हॅप्पी गो लकीच की! बस ड्रायव्हर आणि कंडक्टर पिकनिकला निघाल्यासारखेच सुशेगात असतात बहुतेकवेळा. मात्र हापिसला जाणार्यांना तो ऑप्शन नसतो ना! मग त्यांची चिडचिड होते! गोव्यात टुरिस्ट लोक सोडता बाकी सगळे सगळीकडे असते तसेच आहे!
मडगांवात ४ महिने वास्तव्यास असताना ठाणेकर मित्र मंडळी गोवा फिरण्यास आलेली. तेव्हा सार्वजनिक बसने सगळे फिरलो, मजा म्हणजे बस स्थानकावर सारे वाहक "म्हासा डारे म्हासा डारे" "ए डारे डारे डारे" अशा आरोळ्या ठोकत प्रवासी"पकडायचे" व प्रेमाने त्याला चढवायचे. तेव्हा मित्राने विचारले हे कुठे मासाडारे ला चाललेत का? आणि हे डारे डारे काय?
उकलुन सांगितल्यावर पुढील ४ दिवस जो तो "डारे डारे" म्हणायचा व सर्व हसायचो,
दिवाळीनंतर ४ दिवस गोवा जाणे विचारी आहे.
गोव्यात बसने प्रवास केला होता, मडगाव - कोलवा बहुतेक, तेव्हा तुम्ही सांगताय तशीच परिस्थिती होती.
फुल भरलेली बस, नशिबाने आम्ही आधीच बसलेलो होतो.
मासे, भाज्या इ.खचाखच भरलेल्या टोपल्या घेऊन चाललेल्या अनेक दणकट काकू बसमधे होत्या .
मात्र अशा प्रवासात होणारे गोवा दर्शन खूप प्रसन्न आणि नेत्रसुखद असते.
कधी जायला मिळणार परत गोव्याला..
गोवा म्हणजे मंदिरे, समुद्र, ईसाई मंदिरं त्यातली ममी, मांडवी नदी, त्यातल्या होड्या व मासे इ. इ.
शांतादुर्गा- फोंडा, मंगेशी, जुने गोवा चे युनेस्को जागतिक वारसा यादीतले चर्च ⛪, नदी तील तराफे, अगोदा किल्ला, समुद्र किनारे व तेथील "नयनरम्य" सौंदर्य.
एकंदर, बरीच मजा आहे बॅा १ माणसाची!
मला तर खूप अडचण वाटते आहे, मी शुद्ध शाकाहारी आहे. मुख्य म्हणजे मला फिश चा वास जर सुद्धा सहन होत नाही. शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं का तिकडे ? मुद्दाम रेसोट ऐवजी मी अपार्टमेंट घेतली आहे. काहीच शाकाहारी नाही मिळालं तर maggie किव्हा तत्सम नुडल वर जगावं लागेल.
पैसा ताई काही माहिती द्या या वर
गोव्यात शाकाहारी जेवण अतिशय उत्तम मिळतं. बहुतेक देवळांच्या कॅन्टीनमधे कांदा लसूण सुद्धा न घातलेलं तरी चविष्ट जेवण मिळतं. गावोगावी एखादे तरी प्रसिद्ध शाकाहारी हॉटेल आहे. घरगुती खानावळी आहेत. उडप्यांची हॉटेल्स तर आहेतच आहेत.
नमकीन यांनी म्हटलेल्या गोव्याशी आम्ही जे गोव्यात नेहमी रहातो त्यांचा रोजच्या आयुष्यातल्या आवश्यक कामांव्यतिरिक्त काही फारसा संबंध नाही. गोव्याची खरी माहिती हवी असेल तर आमचे गोंय ही आमची लेखमालिका वाचा. टुरिस्टांसाठी संपूर्ण वेगळे जग अस्तित्त्वात आहे. खरे सांगायचे तर कोणत्या हॉटेलात खाऊ, किंवा कुठे राहू असे विचारले तर मी गोंधळून जाते. कारण गोवा टुरिझमच्या सरकारी हॉटेल्सशिवाय मी कोणालाही कोणते हॉटेल सांगू शकत नाही.
@नमकिन, नयनरम्य ची तुमची व्याख्या काय यावर बरेच काही अवलंबून असते. गोवा नयनरम्य आहेच. पण कमी कपड्यातल्या फॉरेनर्स बद्दल बोलत असाल तर पसंद अपनी अपनी. गोव्याची ही "खाओ पिओ मजा करो" प्रतिमा व्हायला कारण आधीच्या काही सरकारांची पापे आहेत. तो संपूर्ण वेगळा विषय आहे. मात्र गोव्यातल्या सामान्य स्त्रियांबद्दल तरुण तेजपालने काढलेले उद्गार लक्षात ठेवून गोव्यात आलात तर त्याच्यासारखेच काहीतरी होऊन बसेल याची खात्री बाळगा! गोव्यातले लोक मुंबईसारखे कॉस्मोपोलिटन किंवा फुडारलेले नाहीत. अगदी स्थानिक ख्रिश्चनसुद्धा बरीच जुनाट नीतीमूल्ये मानणारे आहेत. इत्यलम.
जाता जाता.
बाकी"खानपान" शाकाहारी भोजन सर्वत्र उपलब्ध.
माझे सलग ४ महिने वास्तव्य असताना (२०००-०१) साली व नंतर इतर अनेक १०-१२ फेरफटके केले असता स्त्री -पुरुष समानता तसेच कष्टकरी स्त्रीया सर्वत्र आढळल्या.
मला तरी कुठेही अप्रिय अनुभव /प्रसंग पाहण्मात नाहीं, दैवकृपेने.
प्रीमो कोचिंग क्लास धागे आहेत.
तरी ही घ्या.
हांगा यो - इकडे ये
थंय वच - तिकडे जा
तुजें नाव कितें - तुझे नाव काय
तू खंय रावतां - तू कुठे रहातोस्/रहातेस
मात्सो रांव - जरा थांब
नुस्त्याक कितलें पयशे - माशाला किती पैसे
शीत दी - भात दे
आमी पणजें या - आम्ही पणजीला जाऊया.
हा, पण गोंयकाराना मराठी छान कळते आणि बरेच जण बोलतात सुद्धा. गोंयकाराना हिंदीपेक्षा मराठी जास्त येते. बाहेरून आलेल्या लोकाना मात्र (भय्ये, नेपाळी, केरळी वगैरे) हिंदी समजते.
या लेखाच्या रूपाने मिळाला. मजा आली. पण माझा अनुभव मात्र चांगला आहे. चारपाच वर्षांपूर्वी. आमच्या सौ.ला कोणीतरी सांगितले की कोरगावची शांतादुर्गा ही कांदळकरांची शांतादुर्गा. मंदिरावर तसा उल्लेख आहे. मग मापशाला उतरलो. तीसगाव नाका जाणारी बस पकडली. कन्डक्टर सौ.ला कोंकणीत म्हणाला की मावशी कोरगांवला जाणारी बस यायला वेळ आहे. उगीच रस्त्यावर उभे राहण्यापेक्षा नाका आला तरी उतरू नका. बस परत येतांना उतरा. जास्त भाडे नको. त्या दुष्काळी वर्षी नेमका धो धो पाऊस कोसळत होता. येतांना उतरलो. तिथून ४ किमीवर कोरगांव. दुकानात चौकशी केली. बसला अजून ४० मिनिटे होती. एकही रिक्षा नाही. थोड्या वेळाने एक पायलट येऊन उभा राहिला. माणशी साठ रुपये, रिटर्न आणून सोडणार. पाच मिनिटे लागतील. मी तयार झालो. सौल. ला सोडून ये मग मला ने म्हणालो. तर तो म्हणाला दोघांनाही नेतो. दर्शन करा, मी थांबतो. परत आल्यावर सोडतो. त्याच्या अंगावर रेनकोट होता. पाऊस थोडा कमी होऊन भुरभुर झाल्यावर त्याने नेऊन आणून सोडले. फक्त १०० रु. घेतले. घनदाट ढगांमुळे प्रकाश कमी होता पण नाईट व्हीजनवर टाकून प्रचि मस्त निघाली.
धन्यवाद.
गोव्यातील बहुतेक मंदिरे अशी प्रशस्त, शांत आणि बजबजपुरी नसलेली आहेत. (आपण उत्सवाच्या वेळेस गेलो तर कदाचित वेगळे चित्र दिसेल.)
शांता दुर्गा (कवळे,फातोर्फा, कुंकळी) नागेशी, मंगेशी किंवा इतर बहुतेक मंदिरे मी उत्सव नसताना पाहिली.
त्यामुळे तेथे शांत पवित्र असे प्रसन्न करणारे वातावरण नेहमीच पाहायला मिळाले.
ती शांतादुर्गा आमची नव्हतीच. आमची कांदोळीला. गेल्या वर्षी तिथे गेलो. चारजण होतो म्हणून मग कारने गेलो. मग बहीण आली तिला पण जायचे होते. पग पुन्हा कांदोळीची वारी. मुलाचे लग्न झाल्यावर सुनेच्या निमित्ताने मग पुन्हा एकदा.
लहानपणी ( वोल्वो च्या आधीच काळ) पणजी ला जायचो तेव्हा तेथे राहणाऱ्या भावाचा फार हेवा वाटायचा कारण तेव्हा महाराष्ट्रात फक्त तांबडी यष्टी हि एकमेव , लक्झरी फार कमीच त्यामानाने गोव्यात भरपूर रंगबिरंगी लक्झरी बघायला मिलाळायचा आणि नुकतेच कदमब सुरु झाली होती त्यामुळे त्यागाड्या एकदम नवीन.. त्यामुळे भाऊ फुशारकी मारायचा ,
गोव्यात अजूनही जुना गोडवा आहे का हो? जुने गुत्ते, सध्या खानावळी का आत जेथे तेथे टुरिष्टांसाठी तंदूर चिकन आणि चिनी च्या गाड्या ?
फार वर्षांनी सिंगडावर गेलो होतो आणि तेथील जेवण तसेच मराठ मोळे ठेवले आहे हे पाहून बरं वाटलं पण कॉस्मोपोलिटिन पुण्यातील "क्राऊड" मात्र " idhar तंदुरी मिलेगी क्या ?" हे विचारत फिरत होता आणि कीव आली पामरांची ( मला तंदुरी आवडते पण ते सिंहगडावर भाकरी पिठलं असताना नाही)
प्रतिक्रिया
धमाल!
पैसाक्काच्या रूट ला कदंबा बस
>>> कानपिटिसन
+१
भन्नाट लिहिलय!
हॅप्पी गो लकीच की!
डारे डारे
??
डायरेक्ट!
आले लक्षात...
छान
पैसाताई, अगदी चकलीसारखा
:)
लेख आवडला. आमच्या गावापासून
सफर होत केलेली सफर.
लेख आवडला आणि हा प्रतिसादपण !
लॆख आवडला पण थोडी काळजी वाटते
मंदिरे
अवघड आहे माझ
काही प्रॉब्लेम नाही
+१०००
केला इशारा
कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा
एकदम खुसखूशीत लेख...
हही हही ह्ह्ह्हह्हाआ
बिचारी पै तै!!!
महाराष्ट्रात बस ने प्रवास केल्यानंतर गोव्यामधील ..
गोव्याचं माहिती नाय पण
+ १
नुकताच गोव्याला जाउन आलो
सुंदर लेख. प्रत्यक्ष अनुभव
लै भारी!
=))
\मुद्दाम हा लेख वर आणतेय =))
कोकणी - मराठी बोलचालीतली सोपी
प्रीमो कोचिंग क्लास
मस्त लेख
मिपावर कानडी, तमिळ,गोय याचे
खुप छान लेख, आवडला.
दिवाळीतला चटकमटक चिवडा आजच ........
गोव्यातील बहुतेक मंदिरे अशी
सर्वात मोठी गंमत म्हणजे ........
गोयेकर
एक पैसा ये पैसा
मजेदार !!!
हे वाचले नव्हते, मजेदार
आधी वाचला होताच, परत वाचून पण
एव्हाना
मस्त