✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका अनोळखी प्रदेशात

ज
जव्हेरगंज यांनी
Sat, 09/26/2015 - 01:35  ·  लेख
लेख
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला. खाचगळगे, प्रवांश्यांच्या गावरान गप्पा, हिरवाईला सोबत करत हाही अनुभव घेतला. सगळचं अनोळखी, काहीच माहीती नाही. मध्येच एक वेगळच गाव लागलं. 'पाचुरी' म्हणे. टमटमवाल्यानं तिथचं सोडलं. आणि गेला निघुन. आता त्या अनोळखी खेड्यात मी असा एकटा. बरं जायचयं कुठं हे विचारणार तरी कसं? यायचं 'कारण' कोणी विचारलं तर बोंबच. तरी एकाला धाडस करुन विचारलचं " हे थिरडी कुठं आलं?". त्यानं हात दाखवुन लांबवर रस्ता दाखवला. मी निघालो, एकटाचं. मातीच्या कच्च्या रस्त्यावरुन चालायला कित्ती छान वाटतं ना! हातात एक काठी घेतली आणि उगाच रस्त्यावर डोकावणारे झुडपांचे शेंडे छाटत चाललो. अगदी उंडग्या पोरांसारखा. चालतं चालतं पुढं आलो तर एक नदी दिसली. पलिकडच्या काठावर गर्द झाडीतुन डोकं वरं काढत असलेलं एक प्राचीन मंदिरही दिसलं. सुंदर. हा तर बोनसचं की. एखाद्या झाडावर कैरी शोधायला जावं आणि पिकलेला हापुसचं भेटावा असं काहीसं. काठावर एक होडी होती. बहुदा नेहमी येजा करणाऱ्या गावकऱ्यांसाठी. नुकतीच पाण्यात शिरत होती. धावत धावत जाऊन चढलो. पाच रुपयांत नदी पार केली. हा तर अजुन एक बोनस. हापुस तोही कोकणातला असल्यासारखा. अवाढव्य मंदिर पुढं ऊभं होतं. भिंती शेवाळानं रंगवलेल्या, नानाप्रकारची झुडपं आणि वेली तिच्यात शिरलेल्या. आतमध्ये देव कुठला होता काय माहित, पण आकर्षण आणि गुढ यांनी ठासुन भरलेला एकंदर परीसर. इच्छा असुनही मंदिराकडे न जाता तसाच चालत राहिलो. शेवटी आपलं ध्येयं महत्वाचं. दिवसाउजेडी ते गाठलचं पाहिजे. नाही म्हणायला आता डांबरी लागला, खड्याखड्यांनी भरलेला. जुनाट छपरी घरं, एखादा टुमदार बंगला, रानभर पसरलेलं जोंधळ्याचं पिक हे या रस्त्याशेजारी दिमाखानं मिरवत ऊभं होत. डोळ्यांनी ही सौदर्य सृष्टि टिपत घेत पावलं झपाझप टाकत होतो. एखादी शेतावरुन परतनारी बैलगाडी, सायकलवर दुध घालायला चाललेलं एखादं मिसरुड फुटलेलं पोर, गुराढोरांच शेण काढणारी एखादी म्हातारी हे रस्ताभर भेटत राहिले. तरी मी आपला थोडा भीतभीतचं चालत राहिलो. शक्यतो संवाद टाळायचा प्रयत्न केला. शेवटी एकदाचं ते 'थिरडी' आलं. गाव कसलं वाडीच म्हणा. पाच पंधरा घरांची. एक हाळी मारली तर समद्या गावाला ऐकु जाईल अशी. उगचं नुसतं ताटकळत ऊभं राहणं बर दिसलं नसतं. सरळ फाट्यावर गेलो. बसस्टॉप शेजारी एक टपरी दिसली. शेजारी म्हणण्यापेक्षा टपरी हीच बसस्टॉप होती. किंवा उलट. तिथचं एका बाकड्यावर बसलो. टपरीवाल्या म्हाताऱ्याला चहा मागितला. कधी पित नाही पण वातावरणाचा परिणाम म्हणुन एक सिगारेट ही मागवली. चहा सिगरेटचा आस्वाद घेत तिनं सांगीतलेल्या खाणाखुणा आठवुन बघितल्या. हो, पहिल्यांदा फाटा, तिथेच बसलो होतो मी. फाट्यापासुन जरा आत गेल्यावर जि. प. प्रा. शाळा. आहे, दिसतेय, ती काय समोर. शाळेला पाठीमागं लागुनचं एक टुमदार घर, थोडं पुढं जाऊन बघतो, पिवळसर दिव्याचा प्रकाश निलगीरीच्या झाडांतुन बाहेर येतोय, पाठीमागे घराचं अस्पष्ट चित्र समोर आलयं. हो तेच. तेच आहे माझं ध्येय. अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. क्रमश:
  • एका अनोळखी प्रदेशात - २

Book traversal links for एका अनोळखी प्रदेशात

  • एका अनोळखी प्रदेशात - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
11542 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

उत्सुकता जागा झालीय

बहुगुणी
Sat, 09/26/2015 - 02:54 नवीन
येऊ द्यात पुढचा भाग लवकर.
  • Log in or register to post comments

वाचतिये.

रेवती
Sat, 09/26/2015 - 03:07 नवीन
वाचतिये.
  • Log in or register to post comments

पुढचा भाग लवकर येऊ दे

सामान्य वाचक
Sat, 09/26/2015 - 07:09 नवीन
.
  • Log in or register to post comments

वातावरणनिर्मिती छान जमलीय!!!

मांत्रिक
Sat, 09/26/2015 - 07:32 नवीन
वातावरणनिर्मिती छान जमलीय!!! मला बर्फी मधलं क्यों न हमतुम चले टेढेमेढेसे रस्तोंपे नंगे पाव रे, हे गाणं आठवलं वाचताना! बाकी उत्कंठावर्धक आहे!!!
  • Log in or register to post comments

छान आहे!

चांदणे संदीप
Sat, 09/26/2015 - 07:47 नवीन
पुभाप्र!
  • Log in or register to post comments

वा ! येऊद्या पुढचा भाग लवकर .

उगा काहितरीच
Sat, 09/26/2015 - 10:39 नवीन
वा ! येऊद्या पुढचा भाग लवकर .
  • Log in or register to post comments

वाचतोय..

संजय पाटिल
Sat, 09/26/2015 - 11:08 नवीन
वाचतोय..
  • Log in or register to post comments

फुल मांगुना बहार मांगु.....

द-बाहुबली
Sat, 09/26/2015 - 13:43 नवीन
फुल मांगुना बहार मांगु..... मय तव सणम तेर्हा प्यार मांगु... लै मस्त गाणे आहे. बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. आहाहा ! डोळे भरुन आले मोजींच्या बहारीच्या काळातील आठवणीने.. झाले बहु होतील बहु... परि त्यासम तोचि. बाकी वातवरण निर्मीती रोचक आहे.. कथा काय वळण घेइल याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

तुमच्या लेखनात वातावरण

पद्मावति
Sat, 09/26/2015 - 13:59 नवीन
तुमच्या लेखनात वातावरण निर्मिती फारच सुरेख असते, नेहमीच. अतिशय चित्रदर्शी वर्णन. पु.भा.प्र. वाचतेय.
  • Log in or register to post comments

जव्हेरगंज भौ

बाबा योगिराज
Sat, 09/26/2015 - 16:00 नवीन
सुरुवात तर मस्त आहे. पुढील भाग लवकर येऊ द्या....
  • Log in or register to post comments

पुभाप्र

प्राची अश्विनी
Sat, 09/26/2015 - 17:11 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

वाह ! चित्रदर्शी खरंच ! लवकर

स्रुजा
Sat, 09/26/2015 - 19:02 नवीन
वाह ! चित्रदर्शी खरंच ! लवकर येऊ द्या पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात

कविता१९७८
Sun, 09/27/2015 - 10:32 नवीन
मस्त सुरुवात
  • Log in or register to post comments

धन्यवाद मित्रहो! क्रमश: कथा

जव्हेरगंज
Sun, 09/27/2015 - 11:04 नवीन
धन्यवाद मित्रहो! क्रमश: कथा लिहीणे हा माझा प्रांत नाही. छोटीशीच कल्पना आहे. पण एका दमात टंकणे जमत नाही. नसता गाडी बुंगाट सुटते. म्हणुन तुकड्या तुकड्यात टाकतोय. :)
  • Log in or register to post comments

साहेब काय झाले ? पुढचा भाग

Rahul D
गुरुवार, 01/14/2016 - 22:46 नवीन
साहेब काय झाले ? पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा