Skip to main content

ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

लेखक गवि यांनी बुधवार, 28/01/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात. कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही. मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच. -सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी. -पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक AA With thanks from www.mahindracarsindia.com -भरपूर रफनेस असलेली थार -स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट -एक्सयूव्ही५००चा अ‍ॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो) -जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं. -आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा -फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स. AAA with thanks from i.ndtvimg.com ... ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं. या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

वाचने 164365
प्रतिक्रिया 281

प्रतिक्रिया

बा द वे. एक प्रश्ण किंवा शंका विचारायची होती. इथे टाटाच्या एस.यु.व्ही. वापरणार्‍यांना. DiCoR आणि CRDI मधे नेमका काय फरक आहे? डिकॉर= डिरेक्ट इंजेक्शन कॉमन रेल सी.आर.डी.आय.= कॉमन रेल डिरेक्ट इंजेक्शन का डिकॉर मॉडीफाईड सी.आर.डी.आय, आहे?

महिंद्रा TUV300 टेस्ट करण्याची संधी कोणाला मिळालीय का? काय आहेत सुरुवातीचे रिपोर्ट्स?

In reply to by गवि

टेस्ट ड्राइव्ह नाही पण मला बघताक्षणी लुक्स आवडलेत. (अपनी अपनी पसंद... बॉक्सी लुक्स अधिक आवडतात) टॉप गिअर ने ठीक रिव्ह्यू दिलाय पण मला ते नेहमीच बायस्ड वाटलेत. http://www.topgear.com/india/mahindra/review-mahindra-tuv300/itemid-51 हे एक बघा http://www.motoroids.com/features/renders-mahindra-tuv300-modifications…

नुकतीच (दोन महिन्यांपूर्वी) घेतली. अर्थात सगळा अभ्यास करुनच. माझ्या गरजांमध्ये कितीही खराब रस्ता असला तरी सहज जाईल अशी गाडी, अधिक ग्राऊंड क्लिअरन्स, पाच मोठे लोक आणि सामान बसेल अशी गाडी, रिलायबल, चांगले सर्व्हिस नेटवर्क, हायस्पीड कॉर्नरिंगला सुरक्षित, वेगात हायवे क्रुझिंग, एअरबग्स आणि एबीएस अशी लिस्ट होती. उमेदवारीत डस्टर, टेरानो, बोलेरो, स्कॉर्पियो आणि XUV5OO या उभ्या होत्या. डस्टरने इंटिरियर क्वालिटीत मार खाल्ला. शिवाय टॉपएंड व्हेरियंट (अधिक पॉवर, ११०ps) मध्ये स्कॉर्पियो येते शिवाय दोन सीट अधिक आणि मोठे इंजिन, अधिक शक्ती, मोठा आकार (माझ्यासाठी हा महत्त्वाचा होता). टेरानो किंमतीत हारली. बोलेरोला एअरबग्स आणि एबीएस ऑप्शन्स नाहीत. स्कॉर्पियोचा विचार केला. एकदोन ट्रिपा (सह्याद्रीतल्या अतिशय खराब असलेल्या रस्त्यांवर, आणि नसलेल्या रस्त्यांवरही) केल्या. पण बॉडीरोल नावाचा प्रकार असतो तो त्रासदायक वाटला. उंच ग्राऊंड क्लियरन्स, बंपी राईड आणि १००किमी स्पीडच्यावर गाडी स्पीडअप करायला आत्मविश्वास वाटत नाही. शिवाय बिल्ड क्वालिटीचाही थोडा खोडा पडला. म्हणून थोडे बजेट ताणून XUV5OO घेतली. XUV5OO ताकद, लोएंड टॉर्क, स्पीड, खराब रस्ते कुठेही कमी पडत नाही. कितीही हायस्पीडला कॉर्नरिंगला भीती वाटत नाही. शिवाय एबीएस, एअरबग्समुळे जास्त सेफ वाटते. मधल्या रांगेतल्या सीटांना बसायला शब्दशः एकरभर रान आहे. मधल्या सीटाच्या पायात बाकी गाड्यांप्रमाणे ट्रान्समिशन हंप (उंचवटा) नाही. जे काही इश्शू होते ते नवीन मॉडेलमध्ये सगळे रेक्टिफाय केले आहेत. एकच निगेटिव्ह पॉइंट आहे तो म्हणजे पूर्ण सात सीट्स बसल्यावर सामान ठेवायला फार काही जागा शिल्लक राहत नाही. पण प्रत्येक सीटला स्वतःचा वेगळा एसी व्हेंट, मागच्या सीटसाठी वेगळाच एसी कंट्रोल आणि शून्य बॉडी रोल त्यामुळे पैसा वसूल गाडी. अवांतर: आधी स्विफ्ट चालवायचो तेव्हा नव्वद-शंभरच्या वर काटा गेला की बायको ढोपर मारायची, आई म्हणायची काटा कुठे चाललाय. XUV5OO घेतल्यानंतर पहिल्यास ट्रिपला १२० ने गाडी मारत होतो हायवेला तेव्हा आई म्हणाली नवीन गाडी आहे म्हणून सावकाश चालवतोय का रे तू आज? ;) (आतमध्ये वाढत्या स्पीडचा फील आणि आवाज अजिबात जाणवत नाही).

In reply to by भटकंती अनलिमिटेड

..अत्यंत उपयुक्त..खूप आभार.. टीयूव्ही३०० अजून कोणाच्या प्रत्यक्ष हाती आलेली नाही. ..एक्सयूव्ही भारीच देखणी आहे.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

मस्त रीव्ह्यु ! नवीन क्षुव ५०० चे लूक्स जुन्या गाडी पेक्षा मस्त आहेत ह्यात शंकाच नाही !! कोणते व्हेरीयेंट घेतले ? टोटल बजेट ? इकॉनॉमी ? ह्या विषयीही लिहा ! क्षुव ५०० चा विषय निघाला की उगाच एन्डेव्हर आणि फॉर्च्युनर येतात मनात म्हणुन विचारले :) बाकी
आतमध्ये वाढत्या स्पीडचा फील आणि आवाज अजिबात जाणवत नाही
हे बेस्ट !

In reply to by प्रसाद गोडबोले

मी W-6 हे व्हेरियंट घेतले. घेण्याआधी एकवेळ असा विचार केला होता की नवे मॉडेल लॉंच झाले की जुन्या व्हर्जनवर थोडेफार डिस्काऊंट मिळेल. कारण नवीनच घ्यावे असा काही विचार नव्हता. माझ्या गरजांना (आणि स्वप्नांना) जुनेही चालले असते. पण त्यात फक्त एकच कलर उपलब्ध असल्याने आणि डीलरही विशेष डिस्काउंट देत नसल्याने तो विचार सोडला आणि नवीन मॉडेल घेतले. पुण्यात ऑनरोड १५.१L. वरचे व्हर्जन W8 आणि W10 आहेत पण त्यात अधिक ज्या सुविधा (material benefits, भौतिक सुख, ब्लिंग्ज) आहेत त्याशिवाय मी गाडी चालवू शकतो. जसे कलर इन्फोटेनमेंट डिस्प्ले, टायरट्रॉनिक्स (टायर प्रेशर मॉनिटर), जीपीस, इलेक्ट्रिक फोल्ड आरसे, लेदर सीट्स, कीलेस एंट्री, अलॉय व्हील्स वगैरे. म्हणून क्रुझ कंट्रोल, एअरबॅग्स आणि एबीएस असलेली W6 निवडली. हायवेवर क्रुझ कंट्रोल वापरणे म्हणजे सुखच आहे. सहा गियर्समुळे १२० ने जाणारी ओव्हरटेक करतानाही पॉवर कमी पडत नाही. एन्डेव्हर आणि फॉर्च्युनर या सेगमेंटच्या गाड्या नाहीत. त्या याच्या पुढच्या सेगमेंटच्या आहेत. किंमत २३ लाखापासून पुढे. या सेगमेंटमध्ये डस्टर, टेरानो, ह्युंडाईची नवीन आलेली क्रेटा या गाड्या आहेत. आणि सध्या तरी कुठलीच कॉम्पॅक्ट एसयुव्ही चार मीटरच्या आतली नसल्याने टॅक्स वाचत नाही. शिवाय या गाड्या मी का साईडलाईन केल्या आणि XUV5OOच का घेतली हे आधीच्या प्रतिसादात लिहिले आहेच. TUV3OOबद्दल चांगले रिव्ह्यू ऐकले आहेत. (मला आता एवढ्यात गाडी घ्यायची नसली तरी) एकदा टेस्ट ड्राइव घेतली आहे. बॉडीरोल बराच कंट्रोल्ड असला तरी तो जाणवतो मात्र. शिवाय लॅडर ऑन फ्रेम डिझाईन असल्याने ती हार्डकोअर ऑफरोडर आहे हे नक्की. परंतु इंजिनमध्ये अधिक ताकदीचा पर्याय हवा होता असे वाटते (जसे डस्टर मध्ये ८५पीएस आणि ११०पीएस असे पर्याय आहेत). हायवेवर ओव्हरटेकला बरेचदा दीड लिटर ८४पीएस इंजिनची पॉवर कमी पडू शकते. अधिक माहिती हवी असल्यास देईनच. बर्‍याच गाड्यांचा अनुभव आणि तांत्रिक ज्ञान आहे तसे थोडेफार.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

कडक रिव्ह्यू. महिंद्रा ने स्कार्पियो नंतर काढलेली आणिक एक भारे गाडी. अ थरो एसयुव्ही अपील दॅट द कार गिव्ज यू. बट आय फाइंड इट अ लिटल ओव्हरडन. माझं मत. स्टिल'; इट्स अ ग्रेट कार. तुमचा रिव्ह्यू आवडलाय. दर्दी आहात.

In reply to by वेल्लाभट

ओव्हरडन आधीचे व्हर्जन होते. सध्याचे व्हर्जन बर्‍यापैकी सुटसुटीत केले आहे. शिवाय आधीच्या मॉडेलचे जे काही इश्यू होते (सस्पेन्शन, ट्रान्समिशन वगैरे) हे सध्याच्या मॉडेलमध्ये काढलेत. शिवाय काळा रंगच अशासाठी घेतला की जास्त काही डिझाईनचे ओव्हरडू असेल ते दिसूच नये. पुढे आता शक्य झाल्यास नजीकच्या भविष्यात डायमंड कट ब्लॅक अलॉय व्हील्स लावेन म्हणतोय. आणि हो महिंद्राची आफ्टरसेल्स सर्व्हिसला तोड नाही. वॉरंटीमध्ये काहीही पार्ट खळखळ न करता रिप्लेस केला जातो. नाहीतर साले माझे आधीचे मारुतीवाले... पार्टचे पैसे जसे सर्व्हिस मॅनेजरच्या खिशातून देणार होता असे नखरे करायचा. XUV5OO च्या मालकांना पर्पल क्लबची मेंबरशिप मिळते त्याचे अनेक फायदे आहेत. जसे गाडी जोपर्यंत तुमच्या मालकीची आहे तोपर्यंत एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर (ज्याला तुम्ही कधीही आणि गाडीसंदर्भातल्या कुठल्याही शंका, प्रश्नासाठी फोन करु शकता) प्रायॉरिटी सर्व्हिस, होम पिकप-ड्रॉप, जास्त दिवस सर्व्हिस सेंटरला गाडी राहणार असेल तर लोनर कार.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

वेल, आधीचे इशू, ओव्हरडू अपील काढला असेल तर सहीच आहे मग. पर्पल क्लब, आफ्टर सेल्स चं वाचून आनंदित झालोय. क्या बात है. हे म्हणजे भारीच आहे. But Mahindra is one brand which has taken some serious efforts to improve itself and reach closer to international standards. Commendable. स्कॉर्पियो जेंव्हा काढली तेंव्हा सहा वर्ष आर अँड डी झाला होता. "जीप" च्या लेबल मधून बाहेर यायचं हे प्राथमिक उद्दिष्ट होतं. टाटाचंही कौतुक वाटतं (नाव कानफाट्या असलं तरी). जे एल आर अ‍ॅक्विजिशन फार मोठी झेप आहे. नवीन बोल्ट, झेस्ट क्लास आहेत. अगेन, अ थरोली न्यू प्रॉडक्ट अटेम्प्टेड टू गेट आउट ऑफ द इंडिका इमेज. आरिया इस गुड, बट राँगली प्राइस्ड. नवीन वाली इनोव्हा च्या जवळपास प्लेस केलीय म्हणे. असो. गाड्या आवडता विषय आहे. मात्र मारुतीबद्दल तुमचं मत ऐकून खट्टू झालो. #मारुतीलॉयलकस्टमर #८००लव्हर तळटीपः तुम्ही फटुग्राफर किती भारी आहात आम्हाला ठाऊक आहे. तुमच्या रथाचा एक फोटो येऊदे की. आणि हो, ब्लॅक अ‍ॅलॉय लावाच. :)

In reply to by वेल्लाभट

टाटाचंही कौतुक वाटतं (नाव कानफाट्या असलं तरी). जे एल आर अ‍ॅक्विजिशन फार मोठी झेप आहे. नवीन बोल्ट, झेस्ट क्लास आहेत.
मलाही टाटाचा अभिमान आहे. जी कंपनी ते फोर्डला विकत घ्या असे विनवत होते त्याच फोर्डकडून जेएलआर विकत घेतली, तीही नाकावर टिच्चून. पण अजूनही त्यांना इंडिकाइश डिझाईनमधून बाहेर पडता आलेलं नाही. कुठलीही गाडी इंडिकासारखीच दिसते. झेस्टमात्र थोडी बरी आहे. बोल्टने सपशेल निराशा केली. अर्थात नॅनोमुळे टाटांच्या बद्दल मनात कायम आदरच राहील. नवीन आरिया इनोव्हाजवळ प्लेस केली असली तरी इनोव्हाचा क्लासच वेगळा आहे. तिच्यासारखी कंफर्टेबल आणि रिलायबल गाडी नाही दुसरी. पण जरा आऊट्डेटेड टेक्नॉलॉजी आणि ओव्हरप्राईज्ड आहे इनोवा. इनोव्हा-२०१६ तर पार अठरा-वीस लाखाच्या घरात जाणार आहे असं ऐकलंय. मारुती: अहो, आम्हीही पाच वर्षे मारुती स्विफ्टच ५०,०००किमी कुठल्याही सह्याद्रीच्या रस्त्यांवर ताबडत होतो. पण त्यांची बिल्ड क्वालिटी आणि सेफ्टी हा नेहमीच वादाचा विषय राहिलाय. लेटेस्ट NCAP टेस्ट्सचे रिझल्ट्स पाहिलेत का मारुतीचे? शून्य स्टार्स म्हणजे पारच लायकी निघाली. आमची जुनी स्विफ्ट: Swift आताच्या रथाचा फोटू: XU5OO

In reply to by भटकंती अनलिमिटेड

लेटेस्ट NCAP टेस्ट्सचे रिझल्ट्स पाहिलेत का मारुतीचे? शून्य स्टार्स म्हणजे पारच लायकी निघाली.
हां, ते वाचलंय. काय आता... असेलही... काय करणार.

४ मीटर पेक्षा लांबी कमी असेल तर टॅक्स कमी असतो असे कुठेसे वाचले आहे . त्यामुळे काँपक्ट एसयुव्ही काँपक्ट सेदान भारतात जास्त पॉप्युलर/ स्वस्त अहेत

काही म्हणा... काळ्या काचांची काळी स्कार्पियो विथ सेक्सी क्रोम अ‍ॅलॉय्ज ... तिची बातच काही और आहे.

मित्रहो आपल्यापैकी खुप लोक उत्तम यंत्रअभियंता आहेत अन आवड म्हणून ही खुप लोक तांत्रिक माहिती ठेवतात मला थोड़ी मदत हवी आहे, एक प्रोजेक्ट आहे डोक्यात त्याला थोड़ी मदत तुम्ही लोक करू शकलात तर आनंद होईल. मला हिंदुस्तान मोटर्स कॉन्टेसा रिबिल्ड + मॉडिफाई करायची इच्छा आहे मला एक मॉडेल मिळते आहे १९९८ बिल्ड ७०,००० किमी चालली आहे एस्थेटिक मॉड्स काही विशेष नाही पेंट जॉब वगैरे किंवा आलोय व्हील वगैरे होतील नीट मला प्रॉब्लम आहे तो इंजिन चा ओरिजिनल इंजिन मिळणे किंवा ओरिजिनल इंजन मिळाले तरी एफिशिएंसी ही आधुनिक इंजिन इतकी खचित नसेल शिवाय स्पेयरपार्ट्स ची सतत बोंब, मला कोणी एखादे असे डीजल इंजिन सांगू शकेल का जे २ लीटर एंड अबोव असावे शक्यतो २.१ वगैरे जे नेमका कॉन्टेसा ओरिजिनल इंजिन इतका torque देईल जेणेकरुन मजबूत लंबीचौड़ी असलेल्या ह्या गाडी चा पिकअप मार खाणार नाही अन जास्त वेल्डिंग जागा बनावणे क्रेडल नवे घालणे वगैरे न करता ते इंजिन कॉन्टेसा च्या चेसिस मधे फिक्स होईल? त्याशिवाय कॉन्टेसा ची शॉकप्स ही विशेष हार्ड म्हणुन बदनाम आहेत ती सेट करणे बदलणे म्हणजे एडिशनल डोकेदुखी अन मैकेनिक नेमका शोधणे आले अश्यवेळी शॉक्स चेंज करायचे म्हणले तर चेसिस मधे काय बदल करावे लागणार? धन्यवाद

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कॉन्टेसा रिबिल्ड + मॉडिफाई करायची इच्छा आहे
मनातलं बोललायत.... माझंही हे स्वप्न आहे. यू कॅन मेक इट अ परफेक्ट लो रायडर. इंजिन - वेल.... टेक्निकल माहित नाही. पण शेव्ही परफॉर्मन्स सीरीज इंजिन्स मिळतात. पण बेक्कार तज्ञ मेकॅनिक हवा तुम्हाला हे करायला. ये-यागबाळ्याचं काम नव्हे. अन व्यवस्थित खर्च केलात तर यु वोल हॅव अ हेडटर्नर ऑन युअर हँड्स. मदत काय करू शकेन ठाऊक नाही, पण वाचूनच एक्सायटेड आहे. माझ्याही मनातलं हे स्वप्न असल्याने अजूनच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

या दोन लिंक्सवरुन बरीच माहिती मिळऊ शकेल. पण खर्चाचाही एक अंदाज घ्या. http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/40542-new-engin… http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/66140-contessa-…

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

लागेल तेवढी तांत्रिकी मदत मी करेन. ३.० लिटर डिझेल इंजिनाचा पर्याय बेष्ट राहिल. फियाटचं घ्यायचं. इंजिन माउंट्स वगैरे बनवुन घ्यावे लागतील. जर बजेट असेल तर ५.२ लिटर व्ही-८ विथ टर्बो/ सुपरचार्जिंग करता येईल (मायलेज विचारायचं नाही). ट्रान्समिशनही बदलावं लागेल. सुटेबल ट्रान्स्मिशन कुठलं असेल त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल. शिवाय ऑक्झिलरिजही बदलाव्या लागतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

Guys,Im Yohan,ive owned a petrol conte since more than 1.5 years now,and prior to that a Merc benz 240 D123 series,and i even recently bought a diesel contessa..Ive been to chor baazar many times,,and guys who are serious about engine swap,can try o purchase the 4 variants available.The gear box mounting is common for petrol and diesel,in petrol swap howeve suspension coils and etc will have to be strengthened.I was also informed by a spare parts dealer that Armada grand,Bolero have a contessa isuzu gearbox,only scorpio is different. 1)isuzu diesel og-2.0 65 bhp 2)isuzu diesel og 2.2 70 bhp turbo and non turbo option 3)isuzu diesel og 2.4 86 bhp turbo and non turbo option 4)isuzu diesel indian 2.0 55 bhp non turbo (turbo can be added aftermarket isuzu) i could be wrong about the bhp rating,but they are approximate ratings. engines are availble at Mr.Pardawala isuzu diesel engine shop(chor baazar).He is quite famous for stocking all isuzu and contessa engine parts for diesel and petrol.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हि इंजिन्स जुनी असतील ना पण? ३.० लिटरांचा पर्याय अश्यासाठी सुचवला की ती इंजिन्स टर्बो/सुपर चार्जिंगबरोबर जास्तं चांगला परफॉर्मन्स देतात. त्यासाठी गिअरबॉक्सेसची भयानक जास्तं पर्याय उपलब्ध होतील. शिवाय इंजिन मॅनेजमेंट सिस्टीम सुद्धा बसवता येईल. शिवाय सोन्याबापुंना "मसल" कार बनवायची आहे असं गृहित धरतो (अमेरिकन मसल ड्रिम) २.० लिटरचं इंजिन तेवढं आउटपुट देतं नाही. ३.० लिटरच्या इंजिनाचं हेड मिलिंग/ ग्राइंडिंग करुन ३ एम.एम. पर्यंत कमी करता येतं (काँप्रेशन वाढवायसाठी). २.० लिटरचं इंजिन एवढं वाढिव प्रेशर सहन करु शकणार नाही. (आयला माझं बजेट असतं तर ५.२ किंवा ६.० लिटरांचं इंजिन टाकलं असतं. चासी रिइनफोर्स्ड करुन घेतली असती. किंवा सरळ डॉज चॅलेंजर नाहितर मस्तांग घेतली असती. 3 )

In reply to by वेल्लाभट

कलिजा खत्म भाई वेल्लाभट!! ह्यातली मॅट ब्लॅक जर कोणी विक्री करणारा असला तर मी हार्डकॅश द्यायला तैयार आहे! एक कॉन्टेसा अन दूसरी रॉयल एनफील्ड मॉडिफाइड बॉबर ह्या मॅटब्लॅक मधे काय दिसतात राव!!

In reply to by वेल्लाभट

मॅटब्लॅक हा खरंच फेवरिट कलर आहे माझाही. पण फार कमी कंपन्या असा रंग देतात. त्यासाठी एक ऑप्शन म्हणजे. आरटीओमध्ये गाडी ब्लॅक कलर मध्ये रजिस्टर करुन घ्यायची. आणि नंतर body wrap करुन मिळते ते करायचे. अगदीच स्वस्तात मॅटब्लॅक रंग होईल. दहा हजारात. अगदीच 3M wrap वगैरे लावले तर साधारण वीस हजार.

त्या टीमबीएचपीच्या धाग्यावर इसुझुच्या काही इंजिनांची यादी आहे. बहुतेक कुठलेही ट्रान्समिशन मॉडिफाय न करता ती वापरता येतील कारण हिंदुस्तान मोटर्स आणि इसुझु यांचा तांत्रिक सहाय्य करार होता. अँबेसेडर (हाय आला...कलिजा खलास झाला)मध्ये देखील इसुझुचे १.८ लिटरचे डिझेल इंजिन वापरले गेले आहे.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

अँबेसेडर (हाय आला...कलिजा खलास झाला)
हिचंही म्वाडिफिक्शन करायचंय एकदा. पार्किंग नाही म्हणून अडतंय फक्त (लोल) उगीच आपली आपली समजूत काढणं.

In reply to by जिन्क्स

होय मी टेस्ट ड्राइव्ह घेतली होती. रॉ पॉवर म्हणतात तशी खूप आहे गाडीत. मी पाहिलेल्या सार्‍या गाड्यांमध्ये ड्रायव्हर सीटिंग पोझिशन सफारीची सर्वात उत्तम होती. बाहेरुन लूक्स एकदम कल्ला. मी SUVचे स्वप्न (१५००/- पगार असताना) सफारी पाहूनच पाहिले होते. अर्थातच आता लायकी आल्यावर आधी तिची टेस्ट ड्राइव्ह घेतली. मागील तिसरी सीटची रांग एकमेकांसमोर तोंड करुन असल्याने त्यात सामान ठेवायलाही तशी बरी जागा असूनही ते अगदीच "जंपसीट्स" अशा प्रकारचे असल्याने त्याचा मोठ्या ड्राइव्हला तसा काहीच उपयोग नाही. त्या दीड फुटी सीटवर माणूस अगदीच अवघडून बसतो. परंतु अजून म्हणावी तशी रिफाईनमेंट जमली नाहीये टाटाला. पण इंटिरियर क्वालिटी आणि फीचर्स अजून कंडमच. सिंगल DIN म्युझिक सिस्टीमचे (जरी ‘हरमन’ची असली तरी) दिवस गेलेत आता. शिवाय XUV म्युझिक सिस्टीम, गॅजेट्स, क्रुझ कंट्रोल, मायक्रोहायब्रिड इंजिन स्टार्ट-स्टॉप फीचर, ऑटो लाईट सेन्सिंग हेडलाईट, रेन सेन्सिंग व्हायपर आणि विशेषतः केबिनचा लक्झरी फील या बाबतीत उजवी ठरली. सफारीची हायस्पीड कॉर्नरिंग स्टॅबिलिटी, बॉडी रोल, राईड क्वालिटी हाही एक वादाचा विषय आहेच. टाटा सेल्स आणि सर्व्हिसचा attitude म्हणजे आपल्यावर उपकार केल्यासारखा आहे. आणखी एक मुद्दा म्हणहे सफारी फुलटाईम SUV म्हणतात तशी आहे रिअर व्हील ड्राइव्ह (इंजिनाच्या ताकदीचा पुरवठा मागील चाकास) आणि XUV ही क्रॉसओव्हर म्हणतात त्या प्रकारातली. मला सध्या तरी हार्डकोअरऑफरोडिंग करायचे नाही. फक्त मी नेईन त्या रस्त्याने नीट खालून न लागता (bottom out होणे) जाणारी गाडी जिचा हायस्पीडला परफ़ॉर्मन्स रिफाईन्ड असेल आणि हॅंडलिंगमध्ये आत्मविश्वास असेल अशी गाडी मला हवी होती. XUV ही फ्रंटव्हील ड्राइव्ह (इंजिनाच्या ताकदीचा पुरवठा पुढील चाकास) असल्याने हॅंडलिंग पुष्कळसे कारसारखे आहे. फ्रंटव्हील ड्राइव्ह गाड्या driver intended path अगदी ऍक्युरेटली फ़ॉलो करतात आणि तेच करताना रिअरव्हील ड्राइव्ह गाडी काही अंशी तो पाथ अंडरस्टिअर किंवा ओव्हरस्टिअर करते (कारण स्टिअरिंग पुढील चाकाला असते आणि पॉवर मागील चाकाला).

In reply to by भटकंती अनलिमिटेड

धन्यवाद. आता नविन गाडी सोबत photography outings होतीलच. त्याची वर्णने येउद्यात मिपा वर :) .

In reply to by भटकंती अनलिमिटेड

xuv 500, रॉयल एन्फिल्ड, Schwinn Sporterra, नावाजलेले फोटोग्राफर असल्यामुळे महागडा कॅमेरा असेलच. त्यात "दोन महिन्यात सात आऊटिंग्ज" . वाह! वाह! वी एन्वी यू :)

In reply to by जिन्क्स

नावाजलेला तर नाहीये. घरात अनोळखी चेहरा कुणी दाखवत नाही तेच समाधान मानायचे. कॅमेरा ऑफरोडिंग या सदरात येत नसल्याने त्याबद्दल येथे लिहिणे टाळतोय. ;-)

TUV300

In reply to by कपिलमुनी

टीयुव्ही३०० ही गाडी सेगमेंटमधे रॉक करणार यात शंका नाही. ती लॉंच झाली आणि मारुतीने त्यांच्या एसक्रॉसवर एक लाखापर्यंत डिस्काउंट देण्याची योजना जाहीर केली, यातच या गाडीमुळे मार्केट किती हलले आहे याची कल्पना यावी. बादवे, वरील फोटो खऱ्या गाडीचा नसून रेंडर केलेला आहे.

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनीश्वर, फोटूमधली टीयुव्ही मॉडीफाइड नसून ग्राफिक रेंडर आहे. ही त्या रेंडर केली आहे त्या बातमीची लिंक. व्हील्स आणि स्टेपनीचं कव्हर पाहिलेत की लक्षात येईल की ग्राफिक रेंडर आहे. http://www.motoroids.com/features/renders-mahindra-tuv300-modifications… हा ओरिजिनल फोटो एका ऑटो वेबसाइटचा असून तो महिंद्राच्या चाकण प्लांटमधल्या टेस्ट ट्रॅकवर काढलेला आहे. त्या फोटोवरुन kalleo4 नावाच्या युजरने हे रेंडर बनवले आहे. त्याच गाडीचा (MH14EY6368) हा ओरिजिनल फोटो. TUV300

टीयुव्ही ३०० चे लुक्स विशेष आवडले नाहित. तसचं ती झायलो चं फेसलिफ्ट केलेलं वर्जन वाटते आहे. झायलो मला स्वतःला तरी कॉर्नरिंग ला कधीचं रिलायेबल वाटली नाही. गाडी प्रत्यक्ष पाहिली किंवा टेस्ट ड्राईव्ह घ्यायला मिळाली तर मत सांगेनच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

या वीकेंडला मी टेस्ट ड्राइव्ह घेईन म्हणतो. झायलो आणि टीयुव्ही३०० या दोन्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बनावल्या आहेत. टीयुव्हीसाठी स्कोर्पियोची हायड्रोफॉर्म चॅसी वापरली आहे जी झायलोहून खूप वेगळी आहे.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

ह्म्म. चासी स्कॉर्पिओची असेल पण सस्पेंशन आणि सेटिंगचं कसं काय आहे? टेस्ट ड्राईव्ह घेतलीत की नक्की लिहा. झायलो ला अगदी कमी वेगात कॉर्नरिंग करताना पहातानाही भिती वाटते. मे बी माझं एकट्याचं असं मत असेल.

कॉर्नरिंग वरून आठवलं, टीयुव्ही हॅज अ लॉट ओफ कॉर्नर्स. बॉक्सी लुक आहे. आणि मला असा लुक वैयक्तिक जाम आवडतो. सो मी टीयुव्ही च्या लुक च्या प्रेमात आहे. गाडी बेन्चमार्क आहे व ठरेल यात वाद नाही. कडक. असं वाटतंय की याचंच मोठं व्हर्जन (फुल साइझ एसयुव्ही) टीयुव्ही ५०० च्या नावाने येईल पुढे मागे. (झायलो क्वान्तो सारखा प्रकार) ते अजून भारी वाटेल. ही गाडी कडक आहे बाकी. इंटिरियर क्वालिटी, राइड अँड फील इज सेड टू बी द बेस्ट महिंद्रा हॅज ऑफर्ड सो फार.

In reply to by वेल्लाभट

TUV300 गाडी नक्कीच बेंचमार्क ठरणार आहे यात शंकाच नाही. ज्या आकर्षक किंमतीत महिंद्राने पाच सीटर (सात सीट्स असले तरी इमर्जन्सी ला ७ सीटर, एरवी ती ५ सीटरच आहे. मागील २ सीट्स अगदीच लहान मुलांना बसण्याजोगे आहेत) कॉंम्पॅक्ट एसयुव्ही बाजारात आणली आहे त्याने नक्कीच सध्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे (डस्टर, टेरानो, इकोस्पोर्ट, एस-क्रॉस, क्रेटा) धाबे दणाणले आहेत. ६.९०लाख (बेस मॉडेल) ते ९.१०लाख (टॉप मॉडेल, AMT) या एक्स-शोरुम किमतीने बरेच प्रतिस्पर्धी गाड्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर महिंद्राने पळवले आहेत. पण त्याची TUV5OO लॉंच केली जाईल असे मला तरी वाटत नाही. कारण मला नाही वाटत त्याच चॅसीवर बनवलेल्या स्कॉर्पिओच्या समोर त्याच प्राइस-पॉइंटला स्पर्धक गाडी लॉंच करुन महिंद्रा त्यांच्या मोस्ट सेलिंग एसयुव्हीच्या स्थानाला धक्का देऊन स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेईल.

सफारी डायकॉर किंवा स्टॉर्म बद्दल अधिक माहीती हवी आणि असेल तर आमच्या SOUL (Safari Owners United League) च्या ड्राईव्ह मधे आपण सहभागी होऊ शकता !

In reply to by भटकंती अनलिमिटेड

लोल ! सही आहे.

माझी टाटा सफारी २.२ EX (February २००८) आहे . ~ २,००,००० रंनिंग झाले आहे :). जवळपास सर्व राज्ये पालथी घातली आहेत हिच्यातून :) (ह्यात २ लडाख ट्रिप्स अन अनेक हिमाचल +काश्मीर ट्रिप्स आल्या ) गाडी एकदम rugged आहे , आफ्टर सेल्स सपोर्ट बेस्ट आहे . फक्त suspension अन timing belt कडे लक्ष द्यावे लागते वेळोवेळी .... driving comfort unmatched आहे अन रोड presence बाबत बोलायलाच नको ! हे काही फोटू गुरुडोंग्मार लेक , नॉर्थ सिक्कीम: गुरुडोंग्मार लेक , नॉर्थ सिक्कीम भूतान भूतान सच पास (२०१३) sach pass स्पिती valley spiti pangong lake २००९ pangong कुणाला अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य विचारावी !

In reply to by आर्बि२३९९

फोटो लई कातिल आणि जब्र्या! इनो घेतो आहे. आमच्या ब्लॅकप्युमालाही असेच नवनवे प्रदेश पाहण्याचे भाग्य लाभो अशी प्रार्थना करा. येत्या वर्षात तिला सदेह लडाखगमन करवून ते रंगीत फ्लॅग लावण्याचे मनी योजितो आहे (तसे मी एकदा लडाख आणि एकदा झंस्कार सदेह केलंय, पण ते झेंडे शरीरावर लावता येत नाहीत ;) )

In reply to by भटकंती अनलिमिटेड

कडकच फोटो. सफारीचं ते स्पेअर व्हीलच अर्धा जीव करून टाकतं... तसं म्हणता, एक वेडं स्वप्नं होतं अजूनही आहे, ८०० ने मुंबई लदाख मुंबई करायचं. असो. ८०० नाही आता, तरी जी कुठली गाडी असेल ती. पण डोअर टू डोअर गाडीने जाणार.... नैतर नाय जाणार असं ठरवलंय. व्हेनेवर इट इज. ते....एखाद ईनो एक्स्ट्रा असेल तर बघा.