Skip to main content

ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

लेखक गवि यांनी बुधवार, 28/01/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात. कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही. मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच. -सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी. -पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक AA With thanks from www.mahindracarsindia.com -भरपूर रफनेस असलेली थार -स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट -एक्सयूव्ही५००चा अ‍ॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो) -जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं. -आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा -फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स. AAA with thanks from i.ndtvimg.com ... ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं. या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

वाचने 164365
प्रतिक्रिया 281

प्रतिक्रिया

एअरपोर्टवर डिसप्लेला ठेवलेली टीयूवी३०० प्रतेक्ष पाहिली. घाईत असूनही घाई दूर ठेवून दरवाजे वगैरे उघडून पाहिले. मागच्या सीट्स जंपसीट्स आहेत. लुक ओव्हरऑल चांगला आहे. फिनिशिंग उत्तम. समोरचं ग्रिल पाहून जीप चेरोकी (की शेरोकी.. चूभूदेघे) ची आठवण होते. (जशी पूर्वी मरिना = गरिबाची सीआरव्ही, तशी टीयूव्ही३०० गरीबाची चेरोकी?! ;) ) जीप चेरोकी: J With thanks from Jeep.com टीयूव्ही: A With thanks from Mahindratuv300.com

फ़ोर्स गोरखा बद्दल काही रिव्यु आहेत का कोणाचे? मला फ़ोर्स चे डीलर नेटवर्क कसे आहे ते माहिती नाही तस्मात् त्यांची सर्विस कशी असेल कल्पना नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गोरखा चांगली गाडी आहे. मी एकदा चालवली आहे चांगली ३० एक किमी. टु मच पॉवर अंडर लाईट चासीज एवढं म्हणेन. ऑफरोड ला चांगली आहे. पण इंटेरिअर एवढं विशेष आवडलं नाही. शिवाय मी चालवलेली गाडी हार्ड टॉप होती. हि गाडी वरती टॉप नसताना अजुन भारी दिसेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तिचं साइलेंसर साइड न बाहेर काढलेले आहे उभे ते लैच भारी वाटते एकदम हमर स्टाइल

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हमर वरुनचं ढापलयं डिझाईन ते. अर्थात ६२०० सी.सी. चं इंजिन सोडुन =))!!!

टीयुव्ही३०० ची टेस्ट ड्राइव्ह काही गेल्या वीकेंडला घेता आली नाही. कुटुंबाला घेऊन खराडी-पनवेल-डोंबिवली-निगडी-चाकण-सुपा-अहमदनगर-जामगावचा भुईकोट किल्ला-भाळवणी-पारनेर-सुपा-पुणे असा ६००किमी मॅरेथॉन ड्राइव्ह झाला. एक्सयुव्ही बिहेव्ड वेल. एक्सप्रेस हायवेला नॉर्मल क्रुझिंग स्पीड १२०, फास्ट क्रुझिंग स्पीड १३०, हायेस्ट स्पीड १६० (खालापूर टोल नंतर मुंबईच्या दिशेने आणि उर्से टोलनाक्यानंतर पुण्याच्या दिशेने फक्त सरळ रस्ता असतानाच). नॉर्मल क्रुझिंग करताना त्या १२० च्या वेगातही आतमध्ये बॉडी रोल न होता व्यवस्थित आणि कॉन्फिडन्ट वळणे घेता आली. १३०किमी/तासच्या पुढे मात्र केबिन नॉइज जरा वाढतो. पण १२० पर्यंत स्पीडोमीटरकडे पाहिल्याशिवाय कळतही नाही की आपण त्या वेगात चाललो आहोत. त्यामुळे जरा cautiously चालवावी लागतेय.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

प्लीज १२०+ कि.मी. च्या वरील वेग टाळावा. भारतातील एकही रस्ता ह्या वेगासाठी तांत्रिकरित्या योग्य नाही. तसेच अश्या वेगाने गाडी चालवल्याचा उल्लेख आणि फोटोही सार्वजनिक करु नयेत.

In reply to by गुंड्या

अ‍ॅग्रीड माझ्यामते भारतातील रस्तांवर जास्तीत जास्त स्पीडलिमिट ८० किमी प्रति तास आहे ! जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा !

In reply to by प्रसाद गोडबोले

८० किमी प्रति तास या वेगासाठी रस्ते , वळणे, उतार बनवलेले असतात तिथे जास्त वेग धोकादायक ठरू शकतो

In reply to by कपिलमुनी

फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन करत नाही. परंतु सुरक्षित ड्राइव्हिंगचे नक्की करेन. पण एक्सप्रेस-वेवर अगदी वीसचाकी ट्रेलर सुद्धा ८० हून अधिक वेगाने चालतो. त्याला आपल्याकडे इलाज नाही. मी मधल्या लेनमधून ८० (किंवा कमी) वेगाने जात राहिलो तर ट्रेलर माझ्यावरुन घालतील. किंबहुना इथल्या कुठल्या सदस्याने ऐंशीहून अधिक वेगाने वाहन चालवले नाही काय? अवांतर: आपल्याकडील वेगमर्यादा या इसवी सन १८५७ च्या काळातील आहेत. ज्यावेळी गाड्यांमध्ये लहान क्षमतेची इंजिने होती, एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉवर ब्रेक्स, एअरबॅग अशा प्रगत तंत्रज्ञानयुक्त सुविधा नव्हत्या त्यावेळी मोटर वाहन आणि हायवेचे नियम बनवले गेले आहेत. त्यात कालपरत्वे सुधारणा होणे अत्यावश्यक आहे. सध्या एक्सप्रेस हायवेवर वेगमर्यादा १२० करावी की १०० यावर सरकार आणि न्हाई पातळीवर चर्चाही सुरु आहे. अवावांतर: लेह-कन्याकुमारी ७८ तासांत.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

अहो पण आपल्याकडे लोकांना ड्रायव्हिंग सेंस नाही त्याचे काय? ७०-८०+ च्या स्पीडने XUV/Fortuner सारखे रणगाडे zig-zag रिक्शाचालवल्यासारखे चालवताना बघितले आहेत....ते सुध्धा आजूबाजूच्या वाहनांपासून फक्त २-३ फूट अंतर ठेउन

In reply to by वेल्लाभट

असे नस्ते....सगळ्या टैपची लोकं बघितली आहेत...अगदी सुटाबुटातला डस्टरवाला हॉर्न न देता डावीकडून झूमकरून ओव्हरटेक करून गेलेला आहे

In reply to by भटकंती अनलिमिटेड

अवावांतर: लेह-कन्याकुमारी ७८ तासांत.
अवाव्वा ! हे भारी आहे.... वाचायला हवं

In reply to by भटकंती अनलिमिटेड

ही पोस्ट आपल्याला उद्देशून नाही, हे आधीच स्पष्ट करू इच्छितो. गाड्यांमध्ये मोठ्या क्षमतेची इंजिने आली, एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉवर ब्रेक्स, एअरबॅग अशा प्रगत तंत्रज्ञानयुक्त सुविधा आल्या, तरीही भारतात, अपघातांचे प्रमाण काही कमी होत नाहीये ;) कारण अर्थात वेगळीच आहेत, हे मान्य आहेच. उलट भारतात तरी रेकलेस ड्रायव्हिंग फार वाढत चालले आहे. गाडी लोडेड आहे, टेक्निकली सुपिरिअर आहे, मग कशाला काळजी करा? ही भावना असू शकेल काय? पॉवर स्टेअरिंग आले आणि कट मारण्याचे प्रमाण वाढले. मी आत्तापर्यंत गाडीत एबीएस, ईबीडी नाहीयेत म्हणून सांभाळून चालवायचो. पण जर मी मोठी गाडी घेतली आणि अधिक स्पीडवर चालवायला सुरुवात केली तर ते कधी रेकलेस ड्रायव्हिंगकडे झुकेल सांगता येत नाही. लोकं सेफ्टी फीचर्सना गृहीत धरून अधिक फास्ट चालवायला लागलीत! एके ठिकाणी असे दावे करण्यास सपोर्टिंग मटेरीअल सापडले. टेक्निकली लोडेड कार्स वाले लोकं रेकलेस ड्रायव्हिंगकडे झुकू शकतात. http://www.esafety-effects-database.org/applications_16.html आल इन आल, स्पीड थ्रील्स, बट इट किल्स!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

(मिपाच्या पोस्ट कुणालाच उद्देशून नसतात हे गृहितच आहे. उलट सारे जण मिळून साधक बाधक चर्चा करत आहेत.) एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉयवर ब्रेक्स, एअरबॅग यांमुळे रेकलेस ड्रायविंग वाढले का? मला तरी असे वाटत नाही. उलट भारतात फारतर ५-१०% कार्सना (अंदाज आपला) हे फीचर्स असतील (पॉवर स्टिअयरिंग सोडून). उलट माझा अनुभव असा आहे की असे फीचर्स नसलेलेच बहुतेक ड्रायव्हर्स रेकलेस चालवतात. उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट बसेस, खाजगी बस, वडाप, जीप, स्कूल व्हॅन्स, इ. किंबहुना रेकलेस ड्रायव्हिंग हा गाडी कुठल्या परिस्थितीत शिकलात आणि शिकवायला कोण होतं यावरही थोडेबहुत अवलंबून असते. रेकलेस ड्रायव्हिंग हा गाडीपेक्षा मानसिकतेचा भाग अधिक आहे. सीटबेल्ट पोलिस पकडतील म्हणून लावणारा आणि सीटबेल्ट आपल्यासाठी आहेत म्हणून लावणारा यात जो फरक आहे अगदी तोच. अजूनही आपल्याकडे चार पैसे वाचतात ना म्हणून सेफ्टी फीचर्स नसलेली कार विकत घेतली जाते. अगदी मीही आयुष्यातल्या पहिल्या कारच्या वेळी तेच केले. कारण तेव्हा फक्त पावसापाण्यापासून वाचत शरातल्या शहरात फिरणे, कधीतरी फोटोशूट्ला आणि नियमित ऑफिसला जाणे एवढाच उद्देश होता. परंतु जसा जसा मी आत्मविश्वासाने गाडी चालवायला शिकलो, प्रवासाचे पल्ले वाढले, दिवसाला सहाशे-सातशे किलोमीटरचे काही वाटेनासे झाले, गाडीचा वेग वाढला आणि विशेष म्हणजे लग्न झाले, बाप झालो त्यामुळे मला माझ्यापलीकडे जाऊन आणखी काही प्रियजनांचा विचार करण्याची गरज वाटू लागली. त्यामुळे अपग्रेड करताना साहजिकच मी सेफ्टी फीचर्स असलेलीच गाडी पाहत गेलो. राहिला प्रश्न वेगमर्यादेचा, तर कुठल्याच रस्त्यावरील वेगमर्यादा प्रॅक्टिकल नसावी. हे नियम १९८९ मध्ये बनवले आहेत. पुण्यातल्या बहुतेक रस्त्यांवर ती चारचाकी वाहनाला ३० आणि दुचाकीला ४० अशी आहे. सगळ्या महामार्गांवर ती ८० आहे आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना अगदी मोटरसायकल, कार, मल्टीऍक्सल ट्रेलर, बस सार्‍यांना ती सारखीच आहे. जर खरेच ती तशी अत्यावश्यक असती तर सरकारने वाहननिर्मिती करणार्‍या कंपन्यांना इसीयू प्रोग्राम करुन ती ८० ला स्पीडलॉक करा असा आदेश देणे जास्त अवघड नाहीच. परंतु त्यांनाही माहीत आहे की बदलत्या तंत्रज्ञानाच्या (वाहने आणि रस्ते दोन्ही बाबतीत) दृष्टीने हे प्रॅक्टिकल नाही. आणि ते बदलण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेतच. ऑल इन ऑल, ड्राइव्ह फास्ट, नॉट रॅश!

In reply to by भटकंती अनलिमिटेड

उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट बसेस, खाजगी बस, वडाप, जीप, स्कूल व्हॅन्स, इ.
यात ऑटोरिक्षा कशी विसरलात =))
सगळ्या महामार्गांवर ती ८० आहे आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना अगदी मोटरसायकल, कार, मल्टीऍक्सल ट्रेलर, बस सार्‍यांना ती सारखीच आहे. जर खरेच ती तशी अत्यावश्यक असती तर सरकारने वाहननिर्मिती करणार्‍या कंपन्यांना इसीयू प्रोग्राम करुन ती ८० ला स्पीडलॉक करा असा आदेश देणे जास्त अवघड नाहीच.
खिखिखि....इतके सरकार विचार करते???

In reply to by टवाळ कार्टा

नक्कीच करु शकते. सरकारकडे ARAI सारख्या पारंगत तंत्रज्ञ असलेल्या नियामक संस्था आहेत. नुकत्यात १२५सीसी वरील सर्व बाईक्सना २०१६ पासून ABS सक्तीचे करणार आहेत अशी बातमी वाचनात आली.

In reply to by टवाळ कार्टा

नियम झाला आहे हे सांगण्याचा हेतू नसून, सरकार तांत्रिक विचार करते हे दाखवण्याचा आहे.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

ऑल इन ऑल, ड्राइव्ह फास्ट, नॉट रॅश! >> +१००. बहुतांशी सहमत. आपल्याकडले स्पीड लिमीटस हे एक घोळ असतात त्यात वाद नाही. शहरी वाहतुकीत तर कितीही नियम लावलेत तरी सुधारणा नाहीच :D सेफ्टी फर्स्ट! आपल्या हातात तेवढेच आहे.

In reply to by वेल्लाभट

१२०ला टर्न दोनच ठिकाणी आहे. एकदा घाट चढताना अमृतांजन पुलाच्या एक किमी आधी आणि दुसरा सिंहगड इन्स्टिट्यूटचा टर्न. दोन्ही ठिकाणी बर्‍यापैकी रस्ता मोठा आणि मोकळा असतो. अर्थात फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन करत नाही. पण मला गाडीचे (आणि माझे) लिमिट टेस्ट करण्याचे असल्याकारणे कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली.

आज एक मॉडीफाय केलेली थार बघितली. अलॉय व्हील्स ला बॉटम आउटवर्ड कँबरिंग करुन घेतलेलं आणि वरच्या आडव्या पट्टीवर ६ फॉग लँप्स लावलेले. बॉडीवर दबा धरुन बसलेल्या वाघाचं मस्तं आर्टवर्क केलेलं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

थर आणि जिप्सि मॉडिफाय करण्यासाठी एक नंबर आहेत. एअर इनटेक, एक्झॉस्ट, विंच, रोल केज्...बरंच काही करता येतं!

In reply to by गुंड्या

थार आणि जिप्सीसारख्या गाड्यांचं एक कॉमन वैशिष्ट्य असं आहे की बेसिक लॅडर ऑन फ्रेम चॅसीवर इंजिन आणि ट्रान्समिशन मॉड्युल माऊंट करुन त्यांचं लग्न लावलं आहे. सस्पेन्शनदेखील अगदी बेसिक प्रकारचे. प्रत्येक गोष्ट सुटसुटीतरीत्या जोडली गेल्याने त्याचे मॉडिफिकेशनदेखील सहज साध्य असते. म्हणूनच मॉडिफाय करणार्‍या जमातीच्या त्या आवडत्या गाड्या आहेत. दुचाकींमध्ये तशीच रचना रॉयल एन्फिल्डची आहे.

खरच अफाट आणि अचंबित करणारी माहिती आहे तुमच्या सर्वांकडे ... सलाम .... मला गाड्यांमधले काडीचही ज्ञान नाही तरीपण सगळी माहिती वाचून माझाकडेही एसयुवि असावी असं वाटायला लागलंय. माझाकडे wagonR आहे १५ वर्षापूर्वीची. कंटाळा आलाय गाडी चालवून असं नाही तर नवीन टेक्नोलोजी असलेली गाडी हवी म्हणून एसयुवि घ्यायचा विचार पक्का झालाय. आधी मारुतीची ertiga घ्यायचा विचार पक्का झाला होता पण नवीन आलेली महिंद्राची TUV ३०० ने परत विचार करायला सुरुवात केलीये. माझी गाडीबद्दल फार काही अपेक्षा नाहीयेत . मला फमिली कार घ्यायची इच्छा आहे तरी तुमच्या सारख्या जाणकारांकडून योग्य माहिती मिळाली तर आपला आयुष्यभर आभारी असेन.....

In reply to by अ.रा.

आपली फॅमिली कार ही संज्ञा अधिक स्पष्ट करावी. किती लोक, कुठल्या रस्त्यांवर प्रवास, गाडीचा मुख्य उपयोग काय (requirements) आणि काही प्रसंगी (occasional) उपयोग काय आहे हे सारे लक्षात घेऊन निर्णय घ्या. शुभेच्छा!

In reply to by भटकंती अनलिमिटेड

अगदी बरोबर! पण कल्ट कार्स आणि बाइक्स च्या बाबतीत ही गोळाबेरीज कधीकधी लागू पडेलच असं नाही ;). उदा. मी सफारी का घेतली? उत्तर - कारण मला सफारी घ्यायची होती !( मायलेज, सर्विस,प्रॉब्लेम गेलं उडत!):)

फॅमिली कार म्हणजे ६ ते ७ लोक व्यवस्थित बसू शकतील अशी गाडी. त्या दृष्टीनेच मारुती ertiga आणि TUV ३०० ची निवड केलीये. तशी गाडी फक्त मी फिरण्यासाठीच जास्त वापरतो. त्यातल्या त्यात कोंकण जास्त. कोंकणात जाणारे सगळेच घाट रस्ते तसे खराबच असतात. (तसे सगळेच रस्ते खराब असतात हि गोष्ट वेगळी सांगायला नको) असो... गाडी जास्त specious हवी. आणि महत्वाचे म्हणजे low maintenance . मारुतीच्या गाड्यांना maintenance तसा कमी आहे पण महिंद्राच्या गाड्यांना माहित नाही.

लो मेंटेनन्स आणि सहा सात लोकांसाठी स्पेशियस अशा सध्या XUV5OO आणि इनोव्हा या दोन गाड्या आहेत. अर्टिगा, मोबिलिओ फारच पाच लोकांना बसवूनदेखील फारच अंडरपॉवर्ड वाटली, मागील दोन सीट म्हणजे फक्त नावापुरते आहेत. आजकाल महिंद्रा/टोयोटा कमीत कमी तीन वर्षांची वॉरंटी देत असल्याने मेंटेनन्सची काळजी करु नका. एक सर्व्हिसिंग साधारण ५०००/- हा कुठल्याही गाडीचा खर्च असतोच. शिवाय टोयोटाचे इंजिन्स रॉकसॉलिड असतात असे म्हणतात. मी स्वतः २-२ लाख किमी रनिंग झालेल्या इनोव्हा पाहिल्या आहेत. तसा बजेट हाही एक मुद्दा असतोच (म्हणजे निदान माझा तरी होता).

सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच असतो. माझं बजेट ८ लाखापर्यंत आहे. आणि त्यामुळेच XUV5OO आणि इनोव्हाचा नाद तिथेच सोडला. Renault ची लोद्ग्य, मोबिलिओ, फोर्ड एकोस्पोर्ट यांचा पण विचार केला तरी सगळ्यात जास्त TUV ३०० आणि अर्टिगाच अगदी योग्य वाटतीये. पण त्याचे फीचर्स आणि अन्य तांत्रिक गोष्टींची माहिती हवी आहे. किंवा अन्य काही मोडेल्स तुम्हाला माहिती असल्यास जरूर सुचवा. धन्यवाद..

In reply to by अ.रा.

बजेट थोडं वाढवता येणार असेल तर टाटा आरिया पण चांगला पर्याय आहे. मस्त टॉर्कि वॅरिकॉर इंजिन आहे त्यामुळं घाट वगैरे साठी उत्तम!

In reply to by अ.रा.

फोर्ड इकोस्पोर्ट ही पाच सीटर गाडी आहे. थोडक्यात सांगायचं तर स्मॉल कार ऑन स्टिरॉइड्स. Entusiastic Driver ही आपली स्वतःची ओळख नसेल तर अर्टिगा, मोबिलिओ या गाड्यांचा विचार करावा. पण पॉवर वगैरे हवे असेल तर ही मॉडेल्स डोक्यातून काढून टाका. रेनॉ लॉजीचे इंटिरियर मार खाते. सद्यस्थितीत स्कॉर्पिओ एस-४ आणि पुढचे व्हेरियंट (थोडे बजेट स्ट्रेच करुन), बोलेरो आणि टीयुव्ही३०० हे पर्याय आपल्यासमोर आहेत.

सध्या तरी टूV३०० ची comprehensive १०किमीची टेस्ट ड्राइव्ह घेऊन या. त्यातले काय काय आवडते काय काय नाही? लूक्स, फील, बाकी फीचर्स याची यादी करा. आपल्या रिक्वायरमेंटचे बेंचमार्किंग करा. आणि त्याच्या अगेन्स्ट बाकी गाड्या टेस्ट ड्राइव्ह घेऊन तुलना करा. तुमचे उत्तर आपोआपच सापडेल.

आजच येताना दोन टीयुव्ही ३०० बघितल्या ...बॉक्सी दिसते पण हमर टैप...दणदणीत रोड प्रेझेंस आहे लाल कलर मस्त दिसतो पण पांढरा फक्त कॉर्पियोवाल्या गुंठामंत्र्यांना आवडेल

In reply to by टवाळ कार्टा

आता तुझा काही खरा नै . ३-४ पांढर्‍या कार्पिओ तुझ्या बिल्डिगचा गेट तोडून आत येणार आणि त्यातून गुंठा मंत्री उतरणार

गेल्या सप्ताहांती अस्मादिकांनी नदी आणि आजूबाजूच्या खडकावर XUV5OOसह मॉडरेट ऑफरोडिंगची ट्रायल घेतली. अधिक विस्तृत व्हिडिओ लवकरच येईल. तत्पूर्वी ही मोबाईल क्लिप. https://www.facebook.com/100008168100113/videos/1676258549323066/

आजच महिंद्राची रोड टेस्टला आलेली गाडी बघितली. सेल फोन काढुन फोटो काढेपर्यंत पुढे निघुन गेली होती... बहुदा TUV 500 असावी. कारण गाडी आकाराने xuv 500 आणि TUV 300 च्यामधली वाटत होती, आणि उजव्या बाजुला मागच्या खिडकिच्या खाली TX-500 लिहिले होते.

TUV 300 mHAWK100 सध्या 100 bhp पॉवर देते असा वाचले आहे . इथे कोणाला या गाडीचा अनुभव आहे का ?

6 वर्ष बोलेरो वापरून समाधानी होतो , हा धागा वाचून हृदयात बारीकशी कळ सुरु झालीये ..... पण तरीही महिंद्र च ... ( आता TUV ३०० वापरतोय )