✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ

आ
आजानुकर्ण यांनी
Wed, 09/19/2007 - 21:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26333 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/19/2007 - 22:07 नवीन

खल्लास !!!

संपादकीय अग्रलेखाने मिसळपावाचे चीज झाले, ह्याची खात्री पटली. सुमार केतकरांची शैली आपल्याला अचूक साधली आहे. लोकसत्तावाल्यांना फरक कसा कळला, कोण जाणे. अजूनही त्यांच्या आयडीने लोकसत्तेला पुन्हा हा अग्रलेख पाठवा, प्रकाशित होईल :-) - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 09/19/2007 - 22:09 नवीन

हाहा!!

अजूनही त्यांच्या आयडीने लोकसत्तेला पुन्हा हा अग्रलेख पाठवा, प्रकाशित होईल :-) हे बाकी सही! लेख आवडला. "शैली"ला बरोब्बर उचलले. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ब
बेसनलाडू Wed, 09/19/2007 - 22:10 नवीन

शंभर नंबरी अग्रलेख

आपल्या संपादकीय कारकिर्दीची अशी जोमदार सुरुवात निश्चितच स्तुत्य आणि सुखावह वाटते आहे. बाकी येथे 'लोकमानस', 'बहुतांची अंतरे' ष्टाइल काहीतरी असेल, तर त्याची जबाबदारी आमच्यासारख्यांवर राहिली(च)! ;) :)
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Wed, 09/19/2007 - 22:21 नवीन

शैली मस्त साधली आहे

तुम्हाला शैली मस्त साधली आहे आणि तुमचे शुद्धलेखनही चांगले आहे;) यापेक्षा जास्त भाव तुम्हाला मी देणे माझ्या करियरसाठी घातक आहे. ;) उगाच नंतर कोणी आमच्यावर काही फाजील आरोप करायला नको म्हणून आमची साईड 'सेफ' ठेवण्यासाठी आम्ही स्त्री सदस्यांना व्य.नि. तर नाहीच पण शिवाय त्याचे लेखन आवडूनही प्रतिसाद देण्याचे टाळत होतो. सुरेखा पुणेकरांनी तुमच्या खरडवहीत आरोप केला आहे.:) तो वाचला. सुरेखाताईंना तुम्ही कसे ओळखता? आमचीही करून द्या ना ओळख.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 22:28 नवीन

प्रतिसाद

सुरेखाताईंनी या प्रतिसादात त्यांची बैठकीची लावणी मिसळपावावर ठेवता येईल का अशी विचारणा केली होती त्यामुळे संपादकीय अधिकारात त्यांची तारीख मिळते का यासाठी आम्ही चौकशी केली. गैरसमज नसावा. ;) अवांतरः येथे दुवा देता येत नसल्याने दुवा देण्यासाठी आम्ही केशवसुमारांच्या खरडवहीचा वापर केला तर तिथेही हाच प्रतिसाद गेला. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
स
सुरेखा पुणेकर गुरुवार, 09/20/2007 - 11:41 नवीन

ह्यो खोटं बोलतूया....

ह्यो आजानुकरनं खोटं बोलतूया. त्या परतिसादाअदूगर बगा काय लिव्हलया. आजानुकर्ण मंगळ, 09/18/2007 - 10:45 अरे वा. गणपतीत कुठं कार्यक्रम नाही का यंदा? » काढून टाका | प्रतिक्रिया संपादन तुमा सर्वांचा लाडकी, आनि आजानुकरना नाव बदल की रं. लय तर्रास होत बग.. आजानूकरनं.. आ जानू करनं. आसं कटिन नाव कस घ्यायचं.. सुरेखा पुनेकर ........ नका जाऊ पावनं जरा थांबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/20/2007 - 11:45 नवीन

सुरेखाताई

सुरेखाताई -->अरे वा. गणपतीत कुठं कार्यक्रम नाही का यंदा? या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाही. आम्ही संपादक मंडळाचे सदस्य आहोत. व मिसळपावावर तुमची बैठकीची लावणी करण्याची तुमची इच्छा जाणून तुम्हाला कधी वेळ आहे हे विचारण्यासाठी हा प्रश्न केला. आणि आमचे नाव आमच्या मातापित्यांनी असे ठेवले त्याला आम्ही काय करणार :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरेखा पुणेकर
स
सुरेखा पुणेकर गुरुवार, 09/20/2007 - 11:52 नवीन

आरं बाबा

या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाही. आम्ही संपादक मंडळाचे सदस्य आहोत. व मिसळपावावर तुमची बैठकीची लावणी करण्याची तुमची इच्छा जाणून तुम्हाला कधी वेळ आहे हे विचारण्यासाठी हा प्रश्न केला. .कसा ह्यो आजानूकरनं. .. . आसं शुद्द आवतान..... नाना फडनिसच हायस..... बामनहरी.. बामनहरी ..बावनखनी... आमच्या पुन्याची बावनखनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रमोद देव गुरुवार, 09/20/2007 - 12:00 नवीन

बैठकीचीच ठेवा!

लावणी बैठकीचीच ठेवा. कारण बाई(?) नाचायला लागली तर हाटेल हादरेल,टेबलं थरथरतील आणि ग्लासातलं(जे काही असेल ते) सांडेल. त्यापेक्षा त्या लावणीत कोणता राग आहे आणि शब्दाशब्दांत कसे सूर (गंधार,मध्यम वगैरे)लपलेत ह्यावर निरूपण ठेवा.ते आवडेल आपल्याला.जमल्यास त्याच विडिओ चढवा इथेच.(दूरदर्शन!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 23:21 नवीन

राजकीय सद्यस्थितीचे विवेचन..

जांभेकर, भोपटकर, अत्रे, खाडिलकर, परुळेकर यांच्यासोबत आमचे नाव घेतले जाणार आणि आमचे गुरू सुमार केतकर आम्हाला फक्त केशवसुमार माहीत होते! सुमार केतकर हे नांव आम्ही प्रथमच ऐकतो आहोत! :) विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. अपार्ट फ्रॉम मस्करी, वरील संपूर्ण लेखातील वरील वाक्याला आम्ही सर्वाधिक दाद देतो.. वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे. हम्म! पुढील वेळेस प्रमाण योग्य आहे ना, एवढे मात्र पाहा.. असो! सदर लेखाबद्दल, सहजसोपे चिमटे काढत अतिशय चांगल्या रितीने राजकीय सद्यस्थितीचे विवेचन केले आहे असे म्हणून आम्ही या लेखास आमची मनमोकळी दाद रुजू करतो... तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/20/2007 - 05:41 नवीन

सही

छान लिहिलं आहेस, योगेश. शैली उत्तम वठली आहे. पुन्हा पाठवणार असशील तर आणीबाणीचे समर्थन करायला विसरु नकोस :). अग्रलेख स्वीकारला जाण्याचे चान्सेस वाढतील. शिवाय जमलंच तर प्रशासकीय अनुमती आणि आणीबाणी, तसेच किचन कॅबिनेट आणि संपादक मंडळ यांच्यातील साम्य या विषयावर एखादा परिच्छेद टाकता आला, तर उत्तमच. [ह. घ्या.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/20/2007 - 06:27 नवीन

छानच

चांगलीच प्रेरणा घेऊन लिहीले आहेस. मला आवड्लेले शब्द म्हणजे "असल्या मूळच्या पुण्याबाहेरच्या " सॉलीड!! ह्या निमित्ताने पेपर मधे आपला लेख ,पत्र छापून यावे असे वाटणार्‍या सर्व इच्छूकांना एक सोपी ट्रीक सांगतो - लेखाच्या खाली " आपला विकास देशपांडे" लिहा.... :-)
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 09/20/2007 - 08:36 नवीन

हा हा हा!!!

>>>ह्या निमित्ताने पेपर मधे आपला लेख ,पत्र छापून यावे असे वाटणार्‍या सर्व इच्छूकांना एक सोपी ट्रीक सांगतो - लेखाच्या खाली " आपला विकास देशपांडे" लिहा.... :-) आवडले! अहो पण आम्ही फकस्त म.टा. मधेच लिहीले आहे. तुम्हाला काय वाटते "सुमार जी" आमचे विचार छापतील की काय? ;) आमचे विचार छापून त्यांना थोडेच राज्यसभेचे सभासद मिळेल ...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सन्जोप राव गुरुवार, 09/20/2007 - 07:15 नवीन

जबरदस्त

आजानुकर्णाने आमच्याकडून कधी गंडा बांधून घेतला की नाही ते आठवत नाही, पण खाजगीत तो आमचा उल्लेख 'सन्जोप सर' असा करतो असे ऐकून आहे. त्या न्यायाने आमच्या या शिष्योत्तमाने हा जबरदस्त लेख लिहून आम्हाला गुरुदक्षिणा पोचवली आहे असे गेल्या महिन्यांत झालेल्या गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाला स्मरुन म्हणावेसे वाटते. जबरदस्त लेखन! (दिला रे बाबा तुला चांगला प्रतिसाद, आता रविवारी मी लिहितो) सन्जोप राव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/20/2007 - 08:53 नवीन

बेरजेचं राजकारण!

(दिला रे बाबा तुला चांगला प्रतिसाद, आता रविवारी मी लिहितो) हम्म्म! याला म्हणतात 'बेरजेचं राजकारण'!! चालू द्या...:) आपला, (नवा पक्ष काढणारा) राष्ट्रवादी तात्या पवार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/20/2007 - 07:47 नवीन

लयी भारी !

कर्णा--- "मिसळ आणि भेसळ" हा अग्रलेख आवडला.सुमार केतकरांचा ष्टाईल आवडली. आणि किती शुद्ध लिहितोस यामुळे आमच्या अशुद्धलेखन संप्रदायाच्या वारक-यांवर परिणाम होण्याची शक्यता वाटते :) अग्रलेख लोकसत्ताकडे पुन्हा पाठवावा आणि हे संकेतस्थळ 'तात्या अभ्यंकराने' काढलेले नाही अशी तळटीप दे. लेख नाही छापून आला तर नावाचा 'प्रा.डॉ.... नाही . :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 09/20/2007 - 08:39 नवीन

सहीच..

'सुमार केतकरां'च्या लोकसत्तेचे माहित नाही.. पण 'कुमार अभ्यंकरां'च्या लोकशाही सत्तेत मात्र हा अग्रलेख आला़की छापून!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 09:47 नवीन

मस्तच

वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे. ते भोवल्यामुळेच आम्हा वाचकांचे फावले प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 09/20/2007 - 10:59 नवीन

आम्ही कर्माने मराठी.

विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. अडचणीत आलेली मांजर जशी गळा धरते तसा भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याच्या ह्या वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. ही वाक्ये (केक्युलेच्या बेन्झिन रिंगसारखी ) आमच्या दिवास्वप्नातल्या (मिसळीच्या) कटात आम्हाला तरंगताना दिसली होती. पण आम्ही ती इथल्या मिसळीत टाकण्याआधीच मेहरबान अजानुकर्ण साहेबांनी जशीच्या तशी पकडून त्यांच्या फरसाणावर ओतली आहेत. ती वाक्ये आमचीच असल्याने ती अत्युत्कृष्ट आहेतच. शिवाय त्यांच्याखालची अजानुकर्णाची मिसळही चवीला बरी आहे. :):):) :) - हा पंचवीस वर्षांचा झाला म्हणे!
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 11:04 नवीन

"माणसाने

"माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. " का?..
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/20/2007 - 11:51 नवीन

आभार

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. (आभारी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/20/2007 - 12:01 नवीन

लेख मस्त

लेख आवडला, मस्त लिहिले आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 09/20/2007 - 12:18 नवीन

अग्रलेखांचा बादशाह!

योगेशचा हा अग्रलेख वाचून खूपच आनंद झाला. महाजालावरील ’अग्रलेखांचा बादशाह ’ असे आजपासून त्याचे नवीन नामकरण मी करत आहे.तेव्हा समस्तांनी ’ साधू! साधू(अरूण नाही हो) म्हणावे ही अपेक्षा!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/20/2007 - 12:23 नवीन

घूटर घू

घूटर घू! घूटर घू! घूटर घू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ग
गुंडोपंत गुरुवार, 09/20/2007 - 13:00 नवीन

मस्तं रे!

कर्णा! मस्त रे... त्या सुमार केतकराला पाठवला पहिजे... ;) गुंडो.
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार गुरुवार, 09/20/2007 - 17:54 नवीन

मस्तच

लेख मस्तच आहे. काही वेळ लोकसत्ताच वाचत आहे असे वाटले! केतकरांची उचलबांगडी होणार असे दिसते ;) मार्मिक लिखाण आवडले. दिवाळी अंकाकरता पाठवून पहा. :)
  • Log in or register to post comments
र
रंजन गुरुवार, 09/20/2007 - 18:14 नवीन

लेख मस्तच आहे

लेख मस्तच आहे.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/20/2007 - 18:28 नवीन

वा वा

सुंदर लेख. मजा आली. (केतकरांचे लेखन फारसे वाचले नसल्याने बाकी टिप्पणी करु शकत नाही :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 18:39 नवीन

केतकरांचे भाकित

आम्ही केतकरांची कुंडली मांडली. त्यांची भाषणे ऐकली. एकदा पत्रकारभवनात मार्क्सवादावर त्यांचे भाषण ऐकले आणि तात्काळ भाकीत आमच्या पत्रकार मित्रांना ऐकवले.' ते लवकरच राज्यसभेवर स्वकृत सदस्य म्हणून जातील' न गेल्यास त्यांची कुंडली चुकली असे समजावे.( आमचे भाकित बरोबरच असते, लवकर म्हणजे कधी ते आम्ही कधीच सांगत नाही आणि आम्हालाही कुणि विचारत नाही) ज्योतिषाचारी प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 21:04 नवीन

कसं बोललात राव...

@ते लवकरच राज्यसभेवर स्वकृत सदस्य म्हणून जातील' न गेल्यास त्यांची कुंडली चुकली असे समजावे. ते नाही गेले पण त्यांचा बगलबच्चा आणि मटा नव्हे सोटा चा (सोन्याआई टाईम्स चा) आजी संपादक रडत राऊत मात्र नक्की राज्यसभेवर जाणार बुवा... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नीलकांत गुरुवार, 09/20/2007 - 20:19 नवीन

खल्लास !

अजानुकर्णा, आमच्या आवडत्या सुमार केतकरांची जशीच्या तशी इस्टाईल घेतलीस बघ. हा ते आणिबाणीचं आणि संजय गांधीच राहीलं बघ. ;) लेख खुप आवडला. नीलकांत
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 14:32 नवीन

धर्म ही

धर्म ही खरच अफुची गोळी आहे. ह्याबाबत सहम्त ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा