Skip to main content

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 23/11/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!

वाचने 448129
प्रतिक्रिया 716

प्रतिक्रिया

In reply to by स्वधर्म

व्हायरसमुळे हा प्रॉब्लेम आला असण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे ऍन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सेल्फ रेप्लिकेट करून जागा खाणारे व्हायरस अजून आले नाहीत. तुमच्या फोनची इंटर्नल मेमरीच मुळात खूप कमी आहे. हे ऍप डाऊनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.diskus… या ऍपद्वारे तुम्हाला कळेल नेमकी जागा कशाकशाने व्यापली आहे.

In reply to by नांदेडीअन

कॅशे क्लिअर केल्यावर, तुंम्ही सांगितलेले अॅप डाउनलोड करू शकलो. लागलीच डिस्क युसेज व व्हाॅटस अॅपही डाउनलोड केले. डिस्क युसेज अाता उपलब्ध मेमरी फक्त ४१ एमबी दाखवत अाहे. तुंम्ही म्हणता तसे माझ्या फोनचे इंटर्नल स्टोरेज कमी अाहे, पण फोन स्टोरेजमध्ये भरपूर जागा दाखवत अाहे - एकूण २ जीबी व उपलब्ध ३०० एमबी. मी ‘डिफाॅल्ट राइट डिस्क’ = फोन स्टोरेज असे सेट करूनही व्हाॅटस अॅप इंटर्नल स्टोरेजमध्येच डाउनलोड झाले अाहे. त्या सेटींगमध्ये ‘मूव्ह टू इंटर्नल स्टोरेज’ हा अाॅप्शन डिसेबल्ड दिसतो. समजा मी एसडी कार्ड घालून मेमरी वाढवली, तर ही अॅप्स तिकडे हलवता येतील काय? अतिशय उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

@स्वधर्म, फॉरमेट करण्याआधी एक काम कराल का? manage app मधे जाऊन जास्तीत जास्त apps च clear cache आणि clear data करणे , ते झाल्यावर मोबाइल रीस्टार्ट करुन मग एखादं app डाउनलोड होतय का ते बघा.

In reply to by के.पी.

जमलं. माझी फ्री स्पेस ४१ एमबी वरून ७५ एमबी झाली. मग मी वरी ल डिस्क युसेज चे अॅप व व्हाॅटस अॅप ही डाउनलोड करू शकलो अाहे. जवळजवळ पंधरा दिवस अडकलो होतो राव. मोठीच मदत झाली. खासच धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

अरे व्वा!! :) मस्तच झाल तर.. आणखी एक लक्षात ठेवा कदाचित पुन्हा तुम्हाला असा प्रॉब्लम आलाच आणि हे वरची पद्धत लागू नाही पडली तर अश्यावेळी गूगल प्ले स्टोर चे अपडेट्स uninstall केले तरी चालतं. बादवे मी सर नाही.... मला ताई म्हटल तरी चालेल ;)

In reply to by स्वधर्म

प्ले स्टोअरवरुन बाकी अ‍ॅप्लीकेशन अपडेट झाल्यावर पुन्हा म्हणु नका की इनसफिशियंट स्पेसचा मेसेज येतोय म्हणुन. :) हा तात्पुरता विलाज झाला. -दिलीप बिरुटे

माझा झोलो (XOLO A500s)फोन रूट करायचा आहे . गुगल वर शोधून बर्याच लोकांनी "फ्रामारूट" इंस्टाल . लिंक मध्ये सांगितल्या प्रमाणे सगळं केलं . पण घंटा फरक पडला नाय . कोणी मदत करेल का

In reply to by अद्द्या

किंग युजर किंवा व्ही रुट हे संगणकावर टाकले जाणारे अ‍ॅप्लीकेशन टाका. डबींग मोड मोबाईल ऑन करुन ठेवा. बाकी प्रोसेस होऊन तो अ‍ॅटो रुट होतो. व्ही रुटचा वर धाग्यात दुवा दिला आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोन चा USB पोर्ट गंडलाय माझा . फक्त चार्ज करतो तो . फोन वरच इंस्टाल करून रूट करण्यासाठी एखाद APP नाहीये का ?

मला माझ्या फोनसाठी Lolipop upgrade मीळत आहे.3G नेटवर्क वापरावे कि वाय् फाय् ने अपग्रेड करावे.?सर्विस सेंटरला वॉरंटी पिरीयडमध्ये फ्री अपग्रेड करुन देतात का?

मला माझ्या फोनसाठी Lolipop upgrade मीळत आहे.3G नेटवर्क वापरावे कि वाय् फाय् ने अपग्रेड करावे.?सर्विस सेंटरला वॉरंटी पिरीयडमध्ये फ्री अपग्रेड करुन देतात का?

In reply to by आनंदी गोपाळ

इनबिल्ट नै करता येणार का ??? लोंचर पेक्षा इनबिल्ट काही प्रयोग करता आले तर बर असं वाटलं होतं ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग कस्टम रॉम लिहावी लागेल गुरुजी. एके काळी वेळ भरपूर होता, तेव्हा लिहिलीही असती. आजकाल तितका वेळ नाही मिळत..

In reply to by आनंदी गोपाळ

नोकियाचे फ़र्म्वेअर लै बद्लायचो सिम्बियनला बद्लायचो मजा यायची. एंड्राइडच्या रोमला काहीच खटपट करता येत नै ये... किंवा आहे ते रोम काढून पिसिवर सेव करून काही बदल करून इंस्टाल तरी करता आलं पाहिजे होतं. एम्केटुल्स मधे मला काहीच समजत नै आणि काही प्रयोगही करता येईना ?? सर फुरसत में मुझे जरुर बताना....तुम्ही तयार केलेली थीम आवडली आणि असा खटपटया माणूस मला आवडतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by टीपीके

गोपाळराव मी हाच प्रश्न विचारणार होतो आणि थीम पाठवा असे सांगण्याचा मोह सुद्धा झाला पण त्यात काही वापरता आलं नाही आणि फोन बंद झाला तर लफडं होईल म्हणून विचार बदलला. पण थीम लैच भारी आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्माराव, ही माझ्यासाठी मीच तयार केलेली कस्टम लाँचर थीम आहे. जालावर उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे लिंक नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

२ दिवस जमलं नाही इथे यायला. उद्या रवीवार आहे. थोडा वेळ हाती मिळेल असे वाटते. ही थींम कशी तयार करायची व वापरायची त्याचा धागा/प्रतिसाद देतो इथेच. वर दिलाय तो जुना एस्सेस होता. आता सध्या थोडी नवे बदल केले आहेत.

माझा फ़ोन रुट आहे. मी रुट एक्सप्लोलर मधुन अनेकदा इनबिल्ट रिंग टोन बदलल्या आहेत. चोप्य पस्ते करुन. पण आता ते कै होत नै ये. या पेक्षा काही सुपाय उपाय आहे का ? -दिलीप बिरुटे

In reply to by घन निल

नाही. पुन्हा कशाला टाकायची कष्टम रोम. फोन रुट करणे आणि कष्टम रोम टाकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कष्टम रोम टाकण्यासाठी फोन रुट आवश्यक असतो इतकेच. -दिलीप बिरुटे

सप्रेम नमस्कार, माझ्याकडे micromax canvas HD A116 मोबाईल आहे.त्याची ओ एस Android ४.२.१ अपडेट केलेली आहे.ram १ जीबी आहे. त्याची फोन मेमोरी १ जीबी आहे. internal sd card memory २ GB व external memory expandable upto ३२ GB आहे. मी त्यामधे १६ जीबी चे मेमोरी कार्ड टाकलेले आहे. Default write disc ही external sd card सिलेक्ट केलेली आहे. इंटरनल sd card मेमोरी पूर्ण रिकामी अाहे. मी प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केलेले apps प्रथम फोन मेमोरीमधेच इन्स्टॉल होतात व नंतर मुव्हेबल apps हे external sd कार्डमधे मूव्ह करता येतात. आता फोन मेमोरी फक्त १०० mb शिल्लक आहे. प्रॉब्लेम इथून पुढे सुरु होतो. मला आता आणखी apps डाऊनलोड करता येत नाहीत. उदाहर्णार्थ Facebook डाऊनलोड करताना "Error while downloading "Facebook" There is insufficient space on the device " असा मेसेज येतो. माझया मोबाईलमधे २ जीबी इंटरनल sd card मेमोरी रिकामी आहे. तिचा वापर मी app इन्स्टॉल करण्यासाठी कसा करु शकतो ? तिचा वापर करुन फोन मेमोरी वाढवता येईल काय ? कसा ? Internal sd कार्डची २ जीबी मेमोरी वापरून फोन मेमोरी वाढवता येईल काय ? जेणेकरुन मला आणखी apps install करता येतील. कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती. आपला नवीन सदस्य, अरुण जायकर.

In reply to by arun jaykar

सेटींग मध्ये जा अ‍ॅप्स मध्ये ऑल टॅब सिलेक्ट करा गुगल प्ले स्टोर सिलेक्ट करा अनइन्स्टाल अप्डेट्स करा सेम गुगल प्ले सर्विसेस सोबत करा नविन अ‍ॅप डाऊन्लोड होईल

radio off परवापासून फोन वर outgoing call चे बटण दाबल्यावर किंवा इनकमिंग call आल्यावर recive केल्यावर "Radio off " असा संदेश येतोय त्यामुळे फोन कुठे लागत ही नाही आणि recive पण होत नाहीये . android version ४.२. २ jelly bean फोन Aeroplane Mode वर नाहीये . काही setting चा घोळ असेल का ? अर्थात factory reset चा पर्याय आहेच पण setting मध्ये काही गडबड झाली असेल तर थोडक्यात काम होईल म्हणून हा प्रश्न . कुणाला आलाय का हा प्रॉब्लेम कधी ?

In reply to by रॉजरमूर

असा कै प्रॉब्लेम आलेला नाही. -दिलीप बिरुटे

किटक्याटसाठी ४.२.२ साठी स्थिर कष्टम रोम आहे का ? सर्वांच्या ह्यांडसेटसाठी चालेल अशी ? -दिलीप बिरुटे

पीसीचा वापर न करता अंड्रॉइड मोबाईलद्वारेच मोबाईलच्या एस डी कार्डवरील डिलीट झालेल्या फाईल परत रिकव्हर करता येतील का ? कशा ?

In reply to by arun jaykar

प्ले स्टोअरवरुन मोबाईल फोन डाटा रिकव्हरी नावाचं अ‍ॅप्लीकेशन घ्या. डिलिट झालेल्या फायली रिकव्हर होतील. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसाहेब त्वरित दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगितलेली सर्व अप्लीकेशन प्ले स्टोअरवरुन इन्स्टॉल करुन पाहिली परंतु सर्वांनाच मदतीसाठी कॉम्प्युटरची मदत लागते.पीसीच्या मदतीशिवाय डायरेक्ट मोबाईलद्वारे रिकव्हरी करणारे एखादे एअँप नाही का.

In reply to by arun jaykar

पीसीच्या मदतीशिवाय मोबाइलवरच होतं Diskdigger हे अपलीकेशन टाका. फोन रुट आवश्यक आहे माझ्या फोनवर हेच आहे आणि ते उत्तम काम करतं. दिलीप बिरुटे

सिंगल सीम मोबाईल वर दोन whatsapp अकौंट . http://thepsycraft.com/wmapp वेवास्तीत चालतात , मी अजून वपरतोय ( सर्विस expiration २ मे २०१६ ) OGWhatsapp चा आलटर्नेतीव म्हणून वापरता येतो .

आमचेकडे सर्व प्रकारचे अ‍ॅन्ड्रॉइड अप्लीकेशन्स प्रो मिळतील. तसेच मोबाइल बद्दल काही अडचण असल्यास संपर्क करावा. फुकटात मदत करण्यात येईल.

How to control use of internet by verious apps on mobile ? And how to grant Internet access to a perticuler app only ? I want to stop access like Whatsapp and other apps to increse the internet speed while browsing and downloading.

जी पी एस नेव्हिगेशन साठी एक जबराट अप्लीकेशन -> ओ एस एम अँड इंटरनेटची गरज नाही. ऑफलाईन अप्लीकेशन आहे. मला किल्ले भटकंती करताना ह्याची खूप मदत होते. मात्र जी पी एस ची रेन्ज असणे आवश्यक आहे. आपण जी पी एस ट्रेल आधी ट्रेस करुन घेतल्यास रस्ता चुकन्याची सुतराम शक्यता नाही. एकदा वापरुन पहा.

In reply to by सुनिल साळी

म्हणजे GPS साठी internet आवश्यक नाहीये का ? मग खालील परिस्थितीत या साठी उपयोग होईल का ? उदा . १. आपण रेल्वेत प्रवासात आहोत. मोबाईल ला रेंज नाही म्हणून इंटरनेट ही बंद आणि रात्री वरच्या बर्थ वर झोपलेलो आहोत अशा वेळी गाडी नेमकी कोणत्या स्टेशनावर आहे किंवा कुठल्या गावापाशी आहे याची नेमकी माहिती मिळत नाही . आणि बाहेर अंधारात ते दिसत ही नाही. जुन्या नोकिया च्या साध्या फोन मध्ये ही छान व्यवस्था होती मोबाईल मनोऱ्याच्या लोकेशन नुसार मोबाईल च्या होम स्क्रीन वरच आपण नेमक्या कोणत्या गावात अथवा गावाजवळ किंवा शहरातल्या कुठल्या भागात आहोत . हे अचूक कळायचे अर्थात तेव्हा फोनला इंटरनेट नव्हतेच त्यासाठी फक्त setting मध्ये जाऊन cell info display ON ठेवायला लागायचे . आताही android साठी याच नावाने किंवा तत्सम भरपूर app आहेत पण त्याला इंटर नेट आवश्यक आहे . २. मोबाईल ला जरी रेंज असली तरी मधल्या बऱ्याच गावात ३ G नसते त्यामुळे गुगल map व इतर app काम करत नाही . ३. आपण नेट pack टाकला नसेल किंवा संपला असेल तर ? अशा वेळेस अजून कोणती app आहेत जी स्थान दर्शक (location finder) म्हणून offline काम करू शकतात ?

In reply to by रॉजरमूर

ही अॅपस( फ्री ,विंडोज) फक्त GPS वर offline चालतात.तुमच्या android वर आहेत का पाहा. एक दोन MB ची आहेत. [app name] [developer name] 1 A route tracker...pure 22 2 GPS Sattelite ......KarhuKoti 3 Maps+...................Live Tiles 4 GPS Tracker.........Maiya 5 Track Finder GPS Free.....Apps Destination हे अॅप वाहनाचा वेग दाखवते Driving Forces..........5ST मॅपस ( google maps ,Nokia maps वगैरे) import करून वापरणारी बरीच अॅपस आहेत परंतू ती इंटरनेट वरच चालतात म्हणून देत नाही.

In reply to by रॉजरमूर

जीपीएससाठी इंटरनेट आवश्यक नाही. मात्र सॅटेलाईट फिक्स मिळणे आवश्यक असते. यासाठी प्रवास सुरू करण्याआधी जीपीएस सुरू करून ठेवावे लागते, हलत्या गाडीतून चट्कन फिक्स मिळत नाही. त्याचप्रमाणे हँडसेटच्या दर्जानुसार किती लवकर मिळेल ते ठरते. तात्पर्य, मोबाईलची बॅटरी बोंबलत राहते. ऑफलाईन नॅव्हिगेशन मॅप्सची अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. मी सिजिक वापरतो. मात्र हे फुकट नाही. तसेच (एस्डी कार्डवर) जागाही भरपूर खाते.

In reply to by आनंदी गोपाळ

आताचे नवीन क्वाड कॅार प्रसेसर(क्वालकॅाम उत्तम) झटकन सटेलाइट लॅाक करतात.मी। दिलेली अॅप फक्त gps वरही मॅप (2G)टाकतात.Android बॅटरी किलर आहेच.

In reply to by कंजूस

आपण ट्रेन मधुन जातो तेव्हा केवळ उत्सुकता म्हणून मॅप पाहतो, driving guidance नको असतो.अर्थात फार डिटेल मॅप नसला तरी चालतो.

In reply to by कंजूस

नाही हो . पूर्ण map बद्दल नाहीच म्हणत आहे . माझा प्रश्न लक्षात आला नाही बहुतेक . पूर्वी नोकीया त जसे आपण कुठल्या गावात आहे हे साध्या handset च्या होम स्क्रीन वर दिसत असे . ते मोबाईल टावर location दर्शवायचे अर्थात . पण त्यावरून कळायचे . तसे दर्शवणारे एखादे app आहे का ? इंटरनेट शिवाय चालणारं ? फ़क़्त गाव समजलं तरी पुरे . अनेकदा रेल्वे ने प्रवास करताना खास करून रात्री ही समस्या येते म्हणून विचारले .

In reply to by रॉजरमूर

%%पूर्ण map बद्दल नाहीच म्हणत आहे . माझा प्रश्न लक्षात आला नाही बहुतेक .%% या अॅपमध्ये टुलबारमध्ये एक वर्तुळ असते ते दाबले की तुमचे लोकेशन च्या जागी मॅपवर मध्यवर्ती दिसत राहते. समजा मॅप नाही आला तर दोन तीन मिनिटे डेटा इंटरनेट ओन करा की सर्व मुख्य नावे येतात आणि वीस एक किमी चा मॅप मिळून जातो.५०kbफक्त जातात.एक दोनवेळा ट्राइअल करा कोणते अॅप चांगले आहे ते कळेल.

In reply to by कंजूस

१. प्रत्येकाजवळ तो लेटेस्ट प्रोसेसर नसतो. २. उत्सुकता म्हणून बोगी अटेंडंटला विचारले तरी स्टेशन कोणते आले ते समजेलच की ;)

मी मोबाईलवर २ जी इंटरनेट वापरतो. पण ब्राउजिंग करताना किंवा डाऊनलोडिंग करताना मोबाईल मधील व्हॉटस् अँपसारखी इतर अँपही इंटरनेट वापरतात.त्यामुळे मला मिळणारी स्पीड कमी होते. इंटरनेटचा इतर अँपकडून होणारा वापर बंद करुन हव्या असणार्या अँपपुरता वापर चालू ठेवणारे असे एखादे अँप प्ले स्टोअर वर किंवा इंटरनेटवर आहे का ? असल्यास कृपया माहिती द्यावी.

In reply to by arun jaykar

मोबाइलच्या सेटिंग डाटा यूजेस मधे गेलो की ओव्हर व्ह्यू आणि आपण जी सिमकार्डवरील नेट वापरतो ते दिसतं त्यातील एक सलेक्ट केलं की त्या खाली मोबाइलवर चालणारी अप्लिकेशन ची नावं दिसतात उदा. वाट्सप त्यावर क्लिक केलं की त्या खाली एक पर्याय Restrict background data त्या समोरील चौकानात टिक केलं की तुमचं वाट्सअप बंद होऊन ब्राउजिंगला तुम्ही मोकळे. :) -दिलीप बिरुटे

ट्रेकींग चा रूट ट्रेस करण्यासाठी विंडोज वर एक A route tracker आहे इकडे Android वर आहे का पाहा.दोन अडिच तास वापरूनही बॅटरी पाच टक्केच उतरते.रूट सेव होतोच.ओफलाइन चालते.

Updated


In reply to by कंजूस

A route tracker Android वर आहे. पण यात आधीचे सेव्ह केलेले रुट इम्पोर्ट करता येत नाही. ओ एस एम अँड मध्ये अशी व्यवस्था आहे.

बिरुटेसाहेब धन्यवाद. नवीन माहितीबद्दल आभार. पण यासाठी प्रत्येक वेळी बराच वेळ लागत आहे. एक सोडून इतर सर्वांचे इंटरनेट अँक्सेस बंद करणारे असे एखादे वन टच अँप आहे का ?

असे अँप आहे का? आपणास हवे त्यानाच फक्त कळेल की आपण वाट्सअप वर आहोत. म्हणजे आपला नंबर जरी कोणाकडे सेव्ह असेल तरी त्यास कळणार नाही कि हया व्यक्तीकदे (नंबरवर) वाट्सअप चालू आहे.

धाग्याला माहितीची विट लावत जा हो ! -दिलीप बिरुटे

OTG support हा हार्डवेअर बेस्ड आहे की सॉफ्टवेअर बेस्ड ? नवीन ओएस टाकून OTG वापरता येते का?