✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

ग
गवि यांनी
Wed, 01/28/2015 - 16:08  ·  लेख
लेख
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात. कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही. मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच. -सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी. -पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक AA With thanks from www.mahindracarsindia.com -भरपूर रफनेस असलेली थार -स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट -एक्सयूव्ही५००चा अ‍ॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो) -जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं. -आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा -फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स. AAA with thanks from i.ndtvimg.com ... ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं. या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
163907 वाचन

💬 प्रतिसाद (281)

प्रतिक्रिया

आपली फॅमिली कार ही संज्ञा

भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 13:33 नवीन
आपली फॅमिली कार ही संज्ञा अधिक स्पष्ट करावी. किती लोक, कुठल्या रस्त्यांवर प्रवास, गाडीचा मुख्य उपयोग काय (requirements) आणि काही प्रसंगी (occasional) उपयोग काय आहे हे सारे लक्षात घेऊन निर्णय घ्या. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अ.रा.

अगदी बरोबर!

गुंड्या
Fri, 10/09/2015 - 14:03 नवीन
अगदी बरोबर! पण कल्ट कार्स आणि बाइक्स च्या बाबतीत ही गोळाबेरीज कधीकधी लागू पडेलच असं नाही ;). उदा. मी सफारी का घेतली? उत्तर - कारण मला सफारी घ्यायची होती !( मायलेज, सर्विस,प्रॉब्लेम गेलं उडत!):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

तसंच काहीसं आमचं रॉयल

भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 16:54 नवीन
तसंच काहीसं आमचं रॉयल एम्फिल्डबाबत झालं. प्युअर कल्ट! brought with heart over brain!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंड्या

मला झेनॉन घेउन मॉडिफाय करायची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/09/2015 - 13:26 नवीन
मला झेनॉन घेउन मॉडिफाय करायची इच्छा आहे. फोर्ड-३५० च्या स्टायलिंग मधे.
  • Log in or register to post comments

यकदम सेम

वेल्लाभट
Fri, 10/09/2015 - 16:34 नवीन
दे टाळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

फॅमिली कार म्हणजे .....

अ.रा.
Fri, 10/09/2015 - 13:45 नवीन
फॅमिली कार म्हणजे ६ ते ७ लोक व्यवस्थित बसू शकतील अशी गाडी. त्या दृष्टीनेच मारुती ertiga आणि TUV ३०० ची निवड केलीये. तशी गाडी फक्त मी फिरण्यासाठीच जास्त वापरतो. त्यातल्या त्यात कोंकण जास्त. कोंकणात जाणारे सगळेच घाट रस्ते तसे खराबच असतात. (तसे सगळेच रस्ते खराब असतात हि गोष्ट वेगळी सांगायला नको) असो... गाडी जास्त specious हवी. आणि महत्वाचे म्हणजे low maintenance . मारुतीच्या गाड्यांना maintenance तसा कमी आहे पण महिंद्राच्या गाड्यांना माहित नाही.
  • Log in or register to post comments

लो मेंटेनन्स आणि सहा सात

भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 14:08 नवीन
लो मेंटेनन्स आणि सहा सात लोकांसाठी स्पेशियस अशा सध्या XUV5OO आणि इनोव्हा या दोन गाड्या आहेत. अर्टिगा, मोबिलिओ फारच पाच लोकांना बसवूनदेखील फारच अंडरपॉवर्ड वाटली, मागील दोन सीट म्हणजे फक्त नावापुरते आहेत. आजकाल महिंद्रा/टोयोटा कमीत कमी तीन वर्षांची वॉरंटी देत असल्याने मेंटेनन्सची काळजी करु नका. एक सर्व्हिसिंग साधारण ५०००/- हा कुठल्याही गाडीचा खर्च असतोच. शिवाय टोयोटाचे इंजिन्स रॉकसॉलिड असतात असे म्हणतात. मी स्वतः २-२ लाख किमी रनिंग झालेल्या इनोव्हा पाहिल्या आहेत. तसा बजेट हाही एक मुद्दा असतोच (म्हणजे निदान माझा तरी होता).
  • Log in or register to post comments

बजेट...

अ.रा.
Fri, 10/09/2015 - 14:36 नवीन
सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच असतो. माझं बजेट ८ लाखापर्यंत आहे. आणि त्यामुळेच XUV5OO आणि इनोव्हाचा नाद तिथेच सोडला. Renault ची लोद्ग्य, मोबिलिओ, फोर्ड एकोस्पोर्ट यांचा पण विचार केला तरी सगळ्यात जास्त TUV ३०० आणि अर्टिगाच अगदी योग्य वाटतीये. पण त्याचे फीचर्स आणि अन्य तांत्रिक गोष्टींची माहिती हवी आहे. किंवा अन्य काही मोडेल्स तुम्हाला माहिती असल्यास जरूर सुचवा. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

बजेट थोडं वाढवता येणार असेल

गुंड्या
Fri, 10/09/2015 - 17:32 नवीन
बजेट थोडं वाढवता येणार असेल तर टाटा आरिया पण चांगला पर्याय आहे. मस्त टॉर्कि वॅरिकॉर इंजिन आहे त्यामुळं घाट वगैरे साठी उत्तम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अ.रा.

फोर्ड इकोस्पोर्ट ही पाच सीटर

भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 18:57 नवीन
फोर्ड इकोस्पोर्ट ही पाच सीटर गाडी आहे. थोडक्यात सांगायचं तर स्मॉल कार ऑन स्टिरॉइड्स. Entusiastic Driver ही आपली स्वतःची ओळख नसेल तर अर्टिगा, मोबिलिओ या गाड्यांचा विचार करावा. पण पॉवर वगैरे हवे असेल तर ही मॉडेल्स डोक्यातून काढून टाका. रेनॉ लॉजीचे इंटिरियर मार खाते. सद्यस्थितीत स्कॉर्पिओ एस-४ आणि पुढचे व्हेरियंट (थोडे बजेट स्ट्रेच करुन), बोलेरो आणि टीयुव्ही३०० हे पर्याय आपल्यासमोर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अ.रा.

सध्या तरी टूV३०० ची

भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 14:54 नवीन
सध्या तरी टूV३०० ची comprehensive १०किमीची टेस्ट ड्राइव्ह घेऊन या. त्यातले काय काय आवडते काय काय नाही? लूक्स, फील, बाकी फीचर्स याची यादी करा. आपल्या रिक्वायरमेंटचे बेंचमार्किंग करा. आणि त्याच्या अगेन्स्ट बाकी गाड्या टेस्ट ड्राइव्ह घेऊन तुलना करा. तुमचे उत्तर आपोआपच सापडेल.
  • Log in or register to post comments

आजच येताना दोन टीयुव्ही ३००

टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 19:51 नवीन
आजच येताना दोन टीयुव्ही ३०० बघितल्या ...बॉक्सी दिसते पण हमर टैप...दणदणीत रोड प्रेझेंस आहे लाल कलर मस्त दिसतो पण पांढरा फक्त कॉर्पियोवाल्या गुंठामंत्र्यांना आवडेल
  • Log in or register to post comments

टक्या

आदिजोशी
Tue, 10/13/2015 - 15:13 नवीन
कॉर्पिओला नाव ठेवायचं काम नाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तो तुम्चा समज आहे

टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 15:19 नवीन
तो तुम्चा समज आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

टका

कपिलमुनी
Tue, 10/13/2015 - 16:31 नवीन
आता तुझा काही खरा नै . ३-४ पांढर्‍या कार्पिओ तुझ्या बिल्डिगचा गेट तोडून आत येणार आणि त्यातून गुंठा मंत्री उतरणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पण मी कॉर्पियोला काही

टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 16:49 नवीन
पण मी कॉर्पियोला काही म्हणालोच्च नैय्यै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ऑफरोड ट्रायल.

भटकंती अनलिमिटेड
Wed, 10/14/2015 - 08:57 नवीन
गेल्या सप्ताहांती अस्मादिकांनी नदी आणि आजूबाजूच्या खडकावर XUV5OOसह मॉडरेट ऑफरोडिंगची ट्रायल घेतली. अधिक विस्तृत व्हिडिओ लवकरच येईल. तत्पूर्वी ही मोबाईल क्लिप. https://www.facebook.com/100008168100113/videos/1676258549323066/
  • Log in or register to post comments

महिन्द्राची नवीन गाडी बघितली

भुमन्यु
Wed, 10/14/2015 - 11:56 नवीन
आजच महिंद्राची रोड टेस्टला आलेली गाडी बघितली. सेल फोन काढुन फोटो काढेपर्यंत पुढे निघुन गेली होती... बहुदा TUV 500 असावी. कारण गाडी आकाराने xuv 500 आणि TUV 300 च्यामधली वाटत होती, आणि उजव्या बाजुला मागच्या खिडकिच्या खाली TX-500 लिहिले होते.
  • Log in or register to post comments

आकार बर्‍यापैकी TUV 300 सारखाच होता.

भुमन्यु
Wed, 10/14/2015 - 11:59 नवीन
शेप बर्‍यापैकी TUV 300 सारखाच होता फक्त साईझ मोठी होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु

ही असावी.

भटकंती अनलिमिटेड
Wed, 10/14/2015 - 12:09 नवीन
ही असावी. http://motoroctane.com/news/17227-mahindra-tuv500-coming-in-2017-exclusive
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु

हो हीच होती

भुमन्यु
Wed, 10/14/2015 - 14:40 नवीन
हो अशीच होती....फक्त काळा कपडा नव्हता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

टियुव्हि ३ओ ओ...

५० फक्त
Sun, 10/18/2015 - 12:33 नवीन
कुणी टेस्ट ड्राइव्ह केली आहे का....
  • Log in or register to post comments

महिंद्रा केयुवी 100 कशी आहे

नाना स्कॉच
Sat, 03/19/2016 - 17:56 नवीन
महिंद्रा केयुवी 100 कशी आहे कोणी मार्गदर्शन करू शकेल का???
  • Log in or register to post comments

हा धागा ऑफबीट आणि ऑफरोड

भटकंती अनलिमिटेड
Wed, 04/13/2016 - 07:28 नवीन
हा धागा ऑफबीट आणि ऑफरोड वाहनांचा असल्याने KUVसाठी वेगळा धागा असावा :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

वा मजा आ गया वाचून. मस्त

विजुभाऊ
Fri, 02/23/2018 - 12:42 नवीन
वा मजा आ गया वाचून. मस्त माहिती मिळाली
  • Log in or register to post comments

TUV 300

कपिलमुनी
Fri, 02/23/2018 - 13:29 नवीन
TUV 300 mHAWK100 सध्या 100 bhp पॉवर देते असा वाचले आहे . इथे कोणाला या गाडीचा अनुभव आहे का ?
  • Log in or register to post comments

ती येतेय

जेम्स वांड
Wed, 04/18/2018 - 09:51 नवीन
Image removed. जिप्सी रिप्लेसमेंट असणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही जिमनी
  • Log in or register to post comments

बोलेरो

अपश्चिम
Wed, 04/25/2018 - 19:01 नवीन
6 वर्ष बोलेरो वापरून समाधानी होतो , हा धागा वाचून हृदयात बारीकशी कळ सुरु झालीये ..... पण तरीही महिंद्र च ... ( आता TUV ३०० वापरतोय )
  • Log in or register to post comments

टाटा सि‌एरा!

गुंड्या
Fri, 02/07/2020 - 20:29 नवीन
टाटा सिएरा परत येणार! अर्थात नवीन डिझाईन आहे पण तरीही लेगसी चालू राहील हे विशेष! टाटा सिएरा!
  • Log in or register to post comments

https://gaadiwaadi.com/maruti

गवि
Sun, 02/09/2020 - 14:19 नवीन
https://gaadiwaadi.com/maruti-showcased-suzuki-jimny-4x4-suv-for-the-first-time-in-india/amp/ मारुती जिम्नी 4x4 जिप्सी नवा अवतार?
  • Log in or register to post comments

खूप भारी धागा

राजो
Wed, 05/08/2024 - 20:44 नवीन
मागच्या वर्षी सिमला - मनालीला गेलो तेव्हा सगळीकडे थार चाच बोलबाला होता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा