Skip to main content

मराठी अंताक्षरी

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 17/09/2007 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
चला मराठी अंताक्षरी खेळूया! आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे हरी पाहिला रे र.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 172378
प्रतिक्रिया 317

प्रतिक्रिया

घ्या थ पाहिजे होता ना तुम्हाला. थेंबभर तुझे मन.. ओघळले माझ्यावर.. माझ्यापाशी मागत होते एक पाऊस, एक सर

In reply to by रातराणी

क्या बात है... बर्याचा दिवसांनी आठवल हे गाणं मी आपला थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा पकडुन बसलो होतो. लिहितो "र" वरुन पैजारबुवा,

ही युगा युगांची नाती हळव्या प्रेमाची महती सागरही थांबे तेव्हा ह्या एका थेंबासाठी ठ घ्या.

ठेउन हिम्मत मर्दा वाणी लाव सगळ्यांची वाट अरे तू लाव सगळ्यांची वाट हिम्मत कसली जिवात माझ्या झालीय ग घबराट घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट, (थरथराट मधले लक्ष्याचे गाणे) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

टिम्क्याची चोळी बाई रंगान फुलायली. तुझी माझी जमली जोरी ....... बाय गो ग घ्या (अरे ते टिंब टिंब कोणीतरी सांगा रे)

In reply to by केदार-मिसळपाव

टिमक्याची चोली बाय रंगान्‌ फुलयली तुझीमाझी जमली जोरी माझे वसयकरीन बाय गो पैजारबुवा,

गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण गोर्‍या गोर्‍या वहीनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा बाहुल्यांच्या परी होऊ, दोघी आम्ही सान दादा मला एक वहिनी आण

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्‍नकीळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेजःपुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियेला वेधू. ध घ्या

हसले आज कुणी तू का मी? हो तू का मी!

मी मज हरपून बसले गं, सखी मी मज हरपून बसले गं आज पहाटे श्रीरंगाने, मजला पूरते लूटले गं साखर झोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं

गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे चंद्रसूर्यतारे बादवे, गाण्याच्या भेंड्या म्हणायचं सोडून अंताक्षरी हा हिंदी शब्द का वापरला जातोय?

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा (सर परत या. गाणं रिपीट झालं असल्यास क्षमस्व)

ऋतु हिरवा ऋतु बरवा पाचूचा मनी रूजवा पाचूचा मनी रूजवा हिरवा, ऋतु हिरवा ऋतु बरवा..

विकल मन आज झुरत असहाय हि चांदरात नीज नच त्यात विरह सखी मी कुठवर साहू नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू

नकळत सारे घडले मी वळता पाउल अडले पैजारबुवा,

हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी, मठाची उठाठेव कां तरी वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि, हरीचें नांव भवांनुज तरी पैजारबुवा,

रवी मी हा चंद्र कसा मग मिरवितसे , लावित पिसे त्या जे न साधे गगनी , गमे ते साधेची , तव या वदनी अबलाबल नव हे भासे

लवलव करी पात डोळं नाही थार्‍याला एकटक पाहु कसं लुकलूक तार्‍याला पुन्हा ल ;)

लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का? प्रीत लपवुनी लपेल का? पैजारबुवा,

डोंगरकाठाडी ठाकरवाडी , ठाकरवाडीला हुल्लडहोळी आमची ठाकरवाडी

रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते कून तान विसरन भान ही वाट कुणाची बघते तया सपतसूराचया लाटेवरूनी साद ऐ!कूनी होई राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी

झिणिझिणि वाजे बीन, सख्या रे, अनुदिन चीज नवीन कधि अर्थाविण सुभग तराणा , कधी मंत्रांचा भास दिवाणा सूर सुना कधि केविलवाणा शरणागत अति लीन सख्या रे, अनुदिन चीज नवीन, पैजारबुवा

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच

तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी उजळती अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपति पैजारबुवा

तव नयनांचे दल हलले ग, पानावरच्या दंवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले ग तारे गळले, वारे ढळले दिग्गज पंचाननसे वळले गिरि ढासळले, सूर कोसळले ऋषि-मुनि-योगी चळले ग, पैजारबुवा

गारवा.. वार्‍यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा

वाट इथे स्वप्‍नातिल संपली जणू थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई पैजारबुवा

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे पैजारबुवा

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही... ह

वादळ वारं सुटलं गं वार्‍याने तुफान उठलं गं भिरभिर वार्‍यात पावसाच्या मार्‍यात सजणाने होडीला पाण्यात लोटलं

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली..