✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 08/27/2015 - 10:50
या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :) तुझे लाघवी बोलणे ते अवेळी तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी जसे पावसाचे अकाली बरसणे तुझे आर्जवी वागणे ते अवेळी लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी लगावली : लगागा लगागा लगागा लगागा वृत्त : भुजंगप्रयात

प्रतिक्रिया द्या
10194 वाचन

💬 प्रतिसाद (36)

छान आहे, गंमत म्हणजे मना

मांत्रिक
गुरुवार, 08/27/2015 - 11:03 नवीन
छान आहे, गंमत म्हणजे मना सज्जना भक्तिपंथेची जावे या चालीवर पण बसतेय! मनाचे श्लोक पण भुजंगप्रयात मध्येच आहेत का? सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं?
  • Log in or register to post comments

होय.

एस
गुरुवार, 08/27/2015 - 11:58 नवीन
होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 08/27/2015 - 17:39 नवीन
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं? चला मेहनत कामी आली तर.. हो, अनुप्रासच. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

झकास! फर्मास!

वेल्लाभट
गुरुवार, 08/27/2015 - 11:38 नवीन
झकास! फर्मास!
  • Log in or register to post comments

तिसरे कडवे फारच छान!

एस
गुरुवार, 08/27/2015 - 11:59 नवीन
तिसरे कडवे फारच छान!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी :)

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 08/27/2015 - 17:38 नवीन
धन्यवाद मंडळी :)
  • Log in or register to post comments

फार आवडली कविता.

स्रुजा
गुरुवार, 08/27/2015 - 17:58 नवीन
फार आवडली कविता.
  • Log in or register to post comments

खूप छान कविता. आवडली.

पद्मावति
गुरुवार, 08/27/2015 - 18:29 नवीन
खूप छान कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

जनरली मी कविता वाचत नाही, पण

उगा काहितरीच
गुरुवार, 08/27/2015 - 19:05 नवीन
जनरली मी कविता वाचत नाही, पण ही वाचली आणि आवडली सुद्धा !
  • Log in or register to post comments

वा वा!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/27/2015 - 19:05 नवीन
वा वा!!
  • Log in or register to post comments

वा! मस्तच.

अजया
गुरुवार, 08/27/2015 - 19:19 नवीन
वा! मस्तच.
  • Log in or register to post comments

सुंदर!

सटक
गुरुवार, 08/27/2015 - 21:05 नवीन
सुंदर कविता!
नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

छान आहे

शीतल जोशी
गुरुवार, 08/27/2015 - 21:55 नवीन
कविता छान आहे !!!!
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
गुरुवार, 08/27/2015 - 22:27 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

झकास

मित्रहो
गुरुवार, 08/27/2015 - 22:32 नवीन
मसत् कविता
  • Log in or register to post comments

_/\_ अप्रतिम!

रातराणी
गुरुवार, 08/27/2015 - 22:51 नवीन
_/\_ अप्रतिम!
  • Log in or register to post comments

@लपे चंद्र मेघांमध्ये

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/27/2015 - 23:08 नवीन
@लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी >> अप्रतीम @मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी >> सल्लामच.. ================ या जब्बरदस्त रचनेबद्दल माझ्याकडून एक रंगावली या रचनेलाच भेट Image removed.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार गुरुजी _/\_

विशाल कुलकर्णी
Fri, 08/28/2015 - 10:36 नवीन
मनःपूर्वक आभार गुरुजी _/\_ सर्व प्रतिसादकांचे खुप खुप धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

केवळ अप्रतिम ! :)

मदनबाण
Fri, 08/28/2015 - 10:38 नवीन
केवळ अप्रतिम ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town
  • Log in or register to post comments

अहाहा!

पैसा
Fri, 08/28/2015 - 10:43 नवीन
किती सुंदर! मस्त! आता कसं छान वाटलं!! कधी कधी ना कविता मुक्तपणे सुचत जाते, जसे मिसळलेला काव्यप्रेमी तसेच लिहितो. पण तुझी मागची कविता पूर्ण मुक्तछंदातही नव्हती. त्यामुळे कल्पना उत्तम होती तरी जरा "समथिंग मिसिंग" वाटत होती. आता काय तक्रार नाय भावड्या!
  • Log in or register to post comments

मस्तच. ये आगई विशालदा स्टाईल

प्रीत-मोहर
Fri, 08/28/2015 - 10:50 नवीन
मस्तच. ये आगई विशालदा स्टाईल कविता :)
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Fri, 08/28/2015 - 10:57 नवीन
मिका कुठेय आणि चाणक्य्/गणेशा दिसेनात. शशक महापूरात हे फिरकेनात की काय मिपावर. साशंक नाखु स्वगतः विशाल्या जबरदस्त.(आहेस तरूण पण लिहितो धीरगंभीराशयी)
  • Log in or register to post comments

आवडली..

पिशी अबोली
Fri, 08/28/2015 - 11:11 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments

काय सुरेख..!!

असंका
Fri, 08/28/2015 - 11:29 नवीन
काय सुरेख..!! सतत याच ओळी आठवायचा प्रयत्न करतोय कालपासनं...बहुतेक पाठही होतील एक दोन दिवसात. धन्यवाद...!!
  • Log in or register to post comments

मस्त गझल आहे

प्रसाद भागवत १९८७
Fri, 08/28/2015 - 11:33 नवीन
मस्त गझल आहे
  • Log in or register to post comments

वा!

प्राची अश्विनी
Fri, 08/28/2015 - 12:08 नवीन
वा!
  • Log in or register to post comments

अशी कौतुके ना कधीही अवेळी

विशाल कुलकर्णी
Fri, 08/28/2015 - 15:18 नवीन
अशी कौतुके ना कधीही अवेळी नसे शब्द गोंजारणे ते अवेळी कुणी कौतुके देत शाबासकीही मनाचेच शेफ़ारणे ते अवेळी मन:पूर्वक आभार मंडळी ! _/\_
  • Log in or register to post comments

सुरेख कविता .

मनीषा
Fri, 08/28/2015 - 15:28 नवीन
सुरेख कविता .
  • Log in or register to post comments

आवडेश

महासंग्राम
Sat, 09/05/2015 - 10:35 नवीन
वा वा जियो….
  • Log in or register to post comments

जल्ला आपल्याला कवितेतली

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/05/2015 - 11:19 नवीन
जल्ला आपल्याला कवितेतली कवडीची अक्कल नाही तरी वाचुन प्रचंड आवडले ह्यात काय ते समजा
  • Log in or register to post comments

मनाला खुपच भावली

दीपा माने
Tue, 09/15/2015 - 21:18 नवीन
तुमच्या कवितेतील शब्दरचना भावनांना सुरेख रूप देतात.
  • Log in or register to post comments

लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने

शुचि
Wed, 09/16/2015 - 00:50 नवीन
लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी
सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी
__/\__
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार मंडळी !

विशाल कुलकर्णी
Wed, 09/16/2015 - 16:15 नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments

आवडली रे गझल! :-)

राघव
गुरुवार, 01/21/2016 - 20:25 नवीन
आवडली रे गझल! :-) स्वगतः मागे बरेच दिवस फिरकला नव्हतास ना मिपावर राघवा.. त्याचेच हे फळ.. बरेच वाचायचे राहून गेलेले दिसतेय.. :(
  • Log in or register to post comments

अरे, हे वाचायचं राहूनच गेलं!

बोका-ए-आझम
Fri, 01/22/2016 - 09:49 नवीन
मस्त गझल/कविता! कवितेतलं काहीही कळत नाही पण ही कविता आवडली!
  • Log in or register to post comments

:-)

चलत मुसाफिर
Fri, 01/22/2016 - 10:11 नवीन
आहाहाहा... स्मृतींचे मनी जागणे ते अवेळी..! :-)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा