आज गुगल प्रमुख सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीच्या भेटी निमित्ताने स्वागत संदेशगुगल इंडीयाच्या युट्यूब चॅनलवर ठेवला आहे. एकीकडे बॉबी जिंदाल सारखा अमेरीकन रिपब्लीकन राजकारणी जो स्वतःची भारतीय मुळे लपवायचा प्रयत्न करत आहे तिकडेच सुंदर पिचाईंसारखा तरूण सिइओ, लोकं काय म्हणतील वगैरेचा विचार न करता, गुगल इंडीयाचॅनलवर मोदींचे स्वागत करतो, हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
भारतीय असणे हे न लपवणे, मोदींचे स्वागत हे माझ्या दृष्टीने किरकोळ मुद्दे आहेत... एखाद्या होतकरू उद्योजकास जर स्वतःच्या उद्योगाकरता, मदत करून घेण्यासाठी म्हणून वगैरे जर मोठ्या व्यक्तीस (जसे की गुंतवणूकदार, एखाद्या मोठ्या कंपनीचा सिईओ वगैरे) यांना पटकन आपण काय देऊ शकतो हे सांगून लक्ष वेधून घेयचे असेल तर ते अगदी थोडक्यात सांगून उत्सुकता निर्माण करावी लागते. लिफ्ट/इलेव्हेटर मधून खालच्या मजल्यावरून एकदम वरच्या मजल्यावर पोहचे पर्यंत हा आपल्या ताब्यात आहे असे गृहीत धरून तेवढ्या वेळेत ते सांगावे लागते. त्याला "इलेव्हेटर पिच" असे म्हणतात हे इथे अनेकांना माहीत असले तरी संदर्भ म्हणून सांगतो...
जी गोष्ट होतकरू उद्योजकाची असते तीच गोष्ट मोठ्या उद्योगांना मोठी बाजारपेठ मिळवण्यासाठीची असते. म्हणूनच, केवळ २ मिनिटे १९ सेकंदाच्या या संदेशात आपल्याला हवे ते प्रभावीपणे कसे दाखवता/सांगता येऊ शकते ह्याचा हा संदेश एक उत्तम नमुना आहे, अर्थात इंग्रजीत सांगायचे झाले तर एक छोटीशी केसस्ट्डी आहे. त्यात बरेच काही शिकण्यासारखे वाटल्याने एक विश्लेषणः
०-०:१९ स्वागत आणि आमंत्रण - मोदींचे स्वागत, गुगलर्स (म्हणजे स्वतःच्या कंपनीची तात्काळ जाहीरात) आणि भारतीय कसे उत्साही झाले आहेत हे सांगत त्यांचे मोठे भाषण आणि गुगल हेडक्वार्टरला भेट हे सांगितले आहे.
०:१९-०:४२ भारत/भारतीय प्रेम/अभिमान - भारत आणि भारतीयांनी (त्यात आय आय टी चा आणि तसेच नाव न घेता इतर संस्थांचा उल्लेख) सिलिकॉन व्हॅलीत कसे योगदान केले आहे. आणि आता भारत कसा या माहिती-तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीतून जात आहे यावर उल्लेख...
०:४२-१:१६ मोदी दूरदृष्टी कौतूक आणि त्याचा होणारा परीणाम आणि - या क्रांती-उत्क्रांतीमुळे भारताचा कसा विकास होणार आहे. किती खेडी जोडली जाणार आहेत, मुली शिकणार आहेत, किती उद्योगांना यातून चालना मिळणार आहेत आणि हे सगळे मोदींनी दिलेल्या डिजिटल इंडीयाच्या दृष्टीकोनाशी कसे जोडलेले आहे याबद्दल...
१:१७ - १:३८ आयटी उद्योगांचा मदतीचा हात - १.२ बिलियन जनतेला मदत करायला गुगल आणि सिलिकॉन व्हॅली कशी सज्ज आहे...
१:३९ - १:५५ मुद्याची गोष्ट. आम्हाला काय करायचे आहे ते - specific... - यामधे गुगलचा वाटा काय? तर गुगल इंटरनेट आणणार, स्वस्त दरातील क्रोमबुक्स जी शाळेतल्या मुलांना देता येतील ती वापरणार, आंतर्जालीय "बांधकामात" पैसे गुंतवणार आणि स्वस्त दरातील अँड्रॉईड फोन्स पण बाजारात आणणार! (थोडक्यात आम्ही "सर्वव्यापी" होणार! ;) )
१:५६ - २:०४ त्यामुळे होणारा विशिष्ठ आणि तात्काळ फायदा - त्यामुळे ५० मिलियन स्त्रीया आणि २० मिलियन उद्योग प्रथमच ऑनलाईन येणार...
२:०५ - २:१९ समारोप - परत एकदा स्वागत करताना आपण कसे पार्टनर आहोत हे ठासून सांगणे.
वर म्हणल्याप्रमाणे, या विश्लेषणाचा उद्देश गुगलवर अथवा पिचई यांच्यावर टीका करणे अथवा कसे चालू आहेत वगैरे म्हणणे हा नाही (तसे मला वाटत देखील नाही), मोदींचे स्वागत कसे केले ह्यावर ताशा बडवणे नाही... मात्र, तुटकपणा, त्रोटकपणा, फक्त काय हवे ह्याचा भडक देखावा न करता व्यवहारात आपले म्हणणे थोडक्यात कसे मांडावे ही कला या निमित्ताने दिसून आली, त्यावर लिहावेसे वाटले, इतकेच काय ते.
वाचने
6587
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्छे दिन येणार कि केवळ 'गाजर
फार छान आणि नेटके!
हेच म्हणतो
In reply to फार छान आणि नेटके! by एस
"अनावश्यक आक्रमकता न दाखवता
प्रभावी संभाषण कौशल्याचा उत्तम नमूना.
माफ करा, पण बॉबी जिंदालला
In reply to प्रभावी संभाषण कौशल्याचा उत्तम नमूना. by पद्मावति
अगदी हेच आणि असंच ! तो
In reply to माफ करा, पण बॉबी जिंदालला by सायकलस्वार
शिवाय उत्तर अमेरिकेत मुळचं
In reply to अगदी हेच आणि असंच ! तो by स्रुजा
ओबामा ला राजकीय द्रष्ट्या
In reply to माफ करा, पण बॉबी जिंदालला by सायकलस्वार
अगदी नेमकं विश्लेषण.
+/-
जिंदाल संदर्भात
In reply to +/- by पिवळा डांबिस
जोरदार टाळ्या
In reply to जिंदाल संदर्भात by विकास
यू आर वेलकम, विकाससम्राट!
In reply to जिंदाल संदर्भात by विकास
सुंदर पिचाईचे भाषण चांगले आहे
सुंदर पिचाईचे भाषण
उत्तम
स्थानिक संस्कृती
(आधुनिक काळातले आक्रमक हे
In reply to स्थानिक संस्कृती by हुप्प्या
(आधुनिक काळातले आक्रमक हे तलवारी आणि बंदुका घेऊन येणार नाहीत तर लोकसंख्येचा बळावर मोठ्या झुंडीने येतील आणि आधुनिक काळच्या समानता, लोकशाही वगैरे हक्कांचा फायदा घेऊन आपले बस्तान बसवतील असे दिसते आहे.)+१ या नाटकाच्या पहिल्या अंकाचा शेवटचा प्रवेश सद्या युरोपात चालू आहे. दुसरा अंक किती आणि कसा रोचक असेल बरे ?!अगदी.
In reply to स्थानिक संस्कृती by हुप्प्या
विकास धन्यवाद !!
छ्या... ज्या लोकांनी गिता
पिचाई आणी जिंदाल