✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धरसोड

आ
आतिवास यांनी
गुरुवार, 10/15/2015 - 19:22  ·  लेख
लेख
आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात. आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते. आजोबा आले की आई मला काम सांगणार. पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची. हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत. “आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं. “ बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा. तेंव्हापासून चहा सोडला.” आजोबा म्हन्ले. भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल. कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा. आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग? असंल कायतरी. जौंदे. हेंनी चा सोडला, कापी पकाडली. येक सोडलं की दुसरं कायतरी पकडायचं. म्या असं काय केलं की आज्जी म्हन्ते “धरसोड”. --- (अवांतर - शशक स्पर्धेतल्या कथा आता वाचणार आहे.)

Book traversal links for धरसोड

  • ‹ शरयत
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
17758 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

खूप दिवसांनी आली आन्जी.

मधुरा देशपांडे
गुरुवार, 10/15/2015 - 19:36 नवीन
खूप दिवसांनी आली आन्जी. नेहमीप्रमाणेच गोड, निरागस आन्जीची कथा आवडली.
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/15/2015 - 23:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

:)

मदनबाण
गुरुवार, 10/15/2015 - 19:36 नवीन
:) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla
  • Log in or register to post comments

चांगली आहे.

जेपी
गुरुवार, 10/15/2015 - 19:41 नवीन
चांगली आहे. पुर्वीची कापी आठवली.
  • Log in or register to post comments

आन्जी इज बॅक!

बहुगुणी
गुरुवार, 10/15/2015 - 19:42 नवीन
ही शशकही आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त कथा

मित्रहो
गुरुवार, 10/15/2015 - 19:50 नवीन
आज्जीची गोष्ट बऱ्याच दिवसानंतर आली
  • Log in or register to post comments

:)

खेडूत
गुरुवार, 10/15/2015 - 19:53 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/15/2015 - 19:57 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments

आन्जी आली आन्जी आली.

प्यारे१
गुरुवार, 10/15/2015 - 19:58 नवीन
आन्जी आली आन्जी आली. कुडं गेलती बे हुम्ब????
  • Log in or register to post comments

:)

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 19:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments

छान आहे,आवडली.

नूतन सावंत
गुरुवार, 10/15/2015 - 20:01 नवीन
छान आहे,आवडली.
  • Log in or register to post comments

:) नेहमीप्रमाणेच मस्तं !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/15/2015 - 20:03 नवीन
:) नेहमीप्रमाणेच मस्तं ! आंजी म्होट्टी झाली की समजंल तिला. उलटसुलट करून त्याचं समर्थन करता आलं की त्याला “धरसोड” म्हणत नाहीत :)
  • Log in or register to post comments

+१

एस
गुरुवार, 10/15/2015 - 20:06 नवीन
आंजी परतल्याचं पाहून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१०.

पलाश
Fri, 10/16/2015 - 10:19 नवीन
+१०.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छान स्टाइल

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 10/15/2015 - 20:14 नवीन
छान स्टाइल
  • Log in or register to post comments

अरेव्वा!!

चांदणे संदीप
गुरुवार, 10/15/2015 - 22:55 नवीन
बऱ्याच दिवसांनी आन्जीला पाहून छान वाटले! अजूनही तिची निरीक्षणं चालू आहेत! आतिवासताई, खूप आवडली ही शतशब्दकथा! धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments

अरेव्वा!!

चांदणे संदीप
गुरुवार, 10/15/2015 - 22:56 नवीन
बऱ्याच दिवसांनी आन्जीला पाहून छान वाटले! अजूनही तिची निरीक्षणं चालू आहेत! आतिवासताई, खूप आवडली ही शतशब्दकथा! धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments

मस्त! आंजी स्मार्टए!

रातराणी
गुरुवार, 10/15/2015 - 23:34 नवीन
मस्त! आंजी स्मार्टए!
  • Log in or register to post comments

आन्जी आली, आन्जी रॉक्स !

स्रुजा
Fri, 10/16/2015 - 00:04 नवीन
आन्जी आली, आन्जी रॉक्स !
  • Log in or register to post comments

आजोबा बहुतेक बकरीचं दुध पीत

उगा काहितरीच
Fri, 10/16/2015 - 00:51 नवीन
आजोबा बहुतेक बकरीचं दुध पीत असावेत, तेही काळ्या !
  • Log in or register to post comments

मस्त शतशब्द कथा हो.. :)

सच्चिदानंद
Fri, 10/16/2015 - 01:54 नवीन
मस्त शतशब्द कथा हो.. :)
  • Log in or register to post comments

लय मस्त...

तर्राट जोकर
Fri, 10/16/2015 - 02:28 नवीन
लय मस्त... येक नमुना ऐसा भी: बाप मेल्यावर काहीतरी सोडायचे, म्हणून येका कारट्याने त्याला अजिबात आवडत नसलेली वांग्याची भाजी खायची सोडली....
  • Log in or register to post comments

शतशब्द कथा सुंदर

सौन्दर्य
Fri, 10/16/2015 - 03:02 नवीन
कथा छान लिहिलेय. आवडली.
  • Log in or register to post comments

वा! एकदम खुमासदार.

चतुरंग
Fri, 10/16/2015 - 07:13 नवीन
आंजी पुन्हा एकदा अवखळपणा करु लागली! :)
  • Log in or register to post comments

अंजी स्मार्ट आहे ,

मनीषा
Fri, 10/16/2015 - 07:54 नवीन
अंजी स्मार्ट आहे , तिचा प्रश्नं योग्यं आहे. अवांतर : कॉफीवाल्यांचं चहाशी इतकं काय वाकडं अस्तं देव जाणे.
  • Log in or register to post comments

अवांतराशी सहमत. "मी कॉफी घेत

आतिवास
Sat, 10/17/2015 - 10:41 नवीन
अवांतराशी सहमत. "मी कॉफी घेत नाही" असं चहा पिणारी व्यक्ती म्हणताना मी कधी ऐकलं नाही हे लक्षात आलं. पण कॉफीवाले मात्र अनेकदा चहा न घेणारे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

मस्त...

मुक्त विहारि
Fri, 10/16/2015 - 08:16 नवीन
आन्जी रॉक्स....
  • Log in or register to post comments

मस्त गोड शशक

अभिजितमोहोळकर
Fri, 10/16/2015 - 08:59 नवीन
आंजी इज ब्याक!!!
  • Log in or register to post comments

अांजी आली का! भारी लक्ष हिचं

अजया
Fri, 10/16/2015 - 10:26 नवीन
अांजी आली का! भारी लक्ष हिचं.डोक्यात चक्र सुरूच असतंय बयेच्या!
  • Log in or register to post comments

छोट्याशा आंजीच्या इवल्याशा

सस्नेह
Fri, 10/16/2015 - 10:34 नवीन
छोट्याशा आंजीच्या इवल्याशा कथा ! ...फार दिवसांनी वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments

कापी

नाव आडनाव
Fri, 10/16/2015 - 10:44 नवीन
कापी माझे आजोबा आठवले. ते काफी म्हणायचे. तेंव्हा काफीची वडी मिळायची. आजोबा घरी आले तर काफी दुकानातून मी आणायचो. मस्त लिहिता तुम्ही.
  • Log in or register to post comments

आंजीला भारी बाई उचापती..

पिशी अबोली
Fri, 10/16/2015 - 10:48 नवीन
आंजीला भारी बाई उचापती.. चक्रं आपली चालू डोक्यात.. :D
  • Log in or register to post comments

कंपनीत

नाखु
Fri, 10/16/2015 - 11:05 नवीन
आणि समाजात
उलटसुलट करून त्याचं समर्थन करता आलं की त्याला “धरसोड” म्हणत नाहीत
च एकच नाव आहे पॉलीसी ( जी स्थलकाल सापेक्ष बदलता येते). उदा विवाहीतांना लग्नागोदर अगदी नजरेसमोर नको असलेली वांग्याची भाजी लग्नानंतर प्रिय(?) वाटू शकते. कथा आवडली. पुलेप्र
  • Log in or register to post comments

ही ही ही...आंजी खूप आवडली.

पद्मावति
Fri, 10/16/2015 - 11:21 नवीन
ही ही ही...आंजी खूप आवडली. क्यूट आहे एकदम.
  • Log in or register to post comments

लई भारी.

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/16/2015 - 11:24 नवीन
अंजी रॉक्स पैजाराबुवा,
  • Log in or register to post comments

सुंदर

जातवेद
Fri, 10/16/2015 - 11:47 नवीन
:)
  • Log in or register to post comments

धरसोड.

द-बाहुबली
Fri, 10/16/2015 - 12:01 नवीन
:) मार्मीक. बाकी जे आंजीला कळतं ते आज्ज्याला कळलं नाही... ह्या आज्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांनीच आपल्या देशाची खरी वाट लावली.
  • Log in or register to post comments

लहान मुलीचं निरागस भावविश्व

अनिता ठाकूर
Fri, 10/16/2015 - 12:05 नवीन
लहान मुलीचं निरागस भावविश्व तुम्ही अगदी नेमक्या शब्दांत मांडता.खूप छान!!
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
Fri, 10/16/2015 - 14:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments

ए आंजाक्का!!!!!!!!!!!! :)

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/16/2015 - 15:01 नवीन
ए आंजाक्का!!!!!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments

भारी शशक. आंजी नेहमीप्रमाणेच

रेवती
Fri, 10/16/2015 - 19:03 नवीन
भारी शशक. आंजी नेहमीप्रमाणेच गोड आहे.
  • Log in or register to post comments

क्या बात ! एकदम आवडेश !

प्राची अश्विनी
Fri, 10/16/2015 - 19:20 नवीन
क्या बात ! एकदम आवडेश !
  • Log in or register to post comments

जादा दौलत होतं असल्यास

दिवाकर कुलकर्णी
Fri, 10/16/2015 - 21:11 नवीन
जादा दौलत होतं असल्यास सोडलेला बार धरलाच धरलाच पाहिजे सोडलेला गुटका आणून पुन्हा कैफासाठी बार भरलाच पाहिजे
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Fri, 10/16/2015 - 21:38 नवीन
मस्त आहे!
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
Sat, 10/17/2015 - 10:37 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाददात्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

चांगलीय

एक एकटा एकटाच
Sun, 10/18/2015 - 12:08 नवीन
चांगलीय
  • Log in or register to post comments

चांगली आहे.

अभिजीत अवलिया
Sun, 10/18/2015 - 19:05 नवीन
चांगली आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा