✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका मंदिरात...

ज
जव्हेरगंज यांनी
Fri, 10/02/2015 - 17:38  ·  लेख
लेख
मी राहतो त्याठिकाणी एक अवजड बोजड मंदिर आहे. पण मी तिकडे फारसा जात नाही. रात्रीचं हे मंदिर मला भेसुर वाटते. कलुळात 'कवशी' दिसते असं मला एकजण म्हणाला होता. बऱ्याच वर्षापुर्वी कुण्या 'कौशल्या'ने ईथेच ऊडी मारली मारली होती. तिचं भेसुर भुत ईथंच वावरतयं असा माझा समज झालाय. रात्रीचं मी तिकडं कधीच फिरकत नाही. भल्या सकाळी उठुन मी मंदिरात जातो. गाभाऱ्यातल्या अनाम परड्या मला जोगवा मागतात. पाट्यावरचा लालबुंद गंध माझ्या कपाळावर अलगद जाऊन बसतो. चाफ्याची सुगंधी फुले माझ्या हाताकडे झेपावत येतात. मी त्यांना देवीकडे फेकतो. आतल्या काळोखात मला फारसं दिसत नाही. गावशिवारातली कोणी शिणलेली बाई जन्मोजन्मीचा दंडवत घालत वाजत गाजत तिथे येते. या बाईची दु:खे जाणण्यात मी रस दाखवतो. पण सकाळच्यापारी तिची दु:खेही मला प्रसन्न वाटतात. तिच्या यातना मला सोसवत नाहीत. मी प्रसाद खाऊन बाहेर पडतो. काळवंडलेल्या भिंती मला जवळ बोलवतात. मी तठस्थ त्यांच्याकडे पाहतो. आषाढात हरीरामचे लग्न झाले तेव्हा मंडपाला याच भिंतींनी आधार दिला. गरीबड्या सुखदेवने पोराच्या लग्नात गावजेवण घातले होते. मीही होतो पंगतीत. ढेरपोट्या गणपतीच्या कट्टयाला टेकुन. ईथेच. चार दिवसात लग्न मोडले होते. नवरीचा म्हातारा बाप दिवसभर व्याह्याच्या वट्यावर बसुन राहीला होता म्हणे. हरीराम घरातुन पळाला तो पुन्हा कधीच न परतण्यासाठी. नवरीचं पुढे काय झालं याची माहीती तर या भिंतींनाही नसावी. मंदिराच्या समोरचा विशाल वटवृक्ष आता केवळ आपली लाकडं दाखवत उन्हापावसात चिवट ऊभा आहे. कित्येक भक्तगणांना आपली सावली देऊन त्यांचे हजारो सुखाशीर्वाद यानं झेलले आहेत. या वटवृक्षाचं बोडकं रुप आता या मंदिराला बाधा आणतयं. मी त्याला विचारतो, तु पडत का नाहीस? वैरान माळावर भणंग खोपट्यात राहणारी एकटी सिंधुबाई याच झाडाखाली जोगतीण झाली. मी तिच्या घरी चहा पिलो होतो. जळता कापूर तोंडात टाकताना मी तिला पाहीलं होतं. मी पाहतोय या वटवृक्षाच्या शेंड्यावर, एक जीर्ण भगवं कापड. वाऱ्यावर फडफडतना. या झाडाच्या जिवंतपणाला ही एक सलामी आहे. दुपारी मंदिर एकटच असतं. आणि मला ते आवडतं. ईथल्या काळवंडलेल्या भिंती मला थंडगार वाटतात. बाहेरचा ऊष्ण परीसर माझ्या डोळ्यांत आग ओततो. ऊन्हाच्या झळयात कित्येक चिमण्या मातीतले कण टिपताना मी पाहील्या आहेत. ही पाखरे रानभैरवी गात मंदिराच्या शिखरावरुन आभाळाकडे पाहतात. उंच भराऱ्या घेऊन त्याला धडकायला बघतात. दुरवरचा त्यांचा ठिपक्याएवढा आकार मला दिसेनासा होतो. ऐन दुपारी मी गच्च ताणुन देतो. या गारठ्यात मला स्वर्गसुखाचा आनंद भेटतो. संध्याकाळी हे मंदिर मला विषण्ण वाटते. तांबुस किरणे झाडाभिंतींवर दाटीवाटीने गर्दी करतात. या भिंतीही मला उदास वाटतात. सुर्यनारायणासारख्या त्याही थकुनभागुन आळस देतात. याचे मला दु:ख होते. हे दु:ख मला टोचत राहते. रात्रभर. या दु:खाच्या परीछायेत मला अर्वाचीन युगाचे सापळे दिसतात. रात्री हिंस्त्र श्वापदं मंदिराच्या भिंतींवर घिरट्या घालतात. मी अनामिक होऊन त्यांच्यात मिसळून जातो. खोल काळोखात मला कवशी दिसते. कलुळात तिच्या भेसुर हसण्याचे आवाज घुमत राहतात. भयानक.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
3959 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

जमलेय...

chetanlakhs
Sat, 10/03/2015 - 06:52 नवीन
थोडेसे निबंधसारखा झालाय..पण 7/10 गुण
  • Log in or register to post comments

खरतर फक्त वर्णनच टाकायचे होते

जव्हेरगंज
Sat, 10/03/2015 - 10:08 नवीन
खरतर फक्त वर्णनच टाकायचे होते. अमुर्त वगैरे. डिस्टिंक्शन दिल्याबद्दल आभार.:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chetanlakhs

काठावर पास.

द-बाहुबली
Sat, 10/03/2015 - 17:16 नवीन
काठावर पास.
  • Log in or register to post comments

.

जव्हेरगंज
Sat, 10/03/2015 - 20:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

नापास

तुडतुडी
Sun, 10/04/2015 - 13:21 नवीन
नापास
  • Log in or register to post comments

.

जव्हेरगंज
Sun, 10/04/2015 - 13:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

!!

पैसा
Sun, 10/04/2015 - 14:42 नवीन
आवडले. वेगळेच!
  • Log in or register to post comments

+१

उगा काहितरीच
Mon, 10/05/2015 - 00:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जरा आवडले, जरा नाही.

अभ्या..
Mon, 10/05/2015 - 00:41 नवीन
जरा आवडले, जरा नाही.
  • Log in or register to post comments

नाही आवडल

ज्योति अळवणी
Mon, 10/05/2015 - 01:29 नवीन
नाही आवडल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा