दुष्काळवाडा.... भाग ३ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास
भाग १ भाग २
कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास
औरंगाबादमध्ये साखर कारखाना संचालकांची बैठक दोन दिवसांपूर्वीच झाली. या वर्षीचा गळीत हंगाम पाण्याअभावी कसा रेटायचा हा प्रश्न कारखान्याच्या संचालकांसमोर होता. वार्षिक ३० हजार कोटींची उलाढाल करून सरकारच्या तिजोरीत २ हजार कोटींची संपत्ती टाकणार्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसमोर साखरेच्या दरापासून ते कर्जाच्या देण्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. तथापि साखर कारखानदारीच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या उसाने मराठवाड्यासमोर निर्माण झालेल्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचीही हीच वेळ आहे.
उसाने मराठवाड्याच्या शेतकर्याच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणली हे खरे असले, तरी मराठवाड्यात ऊस आणि पाणी यांचे गणित मांडावे लागणार हे नक्की. कमी भाव मिळाला तरी चालेल पण आपला ऊस आधी कारखान्याला गेला पाहिजे अशी मराठवाड्यातील ऊसकरी शेतकर्याची धडपड असते. पाणी आहे तोपर्यंत ऊस उभा, अन्यथा त्याचा जनावरांचा चारा होतो हे मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना आता नवीन राहिलेले नाही. १९६०च्या दशकात वसंतदादा पाटील यांनी शेतकर्यांनी उसाकडे वळावे यासाठी बांध झिजवले. शेतकरी संपन्न व्हावा हा त्यांचा उद्देश केव्हाच लोपला आहे. साखर कारखानदारी हा प्रोफेशनल व्यापार बनला. सहाकारी साखर कारखाने खाजगी झाले तसे पाण्याचे दुर्भिक्ष असणार्या मराठवाड्यातही उसाच्या लागवडीसाठी कारखानदारांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्यासाठी रॉ मटेरियल पुरवणारा एवढीच ऊस उत्पादकाची किंमत आहे. नफा-तोट्याच्या या खेळात पाणी आणि ऊस यांचे गणित मांडण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले.
मागील वर्षी मराठवाड्यात १ लाख ५८ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. २०१५-१६च्या हंगामासाठी १ लाख ४२ हजार मेट्रीक टन ऊस उभा आहे. मागील वर्षीच्या हंगामात २५ सहकारी आणि २७ खाजगी कारखान्यातून उसाचे गाळप झाले होते. २४ कारखाने बंद आहेत. या वर्षीही एवढेच कारखाने गाळप करतील असा अंदाज आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की मराठवाड्यात दुष्काळ असूनही उसाच्या क्षेत्रात मागील तीन वर्षात घट झाली नाही. जलपिपासू असलेले उसाचे पीक दुष्काळाशी झगडणार्या मराठवाड्याला कडेलोटाकडे घेऊन जाऊ शकते. भूपृष्ठावर पाणी नाही. जमिनीतील पाणी आधीच उपसा करून संपवले आहे. उसासाठी विहिरींच्या किंवा कालव्यांच्या पाण्याचाच वापर होतो. अॅग्रीकल्चल कॉस्ट अॅंण्ड प्राईजेस मिनिस्ट्रीच्या अहवालानुसार एका हेक्टरवरील ऊस १८७.५ लाख लीटर पाणी पितो. पर्जन्यछायेतील मराठवाड्यात एकटा ऊस किमान ६० टक्के सिंचनाचे पाणी वापरतो. विशेष म्हणजे यातील ९० टक्के पाणी प्रवाही पद्धतीने वापरले जाते. ठिबक सिंचनाखालील क्षेत्र ३.६५च्या टक्क्यांच्यावर जाण्यास तयार नाही. अशा वेळी दुष्काळी मराठवाडा उसासाठी एवढे प्रचंड पाणी कोठून आणणार आहे? पाट पद्धतीने पाणी दिल्याने पाण्याच्या अपव्ययाबरोबरच जमिनीचीही नासाडी होते आहे. औरंगाबादच्या पैठणपासून ते जिल्ह्यातील गेवराईपर्यंतचा गोदावरीच्या काठचा पट्टा पाहिल्यास येथे पाण्याच्या बेसुमार वापरामुळे झालेली जमिनीची नासाडी दिसते. हा पट्टा बहुतांश उसाचाच आहे हेही विसरता येत नाही.
केवळ ऊस लागवडीसाठीच नाही, तर गाळपासाठीही पाणी मोठया प्रमाणात लागते. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर तब्बल ४५ दिवसांचा अवकाश पावसाने घेतला. वार्षिक सरासरीच्या फक्त ३४ टक्के पाऊस झालेला असल्याने धरणातील उपयुक्त पाणीसाठा आठ टक्क्यापेक्षाही कमी आहे. भूगर्भातील पाणीपातळी ०.८६ मीटर खोल अशा धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली असताना सुमारे दोन लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपासाठी पाणी कोठून मिळणार? कारखाने सुरू राहिले तर शेतकर्याचा ऊस जाणार, ऊस गेला तरच पैसे मिळणार. परंतु कारखाने सुरू करण्यासाठी पाणीच नाही, असे सगळे त्रांगडे होऊन बसले आहे.
मराठवाड्यात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसताना उसाचा गोडवा जपण्याची ही धडपड आणखी किती काळ सुरू ठेवता येईल? पश्चिम महाराष्ट्रातील अकलूज, सांगोला, बारामती, फलटण या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात उसाची बेटे निर्माण झाली ती नीरा, भीमा, कृष्णा, मुठा नद्यांवर व त्यांच्या उपनद्यांवर बांधण्यात आलेल्या धरणांमुळे. येथे साखर कारखानदारी रुजली. निश्चित पावसाचा आपला प्रदेश नाही हे माहीत असूनही पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीचा हा पॅटर्न मराठवाड्यात रुजवण्याचा प्रयत्न झाला. कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास करायचीच झाली, तर पाण्याच्या योग्य वापराकडे यावे लागेल. जलसंपत्ती नियामक मंडळ असो वा मराठवाड्याच्या अनुशेषाचा अभ्यास करणारी केळकर समिती - यांनी उसासाठीच नाही, तर सिंचनासाठी पाणी देताना ठिबक बंधनकारक करावे असा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून मराठवाड्याने उसाची मिजास केल्यास उसाचे वैभव उपभोगण्याएवजी वाळवंट झालेल्या मराठवाड्यात राहावे लागेल असे खेदाने म्हणावे लागेल.
क्रमशः
दुष्काळवाडा........ भाग ४ - सैरभैर हात

दुष्काळवाडा........ भाग ४ - सैरभैर हातBook traversal links for दुष्काळवाडा.... भाग ३ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ऊस हे नगदी पीक समजले जाते.
लेख माहितीपूर्ण आहे.
मराठवाडा पर्जन्यछायेत येत
हो ना राव. आम्ही (१०-१२ जण)
आयला, पाचगणीला घर तुमचं? काय
सगळेच माहितीपूर्ण लेख
आता या हाताबाहेर गेलेल्या
उपाय?
‘महानंद’कडून अमूलने दूध
कोरडवाहू मराठवाड्यात ऊसाची
उस लागवडीवर बंदी
शेतीला नियोजनाची गरज आहे असे
ते
साप्ताहिक सकाळ
अमेरिकेचे प्रख्यात कृषितज्ञ
एक दुरुस्ती
बरोबर. टेक्सास प्रांत
टेक्सास
टस्कगी, अलाबामा
लाभार्थी
समतोल पाणीवाटपाची कोणाचाही
सकाळ हा
आभार
"कमी पर्जन्याचा प्रदेश" !
लेख आवडला
उसाचे राजकारण