नुकतीच फुटलेली
अस्ताव्यस्त पसरलेली
अंड्याची टरफलं
आपले अनुभव असेच काहीसे
निष्कर्ष आणि ज्ञान
बाहेर यायच्या आधीच...
पाहतो आहे..
पडलेली टरफले
अस्ताव्यस्त..
टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे. एखाद्या पूर्ण वाक्यात मांडता येणारा अनुभव वाक्ये तुटक करुन आणि शब्द वेगळ्या क्रमाने मांडले की त्यातून सौंदर्य निर्मिती कशी होते याबद्दल जाणकारांकडून काही समजून घ्यावेसे वाटले.
हे लिहित असतानाच अजून एक कल्पना सुचली.
लेस काढलेले माझे बुट
पाहत आहेत माझ्याकडे
आ वासून...
शाळेत निघालेला लहानगा
पाहतोय वाट आईची
बांधण्यासाठी
टायची गाठ
वरील रचनेतली वाक्ये सरळ शब्द क्रमाने लिहिली तर एक छोटीशी मजेदार कल्पना एखाद्या लहानश्या लेखात एक दोन ओळीत बसेल असे वाटले.
मग अश्या कल्पनेला पूर्ण स्वतंत्र काव्याचा मान केवळ शब्दरचना बदलल्याने मिळावा का? असे मनात आले.
आपली मते ऐकायला उत्सुक आहे.
--लिखाळ.
Taxonomy upgrade extras
वाचने
5580
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
नुकतीच
हा हा.. हे
In reply to नुकतीच by आजानुकर्ण
नुकतीच
वृत्त आणि
In reply to नुकतीच by चतुरंग
अहो लिखाळ, आमची प्रतिक्रिया अशी विडंबनातूनच असते!
In reply to वृत्त आणि by लिखाळ
गैरसमज
In reply to अहो लिखाळ, आमची प्रतिक्रिया अशी विडंबनातूनच असते! by चतुरंग
मजेदार विचार
का...वा
In reply to मजेदार विचार by धनंजय
लेखातली वाक्ये
In reply to का...वा by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
पण "ओळी
In reply to मजेदार विचार by धनंजय
रिडिंग बीटवीन द लाईन्स्
नक्कीच
In reply to रिडिंग बीटवीन द लाईन्स् by एकलव्य
एक प्रश्न
काय
बुटाची "लेस"?
त्यामुळे
In reply to बुटाची "लेस"? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
तात्या, काय
In reply to त्यामुळे by विसोबा खेचर
लिखाळ,
प्रतिसाद
In reply to लिखाळ, by चतुरंग
नुकतीच
छान. --
In reply to नुकतीच by कवटी
ph D
मार्मिक चर्चा
प्रतिसादा
In reply to मार्मिक चर्चा by पॅपिलॉन