✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 10/26/2015 - 17:36  ·  लेख
लेख
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8. रावणाला दहा तोंडे होती. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
40894 वाचन

💬 प्रतिसाद (169)

प्रतिक्रिया

तिला घेउन घरी आल्यानंतर

हेमंत लाटकर
गुरुवार, 10/29/2015 - 10:24 नवीन
तिला घेउन घरी आल्यानंतर पांडवांनी कुंतीला हाक मारली. तिने त्यावर आणलेली भिक्षा समान वाटुन घ्या असं नं पहाता म्हणलं होतं.
हे बरोबर नाही. कुंतीला व व्यासाला 100% माहित होते स्वयंवरात अर्जुनच जिंकणार. माते आम्ही भिक्षा आणली असे युद्धिष्टर म्हणाला. म्हणून न पाहता कुंती वाटून घ्या असे म्हणाली. द्रोपदीचे सोंदर्य पाहून युद्घिष्टराच्या मनात द्रोपदीविषयी अभिलाषा निर्माण झाली होती. सुरवातीला द्रोपदी, द्रुपद, द्युष्टद्युम्न यांनी विरोध केला. पण व्यासाने दैवी दाखले देवून पाच पांडवाशी द्रोपदीचा विवाह करण्यासाठी राजी केले. मी महाभारताची बरीच पुस्तके वाचली आहेत नावे आता आठवत नाही.
  • Log in or register to post comments

द्रोपदीला अर्जुनाने स्वयंवरात

हेमंत लाटकर
गुरुवार, 10/29/2015 - 13:15 नवीन
द्रोपदीला अर्जुनाने स्वयंवरात जिंकले तरी विवाह पाच पांडवा बरोबर करावा लागला. अर्जुन तर युद्धामुळे बाहेरच असायचा. व्यासाने सांगितले एखाद्या पांडवाकडे द्रोपदी असताना दुसर्या पांडवाने जर व्यत्तय आणला तर त्याला 12 वर्ष वनवास. एकदा गायी सोडवून आणण्यासाठी शस्त्रे पाहिजे म्हणून युद्धिष्टर द्रोपदी बरोबर असताना अर्जुनाने व्यत्तय आणल्यामुळे त्याला 12 वर्ष वनवास भोगावा लागला व द्रोपदी 12 वर्ष युद्धिष्टरा बरोबर राहिली. 12 वर्षाच्या वनवास काळात उलुपी, चित्रागंदा व सुभद्रा यांच्या बरोबर अर्जुनाने विवाह केला. सुभद्रा अर्जुना बरोबर राहिली. बाकी दोघीनी पुत्र झाल्यावर जायची परवानगी दिली. युद्धिष्टरच जेष्ठ असल्यामुळे द्रोपदी बरोबर जास्त राहिला. (द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता युद्धिष्टराची मात्र मजा झाली)
  • Log in or register to post comments

(द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/31/2015 - 11:28 नवीन
(द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता युद्धिष्टराची मात्र मजा झाली)
अत्यंत चीप प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

मिपावरच्या सग्ळ्यात मोठ्ठ्या

टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 13:15 नवीन
मिपावरच्या सग्ळ्यात मोठ्ठ्या कंपूने यावर काहिही आक्षेप घेतला नाही...त्यामुळे त्या प्रतिसादात वैट्ट काही नसावे (इतरवेळी मात्र खफवर मिपावर पुरुष आयडी स्त्रीयांबद्दल वैट्ट लिहितात असा आरोप केला जातो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

स्त्री-पुरुषांचे कौमार्य जपणे

तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 14:48 नवीन
स्त्री-पुरुषांचे कौमार्य जपणे हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे.
  • Log in or register to post comments

मी पा झोपडपट्टीत सुद्धा

मम्बाजी सर्वज्ञ
गुरुवार, 10/29/2015 - 20:14 नवीन
मी पा झोपडपट्टीत सुद्धा पोहोचल्याची लक्षणे आहेत....
  • Log in or register to post comments

माफ करा जोकर साहेब, माझा

मम्बाजी सर्वज्ञ
गुरुवार, 10/29/2015 - 20:17 नवीन
माफ करा जोकर साहेब, माझा संदर्भ थोडा वेगळा आहे. उगाच वाईट वाटून घेऊ नका. ज्यांना समजायचा त्यांना समजेल.
  • Log in or register to post comments

@ बाहुबली

हेमंत लाटकर
Sat, 10/31/2015 - 11:19 नवीन
@ बाहुबली पराक्षर सत्यवतीच्या सबंधातून व्यासाचा जन्म झाला. पराक्षर ने सांगितले तुझे कोमार्य पुर्वीसारखे झाले. ते पाहण्यासाठी इ.स. पुर्व 3000 मध्ये सोनीग्राफी होती का? वीर्य शोषून घेईपर्यंत शुक्रजंतू थांबणार आहेत का? @ ऋतराज <<<आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य आहे. सुक्ष्म सुईद्वारे कृत्रिम रेतन करून स्त्रीचे कोमार्य टिकवणे शक्य आहे.>>> इ.स. पुर्व 3000 ला हे तंत्र होते का? @चिमणराव <<<तिला घेउन घरी आल्यानंतर पांडवांनी कुंतीला हाक मारली. तिने त्यावर आणलेली भिक्षा समान वाटुन घ्या असं नं पहाता म्हणलं होतं.>>> स्वयंवराला जाताना पांडव कुंतीला सांगूनच गेले होते. कुंतीला अर्जुनाच्या पराक्रमाची खात्री होती की स्वयंवरात अर्जुनच जिंकणार. कुंतीने जाणूनबुजून वाटून घ्या असे म्हणले होते. द्रोपदीचे साेेंदर्य बघून बाकी चार पांडवाच्या मनात द्रोपदीविषयी अभिलाषा निर्माण झाली. व्यासाने दैवी दाखले दिले व द्रोपदीला पाच पांडवाशी लग्न करण्यास भाग पाडले. कोणती स्त्री पाच पुरषाशी लग्न करायला तयार होईल.
  • Log in or register to post comments

म्याचफिक्सिंग झालेलं का? कर्ण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/31/2015 - 11:30 नवीन
म्याचफिक्सिंग झालेलं का? कर्ण सर्वार्थानी अर्जुनाएवढाचं लायक उमेदवार होता. आणि जेष्ठ पांडव असुनही त्याचा सुतपुत्र म्हणुन हिणवलं जाउन त्याला स्पर्धेमधुन थेट बाहेर काढलं गेलं. त्याकाळी एकपतीव्रत वगैरे प्रकार नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

कर्ण हा कुंतीला लग्नाआधी

हेमंत लाटकर
Sat, 10/31/2015 - 13:04 नवीन
कर्ण हा कुंतीला लग्नाआधी झालेला होता. (बहुतेक वसिष्ठापासून झालेला असेल) कुमारी मातेला समाजाने मान्यता दिली नसती. पाच पांडव हे कुंतीला व माद्रीला पान्डुच्या संमतीने झाली. "मनस्मृती" या हिन्दु धर्मशाश्त्रात नियोगाने जन्मलेले पाच पांडवाचे आई वडिल पान्डु, कुंती व माद्री हेच होते. अर्जुन कर्णापेक्षा जास्त धर्नुधारी होता. विराट राजाच्या गाय़ी सोडून आणण्याच्या वेळी अर्जुनाशी युद्ध करताना कर्णाला रणांगणातून पळावे लागले. युद्धाच्या वेळी कुंतीने तु पांडव आहेस व द्रोपदी तुझी सुद्धा पत्नि आहे हे सांगणे म्हणजे कर्णाचे मन खच्ची करणे होते. ही कृष्णनीती होती.
  • Log in or register to post comments

कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/31/2015 - 13:31 नवीन
कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर साहेब. तुम्ही आपलं ट्यालेंट असल्या विषयात वाया घालवु नये असं माझं वैयक्तीक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर

सतिश गावडे
Sat, 10/31/2015 - 18:32 नवीन
कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर साहेब.
महाभारतकथेमध्य दंतकथा काहीही असेल, तुला खरंच असं वाटतं का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वसिष्ठ च्या जागी दुर्वास

हेमंत लाटकर
Sat, 10/31/2015 - 13:26 नवीन
वसिष्ठ च्या जागी दुर्वास वाचावे.
  • Log in or register to post comments

या वेळी तरी नक्की का?

काळा पहाड
Sat, 10/31/2015 - 15:57 नवीन
या वेळी तरी नक्की का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

आता

नाखु
Sat, 10/31/2015 - 16:06 नवीन
निघाला दुर्वासांच्या जागी वसीष्ठांचा पत्ता. पुढच्या वेळी नीट पिसतील ते !!! ५-३-२ वाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

या वेळी तरी नक्की का?

हेमंत लाटकर
Sat, 10/31/2015 - 18:01 नवीन
या वेळी तरी नक्की का?
100% नक्की. रामायण महाभारत मध्ये कन्फ्युज झाले. वसिष्ठ दशरथाचे राजपुरोहित व रामाचे गुरू होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

चांगली सेवा केल्यामुळे

हेमंत लाटकर
Sat, 10/31/2015 - 14:50 नवीन
चांगली सेवा केल्यामुळे दुर्वास ऋषीने तिला मंत्रदिक्षा दिली व कोणत्याही देवाला आवाहन केले की तो देव प्रगट होईल ही कवीकल्पना आहे. प्राचीन काळी निसर्गातील प्रत्येक गोष्टीला देव मानत. उदा. सुर्य,चंद्र,पर्वत,समुद्र,वारा,आग, वीज,पाऊस,वृक्ष,नदी. अंबिका,अंबालिका व दासीला जसे नियोगाने व्यासापासून धृतराष्ट,पान्डु,विदुर झाले. तसेच कुंतीला व माद्रीला हिमालयीन भागातील ऋषीं पासून पाच पांडवे नियोगाने झाली.
  • Log in or register to post comments

दुर्वास

मोगा
Sat, 10/31/2015 - 18:19 नवीन
दुर्वास ऋषींचा संदर्भ आला की पुराणात भयानक घटनाच घडलेल्या दिसतात. त्यांच्या रागामुळे त्यांच्याबरोबर सहवास करणे अवघड वाटे. म्हण्युन दुर्वास नाव मिळाले म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

मला ही तीच शंका आहे

याॅर्कर
Sun, 11/01/2015 - 14:02 नवीन
कर्ण हा दुर्वासांनपासून झालेला असणार,आणि बाकिचे पाच पांडव इतर निरनिराळ्या ऋषींपासून. नंतर यांनी युद्धात पराक्रम दाखवला म्हणून ते देवांपासून प्राप्त झालेत अशी फोडणी टाकली गेली असणार. . . . . . आणि कुठे काही अडचण आलीच तर कथेचे निर्माते(व्यास) प्रकट होऊन ती अडचण पूर्ण करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा