मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे.
एक धुंद रात्र सख्या
मी होते बावरी
सय तुझी ही दाटलेली
या माझ्या अंतरी
मूक भावनांचा खेळ
किती खेळावा परी
काळजातली हुरहूर तुझ्या
दाटली माझिया उरी
आतुरलेले क्षण सारे
साद घालिती तुझे नेत्र
प्रणयातूर जाहले मी
सर्वत्र तुझेच गात्र
धुंद जाहले गीत माझे
चुंबुन घे तू अधरी
एक रात्र सख्या आपुली
घे लपेटून तनूवरी...
- प्राजु.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12860
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
आनंदाचीच गोष्ट आहे!
धन्यवाद..
हो नक्की,
In reply to धन्यवाद.. by प्राजु
छान
धन्यवाद..
१+
In reply to धन्यवाद.. by प्राजु
सुंदर कविता
मस्त कविता
छान
अतिशय
सुंदर...
फार अवघड शब्द
(कवितेची
अभिजीत
In reply to (कवितेची by आपला अभिजित
सय तुझी ही
धुंद जाहले
छान
छान
व्वा!
१+
In reply to व्वा! by वारकरि रशियात
प्राजु,