तेवढं म्हसरावर लक्ष ठेवा
तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच.
व्हय, बांधावरच घडलं आसं.
मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात.
रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार.
तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू.
जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं. सरळ माझ्याकडचं येत चालली.
"कारं राजाभाव हीरीवर चालला व्हय?" हातातलं खुरपं डोक्यावर धरत तिनं ईचारलं.
"व्हय, लाईट गीलती, बघतू आलीय का, मक्यावर पाणी सोडलयं" मी बी आपलं टावेलानं तोंड पुसत पुसत बोललू.
"बराय बाबा, पाणी तरी हाय हीरीला, बायकु कुठं दिसत न्हाय?" हीला नस्त्या चौकश्या.
"आसलं घरीच , घर सारवाय काढलयं"
"सरपानाला काय आसल तर बघु कारं? सकाळच्याला पाणी तापवायला हुईल तेव्हढचं" आस्सं, म्हंजी हीला सरपानाला आमचचं शेत घावलं तर.
"आगं बघकी, त्या तिथं एक बाभळ वाळलीय, बघ काय घावतयं का, काटकुटं बघुन जा" म्या तिला वाट मोकळी करुन दिली.
तशी शितली पुढं गीली. ही शितली मजी पवाराच्या रामाची बायकु. बाय नुसती उफाड्याची. माझ्यासंग आपणहुन बोलायची.
मी आपला बुजरा गडी, परक्या बायशी बोलताना जरा चार हात लांबच ऱ्हायचू. पण ह्या शितलीसंग गुलुगुलू बोलू वाटायचं. लय दिसापस्न नजर ठिवून व्हतु पर काय हातात घावली न्हाय.
हिरीवर गीलु. लाईट आली नव्हती. थुडी वाट बघुन परत मळ्यावर आलू.
शितली खुरप्यानं लाकडं तोडत व्हती.
म्या उगाच इचारायचं म्हणून ईचारलं.
"काय गं, इकटीला येवडा भारा झेपल का? नस्ता न्हीव लागतू घरापतुर"
"कशाला राजाभाव, मला सवय हाय, तसबी सरपान सांच्यालाच न्हेनार हाय, आता नुसतचं बांधून ठिवतीय"
"आसं, मग आता कुठं दौरा हाय?"
"लय ऊन झालय बघ, आता पलिकडं माळयाच्या खोपीत जाऊन पडणार हाय, तेवढच बरं वाटतं जीवाला, सांच्याला जाताना ह्यो भारा बी घीऊन जाईन"
आयला बराय हीचं, माळ्याच्या खुपीत आतापतुर हरीभाऊचा कब्जा हुता. पण म्हातारं गेलं पंधरा दिवस लेकीकडं गेलतं. खुपीत आता कोणच न्हवतं. मी पण ऊन्हाचं तिकडचं पालथा पडायचू.
शितलीनं भारा बांधुन लिंबाच्या झाडाखाली ठिवला. साडीवरनं पालापाचुळा झटकला.
म्हशीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली "कालवाड का लांब बांधलीयं? सावलीत बांध की लिंबाच्या"
"आगं म्हशी ढोसऱ्यात्यात, सारखं त्यंच्यावर ध्यान ठिवाय लागतं"
" बरं राजाभाव, जाव कारं? डोकं लय ठणकायला लागलयं, ह्या उनात नकू नकू झालयं" शितली खुपीकडं जात जात म्हणाली.
"चालतयं की, मी हाय हीतच, काय लागलं तर सांग" मी आपला तिला पाठीमागनं बघत बोललू.
शितली बांधावरनं खुपीकडं निघाली, जरा पुढं गीली नसल तर मधनचं माझ्याकडं वळुन बघत म्हणाली "आली आसल तुला बी झोप तर यी रं म्हागणं, खुपीत लय जागा हाय".
डुलक्या चालीनं शितली पुढं पुढं जात ऱ्हायली. माझ्याकडं एकदा नजर रोखुन झटक्यात खुपीत शिरली.
मायला हीचा डाव समजायला जरा येळच लागला. पर शेवटी हातात घावलीच म्हणायची.
शितली खुपीत झुपली आसलं. मलाबी थुडी जागा ठिवली आसलं. आता डोळ्याला बी जरा पेंग याय लागलीय. तवा मंडळी, मी हाय खुपीत , तुम्ही तेवढं म्हसरावर लक्ष ठिवा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झकास!,
तुम्ही रामभाव का राजाभाव?
चुक रिपेअरींगला पाठवली आहे.
जव्हेरगंज म्हणजे काय हो ?
कडब्याची कशी गंज असते तशी
किंवा रत्नाने जवाहिराने
नायतर हिरे मोती ह्यांना गंज
मायला, या ढेपिनिशन्स कुटुन
जब कोइ मिपाकर होताहय तब वह
वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल
वाघुळमानसास ब्हवतेक माहीत आसल
जव्हेरगंज!!
तुम्हीच का त्या? खफवर माझं
जव्हेरगंज!!
गावातल्या बर्याच जनांच्या
तुमी समध्या गावाचे गुडघे
बघायला कशाला पायजे ?
आयला, आसं पण आसतय व्हय?
हंगाशी.....
जरा त्ये क्रमशः लिवायचं
त्ये इलच हो, पण त्यो टक्या
टक्या म्हनलं, जरा मिपावर लक्ष
ही 'टक्या' नक्की काय भानगड
मस्तं....
मस्त
लै भारी
कडक!
टाकु काय? :)
झोप
जरा आजुन एक डुलका काढु द्या.
हे तर सांटा बांटा च्या पुढचंय
लगता हय हमारे डुलके का मतलब
नशीब. लयनीवर हायसा. बाकी झापा
आयला!
लई वेळा टाका राव.
हा हा हा.........
भन्नाट!
जबरदस्त. कथेचा ग्रामीण बाज
है हा हुर्रर्र......च च च
कायबी करा, पर लवकर धरा. तिला
हो हो हो हैं हैं हैं.......
एखादा 'रेडा' दिसतुय का बघा
हात्तीच्या मारी
दुस्रा
काय नाखु काका,
प्यारे भौ
त्ये पुढ असा झालं...
दं ड व त.
आगाआयाया….
हा हा हा