सर,
गांधीवादात भर घालणार्या साहित्यिकात आपण कलंत्रीसाहेबांचं नांव घ्यायचं विसरलेला दिसताहात!
असो...
तूर्तास, पिसाळलेला कुत्रा कुणाला चावू नये म्हणून त्याला अहिंसावाद कसा शिकवावा यावर विचार करतो आहे!
आपला,
तात्या गोडसे.
अरे हो की! आणि आपल्या पैकी बर्याच जणांचे दैवत असणार्या भाईकाकांचे गांधीजींविषयी विचार? ते देखिल राहिलेच की. बाकी लेख मात्र प्राध्यापकी थाटात विद्वत्तापुर्ण उतरला आहे.
असो..
पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही, त्याला आता अर्धी चड्डी घालुन संचलनाला नेतो आणि बौद्धीकाला बसवतो. चावायचा थांबतो का ते बघुया.
आपला,
कोलबेर गुरुजी
अरे हो की! आणि आपल्या पैकी बर्याच जणांचे दैवत असणार्या भाईकाकांचे गांधीजींविषयी विचार? ते देखिल राहिलेच की..
खरेच की. गांधीजींविषयीचे भाईकाकांचे विचार तात्याकडून ऐकायला आवडतील.
बाकी लेख मात्र प्राध्यापकी थाटात विद्वत्तापुर्ण उतरला आहे.
हं. लेखातून प्राध्यापकांचे शुद्धलेखनविषक विचार मात्र अगदी स्पष्ट झाले आहेत.
पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही, त्याला आता अर्धी चड्डी घालुन संचलनाला नेतो आणि बौद्धीकाला बसवतो. चावायचा थांबतो का ते बघुया.
चांगला उपाय आहे. करून बघायला हवा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
विषय शिर्षक वाचून मला एकदम का कोणास ठाऊक पण "जितना ही जाऊ मै दूर तुझसे, उतनी ही तू पास आए" या अचानक ओळी आठवल्या :-)
बाकी माहीतीपूर्ण लेख. यातील काही मला अनोळखी साहीत्य होते त्या मुळे माहीतीबद्दल धन्यवाद.
यातील नायक विनायकराव गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत.
कसे असणार पूर्ण गांधीवादी? नाव "विनायक" आडनाव "गांधी" :-)
गांधीवादी लोक कसे दुराग्रही असतात हेही त्यांनी दाखवून दिले आहे.
दुराग्रहाची मक्तेदारी काही केवळ गांधीवादींकडेच असते असे मानू नका! जसे एकट्या गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले नाही तसेच एकट्या गांधीवादाने दुराग्रही होता येते असे नाही. "ऑल रोड्स लीड टू रोम" - अर्थात जेंव्हा स्वतःचा अभ्यास, चिंतन, मनन,स्वाध्याय आणि सिंहावलोकन थांबून केवळ कुठल्यातरी विचाराने भारावण्यापेक्षा भारून जाणे होते तेंव्हा दुराग्रहीपणा आपसूक येतो.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांच्या 'कांचनमृग' पासून ते 'ययाती' पर्यंत गांधीवादाचा प्रभाव जाणवतो म्हणतात.
खांडेकरांनी "सोनेरी स्वप्ने भंगलेली" म्हणून (मला तरी वाटते) एक डिप्रेसिंग कादंबरी लिहीली होती ज्यात गांधीवाद्याची स्वप्ने सत्ताधार्यांनी गांधींचे नाव घेत कशी उध्वस्त केली हे स्वातंत्र्यसैनिकाच्या संदर्भातील कथानक होते.
बाकी आपण बरेच सांगितले तरी एक नाव राहीले असे वाटले ज्यांनी गांधीवादी साहीत्य लिहीले असावे (कथाकादंबर्यांच्या रुपात नाही) ते म्हणजे विनोबा भावे.
तसेच गांधींवर लिहीणार्यांसंदर्भात पण अजून लिहीता येईल. मधे गांधीवादी असलेल्या अंबरीश मिश्रा यांचे "गंगे मध्ये गगन वितळले" का असेच काही शिर्षक असलेले माहीतीपूर्ण पुस्तक वाचनात आले होते. त्यात म्हणल्याप्रमाणे गांधींकडे सुरवातीस काँग्रेसने दुर्लक्ष केले तेंव्हा गांधीजींनी स्वतःची चळवळ चालू केली. त्याला मिळणारी प्रसिद्धी पाहून आपोआप काँग्रेस मागे आली...
असो, लेख आवडला.
गांधीवाद हा एका कालावधी मध्येच समाजात रुजला,वाढला व संपला.
कारण तुम्ही वर दिलेच आहे.
त्यांचा स्वप्नाळू ध्येयवाद वास्तवाचे रुप लपवितो.
हे जसे सानेगुरुजीच्या बाबतीत सत्य होते तसे गांधीवादा बद्दलही म्हणता येईल.
अजुन एक मला प्रश्न पडला आहे जर आत्महत्या हे पाप असेल तर गांधीवादा मध्ये आमरण उपोषन करणे ही देखिल एकप्रकारे आत्महत्याच नव्हे का?तसेच यंत्राचा वापर ह्या विषयी गांधीजीचे विचार आजच्या काळात मान्य होणे शक्य नाही.
मराठीसाहित्यात गांधीजीचा प्रभाव तितकासा पडला नाही हे खरे आहे.पण मिपासाहित्यात गांधीजीचा खुपच प्रभाव पडला आहे , हे मान्य करावेच लागेल.
वेताळ
यातील नायक विनायकराव गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत.
हे वाक्य ''यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ... '' असे वाचावे काय?
'भेटेन नऊ महिन्यांनी' ही कविता फाशी जाणारा क्रांतिकारक म्हणत आहे वाटते.
-- लिखाळ.
हे वाक्य ''यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ... '' असे वाचावे काय?
हो, असेच वाचायला हवे. दुरुस्ती केली आहे. धन्यवाद !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. डॉ. बिरुटे साहेबांचे धन्यवाद कसे मानावे हे मला समजत नाही. मिपाच्या लोकांना आवडो अथवा न आवडो मी गांधीवादाचे डोस पाजले आहेच. त्याला चौकट देण्याचा सुजाण मान मात्र प्राध्यापक साहेबांना द्यायलाच हवा.
१. गांधीवादी विचाराच्या प्रचाराबरोबर त्यांच्या विरोधकाचेही साहित्याचा अभ्यास व्हायला हवा. उदा. सावरकरांचे साहित्य, गोपाल गोडसे यांचे गांधीहत्या आणि मी इत्यादी पुस्तके.
२. अनेक भाषेत पुस्तके मराठीत अनुवादीत होत असतात. प्यारेलाल यांचे गांधी एक महामानव हे पुस्तक प्रत्येकानेच वाचले पाहिजे.
३. गांधीवादी विचारावर अनेकांनी डॉक्टरेट केलेल्या आहेत. उदा. भटकळ यांनी गांधीचे समकालिन विरोधक यावर प्रबंध सादर केलेला आहे.
४. वर्तमानपत्रात, पुस्तकात प्रत्येक वर्षी गांधीवादाचा अन्वय नव्या पद्धतीने लावला जातो.
एकंदरीतच गांधीविचारावरचे साहित्य हे अफाट या पद्धतीनेच वर्णन करावे लागेल.
माझा दा. न. शिखरे आणि द. न. गोखले यांच्याबद्दल गोंधळ झाला होता. द. न. गोखले यांचेही गांधींवरचे पुस्तक आहे. ("शोध महामानवाचा").
झालेल्या गोंधळाबद्दल क्षमा.
प्रतिक्रिया
सर, गांधीवा
अरे हो की!
पिसाळलेल्
गांधीजींविषयीचे भाईकाकांचे विचार तात्याकडून ऐकायला आवडतील
फारच छान माहीती!
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो
छान लेख आहे
अजूनही
वाह वाह,
सर, आढावा
असेच वाचावे !
खुपच चांगली कल्पना.
दा न शिखरे
एक शंका
अम्म !
दा. न. शिखरे
धन्यवाद