मिळतो, जो मूळ ओएसमध्ये नाही मिळत. तुम्हाला खूप ऑप्शन्स मिळतात ओएस निवडीसाठी. अनेक फ्री रॉम्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. :)

पिराजी तुमच्या मोबाईल ची सेटींग चायनिजमधेच असून यावर रुट करणे हा पर्याय नाही. यासाठी प्रथम तुम्ही कॉन्ट्याक्ट इत्यादीचे ब्याकप घ्या. नंतर settings मधे जाऊन factory reset मारा. Reset मारताना विचारल्यानंतर English भाषा set करा व factory reset पूर्ण करा. तुमचा प्रॉब्लेम दूर होईल.

In reply to by arun jaykar

केलंय ते मी.. तरीही काही काहीच ठिकाणी चायनीज भाषा आहे. रूट करुन पाहिनही मी (मला त्यातलं काही कळत नाही तरी समजा ट्राय करु...) पण लिनोव्हो ह्यात मदत करु शकत नाही का? त्यांच्या कस्टमर केअरने ह्यावर मला सोल्युशन द्यायला हवे ना.

माझ्याकडे ३२ जीबी चे class १० मेमोरी कार्ड आहे. ते मला फोन मेमोरी वाढविण्यासाठी पार्टीशन करायचे आहे. त्यासाठी २ पार्टीशन कराव्या लागतील.तर जास्तीत जास्त फोन मेमोरी वाढवण्यासाठी कोणते पार्टीशन किती gb चे करावे? फोन मेमोरीसाठी fat 32 पार्टीशन वापरली जाते की ext २ पार्टीशन वापरली जाते ?

In reply to by arun jaykar

फोन मेमरी १ किंवा १.५ जीबी वाढवा.. बाकी स्टोरेजसाठी वापरा. ह्याहून मोठे पार्टीशन मी ट्राय केले नाही. गुगल बाबाला विचारावे लागेल. खूप एॅप्ससुद्धा उपलब्ध आहेत स्टोरवर ह्यासाठी. फाईल सिस्टीम Ext २ वापरली जाते...

सुहास साहेब मी फोन मेमोरीसाठी कोणते फाईल एक्स्टेन्शन वापरु ? Fat ३२ की ext २

In reply to by arun jaykar

फोन मेमरी FAT३२ आणि एसडी कार्ड मेमरी Ext २... ही लिंक बघा इथे स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे :) How to Partition SD Card and Use Link2SD in any Android Phone with Screenshots

एखादे घरगुती उपचारासाठी आर्युवेदीक App सुचवा.

Swapper app आणि link २ sd मधे काय फरक आहे.तसेच फोन मेमोरी व रॉम मधे काय फरक आहे. Swapper ने रॉम व link २ sd ने फोन मेमोरी वाढते असे वाचले आहे. दोन्ही app वापरुन रॉम व फोन मेमोरी या दोन्ही गोष्टी वाढवता येतात का. दोनही वापरण्याची कोणती पद्धत आहे.

Android kitkat 4.4 वरुन SD card मधील files delete करता येत नाहीत . म्हणजे inbuilt applications मधून होतात मात्र third party app जसे की x-plore, ms player , quickpic, यामधून rename , delete काहीच करता येत नाही . कृपया सोपा उपाय सुचवा. फार अडचण होत आहे .

आस्की (Advertising Standards Council of India) यांचं ASCIOnline हे अ‍ॅप पाहिलं. चांगलं वाटलं. तुम्ही एखादी अवास्तव/ खोटी/ दिशाभूल करणारी जाहिरात पाहिली तर तिचं प्रकाशचित्र या अ‍ॅप मधून ASCI ला पाठवू शकता आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करेपर्यंत माहिती मिळवू शकता.

फोन रूत करन्याचे फायदे १) सिस्तीम आप्स काधुन ताकु शकता २) xposed module इन्स्ताल करुन कस्तम रोम चे फीचर्स आनु शकता.

%Android kitkat 4.4 वरुन SD card मधील files delete करता येत नाहीत . म्हणजे inbuilt applications मधून होतात मात्र third party app जसे की x-plore, ms player , quickpic, यामधून rename , delete काहीच करता येत नाही .%%%%----एका सैनिकास एकाच सार्जंटची आज्ञा घेता येते तीनचारांची नाही.फाइल अॅपसचं असंच आहे.

नव काही ? हाऊ टू अपग्रेड न्यु ओस ऑन अँड्राईड ? ४.४.२ ला अपग्रेड करायचा कै नवा फॉर्म्युला ? -दिलीप बिरुटे

हे cross platfrom app जे कोणतीही फाईल wi-fi द्वारे ट्रान्स्फर करते. no data charges. ट्रान्स्फर फाईलस from Lumia to android, from Android to Lumia from Lumia to Apple, from Apple to Lumia from android, to Apple, from Apple to android, बहुतेक वेळा from Android to Lumia ट्रान्स्फरला काही अडचणी येऊ शकतात (वैयक्तिक अनुभव) बाकी मस्त अॅप १gb फाईल काही ५-१० mins. मधे ट्रान्स्फर होते

गो स्टोरीज हे नवीन अप प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. यामधे रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, द मा मिरासदार यांच्या कथा ऑडियो स्वरुपात अतुल कुलकर्णी, जितेन्द्र जोशी, ऐश्वर्या नारकर वगैरे कलाकार मंडळींनी सदर केल्या आहेत. सध्या तरी कॉंटेंट फार नाही परंतु छान आहे. लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.sandeep.gostories3&hl…

कोणाकडे जर android 2.3 version असलेला फोन असेल तर format करु नका गुगल लोगिन ला एरर येतो. xda-developers.com विचारले असता असे कळले कि security reason google has stopped access to lower version of android. मी हे सांगत आहे ह्याचे कारण कि मझ्या कडे असलेला जुना फोन galaxy s वर मी CM7 आनी darkyrom (GB 2.3) टाकण्याचा प्रयत्न केला असता गुगल लोगिन करताना एरर आला. नंतर जेव्हा त्यामध्ये मी CM9 ROM टाकला तेव्हा गूगल लोगिन झाले.

In reply to by स्वप्क००७

माझ्याकडे ही अजून एक लै जुना व्हिडिओकॉन ए१५ जिवंत आहे. स्पेअर म्हणून ठेवला होता. परवा पाहिले तर गूगल लॉग इन होईना. त्याचं काय करू प्रश्न पडला होता. आता अजून जरा आळशीपणा करते. अँड्रॉईड २.३ वाल्या ३.५ इंच स्क्रीनवाल्या फोनसाठी कोणते रॉम उपलब्ध आहे? जरा शोधून लिंक देऊ शकता का?

मोबाईलवर youtube चे व्हिडीओ कसे download करायचे ? कोणते टूल वापरतात ?

In reply to by कपिलमुनी

१. Browser वरुन youtubeचे व्हिडीओ सुरु करा. २.लगेच एक व्हिडीओ icon Browserच्या तळाला येइल. ३. त्यावर क्लिक्/टच करा ४. पोप अप येइल Play/watch offline ५. सीलेक्ट watch offline ६. download सुरु होईल

tubemate app डाउनलोड करा फ़रर्फ़ोक्ष अथवा क्रोम वरून. ह्या app द्वारे विदेओ डाउनलोड करू शकता

Exclamation mark on cellular network icon :- हे सध्या पाहतो आहे, हा लॉलिपॉपचा बग आहे की फिचर ? इथे जाउन आलो :- https://code.google.com/p/android/issues/detail?id=79546 Marshmallow मधे फिक्स करण्यात आले आहे म्हणे ! कोणाला यावर अधिक माहिती आहे का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog

In reply to by मदनबाण

माझ्या cyanogen 12 (over lollipop) मधे ते दिसते जेव्हा डेटा बंद असतो. कुठल्याही प्रकारचा डेटा (२जी, ३जी, वाय-फाय) सुरु असेल तर ते exclaimation mark जाते. --- कानडा

In reply to by कानडा

त्याचा संबंध डेटा शी आहे हो, ते माहित आहे, पण हे फिचर आहे ? का बग ते जाणुन घ्यायचे होते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog