Skip to main content

भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.

लेखक हेमंत लाटकर यांनी बुधवार, 02/09/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत. ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते. प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.

वाचने 55088
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by एस

दौर था (कवीतांका) य भी एक दौर है !!! दुपारचे १२.४० झाले आहेत ऐकू यात सुमधूर गीत "ये दुनीया ये महफिल.." आप्कीफर्माइश नाखु

वानप्रस्थाश्रम स्विकारायची इछ्चा नसलेल्यांची हीच गत होणार.. म्हातरपणी स्वतःच्या अथवा मुलाच्या घरात रहावे असे नक्किच आपली प्राचिन संस्कृती बोलत नाही. अहो मोठमोठे राजे लोक वयं झाली की सर्वत्याग करुन वानप्रस्थी होत असत...

In reply to by द-बाहुबली

टंकनश्रम वाचवल्या बद्दल धन्यवाद. इथे जी लोक ५०-६० व्या वर्षीच देवाघरी/अल्लाला प्र्यार/कैलासवासी वगैरे होत असत ते आता सहज ८०-९० वर्षे जगत आहेत. जरा सारासार विचार करायला शिका कि उगाचच आपले सगळ्या ठिकाणी धर्म बुडाला आणि काय हि संस्कृतिचे रडगाणे. एक जन वानप्रस्थाश्रम स्विकारायला स्वतःहून पुढे येत नाही.

In reply to by चैतन्य ईन्या

इथे जी लोक ५०-६० व्या वर्षीच देवाघरी/अल्लाला प्र्यार/कैलासवासी वगैरे होत असत ते आता सहज ८०-९० वर्षे जगत आहेत. तुम्ही उलट सांगताय.आपल्या आजोबाच्या काळात जन्मलेले लोक 80-90 वर्ष जगत. आताच्या लोकांना 50 शी आली की हार्ट अॅटक होत आहेत, 65 शी आली की स्वर्गवासी होत आहेत, बायका मात्र 85-90 वर्ष पार करीत आहेत.

In reply to by तुषार काळभोर

हा ह हा! :) मधे कस्काय वर आलेली ही ढकल आठवली … (याला काय कविता म्हन्टात का?) मध्य बिंदु आला आयुष्याचा हाफ सेंच्यूरी हा शतायुषीचा ना इकडचे राहीलो ना तिकडचे ना जवान ना वृद्धावस्थेकडचे काही झालेत थोडे स्थूल, काही लठ्ठे काही मात्र आहेत टुणटुणीत पठ्ठे काहिंची पिल्लं गेली घरटे सोडून काहीं अजून काढतात रात्र जागून लागले कोणास चश्मे, कोणाला कवळ्या कोणा कोणाला बीपी शुगरच्या गोळ्या चेहऱ्यावर दिसू लागल्या महीन सुरकुत्या त्या लपवण्यास करतो अतोनात खटपट्या आता लवकरच गुडघे दुखू लागतील काहींच्या डोळ्यात कॅटरॅक्ट पण होतील लागेल कार्डीयाक बायपास काहींना नी जॉइन्ट हिप जॉइन्ट रिप्लेस बाकींना काहींना अलझायमर्स...किंवा डिमॅनशीया बऱ्याच जणांना इनसॉमनीया वा अॅमनेशीया सुरू होण्या पूर्वी ही शरीराची घसरण एन्जोय करा आयुष्याचे क्षण-क्षण छंद जोपासा..मित्र बनवा..जग सारे फिरून घ्या... काम तर आहेच हो...स्वत:ला पण थोडा वेळ द्या... हाफ सेंच्युयरी आलीय...स्वत:ला पण थोडा वेळ द्या...!

In reply to by हेमंत लाटकर

नै वृद्धाश्रमात जाणारे लोक्स नशिबवान असतील तर तुमच्या धाग्याच्या मुद्द्यामधे कैच प्वॉईंट र्‍हात नै काका. धाग्याची नाडी आवळायची का?

In reply to by आदूबाळ

लेगस्टंप उघडा? अहो ते डायरेक्ट नॉन स्ट्रायकरला आले तिन्ही स्टंप्स उघडेचं होते. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वृद्धाश्रमात जाणारे लोक्स नशिबवान असतील तर..... नशिबवान म्हणजे धडधाकट असल्यामुळे वृद्धाश्रमात जायची गरज नसणारे

In reply to by द-बाहुबली

वानप्रस्थाश्रम स्विकारायची इछ्चा नसलेल्यांची हीच गत होणार.. वृद्धाश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम नव्हे

In reply to by प्रसाद गोडबोले

आज सुट्टी आहे काय का संप आहे ?

In reply to by नाखु

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ आज काम कमी आही आणि बाकी ऑफीसात काहीच "इन्टरेस्टींग" नसल्याने आम्ही वृध्दास्रमात असल्या सारखेच आहोत ... म्हणुन जरा भावना वाटुन घेतल्या =))

In reply to by प्रसाद गोडबोले

मी पण भसाभसा, ढसाढसा रडलो.. नंतर नंतर तर पाणी पुसायला माणूस बोलवावा लागला. पाऊस पडतोय म्हणून बरं.. पर्जन्यतुषारांवर ढकललं सगळं.. भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत... बरं, मग?

In reply to by चिगो

कौनो चिंता की बातइ नाही है, हमार बच्चा को अच्छी पढ़ाई देना हमार फरज है, ऊके बाद गर उसको उसका फ़रज याद ना आवत है तो हम का कर सकते है उसके लिए, बताईये तो. हमार भविष्य की पूंजी जमा करके रख देना है बस्स. बाकी नए नए पढना लिखना सीखे बच्चे इधर उधर कुछ तो लिख देते ही है. जोस होता है. हो जाईल ठंढा!

In reply to by प्यारे१

भैबा आपके जइसन कहाँ सब सोचैबे करताऊ? ओकर को ता बस बच्चा तक को इन्शुरन्स पालिसी की तरह देखने का आदत पड़त बा! भैया संस्कारवा जब देइबै करेंगे तभी तो जा कर के कुछो होगा!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरे छड़ो ई सब बात का. ऊ करीना को देखे का? कइसन दूध से नहाकर आयल लागत है हमार दिल में तो एकदम... अब का बताय आपको

In reply to by प्रसाद गोडबोले

=)) आमची पण ढसाढसा रडणारी स्मायली! खरं तर वृध्दाश्रम ही काळाची गरज आहे हे त्यांची वाढती संख्या अधोरेखीत करत आहे.पण अशा दवणीय लिखाणामुळे ज्यांना अशा आश्रमाची गरज भासते त्यांच्या नातेवाईकांच्या मनात निष्कारण गिल्ट निर्माण केला जातो. मी एका आनंदी वृध्दाश्रमासाठी अनेक वर्ष काम करतेय.तिथे राहाणारे बरेचसे उच्चवर्गातील रिटायर झालेले लोक आहेत.बर्याच जणांची मुलं भारताबाहेर सेटल्ड आहेत.या आजी आजोबांना घर सांभाळणे जमत नाही.नोकरवर्गाची भिती वाटते.ते इथे आनंदाने राहातात.त्यांच्यातले काही वृद्धांच्या आॅलिम्पिकमध्ये भाग घेऊन आलेत.काही बागकामात मन रमवतात.काही निपुत्रिक जोडपी तसेच अशाच जोडप्यातला जोडीदार नसल्याने देखील आहेत.समवयस्क असल्याने छान मैत्री दिसते. अजून एक कॅथलिक ख्रिश्चन लोकांचा आश्रम माझ्या घराजवळ आहे.तिथे माझी ८३ वर्षाची मैत्रीण चार उच्चपदस्थ मुलं असताना स्वातंत्र्य असावे म्हणून राहाते. सकारात्मकतेने गरजेकडे पाहिले तर ढसाढसा वाले एकटी छाप विचार करावे लागणार नाहीतच!

नात्यांचे बंध तकलादू होत आहेत ओ. बाकी कै नै. पोरांना वेळेत वेळ दिला नसल्यानं वेळेला पोरं वेळ देत नाहीत. - गुत्ताडलेला

सर्वच जण जड होतात म्हणून स्वतःच्या आईवडीलांना व्रुद्धाश्रमात धाडत नाहीत असा अनुभव आहे. बर्‍याच वेळेला आईवडील व्रुधापकाळामुळे ईतके जराजर झालेले असतात की त्यांना अंथुरणातुन उठताही येत नाही. नवरा बायको कामाला जाणार असतील तर अशा म्हातार्‍यांचे खूप हाल होतात. दीवसभरात पाणी हवे असेल ते देणारेही कुणी नसते तसेच वेळच्यावेळी औषधे देणेही शक्य होत नाही. सर्व सोपस्कार जागेवरच होत असल्यामुळे कपडे बदलणे, आंघोळ घालणे. अशावेळी म्हातार्‍या लोकांना अवघडल्यासारखे होते. घरात दीवसभर माणूस ठेवणे हा एक उपाय असतो पण आजकाल म्हातार्‍यांचा छळ करणारे व्हिडीओ बघीतले की तेही घातक वाटते. उलट व्रुध्दाश्रमात पाठवणे आर्थिकद्रुष्ट्या जास्त जड जाते. एका व्रुद्धाचा महीन्याचा व्रुध्दाश्रमातला खर्च २० हजाराच्या पुढे जातो. यावर उपाय म्हणून आता काही लोक व्रुद्धांची काळजी घेण्याची सेवा पुरवतात. माझ्या समोरील इमारतीमधे एकाने दोन फ्लॅट घेउन त्यात सर्व खोल्यांमधे पलंगांची व्यवस्था केली आहे. (हॉस्पीटल सारखी) जवळ जवळ १५ व्रुध्द तीथे सदैव पलंगावर झोपलेल्या अवस्थेत असतात. त्यांची देखभाल करण्यासाठी एक मावशी आहे. जी त्यांना जेवण देते. औषधे देते. त्यांची अंघोळ आणि बाकीचं करते. त्यांचे कपडे बदलते. प्रत्येक खोलीत टीव्ही आहे. ती जेवढी त्यांची काळजी घेते तेवढी त्यांची मुलं घेउ शकतील की नाही शंका आहे. म्हणणे एवढेच की सर्वच जण आई बाबा नकोत म्हणून व्रुध्दाश्रमाचा पर्याय निवडत नाहीत. काही जणांना आपल्या आईबाबांची चांगली देखभाल व्हावी अशी ईच्छा असते म्हणून मग ते अशा सेवांचा विचार करतात. हॉस्पिटलपेक्षा स्वस्त आणि घराच्या जवळ.

मिपाचे ॠन्मेष......................

In reply to by रुस्तम

माहीत नव्हतं, ज्ञानात भर पडली :-) धन्यवाद!

ओक्के ! बाकी आपण काही विदा जमवला आहे का? . . . . . . . (स्वगत: कै कै धाग्यांसाठीपण एखादा वृद्धाश्रम असायला हवा !)

In reply to by अभ्या..

पर्तेक्ष रंगाण्णा पण्तांशी तुलणा... अरे ते कुठे , मी कुठे. मी आपली साधी,भोळी,सासुरवाशीण,गरीब बिच्चारी आणी बरीच काही(धुमध्डकाफेम उद्योग्पती श्टाइल वाच्णे) अशी सामाण्य गृहिणी आहे रेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेर्रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सर्वप्रथम माणसाने भावनाशील असू नये. म्हातारपणी आपली अडगळ होऊ नये म्हणून स्वतःहून वेगळे व्हावे व रहावे. पुढे, तब्येती ढासळल्या तर जरुर वृद्धाश्रमात जाऊन रहावे. तरुण पिढीचे जीवन इतके धकाधकीचे झाले आहे की त्यांचा प्रॉब्लेम होऊन राहू नये. - एक वृद्ध, तिमा

In reply to by तिमा

सर्वप्रथम माणसाने भावनाशील असू नये. तुमचे म्हणणे बरोबर आहे. आई-वडिलांनी मुलांवर जास्त अवलंबून राहु नये. आपल्या म्हातारपणीची सोय करावी, सगळे मुलांना देऊन टाकू नये. मुलाचे लग्न झाल्यावर त्याला वेगळे राहु द्यावे. कारण आजकाल मुलीनां स्वतंत्र राहवे वाटते. पण मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या संसारात लक्ष घालू नये. याबाबतीत अमेरीकन लोकांचे चांगले आहे. ते मुलांना लहानपणापासून स्वावलंबी बनवतात. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, हाॅटेल येथे नौकरी करून आपला खर्च भागवतात व वेगळे राहतात. याउलट भारतातील मुले नौकरी लागेपर्यंत आई-वडिलांवर अवंलबून असतात.

धागा वाचून बरे वाटले. मलाही भविष्यात एका वृद्धाश्रमाची गरज लागणार आहे. तिथे राहण्यात काय हो एवढे वाटून घ्यायचे? संसार करून कंटाळा येत नाही का? निवांत तिकडे जाऊन रहावे, वेळेवर व्यायाम, जेवण, वैद्यकीय तपासण्या, समवयस्कांशी गप्पा, दूरदर्शन संचासमोर बसून सासूसुना मालिका बघणे (तरण्या वयात ती संधी नाही ना मिळाली!), जमल्यास जरा कथा कीर्तन ऐकणे. उद्याला ब्रेकफास्टायला काय, जेवायला कोणती भाजी, रात्रीच्या जेवणात पिठले करू की कढी? लाँड्री करायचीये, कपड्यांच्या घड्या, घराची स्वच्छता हे विचार कधीतरी थांबतील या कल्पनेने बरे वाटतेय. आधीच्या माहितीनुसार वृद्धाश्रमात बरीच वेटींग लिस्ट असते असे ऐकले होते. आता आश्रमांची संख्या वाढतिये म्हणजे मलाही संधी मिळेल असे वाटतेय. तशा माझ्या चुलत आजेसासूबाई वृद्धाश्रमात राहतायत. अगदी स्वत: ठरवून राहतायत व आम्ही नातेवाईक येताजाता सारखे भेटत असतो. शेवटी त्या कंटाळतात व आम्हाला "घरी जा" म्हणतात. त्यांना त्यांचे वेळापत्रक सोडायचे नसते. हसतमुख आहेत. नुकतीच भेटले तर नव्वदितल्या आजी इतक्या तरतरीत दिसल्या की मीच काळवंडलेली दिसत होते त्यांच्यासमोर! तुम्ही झकास बातमी दिलीत, धन्यवाद! भारतात त्या परांजपे की कोणत्यातरी बांधकाम व्यावसायिकांनी अथश्री नावाची योजनाही आणलिये म्हणे! त्यात वयस्कांसाठी सगळ्या सोयी असतात असे ऐकले आहे. चांगली कल्पना आहे.

मी विचारच करत होते की आता मी म्हातारी झाल्यावर कुठे जाऊ म्हणून. कारण आमच्या घरात तरी ९० च्या पुढे वय असलेले शिनियर लोक स्वतःच्या मुलांच्या अयुष्यातलेच नव्हे तर नातवंडांच्या आयुष्यातले निर्णयही आपणच घ्यायला बघत आहेत. आणि ते हताशपणे बघण्याखेरीज माझ्या हातात काही नाही. अर्थात ती नातवंडे त्यांना कट मारून आपल्याला हवे ते करतात ही गोष्ट वेगळी. चाळीस-पन्नास वयाच्या माझ्या मैत्रिणींशी बोलते तेव्हा कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती सगळ्यांच्या घरी असल्याचे कानावर येते. त्यांची मुले १५ ते २५ वर्षांची झाली तरी आपल्याला मिळालेले पैसे घरातल्या मोठ्या माणसांच्या हातात ठेवावे लागतात आणि खर्चाचा हिशेबही द्यावा लागतो हे अजूनही खूपजणांकडून ऐकते. त्यामुळे आम्ही म्हातारे झाल्यावर असा काही त्रास नसलेल्या ठिकाणी रहायला मिळाले तर मला प्रचंड आनंद होईल!

In reply to by अभ्या..

मिपावरील म्हातार्या लोकांसाठी आश्रम काढायचा का ? महीना वीसहजार बदल्यात खाणे(अमर्यादीत), पिणे(मर्यादीत) आणी मिपा -मिपा खेळण्यासाठी फुकट ब्रॉडबॅंड नेट.!

In reply to by अभ्या..

घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे येईनात>>> स्वाणुभव म्हणाचा हा?? इतक औघडे का अभ्या तुज ??

In reply to by दिव्यश्री

इस्मायली राहिलि की?? :( (स्वसंपाद्णाच कै झाल कै मैत)