✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तेवढं म्हसरावर लक्ष ठेवा

ज
जव्हेरगंज यांनी
Mon, 09/21/2015 - 23:32  ·  लेख
लेख
तर मंडळी, डोळ्यात जरा पेंग याय लागलीय. तरीबी तुमाला सांगतुच. व्हय, बांधावरच घडलं आसं. मी दारं धरत बसलू होतू. म्हशी लिंबाखाली बांधल्या व्हत्या. कालवाडाचं दावं जरा लांब ठिवूनच बांधलं व्हतं, न्हायतरं म्हशी त्येला ढोसरतात. रानात चिटपाखरु नव्हतं. ह्यो ऊनाचा कार. तेवढ्यात लाईट गीली. कटाळा करत उठलू, आन हीरीवर मोटर चालु कराय चाललू. जाताना वाटत शितली दिसली.बहुतेक खुरपाय चालली व्हती. घट्ट साडी नेसली व्हती, आंग कसं एकदम भरल्यालं वाटत हुतं. सरळ माझ्याकडचं येत चालली. "कारं राजाभाव हीरीवर चालला व्हय?" हातातलं खुरपं डोक्यावर धरत तिनं ईचारलं. "व्हय, लाईट गीलती, बघतू आलीय का, मक्यावर पाणी सोडलयं" मी बी आपलं टावेलानं तोंड पुसत पुसत बोललू. "बराय बाबा, पाणी तरी हाय हीरीला, बायकु कुठं दिसत न्हाय?" हीला नस्त्या चौकश्या. "आसलं घरीच , घर सारवाय काढलयं" "सरपानाला काय आसल तर बघु कारं? सकाळच्याला पाणी तापवायला हुईल तेव्हढचं" आस्सं, म्हंजी हीला सरपानाला आमचचं शेत घावलं तर. "आगं बघकी, त्या तिथं एक बाभळ वाळलीय, बघ काय घावतयं का, काटकुटं बघुन जा" म्या तिला वाट मोकळी करुन दिली. तशी शितली पुढं गीली. ही शितली मजी पवाराच्या रामाची बायकु. बाय नुसती उफाड्याची. माझ्यासंग आपणहुन बोलायची. मी आपला बुजरा गडी, परक्या बायशी बोलताना जरा चार हात लांबच ऱ्हायचू. पण ह्या शितलीसंग गुलुगुलू बोलू वाटायचं. लय दिसापस्न नजर ठिवून व्हतु पर काय हातात घावली न्हाय. हिरीवर गीलु. लाईट आली नव्हती. थुडी वाट बघुन परत मळ्यावर आलू. शितली खुरप्यानं लाकडं तोडत व्हती. म्या उगाच इचारायचं म्हणून ईचारलं. "काय गं, इकटीला येवडा भारा झेपल का? नस्ता न्हीव लागतू घरापतुर" "कशाला राजाभाव, मला सवय हाय, तसबी सरपान सांच्यालाच न्हेनार हाय, आता नुसतचं बांधून ठिवतीय" "आसं, मग आता कुठं दौरा हाय?" "लय ऊन झालय बघ, आता पलिकडं माळयाच्या खोपीत जाऊन पडणार हाय, तेवढच बरं वाटतं जीवाला, सांच्याला जाताना ह्यो भारा बी घीऊन जाईन" आयला बराय हीचं, माळ्याच्या खुपीत आतापतुर हरीभाऊचा कब्जा हुता. पण म्हातारं गेलं पंधरा दिवस लेकीकडं गेलतं. खुपीत आता कोणच न्हवतं. मी पण ऊन्हाचं तिकडचं पालथा पडायचू. शितलीनं भारा बांधुन लिंबाच्या झाडाखाली ठिवला. साडीवरनं पालापाचुळा झटकला. म्हशीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली "कालवाड का लांब बांधलीयं? सावलीत बांध की लिंबाच्या" "आगं म्हशी ढोसऱ्यात्यात, सारखं त्यंच्यावर ध्यान ठिवाय लागतं" " बरं राजाभाव, जाव कारं? डोकं लय ठणकायला लागलयं, ह्या उनात नकू नकू झालयं" शितली खुपीकडं जात जात म्हणाली. "चालतयं की, मी हाय हीतच, काय लागलं तर सांग" मी आपला तिला पाठीमागनं बघत बोललू. शितली बांधावरनं खुपीकडं निघाली, जरा पुढं गीली नसल तर मधनचं माझ्याकडं वळुन बघत म्हणाली "आली आसल तुला बी झोप तर यी रं म्हागणं, खुपीत लय जागा हाय". डुलक्या चालीनं शितली पुढं पुढं जात ऱ्हायली. माझ्याकडं एकदा नजर रोखुन झटक्यात खुपीत शिरली. मायला हीचा डाव समजायला जरा येळच लागला. पर शेवटी हातात घावलीच म्हणायची. शितली खुपीत झुपली आसलं. मलाबी थुडी जागा ठिवली आसलं. आता डोळ्याला बी जरा पेंग याय लागलीय. तवा मंडळी, मी हाय खुपीत , तुम्ही तेवढं म्हसरावर लक्ष ठिवा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कथा
भाषा
समाज
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17000 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

सप्तरंगी पोपट कसा दिसतो याचे

प्यारे१
Sat, 09/26/2015 - 12:13 नवीन
सप्तरंगी पोपट कसा दिसतो याचे तंतोतंत वर्णन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

___/\___

बोका-ए-आझम
Sat, 09/26/2015 - 12:40 नवीन
पैजारबुवा की जय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

समदा इस्कुटचं केला की राव!

जव्हेरगंज
Sat, 09/26/2015 - 18:13 नवीन
समदा इस्कुटचं केला की राव! बाकी आमच्या अेठ पॅक्सला बरगड्या म्हटल्याबद्दल शितलीचा निषेध...! -(पळुनपळुन दमलेला) राजाभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

=))

पैसा
Sat, 09/26/2015 - 18:30 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मस्त गावरान भाषेचा बाज.

ज्योति अळवणी
Sat, 09/26/2015 - 12:26 नवीन
मस्त गावरान भाषेचा बाज. आवाडली
  • Log in or register to post comments

पैजारबुआ

दा विन्ची
Sat, 09/26/2015 - 22:14 नवीन
दं ड व त. अगगगगग!!! _/\_!!!!! ठ्ठो!!!
  • Log in or register to post comments

पैजारबुवा

दा विन्ची
Sat, 09/26/2015 - 22:31 नवीन
पैजारबुवा तुमी एवढ चालू असशीला आसं वाटल न्हवत . सुमडीत आणि बाकी ग्यांग्ला पद्धतशीर टांग मारून तुमी कवा आला ते मला कळलंच न्हाई बघा. हेच्या म्होर गावातलं कोन्च्बी लफड तुमाला पत्त्या लागू देणार न्हाय बघा
  • Log in or register to post comments

म्हसाडाकं ध्यान ठुनच ह्ये आम्हि समदी

भीडस्त
Sun, 09/27/2015 - 00:59 नवीन
पर तुम्ही शीतलीवं बईद्वार ध्यान ठिवा सोयरं कसं ह्ये कनि बाईचं खुरपं लयीच् वाखं ह्ये..... खुरप्यानि डायरिक बाभळिची लाकडं तोडिती म्हयी काय खरं नाय पघा.... तुम्ही आपला आयवज सन्भाळून ठ्वा....... उगं दहा मिंटापाई हावय ग्येली नं धावय गेली आसं म्हणित आयुश्यभर त्वोंड झोडून घ्याया लागण् पघा..
  • Log in or register to post comments

खुरपं भाऱ्यापशीच ठिवलयं पघा

जव्हेरगंज
Sun, 09/27/2015 - 11:39 नवीन
खुरपं भाऱ्यापशीच ठिवलयं पघा तिनं, लिंबाखाली नव्हं. ( बाभुळ म्होरल्या अंगाला, घ्या पघुन) तवा आयवजाला काय ईशेष धोका न्हाय. धा मिंट्ट? ह्या, आता सांच्यापतुर ताणुन देणार हाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

आजूक य्येक

भीडस्त
Sun, 09/27/2015 - 01:03 नवीन
खुरपं न बाभळ पघाया भेट्न का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा