Skip to main content

मिपा दिवाळी अंक २०१५ प्रकाशित झाला...

मंगळवार, 10/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, आपण सर्व ज्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात होतो तो...

"मिपा दिवाळी अंक २०१५"

प्रसिद्ध झाला आहे... तो वरच्या दुव्यावर आणि उजव्या बाजूच्या कॉलममध्ये "मिसळपाववर स्वागत"च्या खाली असलेल्या दुव्याने उघडू शकाल.

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !

.

वाचने 7651
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ कुठे आहे? नुसत्या लिंक ऐवजी अनाहिता रुची विशेषांका प्रमाणेच एखादे आकर्षक मुखपृष्ठ असते तर अधिक आनंद झाला असता. आता वाचतो दिवाळी अंक.

In reply to by प्रभाकर पेठकर

अभ्या..ने काढलेल्या चित्रातले फटाके फुटले सगळे आणि आला मिसळपाव दिवाळी अंक २०१५ धडाडधुडुम सूँसूँसूँसूँसूँ!!!!!

In reply to by खटपट्या

मुखपृष्ठ छान आहे. मोठ्या आकारातली प्रतिमा दिसण्याचीही सोय करून द्या. लेखन सावकाश वाचेनच.

मघाशीच पाहिले, अंक सुरेख दिसतो आहे. आत्ता चाळते आहे, एकेक लेख सावकाशीने वाचते.. स्वाती

अंक बघतोच आणि सावकाशीने एकेक लेख वाचेन. पेठकरकाकांच्या सूचनेशी सहमत. उजव्या स्तंभात 'रुचि विशेषांका' प्रमाणेच दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ दिले तर चटकन लक्ष जाईल! :)

अंक वर वर पाहिला. सर्वांग सुंदर झाला आहे. यासाठी मेहनत घेणा-या सर्वांचे मनापासून अभिनंदन.

मिपा दिवाळी अंक संपादकमंडळींचे तसेच तमाम लेखक-लेखिका-कवी-कवयत्रिंचे अभिनंदन! अंक मस्त दिसत आहे. लवकरच वाचून काढेन!

छानंच झालाय दिवाळी अंक ! यासाठी कष्ट घेणारांचे सर्वांचे अभिनंदन !!! बाकी अंक वाचून झाल्यावर :)

दिवाळीचे स्पेशल लेख शोधून काढायला त्रास होतो. आमच्या सारख्या लहान मुलांना, असा "हाईड अँड सीक" खेळ निदान दिवाळीत तरी नको. (हट्टी बालक) मुवि

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता अंक दिसायला लागला... आणि दिवाळीला खरी-खरी सुरुवात झाली....

आता वाचतो सावकाशीने. सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

भरगच्च अंक आहे! छान! मुपृ आवडले. (हमखास चांगली सुरूवात व्हावी म्हणून) तुर्तास बॅट्याने घेतलेली मुलाखत आधी वाचली. बाकी सावकाशीने वाचुन त्या त्या लेखनाखाली प्रतिक्रीया देईनच. अभिनंदन आणि आभार!

अंक चांगलाच असणार पण पीडीएफ आवृत्ती येईपर्यंत वाचणार नाही. गेल्या वर्षापासून ही तुकड्या तुकड्यात अंक प्रसिद्ध करण्याची सुरुवात झालीय ती मला आवडत नाही. नेहमीचेच धागे वाचत असल्याचा फील येतो. दिवाळी अंक एकसंध वाचता आला पाहिजे तरच मज्जा !

In reply to by धर्मराजमुटके

मिपाचा दिवाळी अंक तुकड्या तुकड्यात कधीच प्रकाशित होत नाही. तो नेहमीच एकसंध असतो. उजव्या समासातील फोटोवर टिचकी मारा किंवा ही युआरएल बघा. http://www.misalpav.com/node/33519

In reply to by प्रचेतस

प्रत्यक दिवाळी लेखाखाली अनुक्रमणिका असावी दर वेळी स्वगृह उघडा ,दिवाळी अंक उघडा लेख शोधा कारावे लागते

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

dhanywad

In reply to by सागरकदम

एस Thu, 12/11/2015 - 17:31 दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेच्या धाग्याला कृपया वाचनखूण साठवण्याची सोय करून द्यावी. तसेच दिवाळी अंकातल्या धाग्यांनाही.

In reply to by प्रचेतस

तरी हे तुकडेच ! किंवा इंटरनेटची मर्यादा असलेला अंक झाला. मी गेल्या काही वर्षांच्या दिवाळी अंकांच्या पीडीएफ जपून ठेवल्या आहेत. त्या कधीही वाचता येतात. इंटरनेट नसले तरी. शिवाय जेव्हा गावी जातो लॅपटॉपमधे कॉपी करुन गावाकडील भावंडांना (जिथे इंटरनेट नाही) वाचायला देऊ शकलो आहे. इंटरनेट नसतांना त्यांना मिपा, रेषेवरची अक्षरे इ. इ. जालीय अंक माहित आहेत. जेव्हा त्यांना अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध होते तेव्हा त्यांना होणारा आनंद इथे शब्दात सांगता येत नाही. असो. संपादक मंडळाची इच्छा ! फुकटात अपेक्षा तरी किती करायच्या ?

In reply to by धर्मराजमुटके

मी आता घरातल्या जालनिष्णात नसणाऱ्या पण वाचनाची आवड असणाऱ्या सगळ्यांना मिपाचा अंक देईन. धन्यवाद धर्मराज!

अंकाची अनुक्रमणिका पाहिली. अंक काही प्रमाणात वाचला. सर्वच बाबतीत दर्जा अगदी नामवंत दिवाळी अंकांच्या (निदान) तोडीस तोड दिसतो आहे. या मिपाघरच्या कार्यात सहाय्यकारी ठरलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन व या दिवाळी मेजवानीसाठी आभार.

पण जरा मागच्या अंकांचे दुवे दिलेत तर चार चांद लागतील.

प्ले इट अगेन : वेल्लाभट ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू : मोदक सुपरस्पाय : बोका ए आझम सक्सेसफुल फेल्युअर: अपोलो-१३चा थरार : लाल टोपी पॉन सॅक्रिफाईस : चतुरंग हे अत्यंत वाचनीय म्हणजे, अगदीच बेस्ट झाले आहेत …. इतर वाचून फराळ करू. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

एकदम मस्त. अंकासाठी मेहनत घेनाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. सुरेख दिवाळी अंक.

दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आणि अंकातील आतील सजावट फार भारी आहे. सध्या दिवाळीच्या व्यावसायिक धावपळीत असल्यामुळे वाचता आलेला नाही पण कार्यमुक्त होताच पहिले काम दिवाळी अंक वाचन हेच असेल.

अंक उत्तम झाला आहे

maharashtra times मधे आपल्या दिवाळी अंकाचा उल्लेख आहे शुभ दिपावली

ह्या लेखाला वाचनखूण साठवली आहे. म्हणजे इथून दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेत आणि तिथून अंकातील लेखांपर्यंत पोहोचता येईल.

हा कुठल्याही आॅफलाईन दिवाळी अंकापेक्षाही सुंदर झाला आहे. मुलाखती, संपादकीय, दृकश्राव्य राशिभविष्य आणि सर्वात भारी म्हणजे कथा. सर्व कथा आवडल्या. डाॅ.ख-यांची सत्यकथा ' मुक्ता ', वेल्लाभट यांची ' प्ले इट अगेन ' आणि आतिवास यांची ' उशिरा ' या फार सुंदर आहेत. धन्यवाद संपादक्स आणि लेखक्स!

मिपाच्या या वर्षीच्या दिवाळी अंकांचे स्वागत आहे. पूर्वीच्या अंकांचे दुवे: *(२०११ ला स्वतंत्र अंक नव्हता. दिवाळीसाठी काही खास धागे काढले होते.)

In reply to by श्रीरंग_जोशी

२०१२ ची पूर्ण पीडीएफ नको असेल तर http://www.misalpav.com/node/23127 ते http://www.misalpav.com/node/23170 हे दिवाळी अंक धाग्यांचे नोड नंबर्स आहेत. याशिवाय http://www.misalpav.com/taxonomy/term/239 http://www.misalpav.com/ruchi हे अनाहिता महिला दिन विशेषांक आणि रुची अंकाचे दुवे.

In reply to by पैसा

नोड क्रमांक दिल्याबद्दल धन्यवाद.