अॅडमिनना विनंती. ह्या लेखामधे काही आ़क्षेपार्ह गोष्टींचा उल्लेख केला जाणार आहे. जर आपल्या नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवुन लावावी. मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.३-४ दिवसापुर्वी बस नी प्रवास करायला लागला. माझ्या शेजारी एक जेमतेम २०-२१ वर्षाचा म्हणजे माझ्यापे़क्षा ५-६ वर्षानी लहान कॉलेजकुमार बसला होता. फोनवर मित्राशी आपल्या सो कॉल्ड "प्रेमप्रकरणाबद्द्ल" गप्पा चालल्या होत्या. वन नाईट स्टँड आणि त्यातही दारुच्या नशेत केलेल्या वन नाईट स्टँड नंतर तिला हाकलुन लावण्याबद्द्ल (डीच करणे) अत्यंत बिभत्स भाषेमधे दबक्या आवाजात चर्चा चाललेली होती. पलिकडुन बोलणारे त्याचे "गुरुदेव" ह्या विषयामधे बरेचं अनुभवी दिसत होते. आपल्या आधीच्या प्रकरणात कसं पटकन सुटुन जाता आलं आणि ह्या पोरीला डिचं करणं कसं अवघड आहे, आणि ते कसं करायलाचं हवयं ह्याविषयी चर्चा चालु झाली. साला कचकचुन डोक्यात गेला हा हरामखोर. प्रेम (ह्या असल्या गिधाडांच्या बाबतीत फक्तं आणि फक्तं वासना) आणि त्यातुन घडणार्या पुढच्या नाजुक गोष्टी ह्या काय एवढ्या कॅजुअली कश्या घेऊ शकतात हे लोकं? ह्या मुलीसुद्धा पुढचा मागचा विचार नं करता अश्या हरामखोरांच्या जाळ्यात अश्या कश्या अडकु शकतात? बरं आता ह्यामधुन सुटण्यासाठी काही मुली चक्कं आम्ही त्याला ओळखु शकलो नाही असं कारण देतात. हे कारण कसं काय अॅक्सेप्टेबल असु शकतं? मुलाचा अॅप्रोच कसा आहे ह्यावरुन तो सिरिअस आहे का असला छपरी आहे हे समजुन येतचं की. जेव्हा एखादा अत्यंत सज्जन, सालस, कर्तुत्ववान आणि संयमी मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा कितीतरी वेळा असं होतं की तो त्या मुलीला साधं कधी सांगुही शकत नाही (स्वानुभव, एक सज्जन सोडलं तर बाकी सगळे पॅरामीटर्स फिट लागु होतात). त्यातुन एखादयानी गेल्या ७०,००० पिढ्यांमधलं धैर्य एकत्र करुन विचारलचं तर त्याला किती वेळा होकार मिळतो समोरच्या बाजुकडुन? बहुतेक अशी मुलं फ्रेंडझोनमधेचं जातात. हजारात एखादा नशिबवान असतो की त्याचं सिरिअस प्रेम असणारी मुलगी त्याला हो म्हणते. एक माझ्या माहितीमधला किस्सा मला इथे सांगावासा वाटतोय. नावं अर्थातचं जाहिर करणार नाही. आमचा मित्राचा मित्राशी ट्रेक ला म्हणा कुठे ट्रिपला म्हणा कुठे नाटक सिनेमाला म्हणा अश्या ओळखी होतं होतं एक मोठा मित्रामैत्रिणींचा ग्रुप तयार झालाय. त्यातल्या एका "क्ष" नावाच्या एका सुस्वभावी मुलाला एक "प" नावाची मुलगी खुप आवडायची. दोघही प्रोफेशननी ईंजिनिअर आणि आवडीनिवडींमुळे नेहेमी संपर्कात असायचे. मेड फॉर इच अदर म्हणतात ना तशी त्यांची जोडी होती. तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरु झाल्यानंतर हा अस्व्स्थ झाला. आहे नाही तेवढं धैर्य गोळा करुन त्यानी तिला लग्नाबद्दल विचारलं. तिनी शिस्तीत त्याला कटऊन लावलं. हा बाबाजी मानसिकरित्या पार कोलमडला होता. कसाबसा २ महिन्यानी जागेवर आला. पण त्याच्या वागण्याबोलण्यातला मोकळेपणा, हजरजबाबी पणा कुठे हरवुन गेलाय काय माहिती? ह्याच "प" मुलीला एका उच्चशिक्षितं गिधाडानी फशी पाडलं. जेमतेम महिन्याच्या आतमधे दोघांनी सगळ्या मर्यादा पार केल्या. तीन एक महिन्यानी काही मेडीकल कॉंप्लिकेशन्स होऊन हे लोकं सेपरेट झाले. ही मुर्ख मुलगी परत येऊन आता "क्ष" कडे येऊन मी तुला नकार देऊन चुक केली असं सांगते. "क्ष" तसा झालेला अपमान नं विसरणारा असल्यानी आता हे लफडं तुझं तु निस्तर असं म्हणुन पुर्ण अलिप्त झालाय. एकेकाळी घनिष्ठ मित्र असणारे दोघं आजं एकमेकांसमोर उभेही राहु शकतं नाहीयेत. "प"जानेवारीमधे लग्नं करेल ह्या. होणारा नवरा अर्थातचं अंधारात आहे. "क्ष" तिला माफ करु शकला नसला तरी अजुनही तिच्या आठवणीत झुरतोय. "थिंग्ज कुड हॅव बीन बेटर" अशी स्वतःचीचं समजुन घालतोय. त्या गिधाडाला मात्र नवीन भक्ष मिळालयं किंवा मिळेलचं. असं का? सज्जनं मुलांची मुलींना अॅलर्जी असते का? का ह्या असल्या गिधाडांची बेफिकीर वागणुक त्यांना मॅस्क्युनालिटी साईन वाटते? "सिन्सिअर पिपल डाय अलोन"...."देअर इज नो लव्ह लाईफ फॉर सिन्सिअर्स अनलेस इट्स अरेंज्ड" असा काही नवीन फंडा तर निर्माण होतं नाहीये ना? ह्या अश्या "शॉर्ट टर्म सॅटिसफॅक्शन अँड लाँग टर्म डॅमेज"ची विषवल्ली पसरली जाउ नये आणि अजुन कुठल्याही मुला-मुलींचं आयुष्य अश्या टेंपररी रिलेशनशिपमधे उद्ध्वस्त होऊ नये हिचं एक इच्छा. लेखं विस्कळीत आहे मान्य आहे. पण तो थोडा त्या वन नाईट स्टँड वाल्या मुलाच्या रागाच्या,धिस मस्ट मी स्टॉप्ड समव्हेअर आणि कदाचित स्पेशल तिला कधीच सांगु नं शकल्याच्या अपराधी भावनेतुन लिहिला असल्यानी थोडं समजुन घ्या. बस्स...!!!
वाचने
27121
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> खेळ-खंडोबा निरिक्षण
In reply to आणि सामना by नाखु
तेरी भी चुप मेरी भी चुप
शिक्षण आणि प्रेम
हे तुमचं मत झालं, माझ्या
In reply to शिक्षण आणि प्रेम by सिरुसेरि
कुठल्या जगात ?
In reply to शिक्षण आणि प्रेम by सिरुसेरि
निर्णय व जबाबदारी.
जग आणी उंबरठा
>>अशा तामसी प्रव्रुत्तींना
In reply to जग आणी उंबरठा by सिरुसेरि
पण मुळात अशा प्रवृत्ती नक्की
In reply to >>अशा तामसी प्रव्रुत्तींना by सूड
नॉर्वेतील मुलगी प्रेमात पडते,
आणि आता अवांतराचे अतिअवांतर:
(No subject)
In reply to आणि आता अवांतराचे अतिअवांतर: by हाडक्या
हा हा हा
In reply to आणि आता अवांतराचे अतिअवांतर: by हाडक्या
आता कोणी तरी धागा वर काढलाच
लेखातील व लेखास पूरक
Your comment is right, no
In reply to लेखातील व लेखास पूरक by निनाद मुक्काम …
फ़क्त पोरींशी बोलायला बुझणारी
In reply to Your comment is right, no by कॅप्टन जॅक स्पॅरो