Skip to main content

एक रात्र..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 22/09/2007 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. एक धुंद रात्र सख्या मी होते बावरी सय तुझी ही दाटलेली या माझ्या अंतरी मूक भावनांचा खेळ किती खेळावा परी काळजातली हुरहूर तुझ्या दाटली माझिया उरी आतुरलेले क्षण सारे साद घालिती तुझे नेत्र प्रणयातूर जाहले मी सर्वत्र तुझेच गात्र धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... - प्राजु.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 12890
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. मनोगतासारख्या बलाढ्य संकेतस्थळावर ही कविता आधी प्रकाशित झाली असूनदेखील आपल्याला ती इथे प्रकाशित कराविशी वाटली ही आनंदाचीच गोष्ट आहे. कधितरी आपलं एखादं साहित्य आमच्या मिसळपाववर देखील प्रथम प्रकाशित करा हीच विनंती! अन्यथा, मनोगतावर प्रकाशित केलेलं साहित्य इथे प्रकाशित करत राहण्यास काहीच हरकत नाही. मिसळपावचा तोही सन्मानच असेल! धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... कविता छान आहे हो. पुढील लेखनाकरता अनेकोत्तम शुभेच्छा! :) तात्या.

धन्यवाद तात्या.. पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. - प्राजु.

In reply to by प्राजु

पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. हो नक्की करतो, पण सध्या जरा रौशनीत अडकलो आहे. ती पूर्ण करतो मग शिंत्रेगुरुजींकडे पाहू..:) अहो प्राजु काय सांगू तुम्हाला आता? फक्त शिंत्रेगुरुजीच नाही, मनोगतावर माझं खूप काही राहून गेलं आहे! तात्या.

प्राजु, मी येत्या २ दिवसातच मिसळपाव वर आलो आहे. आणि लगेचच १ उत्तम कविता वाचायला मिळाली. अतिसुंदर...

`श्रुंगारा'च्या नावाखाली अतिशय अश्लील कविता लिहून आमच्यासारख्या निरागस, निष्पाप, कोवळ्या वयातील पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या तथाकथित कवयित्रींचा धिक्कार असो! (अवांतर : कवितेतील भावना या शिंडी क्रॉफर्डने तात्यांबद्दल व्यक्त केलेल्या असतील, तर तात्यांना शुभेच्छा आणि कवितेवरील भोचक अभिप्राय सपशेल मागे!)

कवितेत नेत्र प्रणयातूर गात्र अधरी तनू हे फार अवघड शब्द आहेत. शृंगारिक कवितांसाठी शा. प्रभाकर यांच्या कवितांचा अभ्यास करा असे मी सुचवतो. आपला, (गंगू हैबती) आजानुकर्ण

(कवितेची प्रशंसा करणे बापजन्मी शक्य नसल्याने, कवितेची सहज सुचलेल्या शब्दांत वाट लावत आहे. हीच प्रतिक्रिया समजून घ्यावी!) एक "धुंद' रात्र सख्या मी होते बावरी बाराची वेळही उलटलेली घड्याळातल्या काट्यावरी भूकभावनेशी खेळ किती खेळावा तरी, काळजाला घोर माझ्या "बाटली' तुझ्या उरी भेदरलेले क्षण सारे ना थाऱ्यावर तुझे नेत्र "गटारा'तूर अंग जाहले, रस्त्यावर असे ना कुत्रं रस्त्यावरची धूळ सारी चुंबून घे अंगावरी एक रात्र सख्या तूही घे लपेटून "कोठडी'!

सय तुझी ही दाटलेली ह्यापेक्षा साय तुझी ही दाटलेली कसे वाटते? प्यार इश्क मौहब्बत

कविता सु॑दर आहे. आवडली चा॑गली आहे मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.

मुक्तसंगः अनहंवादि प्राजुतै, कविता आवडली. तरल अभिव्यक्ति! पुलेशु.

कविता मस्तच! छान वाटले, खूप दिवसानी छान कविता वाचायला मिळाली..:) अवांतरः तू गाणे खूप छान म्हणतेस...:) ऐकले मी यु ट्युब वर...:)