Skip to main content

असं का?

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी बुधवार, 24/12/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅडमिनना विनंती. ह्या लेखामधे काही आ़क्षेपार्ह गोष्टींचा उल्लेख केला जाणार आहे. जर आपल्या नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवुन लावावी. मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.
३-४ दिवसापुर्वी बस नी प्रवास करायला लागला. माझ्या शेजारी एक जेमतेम २०-२१ वर्षाचा म्हणजे माझ्यापे़क्षा ५-६ वर्षानी लहान कॉलेजकुमार बसला होता. फोनवर मित्राशी आपल्या सो कॉल्ड "प्रेमप्रकरणाबद्द्ल" गप्पा चालल्या होत्या. वन नाईट स्टँड आणि त्यातही दारुच्या नशेत केलेल्या वन नाईट स्टँड नंतर तिला हाकलुन लावण्याबद्द्ल (डीच करणे) अत्यंत बिभत्स भाषेमधे दबक्या आवाजात चर्चा चाललेली होती. पलिकडुन बोलणारे त्याचे "गुरुदेव" ह्या विषयामधे बरेचं अनुभवी दिसत होते. आपल्या आधीच्या प्रकरणात कसं पटकन सुटुन जाता आलं आणि ह्या पोरीला डिचं करणं कसं अवघड आहे, आणि ते कसं करायलाचं हवयं ह्याविषयी चर्चा चालु झाली. साला कचकचुन डोक्यात गेला हा हरामखोर. प्रेम (ह्या असल्या गिधाडांच्या बाबतीत फक्तं आणि फक्तं वासना) आणि त्यातुन घडणार्‍या पुढच्या नाजुक गोष्टी ह्या काय एवढ्या कॅजुअली कश्या घेऊ शकतात हे लोकं? ह्या मुलीसुद्धा पुढचा मागचा विचार नं करता अश्या हरामखोरांच्या जाळ्यात अश्या कश्या अडकु शकतात? बरं आता ह्यामधुन सुटण्यासाठी काही मुली चक्कं आम्ही त्याला ओळखु शकलो नाही असं कारण देतात. हे कारण कसं काय अ‍ॅक्सेप्टेबल असु शकतं? मुलाचा अ‍ॅप्रोच कसा आहे ह्यावरुन तो सिरिअस आहे का असला छपरी आहे हे समजुन येतचं की. जेव्हा एखादा अत्यंत सज्जन, सालस, कर्तुत्ववान आणि संयमी मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा कितीतरी वेळा असं होतं की तो त्या मुलीला साधं कधी सांगुही शकत नाही (स्वानुभव, एक सज्जन सोडलं तर बाकी सगळे पॅरामीटर्स फिट लागु होतात). त्यातुन एखादयानी गेल्या ७०,००० पिढ्यांमधलं धैर्य एकत्र करुन विचारलचं तर त्याला किती वेळा होकार मिळतो समोरच्या बाजुकडुन? बहुतेक अशी मुलं फ्रेंडझोनमधेचं जातात. हजारात एखादा नशिबवान असतो की त्याचं सिरिअस प्रेम असणारी मुलगी त्याला हो म्हणते. एक माझ्या माहितीमधला किस्सा मला इथे सांगावासा वाटतोय. नावं अर्थातचं जाहिर करणार नाही. आमचा मित्राचा मित्राशी ट्रेक ला म्हणा कुठे ट्रिपला म्हणा कुठे नाटक सिनेमाला म्हणा अश्या ओळखी होतं होतं एक मोठा मित्रामैत्रिणींचा ग्रुप तयार झालाय. त्यातल्या एका "क्ष" नावाच्या एका सुस्वभावी मुलाला एक "प" नावाची मुलगी खुप आवडायची. दोघही प्रोफेशननी ईंजिनिअर आणि आवडीनिवडींमुळे नेहेमी संपर्कात असायचे. मेड फॉर इच अदर म्हणतात ना तशी त्यांची जोडी होती. तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरु झाल्यानंतर हा अस्व्स्थ झाला. आहे नाही तेवढं धैर्य गोळा करुन त्यानी तिला लग्नाबद्दल विचारलं. तिनी शिस्तीत त्याला कटऊन लावलं. हा बाबाजी मानसिकरित्या पार कोलमडला होता. कसाबसा २ महिन्यानी जागेवर आला. पण त्याच्या वागण्याबोलण्यातला मोकळेपणा, हजरजबाबी पणा कुठे हरवुन गेलाय काय माहिती? ह्याच "प" मुलीला एका उच्चशिक्षितं गिधाडानी फशी पाडलं. जेमतेम महिन्याच्या आतमधे दोघांनी सगळ्या मर्यादा पार केल्या. तीन एक महिन्यानी काही मेडीकल कॉंप्लिकेशन्स होऊन हे लोकं सेपरेट झाले. ही मुर्ख मुलगी परत येऊन आता "क्ष" कडे येऊन मी तुला नकार देऊन चुक केली असं सांगते. "क्ष" तसा झालेला अपमान नं विसरणारा असल्यानी आता हे लफडं तुझं तु निस्तर असं म्हणुन पुर्ण अलिप्त झालाय. एकेकाळी घनिष्ठ मित्र असणारे दोघं आजं एकमेकांसमोर उभेही राहु शकतं नाहीयेत. "प"जानेवारीमधे लग्नं करेल ह्या. होणारा नवरा अर्थातचं अंधारात आहे. "क्ष" तिला माफ करु शकला नसला तरी अजुनही तिच्या आठवणीत झुरतोय. "थिंग्ज कुड हॅव बीन बेटर" अशी स्वतःचीचं समजुन घालतोय. त्या गिधाडाला मात्र नवीन भक्ष मिळालयं किंवा मिळेलचं. असं का? सज्जनं मुलांची मुलींना अ‍ॅलर्जी असते का? का ह्या असल्या गिधाडांची बेफिकीर वागणुक त्यांना मॅस्क्युनालिटी साईन वाटते? "सिन्सिअर पिपल डाय अलोन"...."देअर इज नो लव्ह लाईफ फॉर सिन्सिअर्स अनलेस इट्स अरेंज्ड" असा काही नवीन फंडा तर निर्माण होतं नाहीये ना? ह्या अश्या "शॉर्ट टर्म सॅटिसफॅक्शन अँड लाँग टर्म डॅमेज"ची विषवल्ली पसरली जाउ नये आणि अजुन कुठल्याही मुला-मुलींचं आयुष्य अश्या टेंपररी रिलेशनशिपमधे उद्ध्वस्त होऊ नये हिचं एक इच्छा. लेखं विस्कळीत आहे मान्य आहे. पण तो थोडा त्या वन नाईट स्टँड वाल्या मुलाच्या रागाच्या,धिस मस्ट मी स्टॉप्ड समव्हेअर आणि कदाचित स्पेशल तिला कधीच सांगु नं शकल्याच्या अपराधी भावनेतुन लिहिला असल्यानी थोडं समजुन घ्या. बस्स...!!!

वाचने 27121
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by नाखु

>>> खेळ-खंडोबा निरिक्षण प्रेक्षक नाखुस पोचवाला. स्टेडियम मध्ये तिकीट काढून की टीवी वर टेलिकटेलि? ;) -क्युरियस केस

च्यायला, मला एक कळत नाही पोरं पोरी जेव्हा प्रेमात/रीलेशनशिपमध्ये/लग्नात पडतात, तेव्हा 'डोण्ट आस्क डोण्ट टेल' पॉलिसी का ठेवत नाहीत? 'की बाबा/बाई माझ्यासाठी टाईम टी=० आत्ता सुरू होतो. आता तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी एकनिष्ठ राहाणं अपेक्षित आहे.' यानंतर जर दोघांपैकी कोणी/दोघेही इकडे तिकडे तोंड मारायला गेले तर करा म्हणावं हवी तितकी बोंबाबोंब. हाकानाका....

होतकरु मुलांनी जोपर्यंत शिक्षण ( १० वी , १२ वी , पदवी , इतर कोर्सेस , मास्टर्स वगैरे) चालू आहे तोपर्यंत प्रेम वगैरे गोष्टींच्या नादाला लागू नये . दूर रहावे . फक्त शिक्षण , करीअर यांवरच लक्ष केन्द्रीत ठेवावे . कारण बहुतेक मुले हि तोपर्यंत आर्थिकद्रुष्ट्या पालकांवर अवलंबून असतात . मग जेव्हा साधा एक कप चहा वैयक्तिक कमाइवर पिण्याची आणी पिलवण्याची पात्रता नसते तेव्हा प्रेम करण्याचा विचारही करू नये . मुली या मुळातच शिक्षण , करीअर , पैसा , स्थिरस्थावरता यांबाबत जागरुक असतात . त्यामुळे त्या सावधपणे आपले हित पाहू व जपू शकतात .

In reply to by सिरुसेरि

हे तुमचं मत झालं, माझ्या रुममेटने या वयात केलेले प्रताप ऐकले तेव्हा आम्ही अगदीच मागास असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. ;)

In reply to by सिरुसेरि

होतकरु मुलांनी जोपर्यंत शिक्षण ( १० वी , १२ वी , पदवी , इतर कोर्सेस , मास्टर्स वगैरे) चालू आहे तोपर्यंत प्रेम वगैरे गोष्टींच्या नादाला लागू नये
सध्या महानगरांमध्ये पहिला बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड असण्याचा वय १४-१६ आहे .

निर्णय कसे घ्यावेत, का घ्यावेत आणि ते चुकले तर त्याची जबाबदारी घेऊन त्यातून मार्ग कसा काढावा, बरोबर आले तर उत्साहाला संयतपणाचे कोंदण कसे घालावे हे आपण का शिकवत नाही आपल्या मुलांना? आयुष्य हे प्रवाही असतं, कित्येक वेळा पाण्याची ओढ कशी असेल याची आपण केलेली गणिते चुकतात. पण ते तितके मनावर घेऊ नये. चांगल्यावाईटाला एक स्वतंत्र, जबाबदार आणि समर्थ व्यक्ती म्हणून सामोरे जायला शिकवले तर कित्येक मनांमधल्या साचलेपणाचा निचरा होईल. सुधा मूर्ती यांनी बहुधा 'वाइज अ‍ॅण्ड अदरवाइज' या लेखसंग्रहात नॉर्वे की स्वीडनमधील आणि भारतातील अशा दोन कुमारी मातांच्या कथा सांगितल्या आहेत. नॉर्वेतील मुलगी प्रेमात पडते, एका मुलाला जन्म देते, नंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिचं ब्रेकअप होतं, तो त्यांच्या मुलाचा खर्च उचलतो आणि एवढं होत असतानाही ती तिच्या आईवडिलांसोबत अगदी आनंदाने जगत असते. भारतातील मुलगी, लग्नाआधी मातृत्त्व येण्यामुळे होणारी नाचक्की टाळण्यासाठी आत्महत्त्या करते. किती फरक आहे दोन्हीकडच्या संस्कृतीत! लैंगिक आकर्षणाला तिकडे नैसर्गिक समजलं जातं. इकडे शांतं पापं. हेच मुलांनाही लागू आहे. शारीरिक ओढ टाळता तर येत नाही. मग ती दडपण्याच्या दडपणातून मुले आणि मुली, दोन्ही चुका करून बसतात - किंवा केलंय त्याला चूक मानू लागतात. कुठेतरी एक सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे विचारसरणीत. समाज मोकळा झाला पाहिजे.

जगातील सर्वांना / प्रत्येकाला कोणी सुधारु / बदलू शकत नाही . पण हा चंगळवाद आपल्या घरात प्रवेश करणार नाही याची मात्र जास्तीत जास्त काळजी घेता येणे शक्य आहे . अशा तामसी प्रव्रुत्तींना घराच्या उंबरठयाबाहेरच रोखावे.

नॉर्वेतील मुलगी प्रेमात पडते, एका मुलाला जन्म देते, नंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिचं ब्रेकअप होतं, तो त्यांच्या मुलाचा खर्च उचलतो आणि एवढं होत असतानाही ती तिच्या आईवडिलांसोबत अगदी आनंदाने जगत असते. भारतातील मुलगी, लग्नाआधी मातृत्त्व येण्यामुळे होणारी नाचक्की टाळण्यासाठी आत्महत्त्या करते.
इथे एक अवांतर : जल्ला प्लानिंग, गर्भ निरोधके इत्यादि इत्यादि फकस्त लग्न झालेल्या लोकांना लागू असते काय हो ? (जर संभाव्य परिणामांना सामोरे जायची तयारी नसेल तर) लग्नाआधी केलं तर काय पप्पांची बाभळ बुडेल व्हय ? काय कारायचय ते करा, पण झेपत नसेल घेऊ नये आन सोसत नसेल तर करु नये, एवढी अक्कल तर बाळगावी..

आणि आता अवांतराचे अतिअवांतर: मंडळींसाठी डिट्टेलमध्ये (न बोललेल्या शब्दांसहित) मूळ म्हण : (दारु) झेपत नसेल तर घेऊ नये आन (स्वतःची चेष्टा) सोसत नसेल तर (दुसर्‍याची) करु नये. ;) (उगी कल्पनाशक्ती लई पळवू नये!)

लेखातील व लेखास पूरक प्रतिसादातील काही मुद्दे खटकले लेखातील उदाहरण श व प चे पहिले व कथा सिनेमा आठवला काही प्रतिसादात कमिटेड मुलांना सोडून गीघाडे किंवा हरामखोर किंवा छपरी मुलांच्या कडे ..... असे वाचले , आता छपरी मुलगा म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे त्यांच्या माथी तसे लिहिले असते का तशी त्यांची वेशभूषा व भाषा असते असे तुम्हाला अभिप्रेत आहे , कथा सिनेमातील फारुख शेख आठवा कमालीचा आत्मविश्वास असलेला संवांद कलेत हुशार हसलेला बायकांची नव्हे तर पुरुषांची मानसिकता त्यांचे कच्च्चे दुवे ओळखून त्यांना खिंडीत गाठणारा फारुख प्रथम दर्शनी सालस लोभस व आकर्षक व्यक्तीमात्वाचा असतो. माझ्या पाहण्यात अनेक मुली पटवण्यात पटाईत असणारे अनेक तरुण सगळेच काही आकर्षक राजबिंडे नसतात ,हंटर सिनेमात नायक दाखवला तसा सामान्य दिसणारे सुद्धा असतात. मुलींना व मुलांना कोणात काय आवडेल हा गहन विषय आहे आपल्या संस्कृतीत लग्नाआधी शरीर संबंध समाजमान्य नाहीत पण ते अनेकदा होतात मुलगा कमिटेड असो किंवा भ्रमर वृत्तीचा लग्नाआधी शरीर संबंध ठेवतात , मुळात हे शरीर संबंध राजी खुशीने झालेले असतात तेव्हा उगाच झाल्या प्रकारचा जास्त बाऊ करण्यात काहीही अर्थ नसतो , मुलाने मुलीला फसवले किंवा पूर्वी नासवले असे शब्द प्रयोग वापरले जायचे दुध नासते ते पूर्ववत होत नाही मात्र लग्नाआधी महिलेने शरीर संबंध ठेवले तर संपल सगळ व पुरुषाने ठेवले तर त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन का माणसाला आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर जे अनुभव मिळतात त्यातून बोध घेऊन त्याने पुढचे आयुष्य सुखद करायचे असते , भ्रमर वृत्तीच्या मुलांना व मुलींना त्यांच्या खाजगी आयुष्य किंवा त्यांचे प्रणय जीवन त्यांनी कसे जगावे किंवा कसे जगू नये ह्याबद्दल मार्गदर्शक सूची बनवणारे आपण कोण आहोत. लेखाच्या सुरवातीला जेव्हा लेखाने एका मुलाला वन नाईट बद्दल बोलतांना ऐकले, तेव्हा ह्यांना प्रेम समजत नाही फक्त वासना मनात असते असे द्वेषाने लिहिलेले वाचले आयुष्याचा प्रत्येक टप्यावर वासना वाईट व प्रेम उद्दात अश्या खुळचट कल्पना आपल्या मनात समाजातून आपसूक भरल्या जातात , शरीराला भिन्नलिंगी आकर्षण वाटणे हे नैसर्गिक आहे दोघांच्या संमतीने शरीर सुखांचा अनुभव घेणे देखील नैसर्गिक त्यात दोघांच्या कृत्यावर तिसर्या त्रयस्थ व्यक्तीने ह्यांनी पुढे कमिटेड राहून लग्न केले तर ह्यांचा शरीर संबंध प्रेमाच्या वर्गवारीत उद्दात ठरतो व भ्रमर वृत्ती प्रमाणे दोघांनी कालांतराने आपापले जोडीदार बदलले तर त्यांनी वासनेच्या नावाखाली हैदोस घातला म्हणून बोंबा का माराव्यात निसर्गात कीटक असो किंवा जनावर त्यात साप सिंह वाघ आलेत ह्यात नराला मादीस प्रणय करण्यात उद्युक्त करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात मी सालस आहे कमिटेड वृत्तीचा आहे लौकिक अर्थाने कमावता शिकलेला आहे म्हणून मुलगी माझ्या लगेच प्रेमात पडेल ह्या भ्रमात कुणीही राहू नये एका सिनेमात अमोल पालेकर ला अशोक कुमार जसा ट्रेन करतो व पुढे असरानी चा पत्ता अमोल कापतो हे पाहता प्रत्येकाला आयुष्यात अशोक कुमार सारखा एखादा व्यक्ती किंवा व पु ह्यांचा पार्टनर सखा गुरु म्हणून लाभेल असे नाही अवांतर पाण्यात पोहायला माश्याला व इटालियन व ब्राझिलियन माणसांना मग ते समाजातील कोणत्याही स्तरातील असो मुलींना अप्रोच कसा करावा हे शिकवावे लागत नाही, असे माझे निरीक्षण आहे

In reply to by निनाद मुक्काम …

Your comment is right, no doubt about that. One night stand or Friends with benefits or whatever other names it is called by. All I want to do is point out a major flaw due to which Genuine/ nice and sincere people (Doesn't matter whether that person is male or female) are ofthen (Too ofthen actually) ditched. When the other person realizes his/ her mistakes they find no shame in returning to people they ditched and tell them how they were wrong. But whats the point in accepting the fact when it's irreversible and too late? Good people are already hurt. This should be avoided at all costs. The article is not about the incident but about aftermath. It's all about making right choices and not hurting genuine people :). (Sorry for writing in english, browser is not translating text to Marathi :(. Will take some time to fix)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

फ़क्त पोरींशी बोलायला बुझणारी पोरे ही शामळु किंवा सज्जन खचित नसतात बरंका कप्तानसाहेब!! उदाहरण अस्मादिक. कॉलेज मधे फ्रीक्वेंट बंडखोरी मारामार्या अन काय काय केलेला मी सज्जन खचित नव्हतो. पण आमच्या गावचे कर्मठ अन पारंपरिक वातावरण पाहता पोरींशी बोलणे मला मुश्किल होत असे. त्यात फादर प्रसिद्ध शिक्षक अन अडीच प्रसिद्ध पैलवान! नुसती सिगरेट प्यायची एखादी तर १० किमी गावाबाहेर जाणारा मी . तुम्ही म्हणता तसे पोरीही कधी त्या रावडीपणावर भाळल्याचे दिसले किंवा लक्षात आले नाही (आमचे दुर्दैव).