✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कणा , हिंदी भावांतरण

क — कैलासवासी सोन्याबापु, Sat, 08/29/2015 - 10:18
कुसमग्रजांची "कणा" हिंदीत भावांतरित करायचा एक प्रयत्न केलाय, कसा वाटतो नक्की सांगा पहचाने क्या गुरूजी हमको?’ भिगत आये कोय, कपडे उसके कसमसायें, बालों में था तोय. एक क्षण बैठा फिर वो हँसता बोलत ऊपर देख, ‘गंगामैय्या आवत घरपे, अतिथी बने रहैक’. मैहर उसका पाते ही वो चहार दिवार में नाची, खाली हात जाती कैसे, गृहलक्ष्मी बस बची. दीवार टूटी, चूल्हा बुझा, ले गई चल अचल, प्रसादरूप अब तो है बस नैनन में थोडा जल. गृहलक्ष्मी को लेकर संग सर अब हम लढे है टूटी दिवार बांध रहे है, कीचड़ मिट्टी फांद रहे है. जेब में हात जाते देख हसतां हुआ सीधा खड़ा ‘पैसेवैसे नहियो चाही, बस अकेलासा लगा'. टूट पडा मोरा घर पर टुटल नहीं है रीढ़, लड़ तो हम पूरा लेंगे गर कृष्ण सम्हाले रथनीड! टिप:- भावांतर हिंदीत असले तरी हा प्रयत्न मराठी भाषा प्रचारात एक खारीचा वाटा म्हणुन केलाय अन म्हणूनच एक मराठी साईट वर प्रकाशित करतोय, माननीय सदस्य अन संपादक मंडळास गैर वाटत असल्यास उडवून टाकवात अशी आगाऊ विनंती करतो

प्रतिक्रिया द्या
13134 वाचन

💬 प्रतिसाद (47)

तुम्हारी कविता चांगलिच हाय, किंतू मेराभी एका प्रयत्न,

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/29/2015 - 11:19 नवीन
ओळख्या क्या सर मेरेकू , पाउसमे आया कोई, कपडे उसके भिग गयेले, बालो मे था पानी धपकन बैठा, फिर वो हश्या, बोल्या उप्पर देख के, गंगा मैया पाहुणी आयी, गयी घरमे रहेके मैके आये लाडकी जैसी, चार दिवारोमे नाची खाली हात कैसे जायगी, बायको तेवढी वाची, दिवार गिरगायी, चुल्हा बुझा, दुनिया मेरी लुट गयी, प्रशाद केलीये थोडा पानी, आखोमे मेरे छोड गयी, अपनीच बीबी को साथ लेके, सर अभी लड रहा हू, टुटेलि दिवार बना रहा हू, किचड मिट्टी निकाल रहा हू, जेब की तरफ हात गाया तो, हसते हसते उठ्या, पैशे नाही चाहिये सर, थोडा अकेला अकेला वाट्या, उजड गया मेरा संसार फिरभी, आत्मसंम्मान अभी बाकी है , पिठ पे से हात फिराके बोलो, खुब लडो, जबतक जान बाकी है, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आयशीच मंगताय...

जव्हेरगंज
Sat, 08/29/2015 - 20:40 नवीन
आयशीच मंगताय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ही एकदम "मक्या" ष्टाईल की

एक एकटा एकटाच
Mon, 08/31/2015 - 17:29 नवीन
ही एकदम "मक्या" ष्टाईल की लगती है रे ह्ये ह्ये ह्ये.........(भुसनळ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

एकदम फर्मास

द-बाहुबली
Mon, 08/31/2015 - 20:41 नवीन
अशीच मंगता है...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वाह! अतिशय सुंदर भावांतर आहे.

एस
Sat, 08/29/2015 - 11:33 नवीन
वाह! अतिशय सुंदर भावांतर आहे. गुलजार यांनीही ह्या कवितेचे भाषांतर नुकतेच केले आहे. हे आठवले.
  • Log in or register to post comments

खरेच ???????? वाचायला आवडेल

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/29/2015 - 11:42 नवीन
खरेच ???????? वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो... बस!

सुधीर
Sat, 08/29/2015 - 13:32 नवीन
घर तो टूटा, रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी... हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो... बस!" http://kavitakosh.org/kk/रीढ़_/_कुसुमाग्रज तुमचा प्रयत्न पण चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

Thanks!!

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/29/2015 - 13:50 नवीन
Thanks!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

स्वॅप्सभाउ पेस्टवा ना इथे :)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 12:51 नवीन
स्वॅप्सभाउ पेस्टवा ना इथे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आहा...

पद्मावति
Sat, 08/29/2015 - 12:08 नवीन
आहा... काय सुरेख कविता. मी मूळ कविता वाचली नाहीये पण तुम्ही केलेले भावांतरण इतकं अप्रतिम आहे की एक एक कडवं पुन्हा पुन्हा वाचतेय.
‘गंगामैय्या आवत घरपे, अतिथी बने रहैक’.
हे किंवा हे असो
प्रसादरूप अब तो है बस नैनन में थोडा जल.
..आहा...गोड,स्वच्छ भाषा. मनाला सरळ सरळ भिडणारा अर्थ, सुपर्ब!
  • Log in or register to post comments

मराठी अभ्यासक्रमात होती ही

रातराणी
Sat, 08/29/2015 - 12:37 नवीन
मराठी अभ्यासक्रमात होती ही कविता. कितविला आता आठवत नाही पण या लिंकवर आहे डाउनलोड उपलब्ध. शाळेत असताना पारायण केलं होत या कवितेच. कविता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

रातराणी, लिंक दिल्याबदद्ल

पद्मावति
Sat, 08/29/2015 - 17:41 नवीन
रातराणी, लिंक दिल्याबदद्ल तुम्हाला खूप धन्यवाद. छानच आहे कविता. बाकी पण खूप छान कविता दिसताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

२००४ पर्यत नववीला होती . आता

धनावडे
Sat, 08/29/2015 - 23:37 नवीन
२००४ पर्यत नववीला होती . आता कल्पना नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

एकदम झक्कास जमलयं भाषांतर.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 12:42 नवीन
एकदम झक्कास जमलयं भाषांतर. मुळ आशयाला अजिबात धक्का नं लागताही जमलय :) सॅल्युट.
  • Log in or register to post comments

टूट पडा मोरा घर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 12:44 नवीन
टूट पडा मोरा घर पर टुटल नहीं है रीढ़, लड़ तो हम पूरा लेंगे गर कृष्ण सम्हाले रथनीड!
हे शेवटचं कडवं विशेष आवडलं.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे आभार मित्रहो! :)

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/29/2015 - 12:48 नवीन
सगळ्यांचे आभार मित्रहो! :)
  • Log in or register to post comments

मस्त च बापुसाब.

प्यारे१
Sat, 08/29/2015 - 13:01 नवीन
मस्त च बापुसाब. अवांतर: त्या कुशल बद्रिकेनं वाट लावलीय कवितेची.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख भावांतर..

नीलमोहर
Sat, 08/29/2015 - 13:06 नवीन
शब्दाला शब्द असे भाषांतर न करता स्वतःचीही काही भर घालून लिहीली आहे त्यामुळे मूळ कवितेतील अर्थ तोच राहून त्याचवेळी एक स्वतंत्र रचना बनली आहे. श्रीकृष्णामुळे अजून वेगळा अर्थही येतोय कवितेला.. @ पैजारबुवा, आपलेही व्हर्जन छानच :)
  • Log in or register to post comments

छानच लिहिलीये..

चांदणे संदीप
Sat, 08/29/2015 - 13:15 नवीन
छानच लिहिलीये तुम्ही यात शंकाच नाही... फक्त ही भोजपुरी जास्त वाटते आहे! @ ज्ञानोबाचे पैजार.....दंडवत ____/\____ माफ करा, पण मलाही अगदीच राहवल नाही म्हणून हा माझाही एक प्रयत्न.... पहचाना सर मुझे कोई आया बारिशमे कसमसाये हुए कपडोसे बालोंपे पानी लिए बैठा जरा मुसकुराया बोल पडा उपर देख बनी मेहमान गंगामैय्या गई घर चक्कर फेक स्त्री जैसे माईके आयी वो झूमके चारदिवारी नाची जाती कैसे खाली हाथ? पत्नी जैसे-तैसे बची! गिरी दिवारे, बुझा चूल्हा जो था सब गई वो लें जाते हुए प्रसाद ऑंखोमे नम पानीसा गई वो दें लिए अर्धांगिनी को साथ सर, अभी, लढ रहा हू खंडहर फिर बसा रहा हू बाढ-कीचड धो रहा हू जैसे हाथ बढा जेबको हसते हसते वो उठा पैसा, नही सर... मन था जरा सूना-बैठा टूट है आशियाना फिरभी नही अभी टूटी है रीढ हाथ बस पीठपे धर कह दिजीए बढने "निर्भीड!" कुसुमाग्रजांसाठी ____/\____
  • Log in or register to post comments

मस्त साधली की राव!!

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/29/2015 - 13:51 नवीन
मस्त साधली की राव!! मी लिहिली आहे ती शुद्ध भोजपुरी नाही तर हिंदी, भोजपुरी, मगही, मैथिली मधुन शब्द घेऊन लिहिलेली आहे (तसे पाहता सगळ्या हिंदीच्याच बोली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

:)

चांदणे संदीप
Sat, 08/29/2015 - 14:11 नवीन
:=) मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून सगळ्या कन्नडच भाषा वाटायच्या आधी ;) 'गॅंग्स ऑफ वासेपुर' सारख्या चित्रपटांनी शिक्षण देऊन बिहारी-भोजपुरीची ओळख करून दिली एवढेच काय ते माझे ज्ञान! बाकी तुमची रचना आवडलीच! एकदम शाळेत कविता पाठ करायलाच घेऊन गेलात तुम्ही! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

चांगली जमलीऐ !

उगा काहितरीच
Sun, 08/30/2015 - 01:13 नवीन
चांगली जमलीऐ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

छान

चाणक्य
Sat, 08/29/2015 - 16:25 नवीन
सुरेख झालाय भावानुवाद. आवडला.
  • Log in or register to post comments

आवडलं . +१

शिव कन्या
Sat, 08/29/2015 - 16:39 नवीन
आवडलं . +१
  • Log in or register to post comments

सगळ्यांच्याच कविता मस्त.पण

भिंगरी
Sat, 08/29/2015 - 19:10 नवीन
सगळ्यांच्याच कविता मस्त.पण मूळ मराठी कविता वाचताना जे गहीवरून येतं ते या कवितेनी नाही येत.(कदाचित मातृभाषेचा परिणाम असेल.)
  • Log in or register to post comments

सोन्याबापू आणि पैजारबुवा _/\_

प्रचेतस
Sat, 08/29/2015 - 21:07 नवीन
सोन्याबापू आणि पैजारबुवा _/\_
  • Log in or register to post comments

सर्वांचे भावानुवाद आवडले.

यशोधरा
Sat, 08/29/2015 - 21:14 नवीन
सर्वांचे भावानुवाद आवडले. काही काही ओळी खास आवडल्या!
एक क्षण बैठा फिर वो हँसता बोलत ऊपर देख, ‘गंगामैय्या आवत घरपे, अतिथी बने रहैक’.
टूट पडा मोरा घर पर टुटल नहीं है रीढ़, लड़ तो हम पूरा लेंगे गर कृष्ण सम्हाले रथनीड!
उजड गया मेरा संसार फिरभी, आत्मसंम्मान अभी बाकी है , पिठ पे से हात फिराके बोलो, खुब लडो, जबतक जान बाकी है,
स्त्री जैसे माईके आयी वो झूमके चारदिवारी नाची
सुरेख!
  • Log in or register to post comments

भावांतरण आवडलं

बहुगुणी
Sun, 08/30/2015 - 05:53 नवीन
सोन्याबापू: भावांतरण आवडलं. ज्ञानोबांचे पैजार आणि संदीप चांदणे यांच्याही रचना आवडल्या. स्तुत्य प्रयत्न! (अवांतरः झायरात नाही, पण आठवण झाली, मीही इथल्या सुरूवातीच्या काळात असा मराठीतील एका अजरामर गीताचा इतर भाषिकांनाही आस्वाद घेता यावा म्हणून प्रयत्न केला होता, तेंव्हा मिपाच्या तत्कालीन मालकांनी "हे मराठी संस्थळ आहे परंतु अपवादात्मक परिस्थिती मानून हा गैरमराठी अनुवाद येथून काढला जाणार नाही" असा प्रेमळ दम दिला होता. त्यामुळे असेल कदाचित, किंवा वाचकांना तो प्रयत्न पटला नसेल म्हणून, पण दोन हजारांहून अधिक वाचने झालेल्या त्या धाग्याला मालकांचा सोडून एक प्रतिसाद [५ वर्षांनंतर!] मिळाला होता :-) )
  • Log in or register to post comments

वा बापू. जमेश एकदम. लैच भारी

अभ्या..
Sun, 08/30/2015 - 14:20 नवीन
वा बापू. जमेश एकदम. लैच भारी लिहिलय. अर्थात आमचे माऊली पण बागवानी कना दाखवलेत. भोत भोत धन्यवाद उनो. संदीपरावांची पण रचना सुरेख. (आमचं ब्याट्या संस्कृतात पण मज्जा दाखवतय का काय वाटलं पण असो. येईल कदाचित)
  • Log in or register to post comments

सोन्याबापू, पैजारबुवा, संदीपजी

बोका-ए-आझम
Sun, 08/30/2015 - 20:10 नवीन
भावनाओंको भाषा का बंधन नही होता, यही इन तीनों रचनाओंसे प्रतीत होता है।बहुत बढिया। भाषांतर म्हणजे एका कुपीतले अत्तर दुस-या कुपीत सुगंधाशी तडजोड न करता ओतणे या श्री.म.माट्यांच्या व्याख्येची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

वा!

चांदणे संदीप
Sun, 08/30/2015 - 21:30 नवीन
वा! काय सुंदर व्याख्या आहे. कायम लक्षात राहील! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

शाळेतील आठवण

राघवेंद्र
Sun, 08/30/2015 - 20:37 नवीन
माझ्या शाळेतील आठवणी प्रमाणे हि कविता पंढरपुरातील पुराच्या घटनेवरून लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख अनुवाद!

पैसा
Sun, 08/30/2015 - 20:48 नवीन
सगळ्यांचेच भावांतरित अनुवाद आवडले.
  • Log in or register to post comments

वाह वाह

श्रीरंग_जोशी
Sun, 08/30/2015 - 23:18 नवीन
भावानुवाद आवडला, बापू.
  • Log in or register to post comments

good one

एक एकटा एकटाच
Mon, 08/31/2015 - 17:32 नवीन
आवडली......
  • Log in or register to post comments

सर्वच भाषांतरे सुंदर जमून

अन्या दातार
Mon, 08/31/2015 - 17:50 नवीन
सर्वच भाषांतरे सुंदर जमून आलीत.
  • Log in or register to post comments

भावांतरण जमलंय, पण मराठी

सूड
Mon, 08/31/2015 - 19:28 नवीन
भावांतरण जमलंय, पण मराठी कविता आधीच वाचलेली असल्याने की काय जे आपसुक 'वाह' निघून जातं तसं झालं नाही. जाता जाता: भावांतरणापेक्षा एखादी स्वतःला सुचेल तशी लिहून काढा, चांगलं लिहाल असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रसाद गोडबोले
Mon, 08/31/2015 - 19:49 नवीन
मस्त ! बाकी कणा ह्या कवितवर अजुन विडंबने वाचायला आवडतील =))
  • Log in or register to post comments

मी खूप आधी...

चांदणे संदीप
Mon, 08/31/2015 - 21:02 नवीन
मी खूप आधी "कणा"ची बरीच विडंबनं वाचली आहेत. जशी मिळतील तशी टाकतो इथे...
  • Log in or register to post comments

मी खूप आधी...

चांदणे संदीप
Mon, 08/31/2015 - 21:02 नवीन
मी खूप आधी "कणा"ची बरीच विडंबनं वाचली आहेत. जशी मिळतील तशी टाकतो इथे...
  • Log in or register to post comments

हे एक टीपीवालं...

चांदणे संदीप
Mon, 08/31/2015 - 21:06 नवीन
हे एक टीपीवलं... ओळखलत का मुलीनो मला 'गुलाबासह' आला कोणी, केस होते सलमानसारखे कानात होती त्याच्यासारखी बाळी क्षणभर बसला नंतर हसला बोलला शर्ट काढुन ’ काल तुझा भाऊ भेटला गेला बरगड्या तोडुन, गाढवाला मारल्यासारख खालुन- वरुन चोपल रिकाम्या हाती जाईल कसा अँतर्वस्त्र तेवढे वाचल!! चपले कडे हात जाताच तावा - तावात बोललो, चप्पल,बुट नको मुळी फ़क्त ड्रेस तेवढा पाठवा!! मोडुन पडली प्रेम स्टोरी तरी मोडला नाही चाळा एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर... तेवढ नक्की कळवा.... लेखक/कवी माहिती नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हे एक टीपीवालं...

चांदणे संदीप
Mon, 08/31/2015 - 21:14 नवीन
हे एक टीपीवलं... ओळखलत का मुलीनो मला 'गुलाबासह' आला कोणी, केस होते सलमानसारखे कानात होती त्याच्यासारखी बाळी क्षणभर बसला नंतर हसला बोलला शर्ट काढुन ’ काल तुझा भाऊ भेटला गेला बरगड्या तोडुन, गाढवाला मारल्यासारख खालुन- वरुन चोपल रिकाम्या हाती जाईल कसा अँतर्वस्त्र तेवढे वाचल!! चपले कडे हात जाताच तावा - तावात बोललो, चप्पल,बुट नको मुळी फ़क्त ड्रेस तेवढा पाठवा!! मोडुन पडली प्रेम स्टोरी तरी मोडला नाही चाळा एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर... तेवढ नक्की कळवा.... लेखक/कवी माहिती नाही..
  • Log in or register to post comments

हे मला अतिशय आवडलेल...

चांदणे संदीप
Mon, 08/31/2015 - 21:22 नवीन
हे मला अतिशय आवडलेल... कणा (अतिरेक्याचा) from साधं-सोपं.कॉम कणा (अतिरेक्याचा) प्रसाद शिरगांवकर ओळखलंत का परवेझ मला पाकिस्तानात आला कोणी तारवटलेल्या डोळ्यांमध्ये कणभर नव्हतं पाणी क्षणभर बसला, भेसूर हसला बोलला वरती पाहून मुंबईमधून आत्ताच आलो आलो बॉम्ब लावून माज चढल्या सैतानासारखा लोकल्स मधून नाचलो साथी सारे पकडले जातील मीच एकटा वाचलो वाटलं होतं बॉम्ब लावून मुंबईची वाट लागली मुंबईमात्र नेहमी सारखीच पुन्हा धावायला लागली खिशाकडे हात जाताच वर बघून म्हटला पैसे नकोत सरदार मनात भकासपणा दाटला मुंबईकरांचं धैर्य पाहून मोडलाय माझा कणा छातीवरती बंदुक ठेवून फक्त मर म्हणा! मुंबईकरांच्या अनन्वित धैर्याला सादर समर्पण... - प्रसाद शिरगांवकर
  • Log in or register to post comments

जबरदस्त

एक एकटा एकटाच
Mon, 08/31/2015 - 22:49 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मुंबईकरांचं धैर्य पाहून

भिंगरी
Mon, 08/31/2015 - 23:39 नवीन
मुंबईकरांचं धैर्य पाहून मोडलाय माझा कणा छातीवरती बंदुक ठेवून फक्त मर म्हणा! जबरदस्त विडंबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

१ नंबर सोन्याबापु .

तुडतुडी
Tue, 09/01/2015 - 12:01 नवीन
१ नंबर सोन्याबापु . ज्ञानोबाचे पैजार आणि chandanesandeep चं सुद्धा अभिनंदन
  • Log in or register to post comments

हा धागा निसटलेला वाचायचा!

अजया
Tue, 09/01/2015 - 17:38 नवीन
हा धागा निसटलेला वाचायचा! सर्वच भावानुवाद मस्त.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा