तुझे मजवरी भाळणे ते अवेळी
या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :)
तुझे लाघवी बोलणे ते अवेळी
तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी
जसे पावसाचे अकाली बरसणे
तुझे आर्जवी वागणे ते अवेळी
लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने
तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी
सखे आप्त एकांत हा फक्त माझा
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी
नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती
तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी
मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे मंद घोटाळणे ते अवेळी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा
वृत्त : भुजंगप्रयात
छान आहे, गंमत म्हणजे मना
होय.
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं?चला मेहनत कामी आली तर.. हो, अनुप्रासच. धन्यवाद. :)झकास! फर्मास!
तिसरे कडवे फारच छान!
धन्यवाद मंडळी :)
फार आवडली कविता.
खूप छान कविता. आवडली.
जनरली मी कविता वाचत नाही, पण
वा वा!!
वा! मस्तच.
सुंदर!
छान आहे
मस्त
झकास
_/\_ अप्रतिम!
@लपे चंद्र मेघांमध्ये
मनःपूर्वक आभार गुरुजी _/\_
केवळ अप्रतिम ! :)
अहाहा!
मस्तच. ये आगई विशालदा स्टाईल
+१
आवडली..
काय सुरेख..!!
मस्त गझल आहे
वा!
अशी कौतुके ना कधीही अवेळी
सुरेख कविता .
आवडेश
जल्ला आपल्याला कवितेतली
मनाला खुपच भावली
लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने
मनःपूर्वक आभार मंडळी !
आवडली रे गझल! :-)
अरे, हे वाचायचं राहूनच गेलं!
:-)