अगा ते ब्रम्हकमळ उमलले दारी...
आमच्या टेरेसवरच्या छोट्याश्या बागेत अनेक वर्षे एक ब्रह्मकमळाचे (Epiphyllum oxypetallum) रोपटे एक कोपरा पकडून झोपाळू अनामिक सदस्यासारखे चूपचाप पडून आहे. हिमालयात आणि श्रीलंकेत मूळ घर असलेली ही वनस्पती भारताच्या अनेक घरांच्या बागेत रोपट्यांच्या स्वरूपात वाढवली जाते. तिचा भारतापेक्षा थोडा वेगळा प्रकार (Phyllocactus purpusii) मेक्सिको, ब्राझील, इ अमेरिकन खंडातील देशांतही सापडतो.
बागेतल्या इतर नखरेल वृक्षवल्लींना सांभाळताना आणि त्यांच्या सुंदर रूपरंगाचे कौतुक करताना या कार्टूनमध्ये रोडरोलर अंगावर जाऊन सपाट झाल्याप्रमाणे दिसणार्या बिचार्या वनस्पतीकडे बर्याचदा लक्षही जात नाही. कारण Epiphyllum oxypetallum असे भारदस्त शास्त्रीय नाव आणि ब्रम्हकमळ असे दैवी भारतीय नाव असलेल्या या झुडुपाला फार आकर्षक रूपरंग नाही. ऑर्किड-कॅक्टस (Family Cactaceae) प्रकारात मोडणार्या या झुडुपाच्या फांद्या लांबलचक पानांसारख्या दिसतात (phylloclade) आणि त्यांच्या कडांत असलेल्या खाचांसारख्या दिसणार्या डोळ्यांतून नवीनं फांद्या फुटतात. याला Jungle cactus व Dutchman's Pipe या नावानेही ओळखले जाते...
अशी ही वनस्पती आमच्या टेरेस बागेत जवळ जवळ तीन वर्षे निद्रावस्थेत राहिल्यावर अचानक जागी होवून काही दिवसांपूर्वी आपले अस्तित्व जाणवून द्यायला लागली. तिच्या सर्वात समोरच्या फांदीच्या एका डोळ्यामधून अगदी डोळ्यात भरेल अश्या मोक्याच्या जागी एक पिटुकले बाळ डोकावू लागले आणि त्याने "मी सर्वसामान्य फांदी नसून एक बालकलिका आहे" हे जाहीर केले. हे कवतिक हा हा म्हणता सर्वसामान्य झाडांच्या कळ्यांना स्वतःबद्दल न्यूनत्व वाटावे इतके मोठे झाले. ती कलिका अर्थातच घरातल्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र झाले यात काहीच आश्चर्य नव्हते !
......
......
ब्रह्मकमळ : ०१ व ०२ : संध्याकाळी ५ व ६ वाजता
ब्रह्मकमळ : ०३ : रात्री ९ वाजता
ब्रह्मकमळ : ०४ : रात्री ९ वाजता
ब्रह्मकमळ : ०५ : रात्री १० वाजता
......
ब्रह्मकमळ : ०६ व ०७ : रात्री १० व ११ वाजता
ब्रह्मकमळ : ०८ : रात्री १२ वाजता पूर्ण फुललेले फूल
ब्रह्मकमळ : ०९ : रात्री १२ वाजता पूर्ण फुललेले फूल
ब्रह्मकमळ : १० : १२ वाजता पूर्ण फुललेले फूल
ब्रह्मकमळ : ११ : सकाळी कोमेजलेले फूल
ब्रह्मकमळ : १२ : दुसर्या दिवशी सकाळी दिसणारे ब्रह्मकमळ झुडूप
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
मस्त! आवडला प्रवास त्या
वाह!
पानाचा तुकडाच लावतात.
ही वनस्पती कॅक्ट्स कुटुंबातील
मस्त
बढिया
कालच क्रुष्णकमळ बघितले आज हे.
मार्व्हलस !
मस्त स्टोरी आणि फोटूही.
मस्तच. आमच्याही घरी असे एक
ब्रम्हकमळ हे नाव एकापेक्षा
अतिशय आवडते फुल.सुरेख लेख.
मस्त फुलं उमललीत.
सुरेख. अतिशय नाजूक फूल.
माझा गणेशा झालाय.
तीन मशीन वर आणि तीन
मला फोटो दिसत नाहीये. डॉ.
रेवाक्का शांती करुण घे बै आधी
मस्त! माझ्या घरीही एकदा हा
छान!
लेखातले फोटो दिसत नाहीत परंतू
आणि फुले होण्यासाठी...
सुरेख प्रतिसाद!!
अद्भुत किमया
इतक रसभरीत वर्णन वाचून
सुरेख!
सर्व प्रतिसादकांना अनेकानेक
रोचक..
कौतुक
छान माहिती. डाॅ. म्हात्रे
खुपच छान.
धन्यवाद ! तुमचे स्वागतच असेल.
खूप छान चित्रे !
छायाचित्रे दिसत नाहीत , पण
खूप छान.
धन्यवाद !
सुंदर पण अनाकलनीय !
धन्यवाद !
हो पण...
असेक्शुअल प्रोपॅगेशन...
सुंदर! हुप्प्या व डॉक्टर
अजून एक...
किडे कृमी?
कलम प्रकारात गुणवत्तेची
कलम प्रकारात गुणवत्तेची खात्री असते तशीच झाडावर तुटून पडणारे जीवजंतू किडे, हवामानातील चढउतारांना तोंड न देता येण्याचा दुबळेपणा हाही पुढील पिढीत उतरेल ह्याची खात्री असते तेव्हा ती एक दुधारी तलवार आहे.मूळ पेशींतले सर्व चांगले वाईट गुणधर्म कलम / टिश्शू कल्चर वापरून बनवलेल्या वनस्पतींत येणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच अशी पैदास शास्त्रीय पद्धतीने करताना मूळ वनस्पती उत्तम गुणसंपन्न आणि (निदान न परवडणार्या दोषांबाबत) दोषरहित असल्याची खात्री करून केली जाते. यात (आणि इतर कशातच) "१००% उत्त्तम गुण असलेले व १००% टक्के अवगुण काढून टाकलेले" वाण मिळणे वास्तवात शक्य नसतेच. तेव्हा काही सर्व अधिक-उणे जोडल्यावर जास्तीत जास्त फायदेशीर वाण मिळविताना काही तडजोडी कराव्याच लागतात... फक्त त्या तडजोडी करताना दूरगामी परिणाम जमेस धरून शास्त्रीय पद्धतीने करणे हेच आपल्या हातात असते. अर्थात सद्या जनुकीय शास्त्र ज्या वेगाने पुढे चालले आहे ते पाहता, दूरच्या भविष्यात केवळ उत्तम जनुके निवडून आणि नको असलेली जनुके वगळून आदर्श जीव बनविता येण्याची शक्यता नाकारता येत नाही... तो पर्यंत एकुणात (नेट रिझल्ट) फायदेशीर असलेल्या तडजोडी करणे भाग आहे. हेच सर्व नैसर्गिकरीत्या "घडण्यासाठी" हजारो/कोट्यवधी वर्षे लागतात, शिवाय निसर्गाचे बदल हे स्वैर (रॅंडम) तत्त्वावर चालत असल्याने, इतक्या मोठ्या कालानंतरही, "१००% उत्त्तम गुण असलेले व १००% टक्के अवगुण काढून टाकलेले" वाण तयार होईल याची खात्री नसतेच. नैसर्गिक पद्धतीत, बदलत्या परिवेशात (एन्व्हिरॉन्मेंट) जीवाला तगण्यासाठी आणि वंशवृद्धीसाठी आवश्यक ते गुणधर्म त्याच्यात योगायोगाने आले, तरच तो तगतो नाहीतर नष्ट होतो. जरी तगला तरी त्यात मानवाला आवश्यक वाटणारे गुणधर्म असतीलच याची खात्री नसते. किंबहुना जीवाला तगण्यासाठी उपयोगी पडलेले गुणधर्म मानवाला व इतर जीवांना धोकादायकही असू शकतात... अनेक वनस्पती आणि प्राणी अश्याच गुणधर्मांमुळे आजवर तगून आहेत, उदाहरणार्थ : वनस्पतींमधील काटे, कडू चव, विषे आणि प्राण्यांतील विषे, नखे, आक्रमकपणा. मुख्य म्हणजे मानवाला उपयोगी असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या विकासात मानवाचा हस्तक्षेप ही काही आधुनिक काळातली गोष्ट नसून ती प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. आजच्या मानवी जीवनात उपयोगी ठरलेले सर्वच प्राणी व वनस्पती या "मानवाच्या हस्तक्षेपामुळेच" "मानवाला उपयोगी अश्या गुणधर्माच्या" झाल्या आहेत. या मानवी हस्तक्षेपामुळेच केवळ १०,००० वर्षांत मानव प्रगतीची फार मोठी झेप घेऊ शकला. या हस्तक्षेपाला मानववंशशास्त्रात "वनस्पतींचे व प्राण्यांचे घरगुतीकरण अथवा पाळीव बनवणे (डोमेस्टीकेशन)" असे म्हणतात. डोमेस्टीकेशनच्या काही शे ते हजार वर्षांच्या टप्प्यात, मानवाने निसर्गात रानटी अवस्थेत असलेल्या अनेक वनस्पती व प्राण्यांमध्ये अलगीकरणाचे (सेपरेशन) व संकराचे (हायब्रिडायझेशन) प्रयोग करत निकष-चूक (ट्रायल अँड एरर) पद्धतीने "उत्तम अन्नधान्य व फळे देणार्या वनस्पती" आणि "शेतकाम, वाहतूक, व्यापार व युद्धाला उपयोगी प्राणी" विकसित केले आहेत*. तसे झाले नसते तर आजच्या मानवाच्या वापरातल्या सर्व वनस्पतींच्या व प्राण्याच्या जाती आजच्या इतक्या सुधारीत व इतक्या मानवोपयोगी नक्कीच झाल्या नसत्या. आधुनिक शात्रीय प्रगतीमुळे हल्ली त्या मूळ प्राचीन प्रक्रियेत नवीन प्रगत पद्धतींची भर पडत चालली आहे, इतकेच. असो हा फार मोठा विषय आहे. पण वरील स्पष्टीकरण मुद्दा समजण्यास पुरेसे ठरावे. ====== * : आपल्या नेहमीच्या व्यवहारात वापरल्या जाणार्या सर्वच वनस्पती व प्राणी ही डोमेस्टीकेशनची उदाहरणे आहेत. त्यातली दोनच प्रातिनिधिक उदाहरणे अशी आहेत: १. मानवाने रानटी घोडा माणसाळवून त्याचे मानवोपयोगी पाळीव घोड्यांच्या वाणांत परिवर्तन घडवून आणले नसते तर प्राचीन व मध्ययुगीन आंतरखंडीय व्यापार व प्रचंड साम्राज्ये उभी राहणे अशक्य होते व पुढचा मानवी विकासही शक्य झाला नसता. २. जवळ जवळ ४,००० वर्षे अलगीकरण आणि संकराचे प्रयोग करून अमेरिकेतील प्राचीन मानवाने इंचभर लांब कणीस आणि मोहरीइतके दाणे असलेल्या एका रानटी वनस्पतीला, फूटभर लांब कणीस व मूळातल्यापेक्षा २०-२५ पट मोठे दाणे असलेल्या मका या आजच्या आधुनिक वनस्पतीत विकसित केले आहे. अन्नधान्य देणार्या सर्व वनस्पती कमी अधिक फरकाने याच पद्धतीतून विकसित झाल्या आहेत.कर्मधर्मसंयोगाने याच विषयावर
फोटो आता दिसले. मस्तच आलेत.
अजुनही काही केल्या कमळ दिसेना
बहुदा पुण्य कमी पडत असावे ! ;
बहुदा पुण्य कमी पडत असावे
अर्रर्र, "मेन्टॉस जिंदगी" चा