✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फेर..

आ
आनंद कांबीकर यांनी
गुरुवार, 10/22/2015 - 12:44  ·  लेख
लेख
एस टी तुन उतरलें तेव्हा बरीच रात्र झालेली. पाऊस थांबला असला तरी ढगांचा निचरा झाला नव्हता. पुन्हाकधी बरसायला सुरुवात होईल याचा नेम नव्हता. तिथुन गांव अजुन कोस भर दुर. लवकर गांव गाठायला हवं तसच ओढाही भरला असल याचा अंदाज घेत त्याने मधली वाट धरली. मधेच एखादी विज चमकायची अाणि वाट दिसायची. तो वाट काढत समोर तर दोन वर्षाच्या चिमुरडीला छातीशी कवटाळुन ती त्याच्या मागं. पायाला चिखलाची लगदाळं चिकटलेली. मधेच एखादा काटा पायात घुसुन रक्तासगट बाहेर यायचा, आग मस्तकाला भिडायची. पोरगी सारखी बिमार पडते. गांवातल्या डॉक्टरला बरेचदा दाखवलं पर पोरीला गुण येईना. सारखी रडत असते. शेवटी डाक्टरच म्हणाला, भाइरलं बघा. शेजाच्या साखरा आजिचं तेच म्हाणनं आलं. बुढगांव च्या पीराखाली एक देवलसी बसतो. त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी त्याची महतारी मागं लागली. तिन दिवस झाले पोरिला झोप नव्हती. म्हातारीची कुरकुर वाढली. शेवटी टपरीवाल्यां पप्याकडून पाचशे उधार घेऊन तो मुकाम्या गाडीन् गावातुन निघाला. पोरीचे रडने चालूच होते. पिराला वहायला म्हातारिन् घरातून सात लिम्बं दिली होती ती त्यानं एस टी तुन फेकून दिली आणि सरळ शाहरातला दवाखाना गाठलेला. तिथेच रात झाली, मुकामी गाडी हुकलि म्हणून दुसऱ्या गाडींन याव लागलं. वाट काढत दोघ टेकडीवर आले. तो खड़काळ भाग, गांव चा मसनवटा. पोरगी शांत झोपलेली. अंतरावर मढं जळत होतं, त्याच्या उजेडांत झपझप पाय उचलत दोघेही गांवच्या वेशीतून आंत शिरले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
जीवनमान
kathaa

प्रतिक्रिया द्या
3027 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

ओस्करविनींग लिखाण. आता

द-बाहुबली
गुरुवार, 10/22/2015 - 15:29 नवीन
ओस्करविनींग लिखाण. आता थांबायच नाही बरंका...
  • Log in or register to post comments

अरेच्या!! क्रमशः आहे का?

जव्हेरगंज
गुरुवार, 10/22/2015 - 15:38 नवीन
अरेच्या!! क्रमशः आहे का? कि मला समजलीच नाही. शेवट काय आहे तेच समजले नाही. बाकी आवडले. :)
  • Log in or register to post comments

इथे पहा!

चांदणे संदीप
Fri, 10/23/2015 - 06:37 नवीन
सुंदर लिहिलय. यात सातत्य राखता यायला हवे!
  • Log in or register to post comments

पण मढं कोणाचं जळत होतं?

बिन्नी
Fri, 10/23/2015 - 08:14 नवीन
पण मढं कोणाचं जळत होतं?
  • Log in or register to post comments

कथेचे

आनंद कांबीकर
Mon, 10/26/2015 - 14:10 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिन्नी

काही कळलं नाही हो..

पिलीयन रायडर
Mon, 10/26/2015 - 14:25 नवीन
काही कळलं नाही हो..
  • Log in or register to post comments

चांगलंय!! धन्यवाद!!

असंका
Tue, 10/27/2015 - 00:21 नवीन
चांगलंय!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलंय. पिर बाबा कडे न

पद्मावति
Tue, 10/27/2015 - 01:33 नवीन
सुरेख लिहिलंय. पिर बाबा कडे न जाता मुलीला शहरात दवाखान्यात घेऊन गेले त्यामुळे मुलीचा जीव वाचला. सुखांत असलेली कथा आवडली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा