Skip to main content

असं का?

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी बुधवार, 24/12/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅडमिनना विनंती. ह्या लेखामधे काही आ़क्षेपार्ह गोष्टींचा उल्लेख केला जाणार आहे. जर आपल्या नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवुन लावावी. मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.
३-४ दिवसापुर्वी बस नी प्रवास करायला लागला. माझ्या शेजारी एक जेमतेम २०-२१ वर्षाचा म्हणजे माझ्यापे़क्षा ५-६ वर्षानी लहान कॉलेजकुमार बसला होता. फोनवर मित्राशी आपल्या सो कॉल्ड "प्रेमप्रकरणाबद्द्ल" गप्पा चालल्या होत्या. वन नाईट स्टँड आणि त्यातही दारुच्या नशेत केलेल्या वन नाईट स्टँड नंतर तिला हाकलुन लावण्याबद्द्ल (डीच करणे) अत्यंत बिभत्स भाषेमधे दबक्या आवाजात चर्चा चाललेली होती. पलिकडुन बोलणारे त्याचे "गुरुदेव" ह्या विषयामधे बरेचं अनुभवी दिसत होते. आपल्या आधीच्या प्रकरणात कसं पटकन सुटुन जाता आलं आणि ह्या पोरीला डिचं करणं कसं अवघड आहे, आणि ते कसं करायलाचं हवयं ह्याविषयी चर्चा चालु झाली. साला कचकचुन डोक्यात गेला हा हरामखोर. प्रेम (ह्या असल्या गिधाडांच्या बाबतीत फक्तं आणि फक्तं वासना) आणि त्यातुन घडणार्‍या पुढच्या नाजुक गोष्टी ह्या काय एवढ्या कॅजुअली कश्या घेऊ शकतात हे लोकं? ह्या मुलीसुद्धा पुढचा मागचा विचार नं करता अश्या हरामखोरांच्या जाळ्यात अश्या कश्या अडकु शकतात? बरं आता ह्यामधुन सुटण्यासाठी काही मुली चक्कं आम्ही त्याला ओळखु शकलो नाही असं कारण देतात. हे कारण कसं काय अ‍ॅक्सेप्टेबल असु शकतं? मुलाचा अ‍ॅप्रोच कसा आहे ह्यावरुन तो सिरिअस आहे का असला छपरी आहे हे समजुन येतचं की. जेव्हा एखादा अत्यंत सज्जन, सालस, कर्तुत्ववान आणि संयमी मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा कितीतरी वेळा असं होतं की तो त्या मुलीला साधं कधी सांगुही शकत नाही (स्वानुभव, एक सज्जन सोडलं तर बाकी सगळे पॅरामीटर्स फिट लागु होतात). त्यातुन एखादयानी गेल्या ७०,००० पिढ्यांमधलं धैर्य एकत्र करुन विचारलचं तर त्याला किती वेळा होकार मिळतो समोरच्या बाजुकडुन? बहुतेक अशी मुलं फ्रेंडझोनमधेचं जातात. हजारात एखादा नशिबवान असतो की त्याचं सिरिअस प्रेम असणारी मुलगी त्याला हो म्हणते. एक माझ्या माहितीमधला किस्सा मला इथे सांगावासा वाटतोय. नावं अर्थातचं जाहिर करणार नाही. आमचा मित्राचा मित्राशी ट्रेक ला म्हणा कुठे ट्रिपला म्हणा कुठे नाटक सिनेमाला म्हणा अश्या ओळखी होतं होतं एक मोठा मित्रामैत्रिणींचा ग्रुप तयार झालाय. त्यातल्या एका "क्ष" नावाच्या एका सुस्वभावी मुलाला एक "प" नावाची मुलगी खुप आवडायची. दोघही प्रोफेशननी ईंजिनिअर आणि आवडीनिवडींमुळे नेहेमी संपर्कात असायचे. मेड फॉर इच अदर म्हणतात ना तशी त्यांची जोडी होती. तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरु झाल्यानंतर हा अस्व्स्थ झाला. आहे नाही तेवढं धैर्य गोळा करुन त्यानी तिला लग्नाबद्दल विचारलं. तिनी शिस्तीत त्याला कटऊन लावलं. हा बाबाजी मानसिकरित्या पार कोलमडला होता. कसाबसा २ महिन्यानी जागेवर आला. पण त्याच्या वागण्याबोलण्यातला मोकळेपणा, हजरजबाबी पणा कुठे हरवुन गेलाय काय माहिती? ह्याच "प" मुलीला एका उच्चशिक्षितं गिधाडानी फशी पाडलं. जेमतेम महिन्याच्या आतमधे दोघांनी सगळ्या मर्यादा पार केल्या. तीन एक महिन्यानी काही मेडीकल कॉंप्लिकेशन्स होऊन हे लोकं सेपरेट झाले. ही मुर्ख मुलगी परत येऊन आता "क्ष" कडे येऊन मी तुला नकार देऊन चुक केली असं सांगते. "क्ष" तसा झालेला अपमान नं विसरणारा असल्यानी आता हे लफडं तुझं तु निस्तर असं म्हणुन पुर्ण अलिप्त झालाय. एकेकाळी घनिष्ठ मित्र असणारे दोघं आजं एकमेकांसमोर उभेही राहु शकतं नाहीयेत. "प"जानेवारीमधे लग्नं करेल ह्या. होणारा नवरा अर्थातचं अंधारात आहे. "क्ष" तिला माफ करु शकला नसला तरी अजुनही तिच्या आठवणीत झुरतोय. "थिंग्ज कुड हॅव बीन बेटर" अशी स्वतःचीचं समजुन घालतोय. त्या गिधाडाला मात्र नवीन भक्ष मिळालयं किंवा मिळेलचं. असं का? सज्जनं मुलांची मुलींना अ‍ॅलर्जी असते का? का ह्या असल्या गिधाडांची बेफिकीर वागणुक त्यांना मॅस्क्युनालिटी साईन वाटते? "सिन्सिअर पिपल डाय अलोन"...."देअर इज नो लव्ह लाईफ फॉर सिन्सिअर्स अनलेस इट्स अरेंज्ड" असा काही नवीन फंडा तर निर्माण होतं नाहीये ना? ह्या अश्या "शॉर्ट टर्म सॅटिसफॅक्शन अँड लाँग टर्म डॅमेज"ची विषवल्ली पसरली जाउ नये आणि अजुन कुठल्याही मुला-मुलींचं आयुष्य अश्या टेंपररी रिलेशनशिपमधे उद्ध्वस्त होऊ नये हिचं एक इच्छा. लेखं विस्कळीत आहे मान्य आहे. पण तो थोडा त्या वन नाईट स्टँड वाल्या मुलाच्या रागाच्या,धिस मस्ट मी स्टॉप्ड समव्हेअर आणि कदाचित स्पेशल तिला कधीच सांगु नं शकल्याच्या अपराधी भावनेतुन लिहिला असल्यानी थोडं समजुन घ्या. बस्स...!!!

वाचने 27121
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

"कॉन्फिडन्स" ही इम्प्रेषनची किल्ली असल्याने एखादा हरामखोर माणूसही त्या गुणामुळे सुरुवातीला आकर्षक वाटतो. जनरली सज्जन सालस वगैरे पोरं त्यातच मार खातात. शिवाय मुलगी म्हणजे परग्रहावरील सजीव, तिच्याशी बोलणे हे जरा पेश्शल, इ.इ. धारणा असलेली (कारण तशाच वातावरणात वाढलेली) पिढी अजूनही टिकून आहे. येत्या १५-२० वर्षांत अशी पिढी बरीच कमी होईल असे वाटते. मुळात स्त्रीसान्निध्यच कमी, त्यात आकर्षण मिसळले की इंटरअ‍ॅक्शनला भाव जरा जादाच दिला जातो. त्यामुळे मनात कुढल्या जाते. तसे न करता, स्त्रीसान्निध्याला जास्ती भाव न देणे हे साध्य झाले की बाकी गोष्टीही सहजसाध्य आहेत. आता स्त्रीसान्निध्याला जास्ती भाव न देणे हे साध्य करण्याचा एकमेव उपाय काय? ते मिळवायचा प्रयत्न करणे इतकेच.

In reply to by बॅटमॅन

ह्या मुलीसुद्धा पुढचा मागचा विचार नं करता अश्या हरामखोरांच्या जाळ्यात अश्या कश्या अडकु शकतात? मराठी साहित्यात त्याने तिला फुस लावली असे म्हणतात ! आता स्वतः लयं इंटलिजंट समजणार्‍या मुली असं कसं फुस लावुन घेतात ? हे कोडं आहेच ! सज्जनं मुलांची मुलींना अ‍ॅलर्जी असते का? येस. का ह्या असल्या गिधाडांची बेफिकीर वागणुक त्यांना मॅस्क्युनालिटी साईन वाटते? येप्प... सिन्सिअर पिपल डाय अलोन मे बी... देअर इज नो लव्ह लाईफ फॉर सिन्सिअर्स अनलेस इट्स अरेंज्ड यू आर अबाउट रिच द करेक्ट पॉइंट ! मी तर अश्या अनेक मुली पाहिल्या आहेत, आणि काही "क्ष" मित्र सुद्धा आहेत की त्यांनी भरपुर "मजा" मारली आहे ! व्यवस्थित लग्न करुन सुखाने नांदत देखील आहेत / असतील... पॉइंट :- फ्यु पिपल रिअलाइज द ट्रू लव्ह अ‍ॅड वॉन्ट टु एक्स्पिरिएन्स द सेम... बट अदर्स जस्ट वॉन्ट टु फ>>

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant

In reply to by बॅटमॅन

बरेच युवक प्रेम व्यक्त्/विचारायला बिचकत नाहीत तर तद्नंतरच्या परिणाम्-गुंतागुंतीला-बोट्चेप्या स्वभावाला-आणि येऊ घातलेल्या न्युनगंडाला जास्त घाबरतात आणि तिथेच घोड अडतं!! नकार मिळालेल्या मुलांबाबत इतर मुले/आणि मुलीही जास्ती "स्वघोशीत समीक्षक" असतात असे निरीक्षण आहे. *YES* यात घरून "आकर्षण आणि प्रेम " यातला नेमका फरक समजावणारे कुणी (मोठी बहीण्/वहिनी/नक्की ? मैत्रीण) असेल तर ठिक नाही तर आनंदी-आनंद !!!

In reply to by बॅटमॅन

एक मिनिटं, एक पार्टी सिन्सियर असून भागत नाही. अरेंज मधे पदरी पडणारी समोरची पार्टी सिन्सियर असेल (पूर्वीही, नंतरही) याची खात्री कोण देणार? चौफेर भटकून झालेल्या मुली जेंव्हा अशाच एका सिन्सियर क्ष च्या अरेंज्ड बायको होतात तेंव्हा त्या क्ष ची प्रचंड दया येते. तेंव्हा अ‍ॅरेंज इज नॉट अ 'नो रिक्स' बेट इदर.

In reply to by वेल्लाभट

एका सिन्सियर क्ष च्या अरेंज्ड बायको होतात
एक-दोन वर्गमैत्रिणींना असे सिन्सिअर क्ष मिळाले तेव्हा वारलो होतो. ;)

In reply to by वेल्लाभट

तेंव्हा अ‍ॅरेंज इज नॉट अ 'नो रिक्स' बेट इदर.
आणि ह्यासाठी प्रचंड सहमत!! आलातच पुण्यात तर एखादी मस्तानी देऊ..

१५-१६ वर्षाच्या मुलीला छपरी पोरं आवडणं मी एकवेळ समजु शकते.. पण ग्रॅजुएशन झालेल्या.. नोकरी करणार्‍या मुलींना छपरी मुलगा समजत नसेल तर होणार्‍या त्रासाला त्या स्वतःच जबाबदार आहेत... त्यांना कुणीही काही मदत करु शकत नाही.. दुसरा जरा वादग्रस्त मुद्दा असा की ज्या मुली सर्व मर्यादा ओलांडु शकतात.. (म्हणजे ते सर्व करायची अक्कल असते..) त्या फसवल्या गेल्या की "गरीब- बिचार्‍या - नादान - भोळ्या" कशा होतात? सरसकट बोलत नाहीये मी.. पण लग्नाच्या वयांच्या मुली बद्दल बोलतेय जिला चांगल्या वाईटाची जाण आलेली असते..

लेखन फारच एकांगी आहे . दुसरी बाजु , दुसरे पर्पेटीव्ह असु शकतात ह्याचा लेखकाने विचार केलेला दिसत नाही असा आपला अंदाज आहे . गिधाड वगैरे काय ? ( गिधाड मेलेले प्राणी खाते , इथे ज्यांना गिधाड - गिधाडभक्श्य म्हणुन संबोधले गेले आहे ते दोघेही जिवंतपणे अन फुल कॉन्शसली निसर्गदत्त देहाकरवी स्वर्गीय आनंद घेत असतात . ) असो . इतर लोकांचे प्रतिसाद पहातो आधी . मग अजुन प्रतिसाद देता येईल . सारखंच लॅटरल थिंकिंग रादर एक्क्षप्लेनिंग करायचा कंटाळा आलाय मलाही . अवांतर : येथे विचारस्वातंत्र्य , अभिव्यक्तीस्वातंत्र्य , फ्रीडम ऑफ पर्सेप्शन ( मराठी ? ) आणि सर्वंकश चर्चा करायची इच्छा वगैरे गृहीत धरुन प्रतिसाद देत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

गिधाड ही एक उपमा दिलेली आहे गिरिजा काका. लेख कदाचित एकांगी असु शकेलही कारण मी फक्त एक मुलगा ह्या दृष्टीकोनातुनचं बाजु मांडलेली आहे. कदाचित मुलींच्या दृष्टीकोनातुन ह्याला अजुनही काही बाजु असु शकतील. मला ही गोष्ट खटकली म्हणुन लेखं लिहावासा वाटला बस्स.... लॅटेरल थिंकिंग करुन रायटिंग करायचा मला पण कंटाळा आलाय.

In reply to by प्रसाद गोडबोले

दोघेही जिवंतपणे अन फुल कॉन्शसली निसर्गदत्त देहाकरवी स्वर्गीय आनंद घेत असतात . हो...एकदम मान्य ! हे देह सुख मनुष्यां मधे सर्वेच्च सुख समजल जात / मानलं जात / अनुभवल जात... परंतु हे सुख हवे तसे उप-भोगुन मग गळा काढणार्‍यांवर काय कराव ? यात मुख्यत्वे मुली असतात. काही काळा पूर्वी एका वर्तमान पत्रात वाचलेली बातमी :- डोंबिवली मधली एक मुलगी रेल्वे स्थानकावर उभी होती,अचानक एका अनोळखी तरुणाशी तिचे बोलणे झाले आणि तिला खर्डीला घेउन गेला आणि तिकडच्या लॉजवर नेउन बलात्कार केला. आता मला पडलेले प्रश्न :- १}अनोळखी मुला बरोबर ती मुलगी गेलीच कशी ? २}आपण या मुला बरोबर कुठे चाललो आहे ते तिला त्याला देखील का विचारावेसे वाटले नाही ? ३}बरं... लॉजवर जाई पर्यंत ही शांत कशी ? ५}लॉजवर भोंडल्याचा कार्यक्रम खेळला जात नाही हे न-समजण्या सारख्या मुली मूर्ख असतात का ? ६} हे सगळ झाल्यावर मला फुस लावली हे जाहिर करायचे,फुस लावुन घेतली या बद्धल मात्र सोयिस्कर मौन बाळगायचे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ} Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets All About Arihant

In reply to by मदनबाण

"लग्नाच्या आमिषाने २ वर्षे बलात्कार" वगैरे बातम्या वाचून असेच वाटते. दोन दोन वर्षे बलात्कार काय चेष्टा लावलीय होय?

In reply to by बॅटमॅन

ब्यॅट्या , सेम तुझ्या सारखे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे , आता तुला आम्ही मिपावरील अष्टप्रधान मंडळात न्यायाधीष म्हणुन नेमत आहोत :D ही पहा वरीजीनल बातमी 'लग्नाचा शब्द पाळला नाही म्हणून पुरुषावर सरसकट बलात्काराचा आरोप लावता येणार नाही,' http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Pre-marital-s…

In reply to by बॅटमॅन

न्यायाधीश महाराज, तेवढं बेळगाव (बेळगावच!) महाराष्ट्रात ओढण्याचा आदेश द्या हो.

In reply to by सूड

हं.. मग अवघड आहे. मग आम्ही पण आपचा झेंडा हातात घेवून 'न्यायाधीश महाराजांचे अंबानी आणि अदानी बरोबर संबंध आहेत म्हणून ऑनलाईन मोर्चा काढू'.

In reply to by मदनबाण

लॉजवर भोंडल्याचा कार्यक्रम खेळला जात नाही हे न-समजण्या सारख्या मुली मूर्ख असतात का ?
=))

In reply to by मदनबाण

कड्डाक्क्क ! हेच्च्च म्हणतो नेहमी. अरे डोकी असतात की नाही या अशा मुलींना.... इतकं कुणीही______नसतं राव जगात.

In reply to by आनन्दा

मैने ये लडकी खायी, वो लडकी खाऊंगा
तरीही गिधाड ही उपमा चुकीचीच ठरते कारण गिधाड मेलेले प्राणे खाते आणि थे ती "खालेल्ली" मुलगी जिवंत आणि फुल्ल कॉन्शंस असते ... काय सांगता तीही तिच्या मैत्रिणींना म्हणत असेल "मैने ये लडका खाया, वो लडका खाऊंगी " ! थोडक्यात तात्पर्य काय तर संमतीने केलेले सेक्स ही दोन्ही बाजुंनी फुल्ल इंजोय केली जाणारी आनंददायी गोष्ट आहे , उगाच पुरुष बाजु उपभोक्ता आणि दुसरी स्त्री बाजु उपभोग्य अशी विभागणी करणे योग्य नाही . :) अवांतर : ( प्रवचनकार बुवा मोड ) मुळातच उपभोक्ता उपभोग्य आणि उपभोग ही त्रिपुटी मिथ्या आहे , माया आहे , भ्रम आहे भ्रांती आहे , एकदा का हे द्वैत निरसन झाले आणि तुम्हाला ह्या तिन्ही कर्ता कर्म करण मध्ये समभाव निर्माण झाला , एकदा का ही व्यामिश्रता लक्षात घेतलीत की तुम्ही आनंदाच्या अनुर्वाच्च्य अवस्थेप्रत जाऊन पोहचाल . पण त्यासाठी समष्टी होणे अत्यंत गरजेचे आहे ( प्रवचनकार बुवा मोड ऑफ ) :D

ज्याचे त्याने निस्तारावे. फसवले जाणे किंवा फसवणे या रीलेटिव्ह कोन्सेप्ट आहेत. आपण फसवले गेलो आहोत अशी जर त्या मुलीला जाणीव झाली तर तीने सरळ त्या फसवणार्‍या मुलाचा डायरेक्ट गेम करावा. अशा गेम्स ना कायद्याचे संरक्षण असावे .फसवणूकीचे शासन बरोब्बर मिळेल. अर्थात त्यामुळे पुढील फसवणारे किंवा फसवले जाणारे सावध होतील असे नाही. जोवर शारीरीक भावना आहेत त्या चाळवल्या जातात तोवर या गोष्टी होतच रहातील.

पिराशी बाडीस.मीही ती म्हणतेय तशा कित्येक मुली पाहिल्यात. तेव्हा चांगल्या-वाईटाची जाण वगैरे सगळं मागे पडून मजा मारणे हाच त्या मुलींचाही उद्देश असतो.एक मुलगी असूनही मलाच कित्येकदा वाटलंय की या अशा मुलींचा फंडा तेव्हा फक्त मतलब साध्य करून घेणे असाच होता. अशा एका केसमध्ये तर माझा खूप चांगला मित्र आम्ही गमावलाय आणि ती मुलगी आजही मज्जेत.. :(

मुली, बस आणि गाड्या - एक गेली, दुसरी येते असा दृष्टिकोन ठेवावा आणि मनाला लावून घेऊ नये. मुळात कितीही भावनिक गुंतवणूक झाली तरी पुढे दगाफटका होऊ शकतो याची जाणीव ठेवावी. बाकी मुलींना जरा वाया गेलेली मुलं आवडतात असा अनुभव आहे. त्यांना तो मुलगा एक चॅलेंज वाटतो आणि आपण याला सुधरवू असा विश्वासही. मुळात आपला एका गोष्टीवर विश्वास आहे - मुलीच्या मागे लागण्यापेक्षा असं काहीतरी कर्तृत्व गाजवा की तिचे घरचे लोक तुमच्यामागे आमच्या मुलीशी लग्न कर म्हणून लागले पाहिजेत!

In reply to by बोका-ए-आझम

विशेषतः "मुलीच्या मागे लागण्यापेक्षा असं काहीतरी कर्तृत्व गाजवा की तिचे घरचे लोक तुमच्यामागे आमच्या मुलीशी लग्न कर म्हणून लागले पाहिजेत." येस्स्स सर... प्रचंड सहमत....

>>ही मुर्ख मुलगी परत येऊन आता "क्ष" कडे येऊन मी तुला नकार देऊन चुक केली असं सांगते. "क्ष" तसा झालेला अपमान नं विसरणारा असल्यानी आता हे लफडं तुझं तु निस्तर असं म्हणुन पुर्ण अलिप्त झालाय.
हे फार उत्तम केलं त्याने. तो म्हणजे काय ऑप्शनला ठेवलेला आहे की काय, कोणी नाहीच मिळालं तर हा बरा आहे म्हणून!! ज्या व्यक्तीने तुम्हाला एकदा नाकारलंय ती व्यक्ती तुमच्याकडे परत आल्यानंतर जेव्हा तुम्ही होकार देता तेव्हा तुमची किंमत शून्य होते, हे अशाच एका सिच्युएशन मध्ये अडकलेल्याला समजवताना मित्राकडून ऐकलंय आणि अगदी पक्कं मनात राह्यलंय. मुलींची मानसिकता वैगरे ह्यावर बोलायचा मला कितपत अधिकार आहे हे माहीत नाही. पण सिगारेटी ओढणार्‍या, गाड्या उडवत फिरणार्‍या मुलांबद्दल कित्ती बोलू आणि कित्ती नको झालेल्या मुली मित्रवर्तुळात पाह्यल्या आहेत. थोड्या दिवसांनी हे हुरळून जाणं कमी होतं आणि जमिनीवर येईपर्यंत उशीर तरी झालेला असतो नाहीतर कोलमडलेल्या तरी असतात. सेम केस विथ मुलं!! एखादी मुलगी मला प्रपोज करतेय तर माझ्यात असं काय आहे जे तिला आवडलं हे विचारायचं एकदाही धाडस करत नाही. पुढे ती मुलगी फिरते-फिरवते, सहा महिने झाले तरी हा काहीच करत नाही म्हणताना क्षुल्लक कारणावरुन रिलेशनशिप तोडते. आधीचे दोनेक बॉयफ्रेंड, एक डिव्हॉर्स आणि हा चौथा प्रपोज केलेला सोडून पाचव्याशी लग्न करुन सुखी होते. आणि हा प्रपोज केलेला लग्न करायचं नाही म्हणून कुढत राहतो. शिंच्यांचा सेल्फ रिस्पेक्ट अशावेळी कुठे जातो देव जाणे !! मित्रमंडळींशी यावर चर्चा करताना खरं प्रेम वैगरे शब्द गेले आणि माताय एक मित्र पाच मिनटं वेड्यासारखा हसत होता. असो. जोडीदाराच्या बाबतीत 'यथायोग्यं तथा कुरु' म्हणून देवावर (कुठली तरी अज्ञात शक्ती असते हे मानतात त्यांनी) सोडणं योग्य!! जी व्यक्ती अजून आयुष्यात आलेली नाही तिच्याबद्दल काळजीत पडण्यापेक्षा, बर्‍याच करण्यासारख्या गोष्टी आहेत. *सदर प्रतिसादही विस्कळीत आहे, पण वाचता वाचता काही गोष्टी को-रिलेट झाल्या आणि जे मनात आलं ते लिहीलं. :)

In reply to by सूड

हे फार उत्तम केलं त्याने
. हेच इथेच चुकलात तुम्ही सूडराव ! आधी भोंडला खेळुन घ्यायला पाहिजे होता त्याने , नंतर मग नकार द्यायचा ;) "माझ्या आधी तू दुसर्‍या कोणाची तरी झाली होतीस हा विचारच माझ्या मनातुन जात नाही... मी तुझ्या विरहात जगेन एकवेळ पण तु माझी असुनही दुसर्‍या कोणाची तरी होतीस हा विचार घेवुन मी नाही जगु शकत तुझ्या सोबत" हे काय बेष्ट कारण आहे राव ब्रेकाप करायला =)) अवांतर : च्यायला अजुनही कॉलेजात सुचायचं तसलं फिल्मी सुचतय की ... परत एकदा कथा लेखन सुरु करायला हरकत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

आधी भोंडला खेळुन घ्यायला पाहिजे होता त्याने , नंतर मग नकार द्यायचा
इथेच तुमचे आणि आमचे विचार वेगळे पडतात गिर्जाकाका!!

इथले प्रतिसाद मला एकट्यालाच चेकाळलेले , प्रचंड सरसकट करण करणारे आणि वाचाळ वाटत आहेत का अजून दुसरे कोणी आहे ? म्हणजे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार यातला भंपक पणा , रोहतक ब्रेव्ह हार्ट्स प्रकरण मधला प्रचंड खोटेपणा आणि पुरूषाच victimization मान्य असल तरी स्त्रीयां ची बस शी तुलना करण , भोंडला शब्दावरून प्रचंड वाईट कोट्या करण आणि इतर हि काही bold discussion च्या नावाखाली दिलेले frustration दाखवणारे चरबट प्रतिसाद पाहून आपण अजूनही १८ व्या शतकात आहोत कि काय अस वाटायला लागत . आणि मुख्य म्हणजे या भाषेवर इथल्या कुठल्या हि स्त्री सदस्याला पण objection नाही . उलट काही स्त्री सभासदांचे पूरक प्रतिसाद पाहून धक्का बसला आणि मला वाटायचं स्त्रिया त्यांच्या आणि इतर स्त्रियांच्या dignity बद्दल जागरूक असतात .

In reply to by पिंपातला उंदीर

>>> स्त्रीयां ची बस शी तुलना करण , भोंडला शब्दावरून प्रचंड वाईट कोट्या करण आणि इतर हि काही bold discussion च्या नावाखाली दिलेले frustration दाखवणारे चरबट प्रतिसाद पाहून आपण अजूनही १८ व्या शतकात आहोत कि काय अस वाटायला लागत . १८ वंच का? १७ अथवा १९ का नाही? >>>> आणि मुख्य म्हणजे या भाषेवर इथल्या कुठल्या हि स्त्री सदस्याला पण objection नाही . उलट काही स्त्री सभासदांचे पूरक प्रतिसाद पाहून धक्का बसला आणि मला वाटायचं स्त्रिया त्यांच्या आणि इतर स्त्रियांच्या dignity बद्दल जागरूक असतात ख्रंय तुम्च्म. काय क्रता यीएल?

In reply to by पिंपातला उंदीर

तुम्हाला मुद्दाच कळलेला नाही. स्त्रियांची बसशी तुलना करण्याचा प्रश्नच नाही, दृष्टिकोन भावनिक गुंतवणूक टाळण्याचा असला पाहिजे नाहीतर त्रास होतो असं म्हणायचं आहे. आणि डिग्निटी ही दोघांचीही असते, असायला पाहिजे तरच कुठलीही रिलेशनशिप टिकते.मी तर पुढे जाऊन हेही म्हणेन की मुलींनीही मुलांबद्दल असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. उगाचच एखाद्याच्या आठवणीत झुरून स्वतःच्या आयुष्याची वाट लावणं ही महाफालतूगिरी आहे. अशाने उलट माणूस स्वतःची डिग्निटी घालवतो.आणि हे पिंपात आणि पिंपाबाहेर - दोन्हीकडे सत्य आहे!

In reply to by पिंपातला उंदीर

इथले प्रतिसाद मला एकट्यालाच चेकाळलेले , प्रचंड सरसकट करण करणारे आणि वाचाळ वाटत आहेत
याच्याशी सहमत ! भाषा चरबट आहे, हेही मान्य. पण त्यामुळे स्त्री-सदस्य किंवा त्यांची डिग्निटी यांचाच फक्त अवमान कसा काय बरं होतो ? ‘भोंडला’ काय फक्त स्त्रियाच खेळतात का ? दोघेही जे करतात, त्याबद्दल स्त्री चीच फक्त मानहानी कशी काय होते बॉ ? आणि
स्त्रिया त्यांच्या आणि इतर स्त्रियांच्या dignity बद्दल जागरूक असतात
. हे अगदी खरं आहे. दुर्दैवानं, पुरुष त्यांच्या आणि इतर पुरुषांच्या dignity बद्दल जागरूक असलेले दिसत नाहीत, हे खेदाने नमूद करावेसे वाटते !

In reply to by सस्नेह

दुर्दैवानं, पुरुष त्यांच्या आणि इतर पुरुषांच्या dignity बद्दल जागरूक असलेले दिसत नाहीत, हे खेदाने नमूद करावेसे वाटते ! याचे कारण आपल्या समाजाच्या मानिसिकतेत आहे. ज्या गोष्टी स्त्रीला लांछनकारक आणि म्हणून लपवाव्या अश्या वाटतात त्याच गोष्टी त्या कृतीत सामील असलेल्या पुरुषाच्या पौरुष्याचे प्रतिक समजल्या जातात... आणि या मनसिकतेच्या बाबतित स्त्री-पुरुष दोघांत काही फारसा फरक दिसत नाही.

लेखात आणि प्रतिक्रियांमध्ये एकंदरीत मुलींवर राग दिसतोय की त्या सज्जन मुलांना सोडून गिधाडांकडे जातात पण दादांनो तुम्ही पण तर देखण्या/फटाकड्या मुलींकडेच आकर्षित होता न? दिसण्यात बोलण्यात साधारण किंवा चशमिश किंवा १/२ वेण्या घालणाऱ्या बाळबोध मुलींना प्रपोज करता का?
"क्ष" तसा झालेला अपमान नं विसरणारा असल्यानी आता हे लफडं तुझं तु निस्तर असं म्हणुन पुर्ण अलिप्त झालाय.
मुलींचा नकार हा मुलांना "अपमान" वाटतो. ती एक माणूस आहे. तिचा नकार ही तिची "ईच्छा" म्हणून जेव्हा मुले स्वीकारतील तेव्हा त्यांना मुलींना विचारणे (प्रपोज करणे) आपोआप सोपे होईल. दुसरा मुद्दा: हे one night stand किंवा तात्पुरते प्रकरण करायचे असेल तर मुल करण्या आधी मुलींना सांगण्याची हिम्मत दाखवता का? "मला लग्नात interest नाही आपण फक्त १ रात्र/काही दिवस मजा मारू या" असे सरळ मुलीला का नाही सांगत? मग तरी ती सोबत येत असेल तर मग म्हणावे की मुली मजा मारून बलात्काराचा आरोप कशा करतात. पण सहसा असे होत नाही. आधी मुलं मुलींना प्रेम दाखवितात. आणि आजच्या तरुण पिढीची परिस्थिती (movies / mobiles MMS ) अशी आहे की मुलीचा तोल जाणे शक्य आहे पण ही तिची "चूक" म्हणून मान्य न करता ते तिचे "चरित्र" ठरवून समाज मोकळा होतो. थोडक्यात मुलींचे "चरित्र" हे सरळ सरळ त्यांच्या virginity नुसार ठरते. आणि "मुलांचे चरित्र" हा concept च अस्तित्वात नाही. एका गिधाडाने फ़सविलेली किंवा तुमच्या भाषेत "गिधाडासोबत मजा मारून आलेली" मुलगी तुम्ही अजूनही "माणूस" म्हणून स्वीकारत नाहीत त्यामुळे अशा मुलींना त्या गिधाडावर बलात्काराचा आरोप करावा लागतो. गिधाडांचे मात्र आरामात लग्न जमते. ते गिधाडही मुलेच असतात न? तर कॅप्टन जॅक स्पॅरो, फसविणारे कोणीही असू शकते त्यात मुली अथवा मुले असे सरळ सरळ classification करणे अवघड आहे.

In reply to by चिऊकाऊ

लेखामधे कुठे तुम्हाला मुलींवर राग व्यक्त केलेला आढळला ते सांगा प्लीज. म्हणुनचं लेखाच्या सुरुवातिलाचं ही ओळ टाकलेली आहे.
मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.
असाचं अनुभव मुलांच्या बाबतीत मुलींनाही येतं असेलचं. पण माझ्या पाहण्यात एकही नाही. _________
पण दादांनो तुम्ही पण तर देखण्या/फटाकड्या मुलींकडेच आकर्षित होता न? दिसण्यात बोलण्यात साधारण किंवा चशमिश किंवा १/२ वेण्या घालणाऱ्या बाळबोध मुलींना प्रपोज करता का?
इथे मुली कशा दिसतायत ह्याचा पहिला म्हणजे प्रश्ण कुठे येतोय? लेखाचा उद्देश कमीटेड मुलांचं प्रपोजल अव्हेरुन, असल्या छपरी मुलांबरोबर जाऊन स्वतःचं नुकसान करुन घेणार्‍या (आणि हा इतिहास असताना भावी नवर्‍याला अंधारात ठेवणार्‍या आणि पर्यायानी फसवणुक करणार्‍या) मुलींबद्दल आहे. आणि सिन्सिअर मुलांना अल्टरनेट ऑप्शन म्हणुन गृहित धरायच्या वृत्तीबद्दल आहे. माझ्या स्वतःविषयी बोलाल तर मी कोणालाचं त्यांच्या दिसण्यावरुन जज करत नाही आणि कोणी तसं करुही नये.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पण माझ्या पाहण्यात एकही नाही. माझ्या रूममेटची गल्फ्रेंड प्रकरण बरंच पुढ गेल्यावर म्हणाली की तिची येंगेजमेंट झालीय. आता त्याच एंगेज्ड पोराबरोबर सुखाने(?) राहते आहे. शाळेत एका वर्गमैत्रीणीला समजवायला गेलो होतो. म्हटलं, "बाई, अगं तो चांगला मुलगा नाही, टैमपास करतोय तुझ्याबरोबर". तर म्हणाली, "मग मी कुठं सिरियस आहे?" :)) अजुन याच्या पुढची पण आहेत, पण इथे नकोत.

In reply to by टवाळ कार्टा

राजीखुशी फसवणूक नक्की कुणी कुणाला फसवले ??? मला विचारशील तर फक्त वाचकांनाच फशिवले जाय आहे अश्या बात्म्या देवून!!

In reply to by चिऊकाऊ

लेखामधे कुठे तुम्हाला मुलींवर राग व्यक्त केलेला आढळला ते सांगा प्लीज. म्हणुनचं लेखाच्या सुरुवातिलाचं ही ओळ टाकलेली आहे.
मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.
असाचं अनुभव मुलांच्या बाबतीत मुलींनाही येतं असेलचं. पण माझ्या पाहण्यात एकही नाही. _________
पण दादांनो तुम्ही पण तर देखण्या/फटाकड्या मुलींकडेच आकर्षित होता न? दिसण्यात बोलण्यात साधारण किंवा चशमिश किंवा १/२ वेण्या घालणाऱ्या बाळबोध मुलींना प्रपोज करता का?
इथे मुली कशा दिसतायत ह्याचा पहिला म्हणजे प्रश्ण कुठे येतोय? लेखाचा उद्देश कमीटेड मुलांचं प्रपोजल अव्हेरुन, असल्या छपरी मुलांबरोबर जाऊन स्वतःचं नुकसान करुन घेणार्‍या (आणि हा इतिहास असताना भावी नवर्‍याला अंधारात ठेवणार्‍या आणि पर्यायानी फसवणुक करणार्‍या) मुलींबद्दल आहे. आणि सिन्सिअर मुलांना अल्टरनेट ऑप्शन म्हणुन गृहित धरायच्या वृत्तीबद्दल आहे. माझ्या स्वतःविषयी बोलाल तर मी कोणालाचं त्यांच्या दिसण्यावरुन जज करत नाही आणि कोणी तसं करुही नये.
मुलींचा नकार हा मुलांना "अपमान" वाटतो. ती एक माणूस आहे. तिचा नकार ही तिची "ईच्छा" म्हणून जेव्हा मुले स्वीकारतील तेव्हा त्यांना मुलींना विचारणे (प्रपोज करणे) आपोआप सोपे होईल.
कुठलाही स्वाभिमानी माणुस नकार पचवु शकतो, पण भलतीसलती आणि खोटी अपमानास्पद कारणं देऊन मिळालेला नकार मरेपर्यंत विसरु शकत नाही. ती त्याला काय बोलली हे इथे लिहिण्यासारखे नाही
दुसरा मुद्दा: हे one night stand किंवा तात्पुरते प्रकरण करायचे असेल तर मुल करण्या आधी मुलींना सांगण्याची हिम्मत दाखवता का? "मला लग्नात interest नाही आपण फक्त १ रात्र/काही दिवस मजा मारू या" असे सरळ मुलीला का नाही सांगत?
मी तुमचं पाकीट मारणारे आज, द्या टाळी असं म्हणुन कुठला पाकिटमार चोरी करतो का? ह्या अश्याचं फसवणुकीच्या विरोधात मी मतं मांडायचा प्रयत्न केलाय. कारण कारभार करणारा मोकाट सुटुन जातो. खेळखंडोबा होतो तो अश्या फसवणुकीतल्या मुलीचा आणि पर्यायानी तिच्या होणार्‍या नवर्‍याचा.
थोडक्यात मुलींचे "चरित्र" हे सरळ सरळ त्यांच्या virginity नुसार ठरते. आणि "मुलांचे चरित्र" हा concept च अस्तित्वात नाही. एका गिधाडाने फ़सविलेली किंवा तुमच्या भाषेत "गिधाडासोबत मजा मारून आलेली" मुलगी तुम्ही अजूनही "माणूस" म्हणून स्वीकारत नाहीत त्यामुळे अशा मुलींना त्या गिधाडावर बलात्काराचा आरोप करावा लागतो. गिधाडांचे मात्र आरामात लग्न जमते. ते गिधाडही मुलेच असतात न?
हा सरळ सरळ आरोप होतोय. मी त्या मुलीला अजुनही माणुस ह्याच द्रूष्टीनी पाहातो. पण तीचं मुलगी आता सो कॉल्ड मॅस्क्युनल फसवणुकीत सापडुन आता माझ्या मित्राला माणुस नाही तर एक नाईलाज झाल्यावर वापरायचा ओपन ऑप्शन म्हणुन पाहात होती. ह्याला काय म्हणाल? हे किती खरं किंवा किती खोटं मला माहित नाही. पण माझ्या मते तरी एवढ्या नाजुक बाबीपर्यंत गुंतागुंत वाढतात तेव्हा मुली नुसत्या शारिरिकद्रूशट्या गुंतलेल्या नसतात तर त्या मानसिकरित्या सुद्धा त्या विशिष्ट मुलामधे अडकत असाव्यात. नंतर त्यांचं लग्न दुसर्‍याशी झालं तरी जर त्याला मनातुन काढुन शकल्याचं नाहीत तरं ही फसवणुक कोणाची झाली? आणि अशी उदाहरणं घटस्फोटाच्या टोकापर्यंत गेल्याची उदाहरणं पाहण्यात आहेत. आणि हा फसवणुकीचा मुद्दा मुलं आणि मुली दोघांनाही सारखाचं लागु पडतोय.

In reply to by चिऊकाऊ

मुलीचा तोल जाणे शक्य आहे पण ही तिची "चूक" म्हणून मान्य न करता ते तिचे "चरित्र" ठरवून समाज मोकळा होतो
१. म्हणजे थोडक्यात, त्या मुलाने नाकारलेली ती मुलगी चांगल्या चारित्र्याची होती असं तुम्हाला म्हणायचंय? २. असं करून त्या नाकारणार्‍या मुलानं अपराध केला असं तुम्हाला म्हणायचंय?

In reply to by चिऊकाऊ

one night stand किंवा तात्पुरते प्रकरण करायचे असेल तर मुल करण्या आधी मुलींना सांगण्याची हिम्मत दाखवता का? ज्या मुलांना फक्त मजा मारायची असते ते आधी कशाला सांगतील?

In reply to by हेमंत लाटकर

मुलांना फक्त मजा मारायची
मजा फक्त मुलांनाच मारायची असते ! समानतेच्या या युगात केवढा हा गैरसमज आणि प्रतिगामी दृष्टीकोन!

In reply to by कपिलमुनी

मजा हेच मुळात टीमवर्क असते हे विसरलेले दिसतात ते साहेब.

In reply to by बॅटमॅन

टी २० का कसोटी हा खेळाडूंचा वकूब-तग धरण्याची क्षमता-वेळेची ऊप्लब्धता यावर अवलंबून असतो. खेळ-खंडोबा निरिक्षण प्रेक्षक नाखुस पोचवाला.