Skip to main content

मेंटलेक्चुअलांचे उसासे आणि उमाळे

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 14/10/2015 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
४ जुलै २०१० या दिवशी केरळमधील टी जे जोसेफ या प्राध्यापकावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांचा उजवा हात मनगटापासून कापून टाकला कारण एका प्रश्नपत्रिकेत त्यांनी इस्लामसंबंधी एक प्रश्न विचारला होता व त्या प्रश्नामुळे इस्लामचा अपमान झाला अशी या गटाची समजूत झाली होती. - तेव्हा हे सर्वजण गप्प राहिले. हा धार्मिक हिंसाचार आहे असे त्यांना वाटले नव्हते. २००६ मध्ये खैरलांजी येथे भोतमांगे या दलित कुटुंबातील चौघांची गावातील जमावाने क्रूर पद्धतीने हत्या केली. - तेव्हा यांच्यापैकी कोणीही आपले पुरस्कार परत केले नव्हते. एप्रिल २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात नितीन आगे नावाच्या दलित तरूणाची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली. नंतर नगर जिल्ह्यात अशा २-३ घटना घडल्या. - तेव्हासुद्धा यांनी आपले पुरस्कार परत केले नव्हते. हा जातीय हिंसाचार आहे व त्यासाठी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत करावे असे त्यांना वाटले नव्हते. केरळमध्ये गेल्या काही वर्षात जातीय/धार्मिक हिंसाचारातून अनेक हत्या झाल्या आहेत. - तेव्हा यांनी मौन पाळले. आणि आता . . . गेल्या काही दिवसात काही जणांनी साहित्य अकादमीने दिलेले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे गेल्या २ वर्षात झालेले खून आणि काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचारातून उत्तर प्रदेशातील दादरी येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून हे "साहित्यिक विचारवंत" अस्वस्थ झाले आहेत व त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून ही मंडळी पुरस्कार परत करणार आहेत. यातल्या बहुतेकांची नावे आजतगायत ऐकण्यात आलेली नाहीत यात महाराष्ट्रातील काही साहित्यिक आहेत. त्यात प्रज्ञा पवार या एक साहित्यिका आहेत. खैरलांजी व नगर जिल्ह्यातली दलित हत्यांकांडे घडली तेव्हा त्यांनी पुरस्कार परत केला नव्हता. यात नयना सहगल नावाच्या एक लेखिका आहेत. पंडीत नेहरूंची भाची ही त्यांची ओळख. त्यांना १९८६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ज्या सरकारच्या काळात मिळाला त्याच सरकारच्या काळात ३००० शिखांची हत्या झाली होती व त्याच काळात शहाबानो प्रकरण घडले होते. परंतु त्यावेळी निषेध म्हणून पुरस्कार नाकारावासा त्यांना वाटला नाही. १९८६ नंतर आजतगायत अनेकवेळा जातीय हिंसाचार झाला. तेव्हाही त्या गप्प होत्या. आज अचानक त्यांना संपूर्ण देशात जातीय वातावरण निर्माण झाले असून साहित्यिकांची गळचेपी होत आहे असा शोध लागला. मग आता नक्की असे काय घडले की त्यांना अचानक स्वातंत्र्याचे आणि जातीयवादविरोधी विचारांचे उसासे आणि उमाळे येऊ लागले आहेत? यांचे खरे दु:ख या हत्या नसून जे कधीही सत्तेवर येऊ नयेत असे वाटत होते ते मोदी सत्तेवर आले आहेत हे यांचे खरे दु:ख आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीला हे लोकशाहीविरोधी, संघविचार लादणारी कृती इ. ठरवून मोकळे होतात. अमर्त्य सेनना वयाच्या ७८ व्या वर्षी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळाले आणि ३ वर्षानंतर २०१५ मध्ये मुदत संपल्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी यांना नव्याने मुदतवाढ न मिळाल्यावर लगेच मोदी विद्यापीठावर हिंदुत्व लादणारे ठरतात. आपले वय किती आणि आपल्याला एक टर्म मिळाल्यावर दुसर्‍या टर्मचा मोह का असे प्रश्न कधी यांच्या मनात येतच नाहीत. एफटीआयआय मध्ये गजेंद्र चौहानची नेमणूक राजकीय नेमणूक असते पण सईद मिर्झा (यांनी वाजपेयींविरूद्ध निवडणुक लढविलेली होती आणि नंतर मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी सह्यांची मोहीमही चालविली होती), अनंतमूर्ती (मोदी पंतप्रधान झाले तर भारतात रहावेसे वाटणार नाही असे यांनी सांगितले होते) इ. नेमणुका राजकीय आहेत असे कधी यांच्या मनात सुद्धा येत नाही. एकंदरीत या मेंटलेक्चुअलांचा निषेध आणि विरोध सेलेक्टिव्ह असतो. फक्त ठराविक प्रसंगात यांना उसासे आणि उमाळे येतात आणि इतर प्रसंगात हे सोयिस्कर मौन पाळतात. या विषयावर खालील लेख खूपच मार्मिक आहे. http://www.loksatta.com/aghralekh-news/as-compare-to-dadri-more-dangero…

वाचने 54885
प्रतिक्रिया 286

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

दादरी घटना कृर, दुर्दैवी, अमानुष आणि किळसवाणी आहे. मान्य. त्या सगळ्या लोकांना पकडा आणि फाशी द्या. पण धार्मिक तेढीतुन खून झालेले हे भारतातले पहिलेच प्रकरण आहे की काय? त्याचा संबंध सरकारशी का जोडल जात आहे? कोणाही गटाच्या नसलेल्यांनाच नव्हे तर अगदी काँग्रेसला वाहिलेल्या लोकांना हा प्रश्न विचारला की त्यांच्या तोंडावर काहीसे शरमलेले व काहीसे कुत्सित हसू येताना पाहत आहे. हल्ली कांगावाखोरपणा हेच भारतिय राजकारणातचे मूलभूत तत्व झाले आहे. येन केन प्रकारेन संबंधीत/असंबंधीत गोष्ट पकडून राजकिय विरोधकावर राळ उडवा, मग "तो किती नीच आहे बघा" असा ओरडा करत रहा, जमले तर परदेशी संस्था/देशांमध्ये देशाची नाचक्की होईल असे जबाब द्या आणि प्रत्येक, अगदी देशाला फायदेशीर असलेल्या कामातही खोडा घालत रहा; ही प्रणाली जोर पकडून आहे. भारतिय जनता हे सगळे समजून घेण्याइतकी प्रगल्भ नाही, जो गदारोळ जास्त मोठा त्याचेच खरे आहे असे ती समजेल, असा राजकारण्यांचा होरा आहे (आणि तो काही प्रमाणात खराही आहे म्हणा). सर्वात वाईट गोष्ट ही की या सगळ्यात देशाचे नुकसान होत आहे याचे कोणालाच सोयर सुतक असल्याचे फारसे दिसत नाही. :(

In reply to by मृत्युन्जय

कायद्याचा अर्थ समजावून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! मी काही कायदेपंडीत नाही त्यामुळे अर्थ लावण्यास चुकलो असेन. पण दोन प्रश्न आहेत की भारतीय राज्यघटनेत हे कलम येण्यामागची कारणमीमांसा मी सांगीतली ती खरी आहे, की काही वेगळी आहे? व हे गोहत्याबंदी कलम धर्माशी संबंधीत आहे की पशुसंवर्धनाशी? या दोन प्रश्नांची उत्तरे धसास लावलीत तर ती जी चार कारणे आहेत त्याची गरज पडणार नाही बहुतेक. कारण 'आर्टीकल ४८' हे गोहत्याविरोधकच चर्चेत आणतात.
१. लोक बीफ बॅनच्या सरकरच्य निर्णयाचा आणि दादरी घटनेचा संबंध का जोडत आहेत हेच कळत नाही. लोकांना असे तर नाही ना म्हणायचे की मोदींनी लोकांच्या कानात जाउन दादरी मध्ये हत्याकांड करायला सांगितले. लोक मुर्ख असतील तर त्याला मोदी काय करणार?
सरकार बदलून "गुजरातेत मुसलमानांचं शिरकाण करणारे व त्यांना त्यांची जागा दाखवणारे अशी प्रतिमा असलेले नरेंद्र मोदी" सत्तेवर आलेत हे पाहून हिंदूधर्माभिमान्यांना (मुस्लिम-हेटर्स) झालेला आसुरी आनंद व काही दिव्य लोकांचे दिव्य वचनांद्वारे केली जाणारी जनजागृती हे बघता तुम्ही असले प्रश्न विचारणे चमत्कारिक वाटते. शंका असल्यास झलक बघण्यासाठी काही कट्टर हिंदू फेसबुक गृप्सवर जाऊन यावे. हिंदूंसाठी काम करणार्‍या काही आक्रमक संघटनांची भाषा व देहबोली बदलल्याचेही आपणांस दिसून आले नसेल तर आपले कौतुक आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवणे हे आमच्यासारख्या रिकामटेकड्या लोकांची कामे आहेत. त्यामुळे मोदींनी कोणाच्या कानात जाऊन काय सांगितले हे आम्हास बरोब्बर कळते. उदा. वर्गात क्लास मॉनिटर असतो. खोड्या करणार्‍या, बडबड करणार्‍या मुलांची नावे लिहून वर्गशिक्षकाला देणे त्याचे काम असते. आता जे टारगट मुले असतात त्यांच्याच ग्रुपमधला कुणी मॉनिटर झाला की त्यांच्या कारवायांना जसा कुणी न सांगता उत येइल तसा आता हिंदूधर्माभिमान्यांना आला आहे. त्यातून हा मॉनिटर आपली नावे खरंच सांगणार नाही हेही कन्फर्म आहे. त्यामुळे वर्गात काय स्थिती असेल ती मॉनिटरनेच ठरवलेली आहे, त्याच्या आदेशानेच झालेली आहे असे म्हणता येत नाही पण ....इट्स अ बटरफ्लाय इफेक्ट.
२. दादरी घटना कृर, दुर्दैवी, अमानुष आणि किळसवाणी आहे. मान्य. त्या सगळ्या लोकांना पकडा आणि फाशी द्या. पण धार्मिक तेढीतुन खून झालेले हे भारतातले पहिलेच प्रकरण आहे की काय? त्याचा संबंध सरकारशी का जोडल जात आहे?
धार्मिक तेढीतून खून झालेले हे पहिलेच प्रकरण नाही. पण गाय मारून खाल्ली म्हणून याआधी किती खून झालेत तेही सांगा. याआधी हिंदूस्थानात मुस्लिमांनी कधीच गाय खाल्ली नव्हती? मग आत्ताच त्याबद्दल इतका क्रोध कसा काय उत्पन्न झाला की आपल्याच गावातल्या एकाची हत्या करण्यापर्यंत मजल जावी... ह्याची मीमांसा करण्याची खरंच गरज वाटत नाही? त्यात पाञ्चजन्य सारखे मुखपत्र सरळ गोहत्या करणार्‍याच्या हत्येला वेदमान्यता देऊन मोकळे झाले. म्हणजे संघ ह्या हत्येला समर्थन देत आहे. आता भाजप ही संघाचीच राजकिय शाखा आहे -असे इथेच कुठे वाचलेले, बहुतेक गा.पै. यांनी म्हटलेले - त्यांचेच सरकारही आहे. तर सरकार ह्या हत्येला समर्थन देत आहे असे होत नाही का? भाजपप्रेमी, संघप्रेमी, हिंदूप्रेमी इत्यादी लोकांना असले प्रश्न विचारले की तिळपापड होतो. ते गरज असेल तेव्हा संघाशी, हिंदुत्वाशी भाजपचा संबंध सांगतात, गोत्यात येत असले की नाकारतात. तर्काशी अजिबात संबंध नसलेले काहीतरी मग तोंडावर फेकून गप करायला बघतात. बघा बुवा...

In reply to by तर्राट जोकर

कायद्याचा अर्थ समजावून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! मी काही कायदेपंडीत नाही त्यामुळे अर्थ लावण्यास चुकलो असेन. हरकत नाही. कधीकधी अनावधानाने आपण गैरसमज करुन घेतो. तो गैरसमज दूर झाला असेल अशी अपेक्षा. पण दोन प्रश्न आहेत की भारतीय राज्यघटनेत हे कलम येण्यामागची कारणमीमांसा मी सांगीतली ती खरी आहे, की काही वेगळी आहे? व हे गोहत्याबंदी कलम धर्माशी संबंधीत आहे की पशुसंवर्धनाशी? या दोन प्रश्नांची उत्तरे धसास लावलीत तर ती जी चार कारणे आहेत त्याची गरज पडणार नाही बहुतेक. कारण 'आर्टीकल ४८' हे गोहत्याविरोधकच चर्चेत आणतात. कायद्याचे अर्थ लावताना काही प्राथमिक निकष लावतो. Interpretation of Statutes involve external and internal aids of interpretation. One of the aids of interpretation is “Headings” किंवा शीर्षक. तर कलम ४८ चे शीर्षक आहे "Organisation of agriculture and animal husbandry". इतर कुठे या कलमाबद्दल अजुन काही पार्श्वभूमी असेल तर मला महिती नाही पण तशी काही पार्श्वभूमी कुठे नमूद केलेली नाही असे गृहीत धरल्यास या कलमाचा अन्वयार्थ लावताना त्याचे शीर्षक महत्वाचे ठरले. ते बघता या कलमाचा संबंध "धर्माशी" नाही हे अगदी उघड आहे आणी तसा तो कोणी लावत असेल तर ते चुकीचे आहे. सरकार बदलून "गुजरातेत मुसलमानांचं शिरकाण करणारे व त्यांना त्यांची जागा दाखवणारे अशी प्रतिमा असलेले नरेंद्र मोदी" चष्मा काय लावाल तसा असतो. माझ्या मनात तर मोदींची प्रतिमा "विकासाचा रस्ता दाखवणारा नेता" अशीच आहे. मोदींनी संपुर्ण प्रचार विकासाच्य मुद्द्यावर केंद्रित केला होता. तो प्रचार धर्माधिष्ठित नव्हताच. गुजरातेत जे झाले ते दुर्दैवी होते. त्यात हिंदु आणी मुसलमान दोन्ही मेले. गोध्रा प्रकरण देखील दुर्दैवीच होते (अर्थात तेही गुजरातच म्हणा). हे दंगे रोखण्यासाठी शक्य ते सर्व उपाय मोदींनी केले. लोकांनी / जनतेने क्रौर्याचा जो नंगानाच खेळला त्यासाठी मोदी जबाबद्दार होत नाहित. धर्माधिष्ठित दंगे काही भारतात पहिल्यांदा होत नाही आहेत. १९४८ साली ब्राह्मणांवर, १९८४ साली शिखांवर या दंग्यांची कुर्‍हाड कोसळली आहेच आणि अगणित वेळा हिंदु - मुस्लिम दंगे झालेत ज्यात दोन्हीकडचे लोक मेले आहेत. ८० च्या द्शकात पद्धतशीरपणे लाखो पंडितांना काश्मीर सोडावा लागलाच आहे. मग एका घटनेवरुन हा नसता दंगा कशाला? सत्तेवर आलेत हे पाहून हिंदूधर्माभिमान्यांना (मुस्लिम-हेटर्स) झालेला आसुरी आनंद व काही दिव्य लोकांचे दिव्य वचनांद्वारे केली जाणारी जनजागृती हे बघता तुम्ही असले प्रश्न विचारणे चमत्कारिक वाटते. शंका असल्यास झलक बघण्यासाठी काही कट्टर हिंदू फेसबुक गृप्सवर जाऊन यावे. हिंदूंसाठी काम करणार्‍या काही आक्रमक संघटनांची भाषा व देहबोली बदलल्याचेही आपणांस दिसून आले नसेल तर आपले कौतुक आहे. माझे कौतुक करण्यासाठी तुम्हाला बरीच अजुन कारणे मिळतील. त्यासाठी ते कौतुक राखुन ठेवा. सध्य हिंदु संघटना आक्रमक झाल्या असतील तर त्या मुर्ख आहेत. त्यातुन हाती काहिच लागणार नाही. मात्र याचाच दुसरा अर्थ ६० वर्षे देशात मुस्लिम धार्जिणे सरकार होते असा घ्यावा का? माझ्य मते तरी सध्या देशात धर्मनिरपेक्ष सरकार आहे. हे सरकार शिखांचे सिरकाण करणारे किंवा मुस्लिमा।चे लांगुलचालन करणारे नाही म्हणुन हिंदु अतिरेकी सरकार होत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवणे हे आमच्यासारख्या रिकामटेकड्या लोकांची कामे आहेत. त्यामुळे मोदींनी कोणाच्या कानात जाऊन काय सांगितले हे आम्हास बरोब्बर कळते. अच्चं झाल होय. उदा. वर्गात क्लास मॉनिटर असतो. खोड्या करणार्‍या, बडबड करणार्‍या मुलांची नावे लिहून वर्गशिक्षकाला देणे त्याचे काम असते. आता जे टारगट मुले असतात त्यांच्याच ग्रुपमधला कुणी मॉनिटर झाला की त्यांच्या कारवायांना जसा कुणी न सांगता उत येइल तसा आता हिंदूधर्माभिमान्यांना आला आहे. त्यातून हा मॉनिटर आपली नावे खरंच सांगणार नाही हेही कन्फर्म आहे. त्यामुळे वर्गात काय स्थिती असेल ती मॉनिटरनेच ठरवलेली आहे, त्याच्या आदेशानेच झालेली आहे असे म्हणता येत नाही पण ....इट्स अ बटरफ्लाय इफेक्ट. तसे असणे आणि एखाद्याला तसे वाटणे यात फरक आहे. भाजपा आणि इतरांमधला फरक पानसरे घटनेवरुनच स्पष्ट होतो. दाभोळकरांचे खूनी अजुन मोकाट आहेत, कलबुर्गींचे खूनी अजुन मोकाट आहेत. हे दोन्ही खून बीजेपी शासित प्रदेशांच्या बाहेरचे. मात्र पानसरेंच्या खून प्रकरणात बरीच प्रगती आहे. इथेच फरक स्पष्ट होतो. धार्मिक तेढीतून खून झालेले हे पहिलेच प्रकरण नाही. पण गाय मारून खाल्ली म्हणून याआधी किती खून झालेत तेही सांगा. गाय हे निमित्त आहे. कधी मंदिरावर गोमांस फेकले म्हणुन खून झालेत कधी मशिदीसमोरुन मिरवणुकी काढल्या म्हणुन. कधी इतर धार्मिक कारणांमुळे. कारणे काय धर्मांधाना वेगवेगळी मिळत असतात. याआधी हिंदूस्थानात मुस्लिमांनी कधीच गाय खाल्ली नव्हती? मग आत्ताच त्याबद्दल इतका क्रोध कसा काय उत्पन्न झाला की आपल्याच गावातल्या एकाची हत्या करण्यापर्यंत मजल जावी... ह्याची मीमांसा करण्याची खरंच गरज वाटत नाही? परत तेच म्हणतो. वेगेवेगळी कारणांनी खून झलेत. त्या अधीही ती कारणे अस्तित्वात होतीच. लोकांमध्ये तेढ आहे. हिंदु मुस्लिम सलोख नाही हेच खरे आणि त्याचे मूळच शोधायचे झाले तर क्रुर आणि धर्मांध मुस्लिम शासकांमध्येच आहे हे सांगायला इतिहासतज्ञाचीसुद्धा गरज नाही. बाकी तुम्हीच बघा आता

In reply to by मृत्युन्जय

मृत्यूंजय साहेब, माझ्या प्रतिसादातले काही उल्लेख माझी वैयक्तिक मते नाहीत, निरिक्षणे आहेत. 'मुस्लिम-द्वेषी-मोदी' हा चष्मा मी लावलेला नाही तर काही मूर्ख हिंदूधर्माभिमान्यांचा शब्द आहे. जसे शिवाजी मुस्लिम-विरोधक असतात तसे मोदींनाही मुस्लिम-किलर अशी प्रतिमा काही हिंदूंनीच चिकटवली आहे. इथेच, काळापहाड यांचे काही प्रतिसाद त्याचे समर्पक उदाहरण आहे. इथे चर्चा करतांना मी फक्त 'तुम्ही-आणि-मी' इतक्या संकुचित वर्तुळाचा विचार करत नाही. तुम्ही एक सुशिक्षित, संतुलित, सुजाण नागरिक आहात. पण याचा अर्थ प्रत्येक भाजपसमर्थक हा तुमचा क्लोन आहे असे नाही. इथे दिले गेलेले प्रतिसाद एकूण सर्व माध्यमांतून समोर येणार्‍या परिस्थितीवर भाष्य आहे. तुमच्या वैयक्तिक विचारसरणीवर नाही. हिंदु मुस्लिम सलोख नाही हेच खरे आणि त्याचे मूळच शोधायचे झाले तर क्रुर आणि धर्मांध मुस्लिम शासकांमध्येच आहे हे सांगायला इतिहासतज्ञाचीसुद्धा गरज नाही. याबद्दल आपले ज्ञान खरंच तोकडे आहे. इथे माहितीपेक्षा आकस जास्त आहे असे दिसते. हे विधान ज्या अभिनिवेशाने लिहिले आहे त्यावरून सलोख्याची अपेक्षाच नाही असेही जाणवते. या वरून सिंहाची व कोकराची गोष्ट आठवली. एक सिंह ओढ्यावर पाणी पित असतो. प्रवाहाच्या दिशेने पुढे एक कोकरू पाणी पित असते. सिंह त्या कोकराला म्हणतो, 'अरे माझे पाणी का उष्टे करतो आहे, जीव घेईल मी तुझा..', त्यावर कोकरू म्हणतं, 'महाराज, तुमच्याकडून पाणी माझेकडे येतंय, मी कसे उष्टे करेन?', त्यावर सिंह चिडतो आणि म्हणतो, 'अरे, आज तू नसशिल करत, पण भूतकाळात तुझ्या पूर्वजांनी तर नक्कीच केले असेल, तुला सोडणार नाय' असे म्हणत कोकराची नरडी धरतो. बाकीच्या प्रतिसादाशी सहमत व उत्तराबद्दल धन्यवाद!

In reply to by मृत्युन्जय

"मुळात तुम्ही एकीकडे इतरांवर सोयिस्कर अर्थ लावण्याचा आरोप करत असताना तुम्ही स्वतः तेच करत आहात" चालायचंच. विचारवंत आणि सेक्युलर लोकांची खासियतच आहे ती.

हिंदु या वर्तमान पत्रात १२ ऑक्टोबर ला "More writers return Akademi awards" या मथळ्यावर एक लेख प्रसिद्ध झाला होत. त्या वर मी केलेले कॉमेंट लेखाखाली प्रसिद्ध झाले आहे . ते येथे उद्धृत करत आहे. The common refrain in statements by the spate of awardees returning their awards is their resentment towards the "current" intolerance. This sudden realization indicates their resentment towards the present government at center. It is therefore, worthwhile reminding them that out of the three cases, murder of Dabholkar took place when congress was ruling at center and in Maharastra state and that of Kalburgi in congress ruled state of Karnataka.Only the murder of Pansare took place during BJP rule at center and state. Is this single case sufficient to make so much noise against the present democratically elected government ? Their bias and ideological grudge now stands exposed.

लोकशाही मध्ये ज्याला हवा तेव्हा , लोकशाही मार्गाने एखद्या गोष्टीचा विरोध करायची मान्यता आहे. आता त्या समग्र साहित्यिकांना वाटला , आपला पुरस्कार परत करावा आणि त्या मार्गे आपला वैचारिक विरोध नोंदवावा. आणि त्यांनी तसे केले तर त्यात काय चुकले ?? तुम्ही तेव्हा का केला नाही ? आताच का करताय ? केरळमध्ये अशा घटना झाला तेव्हा का केला नाही ? त्यांना ज्यावेळी सरकारवर रोष व्यक्त करावा वाटला त्या वेळी त्यांनी लोकशाही मार्गाने व्यक्त केला (भलेही ते बायस्ड असोत). आणि पूर्वी का केला नाही ? हा विचार हास्यास्पद आहे . हे म्हणजे गांधीजींनी १९४२ ऐवजी १९३६ साली का चले जाव आंदोलन केले नाही ? वाजपेयींनी स्वच्छ भारत अभियान का राबविले नाही अशा टाईपचे रडीचे प्रश्न आहेत. त्यांना विरोध करायचा पूर्ण हक्क आहे . आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचे की फाट्यावर मारयचे हे सरकार ठरवेल. त्यांचा विरोध चुकीच्या कारणांना असला तरी त्यांच्या विरोध करायच्या 'हक्काला' पाठिंबा असेल.

In reply to by कपिलमुनी

बाबतच सहमत. बाकी ठरावीक हेतू समोर ठेऊन केलेला विरोध नक्कीच निषेधार्ह आहे आणि राहिलही !!!!!!!

In reply to by नाखु

बाकी ठरावीक हेतू समोर ठेऊन केलेला विरोध नक्कीच निषेधार्ह आहे आणि राहिलही !!!!!!!
हे तर मान्यच परंतु इतर लोक्स ही ज्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट करत आहेत ते ही तितकेच चूक वाटतेय. सगळाच सावळा गोंधळ.!! भाजप डिप्लोमसी आणि पॉलिटिकली करेक्ट वागणूक ठेवण्यात चाचपडतोय असं वाटतं हे पाहून तरी.

In reply to by कपिलमुनी

त्यांचा विरोध चुकीच्या कारणांना असला तरी त्यांच्या विरोध करायच्या 'हक्काला' पाठिंबा असेल.
त्यांच्या विरोध करण्याच्या हक्काला विरोध नसून सिलेक्टिव्ह विरोध करण्याला विरोध आहे. उदा. एम एफ हुसेनना पाठिंबा आणि तस्लिमा नसरीन यांच्या बाबतीत सोयिस्कर मौन या प्रकाराला विरोध आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पुरस्कार परत केलेले लेखक संजय भास्कर जोशी ह्यांचे एक पत्र फेसबुक वर वाचनात आले आहे, त्यात ते पुरस्काराचे (दोन) ८०,००० रूपये + स्वतःकड़ील २०,००० अशी एकुण १००,००० रुपये फ़क्त सरकार ला परत करीत आहेट, आता काहींच्या म्हणण्या प्रमाणे लेखक (मी इथे सं भा जोशी ह्यांचे उदाहरण घेतले आहे फ़क्त) हे 'सेलेक्टिव विरोध' करीत आहेत, असे असता त्यांनी पत्रांत देवेंद्र फडणवीस ह्यांचे शेतकरी लोकांसाठी अन दुष्काळी परिस्थिती वर ते करीत असलेले काम उत्तम आहे व सबब ते स्वतः कड़ील २०,००० त्यात मिसळून ती एक लाखांची स्वल्प रक्कम शेतकरी कल्याण करायला वापरा असे माननीय मुख्यमंत्री महोदयांस सांगत आहेत. लेखकांचा अतिशय शेलक्या विशेषणाने संभावना करणार किती लोकांनी 'पुरस्कार परत करतानाच्या पत्रांत काय मजकूर आहे?' इतके वाचायची तसदी घेतली आहे? जर तसे नसले तर सेलेक्टिव विरोधकर्ते सुद्धा नाहीत काय? कोणी कोणाला कश्याबद्दल बोलायचे मग? उपमुद्दा हा की , ज्या लेखकांनी पुरस्कार परत केलेत ते त्यांनी पूर्णपणे संसदीय भाषेत पत्रे लिहून कायदेशीर रीत्या केले आहे, ह्यात जर मोदीभक्तांना कायदेशीर काही करता येत नसल्यास ते शिवराळ विरोध करुन मोदींचेच प्रॉब्लम कश्याला वाढवत आहेत ! ? अतिरेकी प्रेम सुद्धा घातक असते ते असे!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सगळेच लेखक वाईट आहेत असे मी म्हणणार नाही. पण हेच कॉंग्रेसच्या राज्यात बरे चालत नाही. आत्ताच का? आणि खरा पोटशूळ मोदी सत्तेत आहेत असा आहे. तो तसा नसता तर इतके कोणी टोकाला गेलेच नसते. मुळात झालेली घटना अखिलेश राज्यावर असताना झाली. मग त्याला किंवा मुलायम सिंगांना बरे कोणी दोषी धरत नाही. मोडीला २००२ साठी अजूनही जबाबदार धरले जाते तर मग सगळे लेखक मोदींवर बरे रोष धरून आहेत? हे दुटप्पी वागणे नसेल तर अजून काय आहे? बंगाल आणि केरळ मध्ये अनेक लोकांच्या हत्त्या झाल्या एक शब्द बाहेर नाहीये.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

संजय भास्कर जोशी , ह्यांनी पुरस्काराचे २०,००० (अक्षरी रुपये वीस हजार फ़क्त) हे सरकार ला परत केले असुन त्यात ८०,०००(अक्षरी रुपये ऐंशी हजार फ़क्त) हे वैयक्तिक पैसे घातले आहेत बाकी ते मेँटलेकच्युअल वगैरे वगैरे (दादुमियां ते गुरूजी सगळ्यांनी आपापले रंग भरून घ्यावे) (काळ) बाप्या

In reply to by कपिलमुनी

Selective विरोध करणाऱ्या लोकांवर टीका करुन आम्हीही आमचा या देशाच्या घटनेने दिलेला अधिकारच बजावत आहोत याचीही नोंद असू द्या. रच्याकने मोदी पंतप्रधान झाल्यावर देश सोडून जाऊ असं काहीजण म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यातला फक्त कमाल रशीद खान उर्फ के.आर.के. हाच देश सोडून गेला. ;)

In reply to by बोका-ए-आझम

दादूस, एकदा फेसबुक वर नजर माराच! असली असली शब्द योजना सापडेल अन असली विशेषणे सापड़तील की ती साक्षात् नमोंनी पाहिली तर "नमामी गंगे" च्या दुप्पट एलोकेशन "नमामी शब्दगंगे" स्कीम ला करतील :D माझा विरोध हा शेलक्या बोलण्याला होता अन राहील सो बोक्या भाऊ लेटस अग्री टु डिसग्री इन आवर सेन्सस एंड गुडविल :)

असताना झाली. मग त्याला किंवा मुलायम सिंगांना बरे कोणी दोषी धरत नाही.
यूपी मधले कनिष्ठ वगैरे जेव्हा लोकल पॉलिटिक्स बद्दल बोलतात तेव्हा तरी असे जाणवले नाही, उरता उरला लेखकांचा प्रश्न तर लेखक अखिलेश वर अगदीच बोलले नाहीत हे आपण कसे ठाम सांगु शकता आहात? (माझे ह्या प्रश्ना संबंधी ज्ञान कमी अन निरिक्षण जास्त आहे)
मोडीला २००२ साठी अजूनही जबाबदार धरले जाते तर मग सगळे लेखक मोदींवर बरे रोष धरून आहेत? हे दुटप्पी वागणे नसेल तर अजून काय आहे?
एक मिनट, लेखकांपैकी किती लोकांनी मोदींस नाव घेऊन वैयक्तिक विरोध केला आहे? माझ्या माहिती प्रमाणे सगळ्यांनी हे पुरस्कार "देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" ह्याचा निषेध म्हणून परत केले आहेत, त्यात मोदींना का पाहता आहात तुम्ही? का ह्या आरोपाला मोदी कारणीभूत आहेत असे कबूल आहे म्हणताय स्वतः? आता ज़रा बोलतोच, 'सगळे कसे बिचार्या मोदींस बोलतात हो" करत त्यांच्यासाठी विक्टिम कार्ड घेणारे लोक आजकाल सहज सपड़तात, ह्यात काही काही मुद्दे कोणीच लक्षात (बहुतेक सोइस्कररीत्या) घेत नाहीये ते खालील प्रमाणे १.बीजेपी न स्वतः मोदी ह्याना एक व्यक्ति असूनही पार्टी पेक्षा मोठे नाही तरी पार्टी बरोबरीत आणले (नाही कोणीच म्हणू नका कारण लोकसभा निवडणुकी मधे "अबकी बार मोदी सरकार" हेच सतत ऐकले आहे ज्याच्या पुढे "अबकी बार भाजपा सरकार" फारच कमी ऐकले आहे) २.त्यामुळे झालंय कसं की मोदी=बीजेपी हे स्वतः बनवलेले समीकरण आहे पार्टी चे, तस्मात् आता मोदी ह्यांच्यावर होणारे आरोप अन बीजेपी वर होणारे आरोप वेगळे उरलेले नाहियेत, 'जया अंगी मोठेपण' विसरून चालणार नाही, अन विसरले असतील तर 'घी देखा लेकिन बड़गा नहीं देखा' लागु होईल बघा काय ते. ३.मते मागताना कमळ भगव्याचे पांढरे केले गेले होते, माननीय प्रधानमंत्री हे सुद्धा "सबका साथ सबका विकास" स्पष्ट बोलले आहेत पण त्यांच्या मंत्रीमंडळाची तशी इच्छा दिसत नाही नापेक्षा रामजादे-हरामजादे किंवा हिंदुन्नी ५ पोरे निपजली पाहिजेत इतकेच काय तर मुस्लिम स्त्रियांच्या कबरी खोदून त्यांच्यावर अत्याचार करा असे संगणाऱ्या साक्षी महाराज अन योगी आदित्यनाथ साध्वी निरंजन ज्योति वगैरे मंडळी ला इतके खमके प्रधानमंत्री "विखारी अन विद्वेषपूर्ण बोलु नका सहन करणार नाही" असली फ़क्त पोकळ धमकी देऊन बसले आहेत करवाई काहीच दिसत नाही त्यावर सगळेच गुळमुळीत , राज्याचे मुख्यमंत्री असलेले मनोहरलाल खट्टर जेव्हा "मुस्लिम देशात चालतील पण त्यानी बीफ सोडायला हवे" असले हलके विधान करतात तेव्हा पक्षश्रेष्ठी ते पंतप्रधान सगळे कसल्या गुळण्या धरून बसले आहेत कळेना, खट्टर ह्यांचे वाक्य तद्दन असंवैधानिक आहे हे प्रथमदिनी लोकसभेच्या पाया पडणार प्रधानमंत्री साहेबांस दिसले नाही का? संगीत सोम ह्यांनी आरंभलेल्या उद्योगात "संगीत ने तिथे जायला नको होते" इतके मोघम बोलणारे अमित शहा नक्की काय आहेत? राष्ट्रिय अध्यक्ष का सामान्य कार्यकर्ते? मग अश्यवेळी जर टिका मोदींवर झाली तर त्यात कश्याला विक्टिम कार्ड खेळावे?
बंगाल आणि केरळ मध्ये अनेक लोकांच्या हत्त्या झाल्या एक शब्द बाहेर नाहीये.
अच्छा म्हणजे तुम्ही त्यांना शेण खाताना काही म्हणाला नाहीत तस्मात् आम्हाला काही म्हणायचे नाही इतके सुलभीकरण होते आहे का इथे? एक लक्षात घ्या की तुम्हीच बंगाल अन केरळ मधल्या हत्या अन सद्धयाचे प्रकार एकाच पातळी ला असल्याचे कबुल करताय इंडिरेक्टली!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माझ्या माहिती प्रमाणे सगळ्यांनी हे पुरस्कार "देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" ह्याचा निषेध म्हणून परत केले आहेत, त्यात मोदींना का पाहता आहात तुम्ही? का ह्या आरोपाला मोदी कारणीभूत आहेत असे कबूल आहे म्हणताय स्वतः?
माझा विरोध त्यालाच आहे. आत पर्यत काय देशात सगळ खेळीमेळीच वातावरण होतं का? अचानक देश असहिष्णू झाला का? पुरस्कार करा परत, निषेध नोंदवा पण या आधी यांच्यापैके कुठल्याच साहित्यिकाने आधी कुठल्याच अशा आधी घडलेल्या घटनेवर साधी प्रतिर्किया पण नाही दिली, निषेध लांबच राहिला. तुम्हाला त्यांची ही व्रुत्ती पटते आहे का? बरं एवढ करुन अखिलेश सरकार केंद्राला कस काय जवाबदार ठरवतं? सगळ्यांनी महित आहे की युपी मधे कायदा सुव्यवस्थेचे काय हाल आहेत?

In reply to by Dhananjay Borgaonkar

+१००००० काश्मीरी लेखक गुलाम नबी खयाल यांना १९७५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार आणीबाणी लादायच्या आधी मिळाला होता की नंतर हे माहित नाही. जरी तो पुरस्कार त्यांना आणीबाणीपूर्वी मिळाला असला तरी आणीबाणीदरम्यान व्यक्तिस्वातंत्र्याची होत असलेली मुस्कटदाबी त्यांना दिसली नाही, १९९० च्या जानेवारी महिन्यात ३ लाख काश्मीरी पंडितांना नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर खोर्‍यातून हाकलले गेलेले दिसले नाही, त्यांच्याच काश्मीरात हजारो लोकांना ठार मारलेले दिसले नाही. हजारो पटींनी अधिक गंभीर घटना घडत असताना कधी पुरस्कार परत करावेसे त्यांना वाटले नाही आणि या दोन गोष्टींच्या ०.१% ही गंभीर घटना घडत नसताना आता मात्र व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असल्याचे स्वप्न त्यांना पडत आहे. डिजगस्टींग. अशा ढोंगी लेखकांना आणि त्यांचे पुरस्कार परत करायचे समर्थन करणार्‍यांना अजिबात धूप घालू नये.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य बोलकं आहे.

In reply to by अनुप ढेरे

हे इथे टाकल्याबद्दल धन्यवाद अनुपराव. यातून हेच सिध्द होते. यांना न आवडणारा मनुष्य यांच्या नाकावर टिच्चून पंतप्रधान झालेला आहे आणि अर्थातच यांना ते सहन झालेले नाही. म्हणून कुठलातरी राग कुठेतरी काढायला म्हणून (आणि बहुदा त्यांचे एकमेकांची पाठ खाजवायच्या साम्राज्याला मोदी सरकारने सुरूंग लावला म्हणून) ते पुरस्कार परत करत आहेत. उगीच व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वगैरे तात्विक मुलामे द्यायचा ते प्रयत्न करत आहेत ती बकवास आहे.

In reply to by अनुप ढेरे

नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य बोलकं आहे.
+१ हे पुरस्कार परत करण्यामागचे मूळ कारण देशातील वाढती असहिष्णुता, वाढता जातीय हिंसाचार, लोकशाही स्वातंत्र्यावर आलेला घाला, विचारस्वातंत्र्याचा कोंडमारा इ. इ. नसून त्यामागचे एकमेव कारण म्हणजे मोदी बहुमताने निवडून येऊन पंतप्रधान झाले हे या मंडळींना अजूनही पचविता आलेलं नाही. मोदींवर टीका केली की प्रसिद्धी मिळते हे या चतुर मंडळींनी केव्हाच ओळखलं आहे. यातली बहुसंख्य नावे लोकांना माहितीच नव्हती (उदा. महाराष्ट्रात गणेश विसपुते या नावाचे पुरस्कार विजेते कवी/लेखक आहेत हे त्यांनी पुरस्कार परत केल्यावरच समजलं. त्यापूर्वी हे नाव कधीही ऐकलेले नव्हते.). नेहा धुपिया नावाची एका अडगळीत पडलेली नटी काही महिन्यांपूर्वी मोदींविरूद्ध ट्विट करून अशीच अचानक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली होती. दिव्या स्पंदना उर्फ रम्या, श्रुती सेठ यांनी झटपट प्रसिद्धीसाठी मोदींविरूद्ध ट्विट करण्याचा मार्ग चोखाळला होता. ज्याला/जिला झटपट प्रसिद्धी हवी आहे आणि एका रात्रीत प्रकाशझोतात यायचे आहे त्याने/तिने मोदींविरूद्ध ट्विट करावे.

In reply to by तर्राट जोकर

मग ते ईंग्रजांच्या मुस्कटदाबीस, इंदिरा गांधींच्या आणिबाणी प्रकरणासही लागू होत असेल... नाही ?
हा आपल्या सोयीचा आपल्या मगदूराप्रमाणे काढलेला अर्थ होतो. ईंग्रज हे परकिय राज्यकर्ते होते त्यांच्याकडुन तशा वर्तणूकीची अपेक्षाही करता येत नाही त्यामुळे हे उदाहरण येथे गैरलागू आहे. राहता राहीला इंदिरा गांधींनीं लागू केलेल्या आणीबाणीचा प्रश्ण, ती त्यांनी एका विशिष्ट राजकीय परीस्थितीत स्वार्थबुध्धीने लागू केली कारण कोर्टाचा निर्णय त्यांच्या विरुध्ध गेल्यामुळे त्यांना पायऊतार व्हावे लागणार होते हे माहित असेलच, नंतर आणिबाणीला भारतीय जनतेने पूर्णपणे झिडकारले / नाकारले असा इतिहास आहे. यथावकाश ईदीराबाईंना त्याचे योग्य ते फळ त्यापूढच्या निवडणुकीत मिळालेच. आज देशात इतकी वाईट परिस्थीती नक्कीच नाहीये, ( अर्थात काही फूकटखाऊ उपटसुंभांचे म्हणजेच तथाकथीत विचारवंत वगैररेंचे हलाखीचे दिवस येताहेत असे दिसते ) त्यामुळे हाही मुद्दा गैरलागू आहे व अस्थानी आहे.

In reply to by विनोद१८

थोरामोठ्यांची वाक्ये आपल्या मगदुराप्रमाणे आपल्या सोयीने अर्थ लावून घ्यायची हे तुम्ही म्हणायचे म्हणजे बल्ले बल्ले! मुळात हे वाक्य चाणक्याचे आहे याचा काय पुरावा नाही. कुणातरी भाजपीय चाणक्याच्या डोक्यातून निघालेले वाक्य दिसते. त्यावर ऑथेंटीक वाटावे म्हणून आर्य चाणक्याचे नाव दिले ठोकून. याची सत्यता कळवलीत तर काही बोलणे पुढे बरे होईल....

In reply to by तर्राट जोकर

वाट्ल्यास सहा ईंची भिंगातुन वाचा माझ्या प्रतिसादात कोठे उल्लेख आहे चाणक्याचा ?? तो फक्त तुमच्या दिव्यच़क्षूंनाच दिसतोय ?? मुद्द्यांवर बोला, अवांतर नको.

In reply to by अनुप ढेरे

नयनतारा सेहगल यांनी हे उत्तर अनावधाने दिलेले दिसते (मनातले खरे विचार असे स्पष्टपणाने म्हणायची पद्धत नाहीय ना ?) आणि राजदीप सरदेसाईंनी ते सरळ तसेच प्रसिद्ध केले हे पण आश्चर्यच आहे (त्यांचा नेहमीचा कल पाहता हे पण अनवधानानेच झाले असावे) ! कधी कधी अनावधानाने सत्य बाहेर येते हेच खरे ! आणि ही तर डबल व्हॅम्मीच झाली की !!! बाकी चालू द्या.

In reply to by अनुप ढेरे

सहज म्हणून ह्या ढोंगी लेखिकेच्या बूकलिस्ट वर नजर फिरवली, त्यात एक पुस्तक सापडले "इंदिरा गांधी, ट्रिस्ट विथ पॉवर" म्हणले बुआ हूँ!! बाई ने चुलत बहिणी चे चरित्र लिहिले आहे त्यात काय नवल असणार! तरी एकदा वर वर चाळले तर अहो आश्चर्यम बाई ने इंदिरा ला वेडी वाकड़ी धुतली आहे म्हणजे आज "असहिष्णुता पसरल्या विरुद्ध" सरकार ला (इंडिरेक्टली मोदींस) जितके बोलली नसेल त्याच्याहुन जास्त! उदा. १ १९७३ च्या निवडणुकांवर डायरेक्ट प्रश्नचिन्ह इतके मोठे का थेट त्यांस अवैध म्हणणे २ इंदिरा गांधींस भारतीय राजकारणाचे केंद्रीकरण अन गुन्हेगारीकरण केल्याबद्दल दोष देणे ३ इंदिरा गांधी ही अतिशय सत्तापीपासू बाई आहे जिने भारतातल्या महत्वाच्या संस्था फ़क्त शिक्का मात्र करून ठेवल्या आहेत अश्या ह्या "लार्जली क्रिटिकल" पुस्तकाला इंदिरा सरकार ने १९८२ मधे बॅन केले होते बघा, आता प्रश्न हा आहे की १. कोण कोणाबद्दल हाफ informed आहे? २. नेमके सेलेक्टिव होण्याबद्दल कोणी कोणाला बोलायचे?? *नयनतारा सहगल ही आदर्श लिबरल बाई एकार्थाने भारताची पहिली महिला राजकीय स्तंभलेखक होती/आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इंदिरा गांधी आणि त्यांची आत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्यात दुरावा इंदिरा लहान असल्यापासूनच होता. कदाचित लहानपणी आत्याकडून काही अनुभव इंदिरांना आले असतील. नेहरू पंतप्रधान असताना विजयालक्ष्मी पंडित यांना यु.एन. जनरल असेंब्लीचे अध्यक्षपद, भारताचे लंडन आणि वॉशिंग्टनमधील राजदूत अशी पदे भूषवायला मिळाली होती.पण इंदिरा पंतप्रधान झाल्यानंतर मात्र त्यांना फारसे महत्व मिळत नव्हते. इंदिरा गांधी प्रसंगी प्रचंड vindictive होऊ शकत. जनता सरकारने विजयालक्ष्मी पंडित यांची मुलगी नयनतारा सहगल यांना रोममध्ये भारताचे राजदूत म्हणून पाठवले.पण १९८० मध्ये इंदिरांचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरांनी ती नियुक्ती रद्द केली. सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयांमध्ये हा निर्णय होता. नयनतारांचे त्यांचे पती गौतम सहगल यांच्याशी पटत नसे.त्या काळात त्या मंगत राय या अत्यंत कार्यक्षम आणि कर्तबगार अशा आय.सी.एस ऑफिसरबरोबर राहत असत. नंतर त्यांचे मंगत रायांबरोबर लग्नही झाले. मंगत राय कॅबिनेट सेक्रेटरी होऊ शकले असते पण त्यांना इंदिरांनी डावलले आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.
हा गॅरी ट्रूमन यांचा एका लेखावरचा प्रतिसाद आहे. नयनतारा सहगल यांनी (मुंबईच्या भाषेत बोलायचं तर) राशनपानी घेऊन इंदिरा गांधींच्या मागे लागण्यामागे हे महत्वाचं कारण आहे. त्यांनी इंदिरा गांधींविरुद्ध घेतलेले आक्षेप खरे असतीलही, पण एक प्रकारे तो dirty laundry सर्वांसमक्ष धुण्याचाच प्रकार आहे.

In reply to by अनुप ढेरे

या माहितीबद्दल धन्यवाद, अनुप ढेरे. अवांतर : यावरून राजदीप सरदेसाई हा मोदींचा छुपा हस्तक आहे हे दिसून येतं. त्याला झालेली न्यूयॉर्क मधली मोदीचाहत्यांची मारहाण वगैरे नाटक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माझ्या माहिती प्रमाणे सगळ्यांनी हे पुरस्कार "देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" ह्याचा निषेध म्हणून परत केले आहेत, त्यात मोदींना का पाहता आहात तुम्ही?
आम्हाला तर काही दिसले नाही बुवा "देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी". १ वर्षांपूर्वी, २ वर्षांपूर्वी, ५ वर्षांपूर्वी, १५ वर्षांपूर्वी किंवा मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देशात जेवढे सहिष्णु/असहिष्णु वातावरण होते, तेवढेच आताही आहे. आणि व्यक्तीस्वातंत्र्य म्हणाल तर साक्षी महाराज, साध्वी प्राची, गिरीराज सिंह, पप्पू, काटजू, नेमाडे, लालू हे व यांसारखे अनेक जण अतिशय बिनधास्त वाटेल ती मुक्ताफळे उधळत आहेत. बाबासाहेब पुरंदर्‍यांना महाराष्ट्र भूषण पारितोषिक देताना अनेकांनी मुक्तपणे विरोध केला. तेव्हा त्यांची कोणीही मुस्कटदाबी केली नव्हती. याकूब मेमनला फाशी देताना अनेकांनी मुक्तपणे फाशीला विरोध केला होता. तेव्हाही त्यांची कोणीही मुस्कटदाबी केली नव्हती. ब्लॉगमधून, मिपासारख्या संकेतस्थळावरून, वृत्तपत्रातून, दूरदर्शनवरील अनेक वाहिन्यांमधून अशा सर्व ठिकाणी नागरिक आपली सरकारच्या बाजूने किंवा विरोधी मते उघडपणे व्यक्त करीत आहेत. तेव्हा त्यांची कोणीही मुस्कटदाबी केली नव्हती. मग कोठे आहे मुस्कटदाबी? या लोकांनी आणिबाणीविषयी माहिती नसावी. त्यामुळेच मुस्कटदाबी हा शब्द इतक्या सहजतेने वापरीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

हे त्यांना सांगा गुर्जी! मी फ़क्त ते काय म्हणाले अन काय नाही (वाचीव ज्ञानावर) सांगतोय! ते बरोबर आहेत असे ही नाही! सालं ह्या देशाचं रडणं हेच तर आहे! त्यांच्यासरख्यास गरज नसताना दिसते अन अंधभक्तांना गरज असताना दिसत नाही!

"देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" >> हे खरच आहे का? ह्याच्या आधी हे होत नव्हते काय? पेडगावाची ट्रीप आहे बाकी काही नाही. बाकीच्या प्रतिसादाशी सहमत आहे. फक्त असहमती ह्यावर आहे कि सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी फक्त मोदी मुलेच होतात. अच्छा म्हणजे तुम्ही त्यांना शेण खाताना काही म्हणाला नाहीत तस्मात् आम्हाला काही म्हणायचे नाही इतके सुलभीकरण होते आहे का इथे? एक लक्षात घ्या की तुम्हीच बंगाल अन केरळ मधल्या हत्या अन सद्धयाचे प्रकार एकाच पातळी ला असल्याचे कबुल करताय इंडिरेक्टली!>> इथेही तुम्हाला मान्य नाहीये कि तेंव्हा आवाज उठवायला हवा होता. प्रोब्लेम तिथेच आहे. जेंव्हा केंद्र कोन्ग्रेस कडे होते तेंव्हा हे साम्य/समाज वाडी जे काही सगळे करत होते ते चालत होते. आत्ताही बातम्या कश्या दिल्या जातात आणि त्याला रंग कसा दिला जातो ह्याचा आहे. हेच सूत्र सगळ्यांना लावले तर मोडीचा इतका प्रतिवाद करायला कोणीच येणार नाही.

हा नक्की काय प्रकार असतो आणि किती भयावह असू शकतो याबद्दल या पुरस्कार परत करणाऱ्या लोकांपैकी कोणाला first hand माहिती आहे? नयनतारा सहगल आणि अशोक वाजपेयी हे खानदानी काँग्रेसी आणि काँग्रेसमुळे फायदा झालेले असल्यामुळे त्यांचं मत ग्राह्य धरणं हे कितपत बरोबर आहे? कारण आता त्यांचा आवडता पक्ष सत्तेवर नाहीये, ज्या पक्षाने आणीबाणी आणून स्वातंत्र्योत्तर इतिहासातला व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचा आणि मुस्कटदाबीचा प्रयोग केला होता. बाकी कामगारांची 'हुकूमशाही ' आणणं हे अंतिम उद्दिष्ट असणारं साम्यवादी तत्वज्ञान मानणारे डावे जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य वगैरेच्या गप्पा मारतात तेव्हा ड्वाले पानावतातच.

In reply to by बोका-ए-आझम

नयनतारा अन बाजपेयी मग शिव्यांस पात्र आहेतच! वाद त्यों नाहीचे बोकोबा दादा, जसे तुम्ही नयनतारा अन बाजपेयी ह्यांचे बैकग्राउंड वर्कआउट केले तसेच इतरांचे ची झाले पाहिजे नव्हे झालेच पाहिजे! सरसकटीकरण नको, इतका मुद्दा आहे म्हणूनच मी "कोणी पत्रे तरी पुर्ण वाचली आहेत का?" हा प्रश्न विचारला आहे (लक्षात घ्या it defines a logical prerequisite and its not उपरोधिक) परवा एका अश्याच अज्ञ बांधवाने मला "लेखकच कोणाला माहिती नाही तर पुरस्कार अन ती अकादमी काय लायकी ची असेल लक्षात घ्या" असे दिव्य मत दिले! आता बोला! हे ट्रेंड एक समाज म्हणून आपल्याला घातक नाही हे क्रिएटिव मीडिया मधे काम केलेला तुमच्या सारखा मनुष्य म्हणेल का हे तुम्हीच सांगा!?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अज्ञ बांधवाने मला "लेखकच कोणाला माहिती नाही तर पुरस्कार अन ती अकादमी काय लायकी ची असेल लक्षात घ्या
हे येथे मिपावरही दिसते. "ही लेखिका आजपर्यंत कोणालाही माहित नव्हती.सगळे प्रसिद्धीसाठी...कोण कुठला कवी.." असे प्रश्न येत आहेत.म्हणजे उद्या नावाजलेल्या २/४ लेखकांनी,कवींनी पुरस्कार परत केले तर ह्या लोकांची बोलती बंद होंणार.असो. पुरस्कार परत करणे अयोग्य वाटते.कायदा-सुव्यवथेबद्दल आ़क्षेप असेल तर तसे बोलून दाखवले पाहिजे. कायदा-सुव्यवथेला साहित्य अकादमी जबाबदार नसते.तेव्हा त्यांना पुरस्कार परत करून काय मिळणार? असा ह्यांचा प्रश्न.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विरोध या लोकांनी पुरस्कार परत करणं किंवा सरकारच्या एखाद्या कृतीचा मुस्कटदाबी म्हणून निषेध करणं याला नाहीच आहे. विरोध हा दुटप्पी वृत्तीला आहे. एका पक्षाच्या सरकारने जी कृती केली किंवा त्याच्या राजवटीत एखादी कृती झाली तर निषेधाचा ब्रदेखील न उच्चारणारे लोक जेव्हा दुस-या पक्षाच्या राजवटीत ती गोष्ट होत असते तेव्हा तावातावानं भांडतात याचा अर्थ काय होतो? जर यांची सद्सद्विवेकबुद्धी ही कोणत्या पक्षाचं सरकार आहे यावर अवलंबून राहणार असेल तर तिला सद्सद्विवेकबुद्धी म्हणणं हा त्या गोष्टीचा अपमान आहे.
परवा एका अश्याच अज्ञ बांधवाने मला "लेखकच कोणाला माहिती नाही तर पुरस्कार अन ती अकादमी काय लायकी ची असेल लक्षात घ्या" असे दिव्य मत दिले! आता बोला! हे ट्रेंड एक समाज म्हणून आपल्याला घातक नाही हे क्रिएटिव मीडिया मधे काम केलेला तुमच्या सारखा मनुष्य म्हणेल का हे तुम्हीच सांगा!?
याच्याशी सहमत. ही टोकाचीच भूमिका आहे. मला एखादा लेखक माहित नाही म्हणजे तो चांगला नाहीच असं जर कोणी म्हणत असेल तर ते धोक्याचं आहेच आणि अशी बंद झापडं लवून आजच्या काळात जगणं हा मूर्खपणा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

@बोका-ए-आझम विरोध हा दुटप्पी वृत्तीला आहे. जर यांची सद्सद्विवेकबुद्धी ही कोणत्या पक्षाचं सरकार आहे यावर अवलंबून राहणार असेल तर तिला सद्सद्विवेकबुद्धी म्हणणं हा त्या गोष्टीचा अपमान आहे. + १००

In reply to by सुबोध खरे

अवतरण अश्या धाग्यांसाठी, आणि तमाम आप्तेष्ट समान धाग्यांसाठी आपोआप (वैधानीक इशार्यासमान छापले जावे हि (

मिपा सा सं कडे

) कळकळीची मागणी.

In reply to by बोका-ए-आझम

डावे जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य वगैरेच्या गप्पा मारतात तेव्हा ड्वाले पानावतातच.
+१००००० (डाव्यांचे नाव ऐकताच तळपायाची आग अस्मानात जाणारा) गॅरी ट्रुमन

तुमच्या त्या अनेक एन.जी.ओ.ज च्या फंडिंगची चौकशी सरकारने चालू केली आहे.कॉन्ग्रेसला पाठिंबा देणार्या एन.जी.ओ.जची जरा जास्तच चौकशी चालू आहे. त्यामुळे लब्धप्रतिष्ठिंतातला एक वर्ग जरा रागावला आहे असा ह्यांचा अंदाज.

म्हणूनच शेषराव मोरे यांनी या सगळ्या तथाकथीत विचारवंतांना "पुरोगामी दहशतवादी" म्हणले आहे. अर्थात शेषराव मोरे बहुदा eminent author नसावेत. कारण यांना साहीत्य अकादमीचे पारीतोषिक मिळालेले नाही. ;)

1 Uday Prakash Hindi writer 2 Nayantara Sahgal Indian English writer 3 Ashok Vajpeyi Hindi poet 4 Sarah Joseph Malayalam novelist 5 Ghulam Nabi Khayal Kashmiri writer 6 Rahman Abbas Urdu novelist 7 Waryam Sandhu Punjabi writer 8 Gurbachan Singh Bhullar Punjabi writer 9 Ajmer Singh Aulakh Punjabi writer 10 Atamjit Singh Punjabi writer 11 GN Ranganatha Rao Kannada translator 12 Mangalesh Dabral Hindi writer 13 Rajesh Joshi Hindi writer 14 Ganesh Devy Gujarati writer 15 Srinath DN Kannada translator 16 Kumbar Veerabhadrappa Kannada novelist 17 Rahmat Tarikere Kannada writer 18 Baldev Singh Sadaknama Punjabi novelist 19 Jaswinder Punjabi poet 20 Darshan Battar Punjabi poet 21 Surjit Patar Punjabi poet 22 Chaman Lal Punjabi translator 23 Homen Borgohain Assamese journalist 24 Mandakranta Sen Bengali poet 25 Keki N Daruwalla Indian English poet 26 Nand Bhardwaj Rajasthani Hindi writer *The list does not include six Kannada writers who returned the State literary award on 3 October. Theatre artist Maya Krishna Rao has also returned her Sangeet Natak Akademi award on 12 October, while Shiromani Lekhak award winner Megh Raj Mitter has also announced to return his award. List of litterateurs who resigned from Sahitya Akademi posts No Litterateur Language 1 Shashi Deshpande Kannada author 2 K Satchidanandan Malayalam poet 3 PK Parakkadvu Malayalam writer 4 Aravind Malagatti Kannada poet

In reply to by कपिलमुनी

केवळ मनोरंजनासाठी. डाकिया डाकिया हांफता है धूल झाड़ता है चाय के लिए मना करता है डाकिया अपनी चप्पल फिर अंगूठे में संभालकर फँसाता है और, मनीआर्डर के रुपये गिनता है. --------------------------------------------------- कुतुबमीनार की ऊँचाई कुतबुद्दीन ऎबक को अब ऊपर से नीचे देख पाने के लिए चश्मे की ज़रूरत पड़ती इतनी ऊँचाई से गिर कर चश्मा टूट जाता. --------------------------------------------------- रंगा-बिल्ला एक था रंगा एक था बिल्ला दोनों भाई-भाई नहीं थे लेकिन दोनों को फाँसी हो गयी । एक थे टाटा एक है बिरला दोनों भाई-भाई हैं लेकिन दोनों को फाँसी नहीं हुई । --------------------------------------------------- छींक ज़िल्लेइलाही शहंशाह-ए-हिंदुस्तान आफ़ताब-ए-वक़्त हुज़ूर-ए-आला ! परवरदिगार जहाँपनाह ! क्षमा कर दें मेरे पाप । मगर ये सच है मेरी क़िस्मत के आक़ा, मेरे ख़ून और पसीने के क़तरे-क़तरे के हक़दार, ये बिल्कुल सच है कि अभी-अभी आपको बिल्कुल इंसानों जैसी छींक आयी । ---------------------------------------------------- करीमन और अशर्फ़ी शाहनवाज़ खाँ तुम अपनी अंटी से तूतनखामेन की अशर्फ़ी निकालना । उधर हाट के सबसे आख़िरी छोर पर नीम के नीचे टाट पर कई साल से अपनी झुर्रियों समेत बैठी करीमन किरानची होगी । तुम उससे अशर्फ़ी के बदले लहसुन माँगना । यह शर्त रही कि वह नहीं देगी । अजुन काही कविता - http://kavitakosh.org/kk/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D…

आमच्या देशीवादी नेमाडे सरांनी अ‍ॅवॉर्ड परत केला की आम्ही ह्या वादात पडु , तोवर पव्हेलियन मधे बसुन मजा घेत आहोत =))

कधीही काही न बोलणारे अन आता उसासे सोडणारे हे http://www.dnaindia.com/india/report-dadri-killing-looking-at-possibili… भारतीय वायुसेनेचे प्रमुख सुद्धा मेँटलेकच्युअल म्हणावतील नाही का हो भद्रजनहो!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब जर वायुदल प्रमुखांनी राजीनामा दिला असता तर त्यांना "मेँटलेकच्युअल" म्हणावे लागले असते. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया हि कोणताही सुजाण नागरिक देईल अशीच आहे. आपल्या माणसांची काळजी घेणे हे कोणत्याही लष्करी अधिकार्याचे कर्तव्य असते त्याप्रमाणेच वायू दल प्रमुख वागत आहेत. कोणत्याही राजकीय वादात न पडता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया एखाद्या परिपक्व अधिकार्याचीच आहे. १९८४ च्या शीख कत्तलीत किंवा काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या वेळेस त्यावेळच्या लष्कर प्रमुखांनी अशीच सुजाण प्रतिक्रिया दिली होती असे आठवते.

In reply to by सुबोध खरे

जल्म ८५ चा म्हणून माहिती नव्हते! धन्स डॉक साब, बाकी लष्करेतर सुजाण नागरिक बोलले तर त्यांच्यावर लगेच "मेंटलकच्युअल" "काविळ पेशेंट" "विकास विरोधी" असे रबर स्टैम्प का मारले जात असावेत असे वाटते?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विरोध हा दुटप्पी वृत्तीला आहे. जर यांची सद्सद्विवेकबुद्धी ही कोणत्या पक्षाचं सरकार आहे यावर अवलंबून राहणार असेल तर तिला सद्सद्विवेकबुद्धी म्हणणं हा त्या गोष्टीचा अपमान आहे. माझे म्हणणे एवढेच आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबाप्पू यु टु? बातमी वाचा तर खरे. त्यांनी दादरी घटनेचा निषेध केला आहे. डोके ताळ्यावर असलेला कुठलाही माणूस करेल. दादरी घटनेचा निषेध करणार्‍या लोकांना धागाकर्ता मेंटलेक्च्युअल म्हणतच नाही आहे. त्याचा निषेध म्हणुन २५ -३० वर्षांपुर्वी मिळालेला पुरस्कार परत करणार्‍या आणि ते करतना विनाकारण सद्य सरकारवर टीका करणार्‍या अज्ञात लेखकांना ते तसे म्हणत आहेत. बाकी बातमीतील खालील वक्तव्याने माझे लक्ष वेधुन घेतले: "Whatever protection is required, we are giving it to him. We are trying to move (them) to some Air Force area. We are with him and our people are there to assist the family," यातुन २ गोष्टी: १. पै इकलाख यांच्या कुटुंबियांना मदत करणारी एक यंत्रणा सरकारीच आहे. २. अश्याच प्रकारची मदत सेनादलांनी काश्मीर मधुन परागंदा व्हायला लागलेल्या आणि परिजनांचे प्राण गमावलेल्या काश्मिरी पंडित सैनिकांचीही केली असेल आणि त्याचेही योग्य ते पुरावे शोधुन हितेष भाई आणि त्यांचे सर्व आजी माजी अवतार आणि चुलत सख्खी भावंडे मिळुन देतील अशी अपेक्षा अहे.

दमले १३५४७९ शब्द वाचून! जाउद्या हो. सगळे साहित्यिक दुर्गाबाई भागवत नसतात. "ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी" हा साधा नियम आहे. माइंचे हे वेगळे विचार करायला लागलेले दिसतात सध्या. आणि आमचे फुजि नि दादूस कुठे दिसले नाहीत ते? त्यांच्याबदली नवे लोक पेट्रोलचे टॅंकर घेऊन आले वाटतं!! =))

In reply to by पैसा

विरोधी विचार वा कृती केली की हल्ली मुडदा पडतो व ' यात केंद्राचा काय संबंध ? ' असे म्हणून श्रीविष्णूंचे ११ वे अवतार मोकळे होतात. म्हणून माइइंचे ' हे ' जरा मवाळ झालेत.

In reply to by dadadarekar

आणि मुडदा पडल्या पडल्या काही लोकांना तो कोणी पाडला हे पोलिस, गुप्चार संस्था, सी बी आय च्या आधी पक्के माहिती असते. हे मात्र अजिबात आश्चर्य नाही.

In reply to by सुबोध खरे

(मिपावर) मुडदाच येऊन सांगतो तो कसा पडला ते ( फक्त त्या करता डु आय्डीचाच) आधार घेतो तीतके महत्वाचे नाही.

In reply to by नाखु

म्हंजे हे नक्क्क्क्की सिद्द जालं की मुडद्याला बोलतं करायला व्हायला त्याची मिपावर्ची डुआयडी पुरेशी हाय... प्लँचेटची गरज नाय, काय ? ;)

पुरस्कार परत करणार्‍यांविषयी आणखी थोडे खोदकाम केले तेव्हा पुढील गोष्टी सापडल्या: १. मंगलेश डबरालः हे पण अशोक वाजपेयींच्या टोळक्यातले असावेत असे म्हणायला वाव आहे. अशोक वाजपेयींनी पूर्वग्रह हे नियतकालिक कलाभवनमधून काढून घेऊन भारत भवनातर्फे प्रकाशित करायला प्रारंभ केला हे मागच्या प्रतिसादात लिहिलेलेच आहे. त्याच पूर्वग्रहचे मंगलेश डबराल हे उपसंपादक होते. ते नक्की कधी उपसंपादक होते ही माहिती शोधायचा बराच प्रयत्न केला. अजून तरी मिळालेली नाही. पण २०१५ च्या अजमेर लिटफेस्टमध्ये दोघेही अशोक वाजपेयी आणि मंगलेश डबराल हे डेलिगेट होते. मान्य आहे की एवढ्यावरून लगेच मंगलेश डबरालही अशोक वाजपेयींच्याच पंगतीतले आहेत हे सिध्द होत नसले तरी दोघेही एकाच संस्थेशी (भारत भवन) संलग्न असणे, दोघेही एकाच लिटफेस्टमध्ये जाणे आणि दोघांनीही एकाच वेळी आपले पुरस्कार एकाच कारणाने परत करणे यावरून ते दोघे एकाच पंगतीतले असावेत असे म्हणायला नक्कीच वाव आहे. २. सारा जोसेफः या तर आम आदमी पक्षाच्या केरळमधील नेत्या आहेत आणि त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये थ्रिसूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मोदी सरकारच्या कालावधीत पान जरी झाडावरून पडले तरी केजरीवालांना आणि आआपला त्यात मोदींचा हात दिसतो. त्यामुळे सारा जोसेफना गांभीर्याने घ्यायची आवश्यकता आहे असे अजिबात वाटत नाही. ३. गणेश देवी: यांच्या भाषा या एन.जी.ओ ला परदेशातून अनेक कोटी रूपये गेल्या काही वर्षांमध्ये मिळाले होते . मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर परदेशातून पैसे मिळत असलेल्या एन.जी.ओ वर कडक नजर ठेवण्यात येत आहे त्यामुळे पूर्वी कोटींमध्ये खेळणार्‍या या एन.जी.ओ ला २०१४-१५ मध्ये अवघे ३१ लाख रूपये मिळाले. आपल्या पोट्यापाण्यावर गदा आली तर माणूस पिसाळणार नाही का? गणेश देवी तसेच पिसाळलेले दिसत आहेत. ४. होमेन बोरगोहेनः हे सुध्दा करूणाधारा या एन.जी.ओ शी संलग्न आहेत. त्यामुळे पुरस्कार परत करण्यामागे गणेश देवींसारखेच कारण असेल का? मला माहित नाही. एक शक्यता मात्र व्यक्त करत आहे. असो. आणखी खोदाखोद करून नवी माहिती मिळाल्यास पोस्ट करेनच. हे सगळे बघता व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला वगैरे कारणे शुध्द बकवास आहेत. आणि यांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून मोदींशी अकाऊंट सेटल करायचे आहेत याची खात्री पटायला लागली आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

हे सगळे बघता व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला वगैरे कारणे शुध्द बकवास आहेत. आणि यांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून मोदींशी अकाऊंट सेटल करायचे आहेत याची खात्री पटायला लागली आहे.
+ १ मी आधीच लिहिले आहे की यांनी दिलेली कारणे बकवास आहेत. मोदी पंतप्रधान झालेले यांना पचविता आलेले नाही. त्यामुळे हा कांगावा सुरू आहे.

१९९५ महाराष्ट्रात सेना भाजप सरकार आल्यावर त्यावेळचे लोकसत्ता वगैरे वृत्तपत्र पाहिल्यास अशीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती. जणूकाही प्रत्येकजण दहशतीखाली असल्याचा देखावा निर्माण करण्यात आला होता. अर्थात ते सरकार पुढील निवडणुकीत त्यांच्या नाकर्तेपणामुळे पडले होते. इथे चुकी मोदींची आहे कारण त्यांच्याच पक्षाची 'पोपट' मंडळी सगळीकडे 'डराव-डराव' करीत सुटलेली आहेत. आता मोदिनीच पंतप्रधानाच्या पदास जागून या सगळ्यांना आवर घालणे गरजेचे आहे. आणि विरोधकांशीही संवाद साधण्याची घेण्याची गरज आहे, यात त्यांना काहीही कमीपणा येणार नाही उलट प्रतिमा उंचावेल.

In reply to by सतीश कुडतरकर

बरोब्बर बोललास रे सतीश. महेश शर्मा,सा़क्षी महाराज्,खट्टर ह्यांना दम द्यायची आवश्यकता आहे असे ह्यांचे मत. .कुलकर्णी ह्यांच्यावर शाई ओतल्यावर 'बरी अद्दल घडली पाकिस्तानला' म्हणणारा वर्ग आपल्याकडे आहे तसेच ह्या लोकांचाही एक चाहता वर्ग आहे पण त्या वर्गाच्या नादी लागले तर मोदी सरकारचे नुकसानच जास्त होणार आहे.