लेकीच पहिलं बाळंतपण! आपल्याच घरी व्हावं म्हणून आईने खूप प्रयत्न केलेले पण लेकीच्या सासरच्यांनी, 'कशाला त्या गावखेड्यात? तित काय येळला सोयी-सुविधा हायेत, का रातीअंधारचं गाडी-घोडा आहे? शिवाय एकली आई आन म्हातारी आज्जी. त्यांच त्यान्ला तरी उरकतयं का ह्ये परपंचाच ऱ्हाटगाडग?' अशा उलटतपासण्या करून बाळंतपण कुठे व्हाव हा विषय संपवून टाकला!
मग नातीने चिमुकले पाऊल सा-यांच्याच जगात ठेवल्यावर लेकीच्या आग्रहाखातर आठ-पंधरा दिवसांसाठी आई गावातल्या वावरातली विळा-खुरपी तिथेच सोडून शहरातल्या इमारतींच्या जंगलात आली. पहिल्यांदाच एकटी आलेली! रस्ते चुकायची भानगड विशेष झाली नाही कारण बसमधून जिथं उतरली तिथ जावई वैतागलेल्या चेह-याने का होईना, घ्यायला आलाच होता. तिथून घरी पोहोचेपर्यंत तीनदा तरी, "तुम्ही रस्त्याच्या ह्या बाजूला बसलायं आन मी चारदा पलीकडन एक-दोन चौक फिरून आलोय", हे जावयाचे बोल तिला ऐकावे लागले. जावयाच्या गाडीवर बसून घराकडे धावत असताना तिची नजर त्याच्या गाडीच्याही पुढे लेक आणि नातीच्या दृश्याकडे धावत होती.
घर आल तस आई नातीला विसरून लेकीच्याच गालावरनं बोटं फिरवून कडाकडा मोडू लागली. मग लेकीने नातीला समोर धरल्यावर तिच्यातल्या आज्जीला आलेलं आनंदाच भरतं डोळ्यांतून पदरावर विसावल! "आग्ग बाय! चित्रावानी दिसती पोरगी!" अस काहीसं गलबलून बोलली.
सासरच्या लोकांना सूनेची आई दिसलीच नव्हती. बाळाच्या धुवून वाळवलेल्या लंगोटांच बोचक खोलीतल्या खाटेवर टाकताना सासू, 'आला व्हय! कधी आला, दिसलाच न्हाय तुम्ही...' असं तुटक, तोंडातल्या तोंडात बोलत दुस-या खोलीत गडप झाली. लेकीच्या हालचाली बाळंतपणामुळे जरा मंदावल्या असल्याने ती स्वस्थ बसलेली होती पण तिची भिरभिर नजर नव-याच्या भाच्यांना, आईसाठी पाणी आणि चहा आणायला सांगण्यासाठी कासावीस झाली होती. आईच्या, 'मला नग चहा, राहूदे ग' च्या पालुपदापुढे तिचा, 'थांब ग, आता चहाचाच टाईम झालाय ग, तिकडं किचनमध्ये करतच असतील, आणतेत ते' असा हट्ट चालू होता.
बाळ अंगावर दूध पित नव्हतं म्हणून बाळासाठी दूध गरम करणे, बाटलीत भरून पाजणे, बाटली उकळत्या पाण्यातून धुणे इत्यादी कामे आपसूकच आईला मिळाली! त्यासाठी तिने घरात जो दिसेल आणि बोलेल त्याच्याकडून स्वयंपाकाच्या गॅसचा धडा गिरवला. बाळाला न्हाऊ-माखू घालून येणा-या जाणा-या पाहुण्यांना दाखवायला तयार करणे ही तिची पुढची जबाबदारी होती.
आठव्या दिवशी बाळाची मोठी आत्या बाळाकडे आली आणि किंचाळलीच, 'असं काय मलूल, मुडदूस झाल्यावनी दिसतय बाळ!' धावाधाव झाली. बाळ आयसीयूमध्ये, लेक आयसीयूबाहेर आणि आई लेकीच्या सासरच्यांमध्ये एकटीच!
चार दिवस झाले तरी बाळ दवाखान्यातून घरी कसं आल नाही अस लेकीच्या सासूकडे विचारताच तिने चांगलाच सूड उगवला. "कशाला आलीस ग भवाने हिथ? माया-लेकी नुस्तं गुलूगुलू बोलत बसायला? आमचं लेकरू तुज्यामुळच गेलं दवाखान्यात!" अशा शब्दांनी उत्तरादाखल तिला बोलणीच मिळाली. जाते म्हणाव तर लेकीने हात धरलेला. कशीबशी बाळ घरी येईपर्यंत थांबली अन बाळासाठी दोनशे रू. लेकीकडे देऊन ती कष्टी झालेली आई गावाच्या एसटीत बसली.
गाव येईपर्यंत डोळ्यातल्या धारा अविरत वाहत चाललेल्या. बाळाला काय झालेल? आपल्याला कुणी सांगितलंही नाही. नीट बघतील ना ती लोकं बाळाला अन् माझ्या लेकीला? काय चुकलं आपल? अशा निरनिराळ्या प्रश्नांनी तिने निरनिराळ्या देवादिकांना भंडावून सोडल. आपल्या गरीबीचा अन मुलीची आई असण्याचा या दोन्ही दुर्दैवाचा पाढा आज पूर्ण झाला असंच तिला मनोमनी वाटत राहीलं. विमनस्क अवस्थेत ती गावात पोचली आणि काही वेळाने गावातल्यांनी लांब शहरातल्या तिच्या लेकीला ती गेल्याचा निरोप कळवला!
तान्ह लेकरू घेऊन लेक आणि तिचा नवरा दोघचं आले. सारे विधी वगैरे झाल्यावर नवरा तान्हुलीला घेऊन लगेच माघारीही फिरला. "शहरातल्या लोकांना असा वेळ घालवून चालत नाही", अस काहीबाही मयतीला जमलेल्या काही सोय-यांना सांगताना आणखी काही सोय-यांनी ऐकलं!
दहाव्याला मंडळी नैवेद्य दाखवून कावळ्याची वाट बघत बसलेली आणि कावळा सा-यांच्या सहनशक्तीचा अंत बघत बसलेला. तिसरा प्रहर चालू झाल्यावर मग काही आठवून लेक अनेक आवंढे गिळत म्हणाली, "चित्राच नाव ठेवते ग आई, पोरीचं!" अचानक कुठूनसा एक कावळा आला नि नैवेद्य चोचीत धरून उडालाही!
वाचने
7604
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही प्रविण दवणे नावाने पण
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to तुम्ही प्रविण दवणे नावाने पण by परिकथेतील राजकुमार
असेल तर कसे? हे तुम्ही कृपया
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद! by चांदणे संदीप
असेल तर कसे? हे तुम्ही कृपया स्पष्ट करून जरा सांगाल?वाचताना साडेतीन्वेळा ड्वाले पाणावेल.निबुतैंचा
In reply to असेल तर कसे? हे तुम्ही कृपया by परिकथेतील राजकुमार
आये....
In reply to असेल तर कसे? हे तुम्ही कृपया by परिकथेतील राजकुमार
पराशेठ
In reply to असेल तर कसे? हे तुम्ही कृपया by परिकथेतील राजकुमार
वाचताना साडेतीन्वेळा ड्वाले
In reply to असेल तर कसे? हे तुम्ही कृपया by परिकथेतील राजकुमार
वेलकम बॅक परादादा. बर्याच
In reply to तुम्ही प्रविण दवणे नावाने पण by परिकथेतील राजकुमार
सुरेख जमलीय कथा. खुप आवडली.
चटका लावून जाते एकदम...
कथा आवडली!
सॅण्डीबाबा. मस्त जमलीय रे.
धन्यवाद अभ्यादादा!
In reply to सॅण्डीबाबा. मस्त जमलीय रे. by अभ्या..
सुरेख लेखन!
+१११
In reply to सुरेख लेखन! by जव्हेरगंज
+१००
In reply to +१११ by प्यारे१
आवडली ! आज ही हे असं चालतंच
Kathashaili aavadali.
कथा आवडली. मला मंटोच्या एका
सादत हसन मंटो!!
In reply to कथा आवडली. मला मंटोच्या एका by दमामि
इच्छुकांसाठी ही
In reply to कथा आवडली. मला मंटोच्या एका by दमामि
मंटोच्या कुठल्या कथेची आठवण झाली ?
In reply to कथा आवडली. मला मंटोच्या एका by दमामि
छान झाली आहे कथा
सुंदर .....
सुंदर कथा आवडली.
धन्यवाद प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सुंदर कथा आवडली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भावनिक
कथा आवडली. कथेचा शेवट भावला.
आवडलं लेखन. पण एक बाळबोध
चित्रगुप्त साहेब,
In reply to आवडलं लेखन. पण एक बाळबोध by चित्रगुप्त
कथा आवडली
छान..
आवड्ली :)
उत्कृष्ट बारकाव्यांनिशी आलेलं
गाविकाका!
कथा आवडली.गविंच्या
धन्यवाद सर्वांचे!
संदीप भाऊ
बोका - ए - आझम
In reply to संदीप भाऊ by बोका-ए-आझम
"प्रतिक्रिया तर सहज मिळतात,
माझी कोणाला मार्गदर्शन
In reply to "प्रतिक्रिया तर सहज मिळतात, by सायकलस्वार
माझी कोणाला मार्गदर्शन करण्याची लायकी आहे असा माझा गैरसमज नाही, तरीपण वरच्या एका वाचकाच्या थोड्या पुणेरी स्टाईलने दिलेल्या (म्हणजे प्रशंसेला भयानक कंजूस, पण खवचट टीकेला तत्पर;)) प्रतिक्रियेचा काय अर्थ असावा, असे मला वाटते, (आणि मलाही थोडं तसंच वाटतं) ते लिहितो. तर कथाशैली चांगली आहे, लिहिण्याची स्टाईल ओघवती आहे, कथा चित्रदर्शी आहे, फापटपसारा टाळला आहे. हे सगळे प्लस पॉईंट आहेत आणि इतरांनी त्याबद्दल लिहिलं आहेच, पण शेवट एकंदरीत फिल्मी वाटला. गावात पाय टाकल्यावरच आईचे (कोणत्याही कारणाशिवाय) आपोआप मरणे पटले नाही. शिवाय ते कावळा शिवणे वगैरे गोष्टी आता जुनाट वाटतात. तुमच्या आधीच्या कथा वाचल्या होत्या, त्या चांगल्या आणि जेन्युईन होत्या. ही टीका नाही हे कृपया लक्षात घ्यावे. शिवाय हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ते पूर्णपणे चुकीचं असू शकतं.पुणेकर येवढे कष्ट घेत नाहीत. 'कशाला वीज वाया घालवता?' येवढेच विचारतात.सायकलस्वार...
In reply to "प्रतिक्रिया तर सहज मिळतात, by सायकलस्वार
उत्तम शैली. छान लिहिता.
लेखनशैली आवडली.
छान कथाविषय
उ त्त म !!!!!!!!!!!!!!!!
सैंडी भौ
भावपूर्ण कथा .
नवीन वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार!
कथा चांगली आहे याबद्दल दूमत