Skip to main content

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

लेखक संदीप ताम्हनकर यांनी शुक्रवार, 25/09/2015 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले. सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल. हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल. धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील. १. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी. २. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा - जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन, ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके, हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी. ३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे. ४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार. ५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी. (सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल) संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.

वाचने 30658
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे वैयक्तिक मत आहे का संघाची भुमिका म्हणून मांडलिये, हे बघावे लागेल. अर्थात अत्ता पर्यंतचा ईतिहास बघता संघचालक यांचे मत हेच संघाची भुमिका समजले गेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याला विरोधासाठी विरोध करणारे पण हळूच पुढे येतील. प्रत्येक वेळी हिंदुनांच का सुधारणांचा सल्ला दिला जातो?( आता हे विचार्णारे कोण असतील हे वेगळे सांगायला नको) काहिही असो, तुम्ही म्हणताय तसे जर खरेच असेल तर संघ सुधार्तोय असेच म्हणावे असे वटते.

In reply to by संजय पाटिल

संघ सुधार्तोय असेच म्हणावे असे वाटते
परफेक्शन को इंप्रूव्ह करना ना मुमकीन होता है.. हे माहीत नाही ??

In reply to by संजय पाटिल

सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे वैयक्तिक मत आहे का संघाची भुमिका म्हणून मांडलिये, हे बघावे लागेल
सांघाच्या बाबतीत हे सर्वात सोपे समीकरण आहे. जोपर्यन्त वादविवाद होत नाहीत तोपर्यन्त ते संघाची भुमीका असते. वाद उफाळली तर सोयीनुसार ते वैयक्तीक मत होते.

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग
सत्यनारायण ही हिंदु उपासनेतील सर्वात जास्त अवैज्ञानिक प्रथा आहे , तिला कोणत्याही वेदांचा उपनिषदांचा गीता ब्रह्मसुत्रांचा आधार नाही , एव्हन , कसलाही पौराणिकही आधार नाही ! वैज्ञानिक आधार तर नाहीच नाही अन ऐतिहासिक आधारही नाही .....आणि कथेतील कित्येक भाग तर सरळ सरळ अध्यात्मिक दहशतवाद आहे ! आता पाहुया, सरसंघचालकांचे आवाहन ऐकुन पुरोहितवर्ग आणि सश्रध्द हिंदु समाज ह्या परंपरेचा त्याग करतो की स्वमतांध दांभिकता चालु ठेवुन स्वतःची तुंबडी भरत ह्या परंपरा चालु ठेवतो आणि वर परत संघावरच टीका करत रहातो ते !! =))

पण सगळ्याच रुढी-परंपरांमध्ये विज्ञान आहे ना?

In reply to by सुनील

असेच म्हणतो. ध्यान केल्यावर शरीरात न्यूट्रिनो नामक कण येतात अशी मोलाची माहिती आम्हांस अलीकडेच मिळालेली आहे. (ते कण आल्याने काय फायदा होतो हे सांगितले नाही हा भाग वेगळा)

In reply to by बॅटमॅन

ध्यान वैग्रे तर सोडाच. ती तर लैच अ‍ॅडवान्स्ड गोष्ट. पण कानावर जानवे अडकवल्याने मुत्राशयाकडे जाणारी नस उत्तेजीत होते, असेही आयकले हाये!!

In reply to by सुनील

शिवाय मराठी व्हेज जेवणच सर्वांत सात्त्विक असे मराठी माणसाचे लेख आणि केरळी जेवण व पर्यायाने नारळाचे तेलच आयुर्वेदिकली सर्वांत बेस्ट असे केरळी माणसाचे लेखनही वाचनात आलेय. झालंच तर शिवलिंग म्हणजे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर हे राहिले का? ;) आणि संध्याकाळपेक्षा सकाळी देवळात गेल्यावर १०.२३४५८७६% जास्त पुण्य मिळते हेही विसरलोच होतो.

In reply to by बबन ताम्बे

ऐकावे ते नवलच. जर असे असेल तर मग गोमांसाबद्दलचे विचार पाहता प्राचीन भारतातील ऋषींची बौद्धिक पातळी एकदम खालच्या पातळीवर होती असेच म्हटले पाहिजे. अन किरणोत्साराचे माहिती नाही, पण अशा माहितीच्या उत्सर्गाने एखाद्याचा मेंदू भरून गेला तर नंतर कितीही प्रबोधन केले तरी उपयोग होत नाही हे खरेच आहे.

In reply to by बबन ताम्बे

हो पण ते गायी मारून खातात, सबब त्यांच्याकडे या शेणाचा साठा कमी असणार, टुकटुक!

In reply to by बबन ताम्बे

च्यायला, ते पाकडे धमकी देतात अणुयुद्धाची. आता टाका म्हणावं अणुबाँब. तो फुसका करण्याची टॅक्ट आली आहे आमच्याकडं. स्मार्ट सिटीतल्या सगळ्या ईमारतींवर बाहेरून शेण लावलं तर त्या अजून स्मार्ट होतील. स्मार्ट सिटीत आतून सुद्धा फरश्या बसवण्यापेक्षा सारवून घेणं कंपल्सरी केलं पाहिजे. मग तर आपली अणुबाँब पासून कायमची सुटका झाली असं म्हणायचं. आता गोहत्या बंदी आहे त्यामुळे पाहिजे तितकं शेण (जसं पाहिजे तसं - गावरान किंवा जर्सि) मिळायला प्रॉब्लेम नाही.

In reply to by नाव आडनाव

पण सगळ्या इमारती आतून-बाहेरून सारवून घ्यायच्या म्हणजे खर्च खूप येईल हो! त्यापेक्षा समस्त नागरिकांनी आपल्या सर्व शरीरावर शेण थापून घेणं कंपल्सरी केलं तर? अणुसर्गापासून सुरक्षा तर मिळेलच शिवाय काळे-गोरे, सुरूप-कुरूप हा भेद नष्ट होऊन समाज एकसंध व्हायला किती मदत होईल!!! :)

In reply to by नाव आडनाव

स्मार्ट सिटीतल्या सगळ्या ईमारतींवर बाहेरून शेण लावलं तर त्या अजून स्मार्ट होतील........ ....तर आपली अणुबाँब पासून कायमची सुटका झाली असं म्हणायचं.
मायला अधिकृतपणे स्मार्ट ठरुनही सिटीच्या नशीबी... हे ऐकणं आहेच :D :D :D :=))

In reply to by बबन ताम्बे

ही बातमी एकदम रोचक वाटली म्हणून खणायला गेलो... Journal of Radioanalytical and Nuclear Chemistry मध्ये Biosorption of radiotoxic 90Sr by green adsorbent: dry cow dung powder हा एक पेपर दिसला... कदाचीत Journal of Radioanalytical and Nuclear Chemistry ऑरगनायजरच्याच छापखान्यात छापले जात असावे झालं...

In reply to by बबन ताम्बे

ताम्बे साहेब आणि ब्याटमनराव तुम्ही कै म्हणा, त्या न्युक्लीयरच्या सुडोवैज्ञानिक गप्पा सोडल्यातर Zelia Nuttall या बाईंच्या The Fundamental Principles of Old and New World Civilizations यांच्या पुस्तकातील गोमाते विषयीचे संदर्भ गैर हिंदूंना आणि अरबस्थानात मूळ शोधणार्‍यांना कदाचित उपयूक्त असावेत.

In reply to by बबन ताम्बे

>>> अणुबॉम्बलाही निष्प्रभ करतं गायीचं शेण!: RSS हा दावा "राष्ट्रीय मुस्लिम मंच" या संघटनेने केला आहे असे या लेखात लिहिले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

https://en.m.wikipedia.org/wiki/Muslim_Rashtriya_Manch लाभ घ्या!!! ह्याच मुस्लिम राष्ट्रिय मंच (पेरेंट आर्गेनाइजेशन आरएसएस) ने पार्लियामेंट एनेक्स ला इफ्तार पार्टी दिली होती !! दादुमियां न हे गुर्जी दोघे बसवायला हवे होते तिथे सोबत!

In reply to by बॅटमॅन

ध्यान केल्यावर शरीरात न्यूट्रिनो नामक कण येतात अशी मोलाची माहिती आम्हांस अलीकडेच मिळालेली आहे. मला असे कोणी म्हणलं असल्यास आश्चर्याचा धक्का बसणार नाही! (पक्षी: तुमच्याशी सहमती). पण नक्की असेच म्हणलेले आहे का? कारण मला वाटते हे सगळे महर्षी महेश योगींच्या transcendental meditation च्या संदर्भातील असावे असे वाटते. आपण उल्लेखलेल्याचा जर नक्की संदर्भ माहीत असला तर सांगावा.

In reply to by विकास

नक्की काय लिहिलेले आहे ते माहिती नाही. मला एकाने एकदम सिरियसली सांगितले, अगदी कालचीच गोष्ट आहे म्हणून लक्षात राहिले इतकेच. बाकी त्या पेपरमध्ये नक्की काय म्हटले आहे ते सांगाल का? बायोसॉर्प्शन म्हणजे काय? कसले प्रयोग केले? इ.इ. म्हणजे नक्की कळेल तरी की आरेसेसच्या न्यूजमागचा क्लेम खर्‍या माहितीच्या आधारावर बेतलेला आहे की असंच काहीतरी ठोकून दिलंय ते.

In reply to by बॅटमॅन

नक्की काय लिहिलेले आहे ते माहिती नाही. मला एकाने एकदम सिरियसली सांगितले हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची माशी न उडवता सांगितले आणि तुम्ही ते गांभिर्याने घेतले. विश्वास ठेवला आणि त्याचा उपयोग माहिती न शोधता कुणाला तरी ठोकायला केला. प्रश्न विचारून खात्री कराविशी वाटली नाही का? बघा तुमच्यावर विश्वास असल्याने मी पण आधीच सहमती दर्शवली होती... ;) असो. बाकी त्या पेपरमध्ये नक्की काय म्हटले आहे ते सांगाल का? बायोसॉर्प्शन म्हणजे काय? कसले प्रयोग केले? इ.इ. आत्ता लक्षात आले की त्या पेप्राचा दुवा का माहीत नाही, आधी चिकटला गेला नव्हता... हा घ्या येथे... तुम्ही वाचून त्यात काय म्हणले आहे ते लक्षात घेऊ शकता. तुमच्या सारख्याला माझ्यासारख्याने सांगणे योग्य वाटत नाही... मी पडलो फंडू - आय मीन फंडामेंटल हिंदू ;) मी बोलून कसे चालणार?

In reply to by विकास

हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची माशी न उडवता सांगितले आणि तुम्ही ते गांभिर्याने घेतले. विश्वास ठेवला आणि त्याचा उपयोग माहिती न शोधता कुणाला तरी ठोकायला केला. प्रश्न विचारून खात्री कराविशी वाटली नाही का? बघा तुमच्यावर विश्वास असल्याने मी पण आधीच सहमती दर्शवली होती... ;) असो.
उगा काहीतरीच?
आत्ता लक्षात आले की त्या पेप्राचा दुवा का माहीत नाही, आधी चिकटला गेला नव्हता... हा घ्या येथे... तुम्ही वाचून त्यात काय म्हणले आहे ते लक्षात घेऊ शकता. तुमच्या सारख्याला माझ्यासारख्याने सांगणे योग्य वाटत नाही... मी पडलो फंडू - आय मीन फंडामेंटल हिंदू ;) मी बोलून कसे चालणार?
हेही आपले उगीच आहे. बाकी पुस्तीची गरज नव्हती.

यातूनही स्वतःला सोयीस्कर असा आणि तेवढाच अर्थ घेऊन हिंदू धर्म कसा पुरोगामी, विज्ञानवादी, सर्वश्रेष्ठ आहे असाच प्रचार केला जाईल. प्रत्यक्षात हिंदू धर्मातील साचलेपणा आणि इतर जे काही दोष असतील ते जिथल्या तिथेच राहतील. बाकी लेख रा. स्व. संघाला छान चिमटे काढणारा आणि उपरोधिक झाला आहे.

छ्या! हिंदू धर्मातल्या वैदिक विज्ञानाची खिल्ली उडवायचे काम नाही सांगतो, भारतीय ईतिहासातील घोडचुका आणि जागतिक इतिहासातील खिंडारे ही पु ना ओक यांची पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन मोदी काकांनी घोषित करावीत

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो,वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????
तुम्हाला कोणी सांगितलय हो हे ? उगाचच कोणाच्या काहीतरी बोलण्यावरुन काहीतरी मते बनवायची अन मग विरोध करत बसायचे ... ? बाकी , गणितामध्ये भारतीयांनी प्रचंड प्रगती केली होती ह्यात शंका नाही पण तुम्ही मात्र नेमका तोच उल्लेख टाळलेला आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचंड प्रगती केली होती ह्यात शंका नाही पण तुम्ही मात्र नेमका तोच उल्लेख टाळलेला आहे !" अहो, कदाचित ते विसरले असतील. किंवा कदाचित त्यांना असलेले ज्ञान त्यांना इथे मिपाकरांना द्यायचे पण नसेल. आता हेच बघाना, गेले कित्येक दिवस, ते "http://misalpav.com/comment/reply/31763/712577" ह्या बाबत काहीच ज्ञान देत नाही आहेत. आता बोला. (फुजि ह्यांच्या ज्ञानकणांचा फॅन) मुवि

In reply to by प्रसाद गोडबोले

@प्रगो,बंधो ,वेदांमध्ये अफाट विज्ञान आहे हे कुणि सांगायला का हवे, जसा सुर्याच्या प्रकाशाने सर्वांचेच डोळे दिपतात तसेच वेदातल्या ज्ञानाचं आहे, जे ज्ञानसाधनेच्या मार्गावरील पांथस्थाला वाट दाखवन्याचे अविरत कार्य करत आहेत. पण या अफाट विज्ञानाचा गैर वापर होऊ शकतो हे आपल्या प्राचीन ऋषिमुनींना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी संस्कृतसारख्या देवभाषेत हे ज्ञान लिहून ठेवले. नुकतेच max plank institute of planetary sciences चे संशोधक फ्रेडरीक वॅन गॉफ यांनी ऋग्वेदातल्या फक्त काही ऋचांचा अभ्यास करुन ion engine चा शोध लावला आहे, आता मनुष्य सलग अनेक वर्श अंतराळात प्रवास करु शकतो.आह्हात्त क्कुठ्ठे!!!!!!!!!!

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

थोडक्यात आपण कोणताच रेफरन्स द्यायला तयार नाही आहात तर ! तुमचे म्हणणे म्हण्जे नुसती हवा आहे तर !

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

"वेदांमध्ये प्रचंड विज्ञान आहे त्यामुळे त्यावर पुरोगामी लोक टिका करुन वेदांना बदनाम करत असतात.आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स,जेनेटिक इंजिनिअरींग,सबॲटोमीक फिजिक्स,थिअरॉटीकल फिजिक्स,बायोमेकॅट्रोनिक्स,कॉस्मॉलॉजी, इव्हॉल्युशनरी बायॉलॉजी हे सगळे ज्ञान आमच्या वेंदांमध्ये होते , पाश्च्यात्य ख्रिस्ती लोकांनी जुने ग्रंथ व वेद इथुन तिकडे नेले व आज ते आम्हालाच विज्ञान शिकवत आहेत.आ हा त कु ठे ??????" वरील माहितीबद्दल धन्यवाद..... पण काय हो, तुम्ही पण, काही गोष्टी इथे मिपावर सांगणार होतात ना? त्याचे काय झाले? लिंक देत आहे. "http://misalpav.com/comment/reply/31763/712577"

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

तुम्ही तो विषय इथेच काढला आहे. तो इथेच व्यक्त करा. तुमच्या ज्ञानकणांचा फायदा सगळ्यांनाच होवू दे.

In reply to by मुक्त विहारि

@ फु.जी.. वैदिक ऋचांमध्ये सूर्याच्या रथाला ७ घोडे असल्याचा उल्लेख आहे. सूर्यप्रकाश ७ रंगांत विभाजीत होतो हे वैज्ञानिक सत्य तुम्हाला माहीत असेलच.. या साम्यस्थळाचे स्पष्टीकरण काय? वेदांतील १००% गोष्टींत वैज्ञानिक सत्य नसेल पण काही काही सत्ये तर नक्कीच दडलेली आहेत.

In reply to by मांत्रिक

खरय हो! फक्त वेदातले हे ज्ञान सरळ सांगितले असते तर् लोकांनी त्याचा गैरवापर केला असता म्हणून रथाची चाके , घोडे अशा सांकेतीक भाषेत ते सांगिअतले . एवढेच प्रसिद्ध फ्रेंच वैज्ञानिक लई झूटोस्की यांचेही असेच म्हणने आहे,2000 साली याविषयीचा त्यांचा लेख national institute of advancement of science च्या proceeding's मध्ये आला आहे. लिंक मिळाल्यास देईनच...

In reply to by मांत्रिक

रंग अनेक असतात. त्यातले सात दिसतात. इन्फ्रारेड , अल्ट्रावायोलेट दिसत नाहीत... ज्ञान नेमक्या भाषेत सांगावे लागते.. आजकालच्या जमान्यात तरच त्याला मान्यता मिळते.

In reply to by dadadarekar

हितेस भाऊ जे दिसतात त्यांना रंग म्हणतात. इन्फ्रा रेड किंवा अल्ट्रा व्हायोलेट हे रंग नव्हे तर तरंग आहेत. ज्ञान नेमक्या भाषेत सांगावे लागते असे म्हणालात म्हणून लिहिले अन्यथा पास दिला असता.

In reply to by dadadarekar

परत तेच जे दिसतात त्यांनाच रंग म्हणतात जे दिसतात आणी दिसत नाहीत(अदृश्य आहेत) अशा सगळ्याना तरंग म्हणतात. सगळे रंग हे तरंग आहेत पण सगळेच तरंग हे रंग नव्हेत.

In reply to by सुबोध खरे

आपापल्या पट्टीत गावे.. काळी दोन काय नी पांढरी पाच काय ! आपली पट्टी सोडू नये. .... पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचा गाववाला ... ( उस्ताद दादाखान कुरुंदवाडकर )

In reply to by dadadarekar

दादूस, तुमी नुसता अवैचारीक वितंडवाद घाला हो, त्यात तुमचा हातखंडा आहे. उगा शास्त्रिय कारण्परंपरेत घुसू नका... कारण तिथे तुम्ची पय्ल्याच बॉल्ला विकेट पड्तिया =)) =))

In reply to by सुबोध खरे

इथे थोडी चुक झाली आहे. " सर्व रंग हे तरंग असतात." जे तरंग मानवी डोळे बघु शकतात त्यांना आपण रंग म्हणून ओळखतो. इतर प्राणी वेगळे तरंग बघु शकतात.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

>>> भारतीय ईतिहासातील घोडचुका आणि जागतिक इतिहासातील खिंडारे ही पु ना ओक यांची पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणुन मोदी काकांनी घोषित करावीत चुकलात नाना! त्याऐवजी तुमच्या लाडक्या खेडेकर आणि कोकाटेची महान पुस्तके राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर व्हायला हवीत.

हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद करणं हि अतिशय चांगली गोष्ट आहे . इतर धर्मियांचं काय ? भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे,
ह्या अंधश्रधा आहेत म्हणणार्यांना त्या करायला जमत नाहीत . ह्या गोष्टी खरोखर अस्तित्वात आहेत . अंधश्रद्धा नाहीत . पण त्या करण जमत नसताना आपल्याला जमतात असं खोटंच सांगणं ,त्यासाठी पैसे उकळणं , अत्याचार करणं , फ़सवणं हे मात्र गुन्हे आहेत . एखाद्याकडे अतींद्रिय शक्ती खरोखर असेल पण त्याचा दुसर्याला काहीच त्रास होत नसेल तर अशी शक्ती असणं हा गुन्हा ठरत नाही .
चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग
हे हवेच्या प्रदूषणात येतात ? थोडक्यात हिंदू धर्म लोकांनी सोडूनच द्यावा असं म्हणायचय तुम्हाला .
जर असे असेल तर मग गोमांसाबद्दलचे विचार पाहता प्राचीन भारतातील ऋषींची बौद्धिक पातळी एकदम खालच्या पातळीवर होती असेच म्हटले पाहिजे.
आधार ?मुल्ला मौलवींची बौद्धिक पातळी काय आहे ह्याच्यावर हि बोला अतिशय गैरसोयीचा असलेला काळा रंगाचा बुरखा वापरायची सक्ती ,शिक्षण घेण्याला बंदी , पहटे ५ लाच मशिदीतून ओरडून लोकांची झोपमोड करणं (ध्वनिप्रदूषण),४ बायका करून व्यभिचार करणं, शेखसल्ल्याच्या उर्सामध्ये मोठमोठ्या दाभणी टोचणं (ह्या दाभणी फक्त सध्या पाण्यात धुतल्या जातात . त्याच पुढच्या वर्षी दुसर्यांसाठी वापरतात . ) , ताबूत च्या वेळी अनैसर्गिक त्रास करून घेणं आणि इतरांवर तशी सक्ती करणं ,बकरी ईद च्या नावाखाली हजारो मुक्या जीवांची कत्तल करणं, माझाच धर्म मोठा बाकी सगळे काफर म्हणून त्यांना हिणवण ,सतत त्यांच्यावर टीका करणं, दंगली करणं , अजिबात स्वच्छता न पाळणं ह्या सुधा सगळ्या अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद करायला हवे .

In reply to by मांत्रिक

आम्ही पुर्वाश्रमीचे ब्राह्मण. त्यामुळे आम्ही स्टाफला मिसळ देऊन इद साजरी केली.

In reply to by dadadarekar

धर्म सोडून झाल संस्कार गेले नाहीत … काय पावर नाई

In reply to by तुडतुडी

अतिशय गैरसोयीचा असलेला काळा रंगाचा बुरखा वापरायची सक्ती ,शिक्षण घेण्याला बंदी , पहटे ५ लाच मशिदीतून ओरडून लोकांची झोपमोड करणं (ध्वनिप्रदूषण),४ बायका करून व्यभिचार करणं, शेखसल्ल्याच्या उर्सामध्ये मोठमोठ्या दाभणी टोचणं (ह्या दाभणी फक्त सध्या पाण्यात धुतल्या जातात . त्याच पुढच्या वर्षी दुसर्यांसाठी वापरतात . ) , ताबूत च्या वेळी अनैसर्गिक त्रास करून घेणं आणि इतरांवर तशी सक्ती करणं ,बकरी ईद च्या नावाखाली हजारो मुक्या जीवांची कत्तल करणं, माझाच धर्म मोठा बाकी सगळे काफर म्हणून त्यांना हिणवण ,सतत त्यांच्यावर टीका करणं, दंगली करणं , अजिबात स्वच्छता न पाळणं
थोड्याफार फरकाने कित्येक हिंदूंतही ह्याच चालिरीती आढळतात तसेच सरसकट सगळ्या मुसलमानांंमधे आढळत नाहीत. तुमची 'हिंदू' या शब्दाची काय व्याख्या आहे? त्यात भारतातल्या सगळ्या जाती-प्रदेश-पंथ येतात ना? (अर्थात मुस्लिम सोडून) मग 'अभ्यासोनि प्रगटावे | अन्यथा झाकोनि असावे | प्रकटोनि नासणे । बरे नव्हे|' १. पहाटे चारपासूनच कित्येक मंदीरांचे भोंगे काकडारत्या उगाळत अस्तात. त्या आपल्या म्हणून त्रास होत नाही. २ एकापेक्षा अधिक बायका करण्याचा रिवाज हिंदूंमधेही आहे. आत्ता आत्ता कायद्याने बंदी आली म्हणून बंद झाले (तेही वर वर). नाही तर 'पूर्वजांची सांगे किर्ती' वाल्यांनी जरा वंशावळ्या धुंडाळाव्या. व्यभिचार करायला लग्न करावंच लागतं असं नाही. दर्शनी एक बायको ठेवायची मग वेश्यालयात मुशाफिरी करायची हा काही एका विशिष्ट धर्माचा प्रांत नाही. ३. कित्येक हिंदू जत्रांमधे उरुसांपेक्षाही अनेक हिंसक, विभत्स, मूर्ख प्रकार बघायला मिळतात. दरवर्षी ह्या देवीच्या, त्या देवाच्या नावाने लाखो प्राणी तर हिंदूही मारतातच. फक्त मुसलमानांनी मारलेले बकरेच बरे डोळ्यात खुपतात... ४. माझीच जात मोठी, माझाच धर्म मोठा असं हिंदू करत नाहीत? अहो इकडून तिकडे लग्न केले तर लोक कापून काढतात हिंदूंमधे. धर्म एकच असला तरीही माज आहे मी अमुक तमुक असण्याचा असे मिरवतात हिंदू लोक. ते कोण मग? ५. स्वच्छता पाळणे ह्याचा धर्माशी काय संबंध? तिकडे गंगा बघा, अगदी आरशासारखे स्वच्छ पाणी आहे की नाही? अर्धवट जळलेले मृतदेह सरळ पिण्याच्या पाण्यात, जिला पवित्र माता म्हणतात त्या गंगा नदीत सोडून देतात. ही हिंदूंची स्वच्छता काय? दंगली करणं हा मुद्दा तर सोडूनच द्या. सगळ्या दंगली राजकीय हेतूनी राजकीय लोकांकडून केल्या जातात. दोन्ही धर्मातले लोक दुसर्‍या धर्मातल्या लोकांनी कसे आपल्यावर अत्याचार केले याच्या कहान्या पुढच्या पिढ्यांना सांगत भविष्यातल्या दंगलींची बीजे पेरत राहतात. आता हा किल्मिषांचा बाजार थांबवुया. येणार्‍या पिढ्यांना सिरीया, अफगाणिस्तान सारखा सतत धुमसत राहणारा देश द्यायचा आहे का आपल्याला? त्याचीच बीजे असल्या नकारात्मक, खोट्या, एकांगी प्रतिसादांतून सतत सांडत असतात. सगळ्या मुसलमानांना कायम अतिरेकी ठरवणारे स्वतः आरशात कधी बघणार आहेत? आपणही अतिरेक करून देशाचे वातावरण दूषित करत आहोत हे कळत नाही का? उगा फालतू गोष्टींच्या चर्चा करायच्या. इतकीच जळजळ होती, हिंमत होती, धमक होती तर कश्मिरात पंडीतांना वाचवायला एकही मायचा लाल हिंदूराष्ट्रवादी का नाही गेला? इथे मारतायत नि:शस्त्र, थकलेल्या, बेसावध म्हातार्‍यांना. आले मोठे आम्ही हिंदू हिंदू करणारे. जरा कुणी धर्मसुधारणेच्या चार गोष्टी केल्या की "त्यांना आधी सांगा" असा घोषा का लावता तुम्ही लोक? त्यांचे ते बघून घेतील. तुमची खरकटी तुम्ही साफ करा. तुमच्या तोंडाला खरकटं लागलंय असं कुणी सांगतंय तर लगेच त्याला 'अरे त्या मुसलमानाने तर आठ दिवस आंघोळच नाही केली, त्याला आधी सांग' चा मूर्ख पवित्रा घेता. शतकानुशतके मुक्तधर्माचा पुरस्कार करणार्‍या, सतत उत्क्रांत होत राहिलेल्या हिंदूधर्माच्या सुधारणांचे बेंचमार्क मुसलमान धर्म ठरवून आपण आपल्याच धर्माला कमीपणा आणतो आहोत हे कळत कसं नाही दिडशाहाण्यांना?

In reply to by तर्राट जोकर

शतकानुशतके मुक्तधर्माचा पुरस्कार करणार्‍या, सतत उत्क्रांत होत राहिलेल्या हिंदूधर्माच्या सुधारणांचे बेंचमार्क मुसलमान धर्म ठरवून आपण आपल्याच धर्माला कमीपणा आणतो याच्याशी सहमत. हिंदू धर्मातील भंपक रूढी आणि परंपरा न पूर्ण फाटा दिला पाहिजे हि वस्तुस्थिती असली तरी शेजार्याने वाटेल तिथे गाडी पार्क करायची आणि तुम्हाला त्रास द्यायचा पण तुम्ही मात्र शिस्तीत गाडी लावायची हे सर्वसामान्य माणसाच्या मनाला पटत नाही. नो एन्ट्री मध्ये घुसल्याबद्दल तुम्हाला पकडले आणि तुम्ही दंड भरत असताना त्याच वेळेस एखादा गणवेशातील पोलिस त्याच नो एन्ट्री मध्ये घुसताना आढळला आणि तोच पोलिस तिकडे काना डोळा करताना आढळला तर तुमची जी स्थिती असते तीच आज सर्व सामान्य हिंदू माणसाची आहे. एकदा सर्व जण एक समान आहेत असे म्हटल्यावर सर्व धर्म जाती आणि वर्गाला समान न्याय लावला पाहिजे. तुम्ही तुमचे पहा असे म्हणणे कितपत संयुक्तिक आहे?

In reply to by सुबोध खरे

नो एंट्रीवाले उदाहरण सपाट चुकले आहे. कायदा-सिविक सेन्स आणि धार्मिक चालिरीती दोन्ही मधे मूलभूत फरक आहे. मुसलमानांनी दाढ्या राखल्याने, सुंता केल्याने, बुरखा घातल्याने, चार बायका केल्याने, बकरे कापल्याने, आठ दिवस आंघोळ न केल्याने, रोजा धरल्याने, पाच वेळा नमाज पढल्याने हिंदूंच्या जगण्याच्या/स्वतंत्रतेच्या कोणत्या मूलभूत हक्कांवर गदा येते हे अजून कळलेले नाही. तुमच्या पार्किंगवाल्या उदाहरणास इथे बसवले तर ते सपशेल चुकतंय. तुमच्या उदाहरणानुसार हिंदूस वरील गोष्टी करायची सवलत मिळत नाही आणि मुसलमानास बिनबोभाट मिळते आहे असे तुम्ही मांडत आहात. नेमका कोण तो पोलिस आहे जो हिंदूंना वरील गोष्टी करण्यास (ज्या त्यांना जणू खरंच करायच्या आहेत) नाकारत आहे? हिंदूंचे कायदे हिंदूंनीच बनवले की आणखी कोणी?

In reply to by तर्राट जोकर

@TJ साहेब तुमचे म्हणणे सकृतदर्शनी बरोबर वाटत असेल तरीही जर दुसरी माणसे नो एन्ट्री मध्ये घुसतात तर मीच काय पाप केलं आहे अशा विचाराने आपणही घुसतात आणी वाहतुकीचा खोळंबा होतो. मुसलमानांना चार मुलं असायला धर्माने परवानगी दिली तर हिंदू धर्मातील धर्म मार्तंड हिंदुनी सुद्धा पाच मुले वाढवायला हवी असा आग्रह धरतात आणी त्यामुळे कोणत्याही राष्ट्रीय धोरणाला हरताळ फसला जातो. एकीकडे आपण म्हणायचे समज सुधारणा झाली पाहिजे आणी चार बायका केल्याने कोणते नुकसान झाले ते विचारता? दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? आता तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे तर मग एखाद्याने आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तरणतलावात पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. मतांच्या राजकारणासाठी मुसलमानांना आरक्षण देण्याचे सुद्धा घाट घातले जातात. एकदा एकच न्याय सर्वाना लावला जाईल हा घटनेतील मूळ मुद्दा ( कलम १४) लाच हरताळ फासला गेला कि घटनेची पायमल्ली करायला किती वेळ लागतो? म्हणूनच अबू आझमी सारखे नालायक लोक भर सभेत असे म्हणून शकतात कि "देश के कितने भी तुकडे होने दो! हम किसीको अपने मजहब के साथ खिलवाड नही करने देंगे! माझे म्हणणे एकच आहे सर्वाना समान न्याय मिळेल हे जर घटनेतील मुलभूत कलम आहे तर त्यावर अंमल बजावणी करताना कोणत्याही धर्माचा बागुलबुवा येत कामा नये आणी धर्म हा घरातच राहिला पाहिजे रस्त्यावर येण्यास मनाई च ठेवली पाहिजे या उप्पर आपल्याला वितंडवाद घालायचा असेल तर माझा पास

In reply to by सुबोध खरे

परत परत तेच. तुमची पोस्ट परत एकदा वाचा आणि तुम्हाला वितंडवाद म्हणजे काय हे लक्षात येइल. धर्म घरात ठेवा म्हणायचं आणि लोकांच्या बेडरूममधे डोकावून बघायचं ह्याला काय अर्थ. एकीकडे आपण म्हणायचे समज सुधारणा झाली पाहिजे आणी चार बायका केल्याने कोणते नुकसान झाले ते विचारता? दुसरी बायको केल्याने पहिल्या बायकोच्या हक्कावर गदा येते त्याचे काय? समाजसुधारणेची चरचा इथे हिंदूंची चालली आहे. एका मुस्लिमाच्या कितव्या बायकोच्या कोणत्या हक्कांवर गदा येते हे बघणे हे हिंदूंचे काम आहे की मुस्लिम सुधारकांचे? हिंदूंची बहुपत्नित्व प्रथा हिंदूंनी बंद केली की इतरांनी? आता तुम्हाला असे म्हणायचे असेल कि मला काय त्याचे तर मग षःएट्खाऋय़ाणीओ आत्महत्या केली तरी मला काय फरक पडतो? किंवा लोकांना पिण्याचे पाणी नसले तर मला काय फरक पडतो माझ्या तर्न्तालावत पाणी असले कि झाले हे म्हणण्य़ासारखे आहे. - हा वितंडवाद. नागरी, शासकिय, राजकिय धोरणांचा आणि धार्मिक चालीरीतिंचा बादरायण संबंध दाखवून बुद्धीभ्रम करायचा. अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य फार मनाला लावून घेताय. तोगडीया प्रभृती काही वेगळ्या नाहीत. त्याबद्दल काय मत? समान नागरी कायदा व धर्म रस्त्यावर येऊ नये ही सूचना हिंदूच स्वतः किती पाळतात ते बघायला उत्सूक आहोत.

In reply to by तर्राट जोकर

अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य फार मनाला लावून घेताय. हा माणूस आपला लोकनियुक्त प्रतिनिधी( आमदार) आहे आणि तो देशाचे तुकडे करण्याची भाषा बोलतो आहे आणि तुमचे म्हणणे ते मनाला लावून घ्यायचे नाही? बाकी आपली विचार सरणी पाहून आमचा पास तोगडिया आणि अबू आझमी यांना एकाच न्याय लावला पाहिजे याबद्दल दुमत नाहीच. जाता जाता -- आपण सरकारी नोकर आहात काय?

In reply to by सुबोध खरे

मतपेटीकडे डोळे ठेवून लोकनियुक्त प्रतिनिधींनी आतापर्यंत किती आणि काय काय वादग्रस्त बोलले आहे याचा आपला किती अभ्यास आहे हे माहित नाही. पण अबू आझमींसारख्यांच्या निवडक वक्तव्यांना सिंगल-आउट करून "हे असलेच" असा छापा तमाम मुस्लिमांवर मारण्याचे काय प्रयोजन? तसेच या वक्तव्यांना मनाला लावून घेणार्‍या राष्ट्रप्रेमी-देशप्रेमी लोकांनी उत्तरादाखल काय केले हेही सांगितले तर बरे होईल. तुमच्या पासचे विशेष कौतुक नाही. आमच्या एकाक्ष विचारसरणीसमोर रंगीत चष्मे घालणार्‍यांची डाळ शिजत नाही हा नेहमीचा अनुभव आहे. तोगडीया-अबूआझमी ला एकच न्याय लावत आहात याबद्दल धन्यवाद! जाता जाता: सरकारी नोकरीत तेही लष्करात आपण होता असे कळते. इतकी वर्षे तिथे काढूनही असले रंगीत विचार बघून मौज वाटली.