✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझा बसप्रवास

प
पैसा यांनी
Sun, 08/29/2010 - 01:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45279 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

धमाल!

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/29/2015 - 06:17 नवीन
पाच वर्षांनीही अशीच परिस्थिती आहे का पैसातै?
  • Log in or register to post comments

पैसाक्काच्या रूट ला कदंबा बस

प्रीत-मोहर
गुरुवार, 10/29/2015 - 07:01 नवीन
पैसाक्काच्या रूट ला कदंबा बस कमी चालतात/चालायच्या. आताही थोडीफार तशीच परिस्थिती आहे पण कानपिटिसन वाढलोय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

>>> कानपिटिसन

प्यारे१
गुरुवार, 10/29/2015 - 15:23 नवीन
>>> कानपिटिसन आधी म्हटलं काही गोव्याचं पेश्शल दिसतंय. नंतर पेटली. शब्दसंग्रहात वाढ केल्याबद्दल मंडळ आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

+१

जातवेद
Fri, 11/06/2015 - 09:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

भन्नाट लिहिलय!

चांदणे संदीप
गुरुवार, 10/29/2015 - 07:23 नवीन
भन्नाट लिहिलय पैसाताई. अजून येऊ द्या! रच्याकने, कोकण-गोवा कडची माणसे हॅप्पी-गो-लकी टाईप असतात अस ऐकलय. मग ती बसची मंडळी फक्त नसतात काय तशी?
  • Log in or register to post comments

हॅप्पी गो लकीच की!

पैसा
गुरुवार, 10/29/2015 - 11:47 नवीन
हॅप्पी गो लकीच की! बस ड्रायव्हर आणि कंडक्टर पिकनिकला निघाल्यासारखेच सुशेगात असतात बहुतेकवेळा. मात्र हापिसला जाणार्‍यांना तो ऑप्शन नसतो ना! मग त्यांची चिडचिड होते! गोव्यात टुरिस्ट लोक सोडता बाकी सगळे सगळीकडे असते तसेच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

डारे डारे

नमकिन
गुरुवार, 10/29/2015 - 09:09 नवीन
मडगांवात ४ महिने वास्तव्यास असताना ठाणेकर मित्र मंडळी गोवा फिरण्यास आलेली. तेव्हा सार्वजनिक बसने सगळे फिरलो, मजा म्हणजे बस स्थानकावर सारे वाहक "म्हासा डारे म्हासा डारे" "ए डारे डारे डारे" अशा आरोळ्या ठोकत प्रवासी"पकडायचे" व प्रेमाने त्याला चढवायचे. तेव्हा मित्राने विचारले हे कुठे मासाडारे ला चाललेत का? आणि हे डारे डारे काय? उकलुन सांगितल्यावर पुढील ४ दिवस जो तो "डारे डारे" म्हणायचा व सर्व हसायचो, दिवाळीनंतर ४ दिवस गोवा जाणे विचारी आहे.
  • Log in or register to post comments

??

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/29/2015 - 09:27 नवीन
हे कुठे मासाडारे ला चाललेत का? आणि हे डारे डारे काय? आम्हालाही सांगा की त्याचा अर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन

डायरेक्ट!

पैसा
गुरुवार, 10/29/2015 - 11:43 नवीन
म्हापसा डायरेक्ट! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आले लक्षात...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/29/2015 - 15:19 नवीन
हा: हा: हा: आता डारे लक्षात आलो हो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छान

मधुमति
गुरुवार, 10/29/2015 - 10:42 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

पैसाताई, अगदी चकलीसारखा

तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 15:34 नवीन
पैसाताई, अगदी चकलीसारखा खुसखुषीत लेख.. पुढील लेखन केव्हा..?
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
गुरुवार, 10/29/2015 - 17:12 नवीन
गोव्यात बसने प्रवास केला होता, मडगाव - कोलवा बहुतेक, तेव्हा तुम्ही सांगताय तशीच परिस्थिती होती. फुल भरलेली बस, नशिबाने आम्ही आधीच बसलेलो होतो. मासे, भाज्या इ.खचाखच भरलेल्या टोपल्या घेऊन चाललेल्या अनेक दणकट काकू बसमधे होत्या . मात्र अशा प्रवासात होणारे गोवा दर्शन खूप प्रसन्न आणि नेत्रसुखद असते. कधी जायला मिळणार परत गोव्याला..
  • Log in or register to post comments

लेख आवडला. आमच्या गावापासून

अभिजीत अवलिया
गुरुवार, 10/29/2015 - 21:51 नवीन
लेख आवडला. आमच्या गावापासून (कणकवली) गोवा जवळ असल्याने बर्याचदा जाणे झालेले आहे. आणी पैसा ताई ह्यांनी लिहिलेले आहे त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे.
  • Log in or register to post comments

सफर होत केलेली सफर.

शिव कन्या
Sat, 10/31/2015 - 00:35 नवीन
सफर होत केलेली सफर. आवडले लेखन .
  • Log in or register to post comments

लेख आवडला आणि हा प्रतिसादपण !

पलाश
Sat, 10/31/2015 - 08:38 नवीन
लेख आवडला आणि हा प्रतिसादपण !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

लॆख आवडला पण थोडी काळजी वाटते

मीउमेश
Sat, 10/31/2015 - 11:15 नवीन
पैसा ताई , मी ६ नोहेंबर पासून १० दिवस गोव्यात आहे, कृपा करून तिकडची उत्तम आवर्जून भेट देण्या सारखी ठिकाणे कळवा
  • Log in or register to post comments

मंदिरे

नमकिन
गुरुवार, 11/05/2015 - 06:47 नवीन
गोवा म्हणजे मंदिरे, समुद्र, ईसाई मंदिरं त्यातली ममी, मांडवी नदी, त्यातल्या होड्या व मासे इ. इ. शांतादुर्गा- फोंडा, मंगेशी, जुने गोवा चे युनेस्को जागतिक वारसा यादीतले चर्च ⛪, नदी तील तराफे, अगोदा किल्ला, समुद्र किनारे व तेथील "नयनरम्य" सौंदर्य. एकंदर, बरीच मजा आहे बॅा १ माणसाची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीउमेश

अवघड आहे माझ

मीउमेश
गुरुवार, 11/05/2015 - 08:56 नवीन
मला तर खूप अडचण वाटते आहे, मी शुद्ध शाकाहारी आहे. मुख्य म्हणजे मला फिश चा वास जर सुद्धा सहन होत नाही. शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं का तिकडे ? मुद्दाम रेसोट ऐवजी मी अपार्टमेंट घेतली आहे. काहीच शाकाहारी नाही मिळालं तर maggie किव्हा तत्सम नुडल वर जगावं लागेल. पैसा ताई काही माहिती द्या या वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन

काही प्रॉब्लेम नाही

पैसा
गुरुवार, 11/05/2015 - 09:09 नवीन
गोव्यात शाकाहारी जेवण अतिशय उत्तम मिळतं. बहुतेक देवळांच्या कॅन्टीनमधे कांदा लसूण सुद्धा न घातलेलं तरी चविष्ट जेवण मिळतं. गावोगावी एखादे तरी प्रसिद्ध शाकाहारी हॉटेल आहे. घरगुती खानावळी आहेत. उडप्यांची हॉटेल्स तर आहेतच आहेत. नमकीन यांनी म्हटलेल्या गोव्याशी आम्ही जे गोव्यात नेहमी रहातो त्यांचा रोजच्या आयुष्यातल्या आवश्यक कामांव्यतिरिक्त काही फारसा संबंध नाही. गोव्याची खरी माहिती हवी असेल तर आमचे गोंय ही आमची लेखमालिका वाचा. टुरिस्टांसाठी संपूर्ण वेगळे जग अस्तित्त्वात आहे. खरे सांगायचे तर कोणत्या हॉटेलात खाऊ, किंवा कुठे राहू असे विचारले तर मी गोंधळून जाते. कारण गोवा टुरिझमच्या सरकारी हॉटेल्सशिवाय मी कोणालाही कोणते हॉटेल सांगू शकत नाही. @नमकिन, नयनरम्य ची तुमची व्याख्या काय यावर बरेच काही अवलंबून असते. गोवा नयनरम्य आहेच. पण कमी कपड्यातल्या फॉरेनर्स बद्दल बोलत असाल तर पसंद अपनी अपनी. गोव्याची ही "खाओ पिओ मजा करो" प्रतिमा व्हायला कारण आधीच्या काही सरकारांची पापे आहेत. तो संपूर्ण वेगळा विषय आहे. मात्र गोव्यातल्या सामान्य स्त्रियांबद्दल तरुण तेजपालने काढलेले उद्गार लक्षात ठेवून गोव्यात आलात तर त्याच्यासारखेच काहीतरी होऊन बसेल याची खात्री बाळगा! गोव्यातले लोक मुंबईसारखे कॉस्मोपोलिटन किंवा फुडारलेले नाहीत. अगदी स्थानिक ख्रिश्चनसुद्धा बरीच जुनाट नीतीमूल्ये मानणारे आहेत. इत्यलम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीउमेश

+१०००

प्रीत-मोहर
Fri, 11/06/2015 - 09:22 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

केला इशारा

नमकिन
Sun, 11/08/2015 - 20:44 नवीन
जाता जाता. बाकी"खानपान" शाकाहारी भोजन सर्वत्र उपलब्ध. माझे सलग ४ महिने वास्तव्य असताना (२०००-०१) साली व नंतर इतर अनेक १०-१२ फेरफटके केले असता स्त्री -पुरुष समानता तसेच कष्टकरी स्त्रीया सर्वत्र आढळल्या. मला तरी कुठेही अप्रिय अनुभव /प्रसंग पाहण्मात नाहीं, दैवकृपेने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा

खटपट्या
गुरुवार, 11/05/2015 - 10:55 नवीन
कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा सुरूवातीला हात दाखवताच तीपण थांबेल की काय असा बर्‍याच लोकांना संशय होता.
ळोळ
  • Log in or register to post comments

एकदम खुसखूशीत लेख...

मुक्त विहारि
Fri, 11/06/2015 - 08:59 नवीन
अगदी दिवाळीतल्या चकलीसारखा. वाखूसा......
  • Log in or register to post comments

हही हही ह्ह्ह्हह्हाआ

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/06/2015 - 10:19 नवीन
हही हही ह्ह्ह्हह्हाआ
  • Log in or register to post comments

बिचारी पै तै!!!

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 11/06/2015 - 11:55 नवीन
बिचारी पै तै!!! प्रथम गोव्याला गेलो होतो ते आठवले "फोण्याहुन बसला का सायबां" असा विलक्षण व्यक्तिगत अदर अन बेदरकार प्रश्न विचारणारा कंडक्टर आठवला
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रात बस ने प्रवास केल्यानंतर गोव्यामधील ..

अक्षया
Fri, 11/06/2015 - 16:48 नवीन
बसप्रवासात आपण व्हि आय पी असल्याचा भास होतो. गोवेकरांचे बोलणे खुपच गोड हो ! :)
  • Log in or register to post comments

गोव्याचं माहिती नाय पण

बॅटमॅन
Fri, 11/06/2015 - 17:02 नवीन
गोव्याचं माहिती नाय पण कर्नाटक बसप्रवासाबद्दलही हे तितकेच खरेय. रादर महाराष्ट्र सोडून कुठेही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया

+ १

अक्षया
Sat, 11/07/2015 - 10:38 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नुकताच गोव्याला जाउन आलो

प्रणवजोशी
Sat, 11/07/2015 - 00:34 नवीन
नुकताच गोव्याला जाउन आलो मडगाव-पणजी प्रवास कदंबानी केला.कदंबच्या नविन बस चांगल्या आहेत
  • Log in or register to post comments

सुंदर लेख. प्रत्यक्ष अनुभव

सुबोध खरे
Sun, 11/08/2015 - 14:13 नवीन
सुंदर लेख. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असल्याने लेख जास्त भावला. प्रतिक्रिया द्यायची राहून गेली त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

लै भारी!

चतुरंग
Sun, 11/08/2015 - 22:23 नवीन
बसप्रवासाला कंडक्टरच्या 'कर्करोगाने' असं ग्रासलं जावं हे बाकी भलतंच मनोरंजक! :) (कर्कांंची माळफुले अजुनि क्दंबात) ;) -कर्करंग
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Sun, 11/08/2015 - 22:35 नवीन
=)) नशिबाने कदंबाचे कंडक्टर चांगले शिस्तीचे असतात. पॉइंट टू पॉईंट कदंबा बसेसमधे तर कंडक्टर नसतातच. हा कर्करोग खाजगी बसगाड्यांनाच! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

\मुद्दाम हा लेख वर आणतेय =))

प्रीत-मोहर
Mon, 02/26/2018 - 15:51 नवीन
\मुद्दाम हा लेख वर आणतेय =)) परत वाचुन ही मज्जा आली.
  • Log in or register to post comments

कोकणी - मराठी बोलचालीतली सोपी

कंजूस
Mon, 02/26/2018 - 21:17 नवीन
कोकणी - मराठी बोलचालीतली सोपी वाक्ये लवकर द्या. कोकणीतले संवाद का दिले नव्हते? आता ते देऊन २७-२८ फेब्रुवारीच्या बोलीभाषा नवीन मालिकेत द्याच.
  • Log in or register to post comments

प्रीमो कोचिंग क्लास

पैसा
Mon, 02/26/2018 - 22:34 नवीन
प्रीमो कोचिंग क्लास धागे आहेत. तरी ही घ्या. हांगा यो - इकडे ये थंय वच - तिकडे जा तुजें नाव कितें - तुझे नाव काय तू खंय रावतां - तू कुठे रहातोस्/रहातेस मात्सो रांव - जरा थांब नुस्त्याक कितलें पयशे - माशाला किती पैसे शीत दी - भात दे आमी पणजें या - आम्ही पणजीला जाऊया. हा, पण गोंयकाराना मराठी छान कळते आणि बरेच जण बोलतात सुद्धा. गोंयकाराना हिंदीपेक्षा मराठी जास्त येते. बाहेरून आलेल्या लोकाना मात्र (भय्ये, नेपाळी, केरळी वगैरे) हिंदी समजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मस्त लेख

प्रियाजी
Wed, 02/28/2018 - 15:39 नवीन
वाचन खूण साठविली आहे.
  • Log in or register to post comments

मिपावर कानडी, तमिळ,गोय याचे

कंजूस
गुरुवार, 03/01/2018 - 05:34 नवीन
मिपावर कानडी, तमिळ,गोय याचे कोचिंग क्लासिज सुरु होतील तर एक उपयुक्त साइट होईल॥ ( मी दमणच्या लेखात गुजराथी वाक्ये दिली आहेत.)
  • Log in or register to post comments

खुप छान लेख, आवडला.

Ashok Waghole
Sun, 09/15/2019 - 18:25 नवीन
खुप छान लेख, आवडला.
  • Log in or register to post comments

दिवाळीतला चटकमटक चिवडा आजच ........

सुधीर कांदळकर
Mon, 09/16/2019 - 11:14 नवीन
या लेखाच्या रूपाने मिळाला. मजा आली. पण माझा अनुभव मात्र चांगला आहे. चारपाच वर्षांपूर्वी. आमच्या सौ.ला कोणीतरी सांगितले की कोरगावची शांतादुर्गा ही कांदळकरांची शांतादुर्गा. मंदिरावर तसा उल्लेख आहे. मग मापशाला उतरलो. तीसगाव नाका जाणारी बस पकडली. कन्डक्टर सौ.ला कोंकणीत म्हणाला की मावशी कोरगांवला जाणारी बस यायला वेळ आहे. उगीच रस्त्यावर उभे राहण्यापेक्षा नाका आला तरी उतरू नका. बस परत येतांना उतरा. जास्त भाडे नको. त्या दुष्काळी वर्षी नेमका धो धो पाऊस कोसळत होता. येतांना उतरलो. तिथून ४ किमीवर कोरगांव. दुकानात चौकशी केली. बसला अजून ४० मिनिटे होती. एकही रिक्षा नाही. थोड्या वेळाने एक पायलट येऊन उभा राहिला. माणशी साठ रुपये, रिटर्न आणून सोडणार. पाच मिनिटे लागतील. मी तयार झालो. सौल. ला सोडून ये मग मला ने म्हणालो. तर तो म्हणाला दोघांनाही नेतो. दर्शन करा, मी थांबतो. परत आल्यावर सोडतो. त्याच्या अंगावर रेनकोट होता. पाऊस थोडा कमी होऊन भुरभुर झाल्यावर त्याने नेऊन आणून सोडले. फक्त १०० रु. घेतले. घनदाट ढगांमुळे प्रकाश कमी होता पण नाईट व्हीजनवर टाकून प्रचि मस्त निघाली. Image removed. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

गोव्यातील बहुतेक मंदिरे अशी

सुबोध खरे
गुरुवार, 09/19/2019 - 10:44 नवीन
गोव्यातील बहुतेक मंदिरे अशी प्रशस्त, शांत आणि बजबजपुरी नसलेली आहेत. (आपण उत्सवाच्या वेळेस गेलो तर कदाचित वेगळे चित्र दिसेल.) शांता दुर्गा (कवळे,फातोर्फा, कुंकळी) नागेशी, मंगेशी किंवा इतर बहुतेक मंदिरे मी उत्सव नसताना पाहिली. त्यामुळे तेथे शांत पवित्र असे प्रसन्न करणारे वातावरण नेहमीच पाहायला मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

सर्वात मोठी गंमत म्हणजे ........

सुधीर कांदळकर
Mon, 09/16/2019 - 11:18 नवीन
ती शांतादुर्गा आमची नव्हतीच. आमची कांदोळीला. गेल्या वर्षी तिथे गेलो. चारजण होतो म्हणून मग कारने गेलो. मग बहीण आली तिला पण जायचे होते. पग पुन्हा कांदोळीची वारी. मुलाचे लग्न झाल्यावर सुनेच्या निमित्ताने मग पुन्हा एकदा.
  • Log in or register to post comments

गोयेकर

चौकस२१२
Mon, 09/16/2019 - 14:47 नवीन
लहानपणी ( वोल्वो च्या आधीच काळ) पणजी ला जायचो तेव्हा तेथे राहणाऱ्या भावाचा फार हेवा वाटायचा कारण तेव्हा महाराष्ट्रात फक्त तांबडी यष्टी हि एकमेव , लक्झरी फार कमीच त्यामानाने गोव्यात भरपूर रंगबिरंगी लक्झरी बघायला मिलाळायचा आणि नुकतेच कदमब सुरु झाली होती त्यामुळे त्यागाड्या एकदम नवीन.. त्यामुळे भाऊ फुशारकी मारायचा , गोव्यात अजूनही जुना गोडवा आहे का हो? जुने गुत्ते, सध्या खानावळी का आत जेथे तेथे टुरिष्टांसाठी तंदूर चिकन आणि चिनी च्या गाड्या ? फार वर्षांनी सिंगडावर गेलो होतो आणि तेथील जेवण तसेच मराठ मोळे ठेवले आहे हे पाहून बरं वाटलं पण कॉस्मोपोलिटिन पुण्यातील "क्राऊड" मात्र " idhar तंदुरी मिलेगी क्या ?" हे विचारत फिरत होता आणि कीव आली पामरांची ( मला तंदुरी आवडते पण ते सिंहगडावर भाकरी पिठलं असताना नाही)
  • Log in or register to post comments

एक पैसा ये पैसा

जॉनविक्क
Mon, 09/16/2019 - 21:58 नवीन
एक पैसा ये पैसा दो जैसा है कैसा तीन नहीं कोई ऐसा चार जैसा ये पैसा पाँच ये हो मुसीबत छह ना हो मुसीबत हो मुसीबत ना हो मुसीबत सात आठ नौ दस
  • Log in or register to post comments

मजेदार !!!

किल्लेदार
Wed, 09/18/2019 - 15:19 नवीन
चटपटीत आणि मजेदार !!!
  • Log in or register to post comments

हे वाचले नव्हते, मजेदार

अनिंद्य
गुरुवार, 09/19/2019 - 11:24 नवीन
हे वाचले नव्हते, मजेदार प्रकरण आहे :-)) BTW लेखिका बऱ्याच दिवसात दिसल्या नाहीत. त्यांनी ही गोवा सिरीज पुढे नेली तर वाचायला मजा येईल.
  • Log in or register to post comments

आधी वाचला होताच, परत वाचून पण

वीणा३
गुरुवार, 09/19/2019 - 22:09 नवीन
आधी वाचला होताच, परत वाचून पण मजा अली. हडपसर ते पुणे अशा २ वर्ष बस प्रवासाच्या सुखद (??) आठवणी आल्या :P . 
  • Log in or register to post comments

एव्हाना

धर्मराजमुटके
Fri, 09/20/2019 - 23:13 नवीन
एव्हाना मुंबईतल्या बशींचे भाडे अर्ध्याने कमी झाल्यामुळे बेस्टीच्या बशींना सुगीचे दिवस आलेत. कंडक्टरला मनसोक्त ओरडून घेता येतं पब्लीकवर...
  • Log in or register to post comments

मस्त

diggi12
Mon, 04/29/2024 - 03:36 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा