होमो नालेदी : आपल्या पूर्वजांचे चुलत कुटुंब
(सूचना : या लेखातली सर्व चित्रे आंतरजालावरील वेगवेगळ्या स्रोतातून साभार घेतलेली आहेत)
आतापर्यंत, म्हणजे अगदी गेल्या काही आठवड्यांपर्यंत सबळ शास्त्रीय पुराव्यांनी मान्य असलेली मानवाची कुळकथा आपण इथे पाहिली होती. अर्थातच ही Australopithecus afarense या आदिमानवापासून पासून ते Homo sapiens sapiens या आजच्या आधुनिक मानवापर्यंतची कुळकथा लक्ष-दशलक्ष वर्षांच्या मोजमापाने मोजली जाते. याचा स्पष्ट अर्थ असा या कथेत बरेच आतापर्यंत न सापडल्यामुळे गाळलेले दुवे आहेत. त्या कालखंडातील Homo नावाच्या कुटुंबाचा Homo habilis पासून सुरू झालेला एकूण भाग अंदाजे २० लाख वर्षांचा आहे ! या कुटुंबातल्या Homo ergaster (१५ लाख वर्षांपूर्वी); Homo heidelbergensis (५ लाख वर्षांपूर्वी) आणि Homo neanderthalensis (२ लाख वर्षांपासून ते ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत) याच्याबद्दल आपल्याला बर्यापैकी माहिती आहे (निदान, आपला तसा आतापर्यंतचा समज आहे :) ). मात्र या सर्व Homo कुटुंबातील इतर सभासदांपेक्षा आपण Homo sapiens sapiens इतके वेगळे आहोत की या सर्व नातेवाईकांशी आपण कसे जोडलेले आहोत याबद्दल आपले ज्ञान १००% खात्रीचे नाही तर केवळ सैद्धांतिक आहे. म्हणजेच आपल्याला इतरांशी जोडणारे अनेक दुवे/साखळ्या अजून नक्की माहीत झालेल्या नाहीत. हा इतिहास अनेक दशलक्ष वर्षांच्या मोठ्या कालखंडावर विखुरलेला असल्याने, त्यातील बरेच पुरावे निसर्गाच्या आघातांनी पुसून गेले आहेत किंवा अस्पष्ट झालेले आहेत. याशिवाय, इतक्या मोठ्या पृथ्वीतलावर इटुकल्या मानवाचे लक्षावधी वर्षांच्या नैसर्गिक आघातांनी मोडतोड झालेले, सांदीकोपर्यात लपून बसलेले, पिटुकले अवशेष कुठे असतील हे सांगणे म्हणजे गवताच्या गंजीत लपलेली सुईच्या जागेचा अंदाज बांधण्यापेक्षा अनेक पटीने जास्त कठीण आहे हे सांगायला नकोच. या पार्श्वभूमीवर, जेव्हा जेव्हा अपघाताने मानववंशातील नातेसंबंधातली एखादी कडी सापडते तेव्हा तिचे महत्त्व लक्षात येणे कर्मकठीण असते. असेच काहीसे २०१३ मध्ये झाले. दक्षिण आफ्रिकेतील जोहानेसबर्ग येथील विटवॉटर्सरँड (Witwatersrand) विद्यापीठातल्या ली बर्गर नावाच्या प्रोफेसरच्या घरी एका रात्री एक हौशी गुहा धुंडाळत फिरणारा (amateur caver) भूगर्भशास्त्रज्ञ त्याला सापडलेला जबड्याच्या जीवाश्माचा (fossil jawbone) तुकडा घेऊन आला. बर्गर नॅशनल जिओग्राफिकचा Explorer-in-Residence आहे. त्याने याआधी २००८ मध्ये Australopithecus sediba ही प्रजाती शोधून काढलेली आहे. हा जीवाश्म महत्त्वाचा आहे असा बर्गरचा प्राथमिक अंदाज होता. परंतू तो इवलासा तुकडा मानवाच्या जीवनकथेत मोठे मानाचे स्थान मिळवेल आणि त्याचबरोबर मानवाच्या इतिहासाबद्दल अजून काही प्रश्न निर्माण करेल असे त्याला वाटले नव्हते. जोहानेसबर्गच्या जवळ असलेल्या रायझिंग स्टार नावाच्या गुहेत (Rising Star Cave) तो जीवाश्माचा तुकडा मिळाला होता. ही गुहा असलेला भाग पुरातन मानवी अवशेषांनी इतकी समृद्ध आहे की त्याला "Cradle of Humankind world heritage" असे ओळखले जाते. त्या गुहेतील अवशेषांवर दोन वर्षे केलेल्या संशोधनाच्या आधारे बर्गरच्या संघाने मानवाच्या Homo कुटुंबातील एक नवीन प्रजाती शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रजातीला होमो नालेदी (Homo naledi) असे नाव दिले आहे.
रायझिंग स्टार गुहेची जागा
रायझिंग स्टार गुहेचे मानचित्र
"भूगर्भातल्या अवकाशवीर" तरुणी
"भूगर्भातल्या अवकाशवीर" काम करताना
गुहेत सापडलेल्या जीवाश्मांपैकी काही
होमो नालेदी कवटी आणि तिची आधुनिक मानवी कवटीशी तुलना
होमो नालेदी जबडा
जीवाश्मांवरून बनवलेला होमो नालेदीचा अर्धपुतळा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त लेख.
फोटो काही दिसले नाहीत
दुष्ट क्रोम!
खूप उपयुक्त टीप दीलीत. सर्व
वाटेची रुंदी वाचतानाच श्वास
पण ते "HOMO" होते!!! लोल...
बाय द वे, तुम्हीपण Homo
विनोदाचा दर्जा थोडा उंचवायला
अगदी सहमत....
गोंधळ्या; विस लाख वर्षे HOMO
मस्तं!
वाह!
+१
फोटो ज्यांना दिसत नाहीत
उत्तम लेख माला
छान लेख आहे म्हात्रे साहेब.
या लेखाचा विषय मानववंशशास्त्रात
रायझिंग स्टार गुहेतला थडगे कक्ष (burial ground)
.माहितीपूर्ण लेख.त्या गुहेत
हा साडेतीन मिनिटांचा
हनुमान सारखे दिसत आहे.
आम्हाला हे आधीच माहिती होते :)
मिळालेल्या तुटपुंज्या
रोचक आहे.
मस्त लेख....
मानवाच्या ह्या पुर्वज कडीची
मानवांनी?
धन्यवाद !
आवं ह्या फारिनच्या सातिआसरा
अतिशय माहीती पुर्ण लेख :)
मस्त माहितीपूर्ण लेख
छान लेख..
उत्तम माहितीपूर्ण लेख
धन्यवाद एक्का काका....
धन्यवाद !
पण तुम्ही यांना चुलत कुटुंब असे का म्हटले आहे? म्हणजे ते सध्याच्या मानवाचे पुर्वज नाहीत का?नाही. आपले कोणते तरी पूर्वज आणि नालेदींचे पूर्वज एकाच प्रजातीचे असू शकतील (किंवा वेगळ्या शब्दांत : कोण्या एका अतीप्राचीन प्रजातीतून आपले आणि नालेदींचे पूर्वज निर्माण झाले असावेत व पुढे स्वतंत्र स्पेसिजमध्ये विकसित झाले असावेत). थोडक्यात रुपक वापरून सांगायचे तर "होमो (जीनस)" नावाच्या झाडाच्या खोडावर "नालेदी" आणि "सेपिएन्स (आपण आधुनिक मानव)" या दोन फांद्या आहेत असा अंदाज आहे. म्हणूनच शिर्शकातला त्यांचा उल्लेख "आपल्या पूर्वजांचे चुलत कुटुंब" असा केला आहे. या फांद्या एकमेकापासून किती दूर आहेत याबाबतीत निर्णय करण्यासाठी संशोधन चालू आहे.तो पुतळा बनवताना त्वचेचा रंग डोळ्यांचा रंग केसांची रचना कशी ठरवली जाते? (म्हणजे विचारण्याच उद्देश असा की तो पुतळा खर्या होमो नालेदीच्या कितपत जवळपास जाणारा असावा?)यासाठी वरची व्हिडिओ क्लिप पहा.तसे असेल तर ते का नामशेष झाले याची काही कारणे आहेत का?एखादी प्रजाती नामशेष का होते याबाबत केवळ अनेक अंदाज मांडता येतात. याला असंख्य कारणे असल्याने ते थोडक्यात सांगणे अशक्य आहे. यांचा थोडाबहुत उहापोह "पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" या लेखमालेत केलेला आहे.मस्त माहितीपुर्ण लेख.गुहेच्या
धन्यवाद !
अजुन किती गोष्टी माहिती नसतील मानव इतिहासातील आपल्याला?अस वाटत रहात.हा शोध हीच गोष्ट अधोरेखीत करतो आहे ! "जर जोहानेसबर्ग सारख्या पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासाच्या जागतिक केंद्रापासून काही किलोमीटरवर अंतरावर आणि अनेक दशके संशोशन सुरू असलेल्या जागेवर असा क्रांतीकारी शोध लागण्यासारखे अवशेष सापडले आहेत तर आफ्रिकेच्या दूरदराज कानाकोपर्यात काय काय रहस्ये दडून राहिली असतील ?" हाच प्रश्न संशोधकांना सतत सतावत असतो !तेव्हापासुनच माणासाच्या
तेव्हापासुनच माणासाच्या
माहितीपूर्ण लेख आणि तितकेच
लेख आवडला.
खूप छान माहिती. आता माझे काही
एखाद्या ठिकाणी जीवाश्म मिळतील
एखाद्या ठिकाणी जीवाश्म मिळतील हे शास्त्रज्ञांना कळतं कसं?(अ) हे बहुदा अपघातानेच कळते. प्राणी पृथ्वीवर मोकळेपणे फिरत असतात / होते. त्यामुळे, जीवाश्म पृथ्वीवर कोठेही विखूरलेले असू शकतात; त्यासाठी काही विशिष्ट नियम असू शकत नाहीत. (आ) एखाद्या जागी महत्वाचे जिवाश्म सतत सापडतात अश्या जागेमध्ये शोध चालू ठेवणे जास्त फायद्याचे असते. रायझिंग स्टार गुहेच्या आजूबाजूचा प्रदेश याबाबतीत प्रसिद्ध आहे. पण तरीही अश्या शेकडो चौ किमी प्रदेशात नक्की कुठे कोणते अवशेष असतील हे सांगणे कठीण असते. अर्थातच, गुहांसारख्या आडोश्याच्या जागांत माणसे राहण्याचे आणि त्यांचे अवशेष इतर प्राण्यांपासून व नैसर्गिक आघातांपासून सुरक्षित राहण्याचे प्रमाण जास्त असू शकते, इतकेच.जेव्हा त्या जागी मृतशरीरे पुरली गेली तेव्हा कदाचीत ती जागा एवढी खोल नसावी, आणि नंतर नैसर्गिक कारणांमुळे जमिनीवर नविन लेयर बनले असावे किंवा इतर तत्सम कारणांमुळे गुहा खोलवर गेली असावी, असंही असेल. अर्थात ही शक्यता शास्त्रज्ञांनी आधीच पडताळून पाहिली असणारच म्हणा.एखाद्या जागी अवशेष मिळतात तेव्हा त्या परिसराचा भूगर्भशास्त्रिय अभ्यासही कसून केला जातो. त्या अभ्यासाचा अवशेषांच्या सद्याच्या स्थितीची कारणे आणि अवशेषांचे वय ठरवण्यात फार मोठा उपयोग होतो. रायझिंग स्टार गुहेचे भूगर्भशास्त्रिय मानचित्र येथे दिले आहे त्यावरून हा अभ्यास किती खोलवर केला जातो याची प्राथमिक कल्पना यावी. हे अवशेष आहेत तिथे नैसर्गिक कारणाने आले असावेत की मानवी हस्तक्षेपाने आले असावेत आणि तेथिल दगड-माती का आणि कशी आली असावी / आहे याचा पुरेपूर उहापोह झालेला आहे. हे केवळ मूळ संशोधक म्हणतात म्हणून खरे मानले जात नाही. त्यांना हे संशोधन इतर मान्यवर संशोधकांपुढे (ज्यात बहुदा पाठीराख्यांपेक्षा विरोधकच जास्त असतात) प्रदर्शित करून आपल्या म्हणण्याचे सबळ शास्त्रीय पुरावे द्यावे लागतात. हे सगळे होऊनही सर्व संशोधन सर्वमान्य होण्यासाठी इतर अनेक सबळ शास्त्रिय पुरावे पुढे यावे लागतात. हा प्रवास लांब काळाचा असतो. या लेखातले अवशेष २०१३ मध्ये मिळालेले आहेत आणि त्यासंबंधीचे अनेक निर्णय अजून लागलेले नाहीत आणि / अथवा सर्वमान्य झालेले नाहीत.ठार खोटे !!
खी खी खी...
७० लाख वर्षापूर्वीचा माणसाचा
डाॅक! माझे एक निरीक्षण
धन्यवाद !
बालीतला हिन्दु धर्म आणि
धन्यवाद !
वा..