तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी...
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती.
असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची.
अॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी)
सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!)
आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम.
१. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट.
२. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते.
३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत.
४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता.
५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता.
६. मराठीत टाईप करण्यासाठी -
अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन
ब) PaniniKeypad Marathi IME
क) AnySoftKeyBoard - Devanagari
ड) Lipikaar Hindi Keyboard Free
मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले.
७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो.
८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता.
९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर.
१०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता.
११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त.
१२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता.
१३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :)
१४. TED - Ideas worth spreading :) :)
बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा.
- सुझे !!
वाचने
447845
वाचनखूण
प्रतिक्रिया
716
In reply to मी आता चेक केले. रु. १५० ला by संपत
पहिले पुस्तक १ रुपयाला.
अगदी खरे , रहस्य कथा तर फक्त
निवडणुक आयोगाला मदत करू या
In reply to निवडणुक आयोगाला मदत करू या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा व्वा... मस्त. धन्यवाद सर
या धाग्याच्या त्रिशतका
In reply to या धाग्याच्या त्रिशतका by जोशी 'ले'
आमच्या उपयोगाचा नाही...
हो...मिळाल्यावरच पोस्ट केलं
निवडणुकीचा मौसम... त्यात अजून
एक प्रश्नमंजुषेचा गेम : Quiz
सुहास झेले आपण वर सांगितलेला
हार्टब्लीड चा फटका अ
In reply to हार्टब्लीड चा फटका अ by मदनबाण
धन्स बाणा.....
In reply to धन्स बाणा..... by सुहास झेले
CM Security चा Heartbleed
अनायासे हा धागा वर आलाच आहे
हे ही उपयुक्त
शिवाय..
आज एक वेगळे महत्वाचे अॅप देत
In reply to आज एक वेगळे महत्वाचे अॅप देत by मदनबाण
बी सेफ
माहितीपूर्ण लेख.
अरे नवं काही आलं का नाय ?
काय कमाल झाली राव.
In reply to काय कमाल झाली राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लवकरच देतो काही अॅप्सची
In reply to लवकरच देतो काही अॅप्सची by सुहास झेले
गुड....
कोणाला माहिती आहे का?
In reply to कोणाला माहिती आहे का? by प्रभाकर पेठकर
सिजिक व टॉमटॉम दोघेही उपलब्ध
सध्या Emoji प्रकरण समजवुन
हे डे (Hay Day) नावाचा गेम
एक माहिती हवी
In reply to एक माहिती हवी by इरसाल
गूगल इंडिक. यात फोनेटिक आणि
In reply to एक माहिती हवी by इरसाल
Multiling keyboard
In reply to एक माहिती हवी by इरसाल
मराठी साठी स्विफ्ट की बोर्ड
वरती किसना ने गेम दिला असला
गुगल इंडिक ची लिंक हवी आहे
In reply to गुगल इंडिक ची लिंक हवी आहे by निनाद मुक्काम …
ही का?
@ निनादGoogle Hindi Input
आत्ताच एक नविन अॅप इन्स्टॉल
In reply to आत्ताच एक नविन अॅप इन्स्टॉल by मदनबाण
अॅप आवडले.... माझ्या
In reply to अॅप आवडले.... माझ्या by सुहास झेले
मित्रानेच डेव्हलप केलेलं आहे
लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन
In reply to लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन by श्रीगुरुजी
लॅपटॉपवर वापरत असलेले कनेक्शन
In reply to लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन by श्रीगुरुजी
लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन
In reply to लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन by मदनबाण
परफेक्ट ...
In reply to लॅपटॉपवरील इंटरनेट कनेक्शन by मदनबाण
माझ्याकडे विंडोज ७.० आहे.
आजचे काही अॅप्स -
In reply to आजचे काही अॅप्स - by सुहास झेले
@सायबर घोस्ट >>> या अॅपचा
In reply to @सायबर घोस्ट >>> या अॅपचा by अत्रुप्त आत्मा
हे काही महत्वाचे फायदे -
In reply to हे काही महत्वाचे फायदे - by सुहास झेले
धन्यवाद.
app memory card मधे कसे टाकायचे...???
In reply to app memory card मधे कसे टाकायचे...??? by Gayatri Muley
आपण...
In reply to आपण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॉरी, मला सध्या तरी फोटो नाही
In reply to सॉरी, मला सध्या तरी फोटो नाही by Gayatri Muley
अप्लिकेशन मधे फ़ाईल म्यानेजर दिसतं का ?
In reply to अप्लिकेशन मधे फ़ाईल म्यानेजर दिसतं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही ना...!!!
In reply to नाही ना...!!! by Gayatri Muley
आता उद्या एखादा फ़ोन पाहुन सांगतो.
डिस्क डिगर.
फोन रुट करणे
In reply to फोन रुट करणे by आ युष्कामी
http://forum.xda-developers
In reply to http://forum.xda-developers by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लई भारी... बिरुटेसाहेब द रूट
In reply to http://forum.xda-developers by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
framroot ने ही रूट होत नाहीये.
In reply to framroot ने ही रूट होत नाहीये. by आ युष्कामी
हो येऊ द्या अडचण कै हरकत नै.
In reply to हो येऊ द्या अडचण कै हरकत नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
framaroot मधील
अँड्रॉईड फोनचं रुपांतर वाय फाय हॉट स्पॉट मध्ये
Clean Master च्या अॅप
टिम व्हिवर
स्क्रीनशॉट घेण्यासाठी
In reply to स्क्रीनशॉट घेण्यासाठी by वामन देशमुख
श्यामसिंगच्या मोबाईलवर
In reply to स्क्रीनशॉट घेण्यासाठी by वामन देशमुख
:)
कार्टूनिस्ट प्राण आपल्यात
अहो, फोन रुट झाला का नै ?
In reply to अहो, फोन रुट झाला का नै ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा सर.... धन्स
In reply to अहो, फोन रुट झाला का नै ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे व्वा!
ट्युबमेट
In reply to ट्युबमेट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यप्प... खूप आधीपासून वापरतो..
In reply to यप्प... खूप आधीपासून वापरतो.. by सुहास झेले
ट्युबमेट फार पूर्वी पासुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टIn reply to ट्युबमेट फार पूर्वी पासुन by मदनबाण
ट्युबमेट १ नंबर आहे. सहज
Black Market गूगल प्ले स्टोअर
In reply to Black Market गूगल प्ले स्टोअर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्राय करतो....
अॅडब्लॉक.
वाट्सअॅप प्ल्स माझ्या कीटकॅट
नवं काय आलं का नै
फाईल एक्सप्लोर इंस्टाल करून
In reply to फाईल एक्सप्लोर इंस्टाल करून by देव मासा
नै जमत ये
In reply to फाईल एक्सप्लोर इंस्टाल करून by देव मासा
वाट्सप प्लस इन्स्टॉल झालं.
ट्रॅफलाईन अॅप
In reply to ट्रॅफलाईन अॅप by बहुगुणी
त्यांचे ट्विटर हँडल अल्टीमेट
रिकव्हरी फाईल (CWM इमेज)
मोटो जी साठी आताच अॅन्ड्रॉइड
पैसे वाचवन्यासाठी अप्लिकेशन
पाच ईंची फोन ब्राऊजींग करताना
In reply to पाच ईंची फोन ब्राऊजींग करताना by ग्रेटथिंकर
हा तुम्हीच दिलेला पुरावा..
In reply to पाच ईंची फोन ब्राऊजींग करताना by ग्रेटथिंकर
साईजचा आणि डेटा कंजंप्शनचा
In reply to साईजचा आणि डेटा कंजंप्शनचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
आप्ल्यासार्ख्या स्मॉलथिंकर्ना
In reply to साईजचा आणि डेटा कंजंप्शनचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
बस्स का
मला फक्त इतकेच विचारायचे होते
In reply to मला फक्त इतकेच विचारायचे होते by ग्रेटथिंकर
तुमच्या वेब ब्राऊजरवरसुद्धा
माझा HTC Desire -x फोन आहे.
In reply to माझा HTC Desire -x फोन आहे. by देव मासा
नेमकं नै सांगता येणार ?
नवं काही आलं का ?
In reply to नवं काही आलं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वंडरशेअरच सगळ्यात चांगलं आहे.
In reply to वंडरशेअरच सगळ्यात चांगलं आहे. by नांदेडीअन
कनेक्ट होत नाही
In reply to कनेक्ट होत नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
USB Debugging ऑफ करा आणि
In reply to USB Debugging ऑफ करा आणि by नांदेडीअन
हे सर्व करुन झालं आहे.
In reply to हे सर्व करुन झालं आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मीसुद्धा विंडोज ७ च वापरतो.
In reply to मीसुद्धा विंडोज ७ च वापरतो. by नांदेडीअन
अर्रर्र... घोळ झाला माझा.
मोटो जी वर अॅन्ड्रॉइड
In reply to मोटो जी वर अॅन्ड्रॉइड by पिंपातला उंदीर
developer options मधून
काही अॅप उदाहरणार्थ रेल्वे
हे करुन बघा
चिन्ह येत न्हवते
अॅप नाहीये पण सोनीचा बजेट फोन
WhatsApp voice calling feature is now available
In reply to WhatsApp voice calling feature is now available by आयुर्हित
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून प्रश्न विचारल्यास व्यनि
In reply to अजून प्रश्न विचारल्यास व्यनि by बॅटमॅन
अजुन अन्भव नै
In reply to अजुन अन्भव नै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वायफाय किंवा ३जी नेटवर्क असेल
In reply to अजुन अन्भव नै by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग्रुप म्युट करता येतो.
In reply to अजून प्रश्न विचारल्यास व्यनि by बॅटमॅन
@ -टेक्नोहित. >> =)))))
In reply to @ -टेक्नोहित. >> =))))) by अत्रुप्त आत्मा
=))
मायक्रोमॅक्स ए८९ व्हायरस?
In reply to मायक्रोमॅक्स ए८९ व्हायरस? by स्वधर्म
एकदा फोन फ़ॉर्मेट मारा
In reply to एकदा फोन फ़ॉर्मेट मारा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर
In reply to मायक्रोमॅक्स ए८९ व्हायरस? by स्वधर्म
व्हायरसमुळे हा प्रॉब्लेम आला
In reply to व्हायरसमुळे हा प्रॉब्लेम आला by नांदेडीअन
नांदेडीअन सर
In reply to मायक्रोमॅक्स ए८९ व्हायरस? by स्वधर्म
@स्वधर्म, एक काम कराल का?
In reply to @स्वधर्म, एक काम कराल का? by के.पी.
केपी सर, धन्यवाद
In reply to केपी सर, धन्यवाद by स्वधर्म
अरे व्वा!! :) मस्तच झाल तर..
In reply to अरे व्वा!! :) मस्तच झाल तर.. by के.पी.
केपी ताई
In reply to केपी सर, धन्यवाद by स्वधर्म
:)
मिपाचे फ्रंट पेज ओपन करताना
माझा झोलो (XOLO A500s)फोन रूट
In reply to माझा झोलो (XOLO A500s)फोन रूट by अद्द्या
प्रयत्न करुन बघा
In reply to प्रयत्न करुन बघा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोन चा USB पोर्ट गंडलाय माझा
मला माझ्या फोनसाठी Lolipop
In reply to मला माझ्या फोनसाठी Lolipop by ग्रेटथिंकर
वायफाय असेल तर चांगले ...
In reply to वायफाय असेल तर चांगले ... by सुहास झेले
थॅन्क्स
मला माझ्या फोनसाठी Lolipop
आरं कै नवीन आलं का ?
In reply to आरं कै नवीन आलं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थीमर पाहिलंय ना तुम्ही?
In reply to थीमर पाहिलंय ना तुम्ही? by आनंदी गोपाळ
इनबिल्ट नै करता येणार का ?
In reply to इनबिल्ट नै करता येणार का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इनबिल्ट नै करता येणार का
In reply to इनबिल्ट नै करता येणार का by आनंदी गोपाळ
लिहा राव किंवा शिकवा...
In reply to इनबिल्ट नै करता येणार का by आनंदी गोपाळ
तुम्ही डॉक्टर कि इंजिनियर? ह
In reply to तुम्ही डॉक्टर कि इंजिनियर? ह by टीपीके
गोपाळराव
In reply to थीमर पाहिलंय ना तुम्ही? by आनंदी गोपाळ
ही मराठी थिम कशी काय करतात हो
In reply to ही मराठी थिम कशी काय करतात हो by श्री
+++१११
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
आत्माराव, ही माझ्यासाठी मीच
In reply to आत्माराव, ही माझ्यासाठी मीच by आनंदी गोपाळ
मग प्लिझ ह्याची झीप फाईल देऊ
In reply to आत्माराव, ही माझ्यासाठी मीच by आनंदी गोपाळ
मस्त आहे थिम, जमल्यास मलाही
In reply to मस्त आहे थिम, जमल्यास मलाही by किसन शिंदे
आं............. मग मलाहि
In reply to आं............. मग मलाहि by अत्रुप्त आत्मा
पण मी पयला हय..
In reply to आत्माराव, ही माझ्यासाठी मीच by आनंदी गोपाळ
मुझे भी प्लीज :)