मिपावर सशस्त्र क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल नियमित लेख प्रसिद्ध होत असतात. याचा एक अर्थ सरळ सरळ असा आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकाचे भरीव योगदान आहे. दुसरा अर्थ असाही आहे की भारतीय जनमाणसाला क्रांतिकारकाचे अप्रुप वाटत असले तरी तत्कालिन राजकारणातील मुख्यलढ्याच्या समोर हा लढा तसा निष्प्रभ ठरत होता.
पुढील विवेचन करण्याअगोदर काही स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. एकतर भारतातील एकंदरीतच सर्वच स्वातंत्र्य सेनानी आदर्शवादाने भारावलेले होते, त्यांचे मनोबल उच्चदर्जाचे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वर्तन, चरित्र हे निष्कंलक होते. अशा सर्वच सशस्त्र अथवा निशस्त्र सेनानीचे व्यक्तिमत्व अतिशय धवल आणि प्रेरणा देणारे होते.
स्वातंत्र्य लढ्यात आपल्या विषयाच्या शीर्षकाप्रमाणे सशस्त्र क्रांतीच्या बद्दल खालील प्रवाह आढळतात. ( १९०० ते १९४७पर्यंत).
१. सावरकरांच्या नेतृत्वाखालील असणारे क्रांतिकारक.
२. भगतसिंगाच्या प्रेरणेतून साकारलेले क्रांतिकारक.
३. सुभाषचंद्र बोसबाबुच्या नेतृत्वखाली लढले गेलेले आझाद हिंद सेनेचे संग्राम.
४. तुरळ्क होत असणारे तुरळक सशस्त्र क्रांतिच्या घटना.
( माझा अभ्यास तसा याबाबतीत मर्यादित असल्याकारणे चुभुदेघे आणि लेखात भर टाकणे.).
आता या लढ्याच्या काय मर्यादा होत्या याबाबतीत माझे मत.
१. सशस्त्र / निशस्त्र क्रांतिसाठी असलेल्या नेत्यांची आवश्यकता. दुदैवाने मोठी खेळी करु शकंणारा नेता सशस्त्र क्रांतिसाठी मिळाला नाही. भगतसिंगांना तरुणवयातच फासावर जावे लागले. सावरकर यांचीही कारकिर्द ही दोन जन्मठेपेनंतर राजकिय दृष्ट्या निष्क्रिय ठरली. सुभाषचंद्रांच्या प्रेरणा या महासभेतील ( काँग्रेस) असल्यामुळे त्यांनी निरुपाय म्हणून या लढ्याकडे पाहिले असे माझे मत आहे.
२. गुप्ततेची पराकोटीची आवश्यकता. : अनेक वेळेस अश्या क्रांकिकारकांचे सर्वच प्रयत्न स्वातंत्र्य लढ्याच्या सशस्त्र क्रांतिच्या अनिवार्यतेपेक्षा कट - कारस्थान रचण्यात जाऊ लागले. बरे असा कट - प्रसंग अंतिम टप्प्यात येण्याअगोदरच फंदफितुरी होण्याची शक्यता असे. सर्वच प्रयत्न अशा मुळे वाया जात असत. ( अवांतर : निशस्त्र लढ्यात या लढ्याचे नेतेच प्रचंड फितुर होते. आपल्या चळवळीची माहिती ते स्वताच ब्रिटिशाना देत असत. उदा दांडी, चंपारण्य, चलेजाव याची माहिती ब्रिटिशांना तेच देत असत. किती सत्याग्रही, कोठे, कधी आणि का ही माहिती पुरवत असत, इतके कमी आहे का ते तुरुंगात जाण्यासाठीही तयार असत, लाठी - गोळ्या खाण्यासाठीही तयार असत, त्यामुळे ब्रिटिशांना काय करावे हेच समजत नसे, अरेरे बिचारे सत्याग्रही.... )
३. आहे त्या यंत्रणा नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न : अनेकवेळेस आगगाडी उडविणे, कोषागार लुटणे, एखाद्या दुसर्या आधिकार्याला मारणे येथपर्यंतच क्रांतिची व्याप्ति असे. नकळतच एक राष्ट्र म्हणून उभारणीसाठी लागणार्या गोष्टी नकळतच नष्ट होत असत.
४. निष्पाप जनतेला अशा कृत्याची झळ बसणे : अशा काही गोष्टी घडल्यानंतर निष्पाप जनतेला याची ( पोलीसी कारवाईची )झळ बसत असे. माझ्यामते सर्वसामान्यांना क्रांतिकारकांच्या लढ्यात येण्यासाठी या मुळेही अटकाव होत असावा.
५. पकडले गेल्यानंतर नेत्याची उणीव भासणे : एखादा नेता पकडला गेल्यानंतर सशस्त्र लढा हा नेत्याअभावी परत उभारी घेत नसे, चळवळ भरकटण्याची शक्यता असे.
६. क्रांतिकारकात आणि सामान्यजनात दरी असणे. : क्रांति ही गोष्ट सर्वसामान्यांना आपल्या आवाक्याच्या पलिकडे वाटत असे. दुसरे असे की लढ्यासाठी पिस्तुले, बॉब्म इत्यादीची आवश्यकता असणे. ही शस्त्रे आणणे हे सर्वसामान्याच्या आवाक्यात नसे.
७. मतांतर, विचारमांडण्यासाठी स्वातंत्र्य नसणे : नेता म्हणेल तशीच कृती करणे. सर्वसामान्यांना यामध्ये कितपत सक्रियता वाटत असावी?
८. अयोग्य लोकाच्या हाती चळवळ जाणे : ( भारतीय लढ्यात हा मुद्दा गैरलागु आहे) समजा एखाद्या अंहकारी, हुकुमशहाच्या हाती अशी चळवळ गेली तर काय झाले असते? ( उदा. प्रभाकरणने आपल्या विरोधकाचा सरळसरळ काटा काढला होता.) गट-गटात चळवळ विभागली जाऊन अंतर्गत हिंसा निर्माण होणे.
९ लोकसहभाग नसणे : लोकसहभाग नसल्यामुळे समजा अश्या क्रांतिलढ्यामुळे स्वातंत्र्य मिळालेही असते तर राज्य चालविण्यासाठी लोक कोठुन आले असते?
१० विधायक भाग नसणे : मारणे / वध करणे यापेक्षाही राष्ट्र वेगळ्यापद्धतीने उभारले जात असते. उदा. दारुबंदी, खादी, अस्पृश्यता निवारण, राष्ट्रभाषा निर्माण, स्वदेशी इत्यादी.
माझ्या मते मिपाकरांनी या सर्वबाबीचा विचार करावा.
वाचने
10144
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
कलंत्री
सर्वच सशस्त्र लढ्याबद्दल हाच नियम असावा.
In reply to कलंत्री by घाटावरचे भट
काय?
तुमचे मामा
In reply to काय? by विनायक प्रभू
बहुतेक...
In reply to तुमचे मामा by धम्मकलाडू
ज्यांनी
भंपकपणा
आपले स्वागत आहे.
In reply to भंपकपणा by एकलव्य
प्रतिसाद अपेक्षित आहे.
In reply to भंपकपणा by एकलव्य
मान्य
In reply to प्रतिसाद अपेक्षित आहे. by कलंत्री
७. मतांतर,
असहमत
तर...
In reply to असहमत by मैत्र
सहमत
कलंत्री,अज
चांगली सुरुवात आणि मुद्दे...
In reply to कलंत्री,अज by चिन्या१९८५
झोपी गेलेल्यांनाच जागे करता येते.
In reply to कलंत्री,अज by चिन्या१९८५
इतर् कुठे
In reply to झोपी गेलेल्यांनाच जागे करता येते. by केदार
कोलबेर
In reply to इतर् कुठे by कोलबेर
केदार
In reply to कोलबेर by केदार
जुन्या काळात
In reply to केदार by चिन्या१९८५
त्या काळी
In reply to केदार by चिन्या१९८५
सशस्त्र क्रांतीची अयशस्वीता:
मान्य
In reply to सशस्त्र क्रांतीची अयशस्वीता: by यशोदेचा घनश्याम
शक्य आहे...
In reply to मान्य by नितिन थत्ते