✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कुछ ना कहो...<3 ;)

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Fri, 08/28/2015 - 22:29  ·  लेख
लेख
बाप्पा जेमतेम पंधरवड्यावर येउन ठेपलेले आहेत. त्यामुळे सद्ध्या साफसफाई, आवराआवरीमधे संध्याकाळ आणि जमेल तेवढा वेळ निघुन जातोय. घर आवरायला एवढा वेळ लागतो का वगैरे छापाचे प्रश्ण विचारु नये. आमच्याकडे घर आवरणे हा कार्यक्रम घर शिफ्ट करणे ह्याच्याएवढाचं किंबहुना त्याहुन मोठा असतो. माळ्यावरच्या फक्त गणपतीमधे/ दिवाळीमधे वगैरे लागणार्‍या वस्तु काढत असताना आमच्या मातोश्रींच्या नजरांना उंची पुरत नसली तरी त्या तिकडच्या मागच्या कोपर्‍यामधल्या पोत्यामधली कढई आणि त्यामधे ठेवलेली पंचामृताची पंचपळी किंवा तांब्याची मोठी ताम्हनं बरोबर दिसलेली असतात. मग त्या किमान ७५-८० वर्षं जुन्या कढईबरोबरचं त्याहुन जुन्या आईच्या आज्जीच्या म्हणजे माझ्या पणजीच्या आठवणीही येतात. त्या कढईच्या कानावरुन कधीकाळी पणजीचा आणि त्यानंतर माझ्या आज्जीचा सुरुकुतलेला हात फिरलेला असतो तिथे मातोश्रींचे हात थबकतात. महाग झालेल्या आणि नं चिरलेल्या कांद्यातला अमोनिया मातोश्रींच्या डोळ्यामधे जाउन पाणी यायला लागतं. एवढा वेळ चाललेलं वरुन ती ताटं काढ, हा डिनरसेट तिकटे सरकव वगैरे (अत्यावश्यक) सुचना स्वयंपाकघरामधे गायब होतात. हा नित्यक्रम गेली कित्येक वर्षं अगदी नं चुकता चालत आलेला आहे. दोन दिवसांपुर्वी हा वर्षानुवर्षं चालत आलेला उपक्रम करत असतानाचं आमच्याकडच्या एका फुटक्या सोलर कुकरमधे निमुट पडुन असणारी माझी कोणेएकेकाळची कॉलेजमधली मिसेस कॅप्टन जॅक स्पॅरो दिसली. गेल्या काही वर्षांमधे अगदीचं विस्मरणामधे गेली होती. किंबहुना ती घरामधे असेल हे ही मी विसरुन गेलेलो होतो. आतमधे काय काय आहे हे बघायसाठी सहज खाली काढली आणि अंगणामधे नेउन झाडायला सुरुवात केली. बॅग तशी जड लागत होती म्हणजे आतमधे वस्तु असणार हे तर उघड होतं. बॅगेवरच्या साठलेल्या धुळीमधली काही धुळ साफ केली आणि बॅग घेउन परत घरामधे गेलो. जमिनीवर बसकण मारली आणि हलकीचं एक-एक चेन उघडुन आतमधला माल-मसाला बघायला सुरुवात केली. तत्कालिन पी.एम.टी.चा २००८ सालचा विद्यार्थी पास (च्यामारी त्या फोटोमधल्या सारखं परत दिसायला रादर त्या दिवसांमधे परत जायला काय वाटेल ते करायची तयारी आहे), कॉलेजचं शेवटच्या वर्षांचं ओळखपत्र, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या परिक्षेचं फाटलेलं प्रवेशपत्र, फ्रेंडशिप बँड्स, स्टीलची फुटपट्टी वगैरे काय काय निघालं त्यातुन. तो कप्पा संपवुन जरा दुसर्‍या कप्प्याकडे वळालो. दुसरा कप्पा उघडला. काही कागदपत्रांच्या पार चुरगळलेल्या छायाप्रती होत्या. त्याखाली उत्खनन केल्यावर हाताला प्लॅस्टिकची केस लागली. उपसुन बाहेर काढली तर हातात चक्कं आलं एक सी.डी.चं जुनं फोल्डर आणि त्यामधे जवळपास वीसएक जुन्या सी.डी.ज आणि दोन हेवनवासी झालेल्या बुटेबल फ्लॉपीज सापडल्या. विंडोज ९५, ९८ आणि विंडोज २००० सर्वर एडिशन च्या बुटेबल सीडीज सापडल्या. फोल्डरची अजुन एक-दोन पानं उलटल्यावर हाताला लागला काही वर्षांपुर्वी विस्मरणामधे गेलेल्या काही गाण्यांच्या सी.डी.ज. हाताला लागल्या. सुमारे २००३-०४ मधे राईट केलेल्या. त्यावेळी साधे सी.डी. रायटर्स सर्रास उपलब्ध नसायचे. त्यामुळे एका मित्राच्या गाण्यांची सी.डी. दुसर्‍याच्या हार्डडिस्कमधे कॉपी करुन नंतर ती हार्डडिस्क चौथ्याच्या (श्रीमंत चौथेसाहेब ह्यांच्याकडे त्यावेळी पेंटीयम-३ का पेंटियम-४ चा अत्याधुनिक संगणक होता. ;))घरी नेउन त्याच्या मिनतवार्‍या करुन, त्याला हरबर्‍याच्या झाडावर चढवुन सी.डी. राईट करायचा काळ होता तो. वरती Favorite Superhits-04 वगैरे लिहिलेलं नावं पाहुन ती सी.डी. उलटी केलेली. चकचकीत बाजु बर्‍यापैकी चकचकीत आहे हे बघुन पटकन डिव्हीडी रायटर ड्राईव्हमधे टाकली. सी.डी. रॉमचा आवाज हळुहळु वाढत जातो आणि नंतर एकदम बंद होतो असं चार पाच वेळा झालं तरी सी.डी. रिड व्हायला तयार नाही. शेवटी सी.डी. चक्क साबणाने धुतली, वाळवली आणि परत ड्राईव्हमधे टाकली. ह्यावेळी चक्क ऑटोरनमधे विनअँपचा ओळखीचा पॉपअप आला. दिल खुश हो गया जी. विनअँप वर अधिरपणे डबलक्लिक केलं गेलं आणि कानावर सेनहैजर्स चढवले गेले. मिनिटभर हँग होउन नंतर विनअँप ओपन झालं. प्लेलिस्ट वर एक नजर टाकताच एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आली. ही सी.डी. म्हणजे त्या काळामधली होती ज्या काळामधे मी नुकतीचं इंग्रजी गाणीसुद्धा ऐकायला सुरुवात केलेली होती. ह्या सी.डी. मधे हिंदी, मराठी आणि इंग्रजी गाण्यांची अतिशय चविष्ट खिचडी आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे गाण्यांची सुरुवात सुर मधल्या "आ भी जा, आ भी जा" गाण्यानी झाली. व्वा!! व्हायोलिन आणि लकी अलीचा आवाज ऐकुन काय वाटलय म्हणुन सांगतो. विनअँप शफल ला टाकुन इकडे मिपावर ऑनलाईन आलो. इकडे दोन-चार ठिकाणी प्रतिसाद देतोय नं देतोय पर्यंत विनअँपने एकेकाळचं फँटसी असणारं १९४२- अ लव्ह स्टोरी मधलं कुछ ना कहो, कुछ भी ना कहो हे गाणं सुरु केलं. मी आमच्या भडजी मित्रवर्यांना किंवा ना"खु"न काकांना काहितरी काडीसारु खरड लिहित होतो. ते गाणं सुरु झालं आणि बॅकस्पेसच्या किवर जे बोट दाबुन धरलं ते थेट आख्खा प्रतिसाद खोडला आणि मिपावरुन चक्क "गमन" केलं. ते गाणं जवळजवळ ७-८ वेळा ऐकलं. एचडीमधे डाउनलोडवलं आणि परत परत ऐकलं आणि आत्ताही ऐकतोय. (ओसीडी). असं म्हणतात किंवा मला असं वाटतं किंवा माझी अशी समजुत आहे की तरुण वयामधे जेव्हा कधी माणुस प्रेमामधे पडतो किंवा त्याला कोणीतरी आवडायला लागतं (तिलाही हेच्चं अ‍ॅप्लाय होतं पण मी सद्ध्या प्रथमपुरुषी एकवचनी मधे लिहिणारे) तेव्हा तो (निरर्थक) अत्मरंजनामधे गुंग व्हायला लागतो. ते मै हुं ना मधे दाखवलयं तसं ती समोर आली की डोक्यात व्हायोलिन, गिटार वगैरे वाजायला लागतात. (देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार हे गाणं अपवाद, हे गाणं प्रेमात पडण्यापेक्षा दहिहंडीच्या बाराव्या मजल्यावरुन पडण्यासाठी जास्तं शोभुन दिसतं असं वैयक्तिक मत आहे.). त्यातुन मी पडलो "मुंगेरिलाल के हसिन सपने" छाप साधा भोळा सज्जन इत्यादी सद्गुणांनी नटलेला मुलगा. होपलेसली रोमँटिक म्हणावा असा. स्वप्नं पडायला आजपर्यंत कधी झोपायला लागलेलं नाही. जिधर टैम मिला उधर सपने देखना शुरु! असो. अवांतर होतय जास्तं. तरुण वयामधे प्रत्येकजण कधीनाकधीतरी प्रेमात पडतोच. ती पेश्शल व्यक्ती समोर आली की डोक्यामधे "ऑर्चेस्ट्रा" सुरु होतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिला मागणी घालण्यासाठीचे वेगवेगले सिनारियोज (फिरलेल्या आणि अंध) डोक्यामधे सुरु होतात. ती प्रेयसी असती तर काय काय केलं असतं (गैरसमज नकोत, फक्त डोळ्यात तुझ्या पाहतो मी गीत चांदण्यांचे किंवा वैचारिक चावटपणाची परिसीमा म्हणुन फार फारतर हे चिंचेचे झाड, दिसशी तु नवतरुणी काश्मिरी पलीकडे प्रतिभा जात नाही वगैरे छाप रोमँटिक गोष्टी) त्याची दृष्य डोळ्यांसमोर उभी रहायला लागतात. अस्मादिक ह्या सर्व बहुगुणांनी नटलेले असल्याने प्रेमात पडणं (आणि भरपुर लागुन घेणं) अत्यंत अपरिहार्य होतं. ;) आपण एखाद्या व्यक्तीला मागणी कशी घालु ह्याविषयी प्रत्येकाच्या काही कल्पना ठरलेल्या असतात. गद्धेएकविशीमधे माझ्याही काही रोमँटिक कल्पना होत्याच रादर अजुनही आहेत. ह्या माझ्या कल्पनेचा एक अविभाज्य भाग म्हणजे हे १९४२-अ लव्ह स्टोरी मधलं 'कुछ ना कहो, कुछ भी ना कहो' हे गाणं. (कुमार सानु _/\_). आपण एखाद्या छान गर्दीच्या ठिकाणी असावं. ती समोर यावी, आपल्याकडे बघुन 'कातिल' हसावी. अचानक पाउस भरुन यावा. तिनेही तेवढ्या गर्दीमधे जराहि नजर नं हटवता आपल्याकडेचं एकटक बघत रहावं. आपण एखाद्या मंत्रचळ (स्पेलबाउंड) लागलेल्या माणसाप्रमाणे हलकचं तिच्याकडे जायला निघावं. आपण जसं जसं तिच्या जवळ जाउ तसं तसं तिच्या स्मितहास्याचं रुपांतर गालावर लाली चढवणार्‍या लज्जेमधे व्हावं. तिच्या गालावर चढलेली लाली बघुन आपण अजुन वेडं व्हावं. ;). नकळत त्याचं धुंदीमधे पुढे जाउन आपण तिचा हात हातामधे घ्यावा. आणि आपण तिला मागणी घालायच्या वेळीच जादुने बॅकग्राउंडला हे गाणं सुरु व्हावं. ;)
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो क्या केहेना है, क्या सुनना है मुझको पता है, तुमको पता है
तिनी आपण काहीही नं बोलता आपल्या मनामधलं ओळखावं. काहि नं बोलता,गर्दीची पर्वा नं करता आपल्याला पटकन येउन बिलगावं. अगदी मुकपणेचं आपल्याला होकार द्यावा. सगळी गर्दी आपल्याकडे बघत असावी आणि त्याचं क्षणी भरुन आलेला पाउस कोसळायला सुरुवात व्हावी.
समय का ये पल, थमसा गया है और इस पल मे, कोई नही है बस एक मै हुं, बस एक तुम हो कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
तो एक क्षण कायमचा अजरामर व्हावा. आजुबाजुच्या त्या गर्दीचं अस्तित्व त्या झंझावाती पावसाने म्हणा किंवा त्या गोड क्षणाच्या गोडव्यामधे विरघळुन जावं. फक्त ती आणि मी आणि बाजुची अतिशय धुसर झालेली गर्दी. तिचा दुसराही हात नकळत आपल्या हाती यावा आणि एका अत्यंत लयबद्ध अश्या सालसा ला सुरुवात व्हावी. a
सुलगी सुलगी सांसे, बेहेकी बेहेकी धडकन मेहेके मेहेके शाम के साये, पिघले पिघले तन मन
;) ;) ;) णो एक्सप्लेणेशण!!! ;) ;) ;) ह्युमन माईंड नोज नो लिमिट्स. अपनी अकड लगाओ ;) ;)!!! ह्या सगळ्या कल्पना परत मनामधे पुनरुज्जीवीत झाल्या गाणं ऐकुन. नॉस्टॅल्जिक विचारांनी मनावर कब्जा घ्यायच्या आतचं आमच्या अत्यंत चलकटह विनअँपनी पुढचं गाणं सुरु केलं ते होतं "सच केह रहा है दिवाना, दिल दिल ना किसी से लगाना" ;). त्यानंतर मग मात्र "तनहा दिल तनहा सफर", "भुल जा" वगैरे शानकृत गानी लागायला लागली शफलवर. It's like universe giving signs for giving up life long dream. :/ हेचं ते भारी वालं गाणं (ज्यांना चित्रपटांमधल्या चुंबनदृष्यांची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी व्हीडीओ फाट्यावर मारावा) रच्याकने. त्याच सी.डी.मधे देवांग पटेलची पिछाडी पे कुत्ता काटा, अय्यय्या सु सु सु सु वगैरे गाणी सापडली आणि गेलेला मुड परत मिळाला. अजुनही काही अशीचं रोमँटिक गाणी सापडली. त्याविषयी परत कधीतरी मुड आला लिहायचा की :) विस्कळीतअव्यवस्थित (-कॅप्टन जॅक स्पॅरो-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रेमकाव्य
मुक्तक
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
18101 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

सावकाशीनं वाचतो!

दमामि
Fri, 08/28/2015 - 22:42 नवीन
सावकाशीनं वाचतो!
  • Log in or register to post comments

आँ? संपादनाचे अधिकार हायती

यशोधरा
Sun, 08/30/2015 - 07:17 नवीन
आँ? संपादनाचे अधिकार हायती जनू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

नोप. हल्ली म्या पहिला छाप

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 08/30/2015 - 07:37 नवीन
नोप. हल्ली म्या पहिला छाप कमेंटा डायरेक्ट हेवनवासी होतात किंवा संपादित होतात. माझ्या पण झाल्या मोजीकथांवरच्या दोन वेळा. (मुविंनी जॅक लावला असावा असा अंदाज आहे.) :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कायबी सांगता यीना आजकाल!

यशोधरा
Sun, 08/30/2015 - 11:04 नवीन
कायबी सांगता यीना आजकाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांच्या काही कथांवर मी "छान

वगिश
Sun, 08/30/2015 - 22:34 नवीन
त्यांच्या काही कथांवर मी "छान लेख" अशा प्रतिक्रिया दिल्या, त्या उडवून लावण्यात आल्या. ईथे प्रतिसादाबद्दल नेमके काय नियम आहेत???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त लिहिलंय. अगदी

मांत्रिक
Fri, 08/28/2015 - 22:48 नवीन
मस्त लिहिलंय. अगदी नाॅस्टॅल्जिक केलं. (च्यामारी त्या फोटोमधल्या सारखं परत दिसायला रादर त्या दिवसांमधे परत जायला काय वाटेल ते करायची तयारी आहे), हे तर अगदी आवडलं. ध्रुवबाळासारखं तप करावं इतका प्रिय विषय!
  • Log in or register to post comments

_/\_ _/\_ _/\_

चौथा कोनाडा
Fri, 08/28/2015 - 22:55 नवीन
_/\_ _/\_ _/\_ सुरेख आणि सुरेल लेखन ! सुपर्ब स्मरण रंजन वाचुन आख्ख "कुछ ना कहो " धा वीस वेळा वाजुन गेले. यावेळी पिंचिवाडी मध्ये पावसाळी जाणवला नाही, कोरडे कोरडे वाटत होते. हा लेख वाचुन चिंब झाल्या सारखे झाले. आमच्याही "काही" जुन्या आठवणी जाग्या झाल्या ! पु.भा.प्र. हे ल्ह्यावेच लागले.
  • Log in or register to post comments

कुछ ना कहो....

मुक्त विहारि
Fri, 08/28/2015 - 23:03 नवीन
हे आमचे पण आवडते गाणे.... १९४२-ए लव स्टोरी, मधील सगळीच गाणी अप्रतिम. मग ते "एक लडकी हो देखा" असू दे किंवा "प्यार हुवा चुपके से" किंवा "रिम झिम रिम झिम" पण ही गाणी ऐकावित ती आपल्या जोडीदारा बरोबरच, ही गाणी एकट्याने कधीच ऐकू नयेत, असे माझे मत आहे. आता, ह्या सोमवारी बायकोबरोबर ही गाणी परत ऐकणार.
  • Log in or register to post comments

सहमत. १९४२ अ लव्ह स्टोरी हा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 08/28/2015 - 23:19 नवीन
सहमत. १९४२ अ लव्ह स्टोरी हा स्टोरीपेक्षा जास्तं गाण्यांसाठी आवडलेला. :) रिमझिम रिमझिम, एक लडकी को देखा तो आणि कुछ ना कहो अतिशय सुंदर गाणी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

अन्या दातार
Sat, 08/29/2015 - 11:36 नवीन
१९४२ अ लव्ह स्टोरी हा स्टोरीपेक्षा जास्तं गाण्यांसाठी आवडलेला. पंचमचा तो नॉक आउट पंच म्हणावा लागेल; कारण त्याआधी अंदाजे ५-८ वर्षे पंचम फ्लॉप संगीतकारांमध्ये गणला जायचा. अवांतर - मुविंच्या प्रतिसादातली शेवटची २ वाक्ये व तुझे "सहमत" हे वाचून मला कळेचना नक्की कशाशी सहमत ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एक अत्यंत काड्यासारु प्रतिसाद

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 08/30/2015 - 00:13 नवीन
एक अत्यंत काड्यासारु प्रतिसाद डोक्यात आलेला आहे ;) लिहु काय? रच्याकने तुला कळेलचं लौकरचं म्हणा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मूळ लेखाला

नाखु
Mon, 08/31/2015 - 10:59 नवीन
जाब्बर्दस्त "लाईक" केले आहे. आता अवांतर : सुमडीतल्या लोकांनी अशी (दुसर्याची)कोंबडी करू नै पाप लागतं आधिक तपशील वयक्तीक+गँग भेटीत. दातरू आपणास प्रगोने सस्नेह आवताण दिले आहे येण्याचे करावे. निरोप्या चिमण हटेला मेंबर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मुळीच 'विस्कळीत अव्यवस्थित' वगैरे नाहीये...

बहुगुणी
Fri, 08/28/2015 - 23:03 नवीन
मुळीच 'विस्कळीत अव्यवस्थित' वगैरे नाहीये...अगदी सुरेख जमलंय स्मरणरंजन! आवडलंच.
  • Log in or register to post comments

कं लिवलंय, कं लिवलंय!

आदूबाळ
Fri, 08/28/2015 - 23:12 नवीन
कं लिवलंय, कं लिवलंय! "कितने गहरे हल्के, शाम के रंग है छलके..." काय गाणी बनायची राव ९०च्या दशकात... (चला एक प्लेलिस्ट बनवू या!)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी. ८० च्या दशकातली

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 08/28/2015 - 23:21 नवीन
अगदी अगदी. ८० च्या दशकातली पिढी सगळ्यात नशिबवान. जुनी चांगली गाणी आणि साधारण २००२ पर्यंतची चांगली गाणी दोन्ही प्रकारचा अनुभव मिळाला. २००२-०३ नंतर धांगडधिंगा आणि नंगानाच चालु झाला गाण्यांच्या नावाखाली. अपवाद म्हणजे मोहित चौहान, अर्जित सिंघची काही गाणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अपवाद म्हणजे मोहित चौहान,

सूड
Mon, 08/31/2015 - 16:37 नवीन
अपवाद म्हणजे मोहित चौहान, अर्जित सिंघची काही गाणी.
सहमत!! काल सकाळ सकाळ अर्जित सिंघ ऐकत बसलो होतो...तेवढ्यात तुनळीवरच्या प्लेलिस्टमध्ये मोहितचं 'कितने दफे दिल ने कहा' दिसलं. डाऊनलोड करुन घेतलं. आज सकाळी आंघोळीला गेल्यापासनं ब्रेकफास्ट होईस्तवर त्याची किती आवर्तनं झाली त्याचा नेम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखन आवडले. माझ्या जुन्या

रेवती
Fri, 08/28/2015 - 23:34 नवीन
लेखन आवडले. माझ्या जुन्या ब्याकप्याकमध्ये असे काही नव्हते. गोग्गोड रंगाचे रुमाल दोन सापडले होते. बाकी परिक्षापत्र, पासपोर्ट आकारातले फोटू, त्यातील उग्गीच केलेला आज्ञाधारक चेहरा असे काहीसे होते. पेनं ,पेन्सिली वगैरे. एकदा लहान भावाचे प्राथमिक शाळेचे दप्तर व त्यातील वह्या सापडल्या होत्या. त्याने गायीवर लिहिलेला निबंध, दोन शिंगे, कपिला, देव मानणे, गाय दूध देते वगैरे वाचून हसून पुरेवाट झाली होती. तुमच्या लेखाच्या निमित्ताने हे आठवले.
  • Log in or register to post comments

खासच!

प्यारे१
Sat, 08/29/2015 - 01:03 नवीन
खासच! मस्त लिहिलंयस. नॉस्टॅल्जिक काय होता रे तुम्ही पंचविशीतली पोरं???
  • Log in or register to post comments

पंचवीशी सरुन दोन वर्षं झाली.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 09:42 नवीन
पंचवीशी सरुन दोन वर्षं झाली. :( गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मस्तच

एक एकटा एकटाच
Sat, 08/29/2015 - 01:39 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय! आवडलं :)

रातराणी
Sat, 08/29/2015 - 02:37 नवीन
छान लिहिलंय! आवडलं :)
  • Log in or register to post comments

वाह वाह

श्रीरंग_जोशी
Sat, 08/29/2015 - 03:28 नवीन
कॅप्टन तुझ्या दिलच्या छाल्यांना वाह वाह म्हंटल्याबद्दल माफी असावी. पण ते आहेतच त्या योग्यतेचे. हे गीत माझ्याही सार्वकालिन आवडत्या गीतांपैकी एक आहे. मी मिपावर नवा असताना सायलेंट गाणी या धाग्यावर याच काळातली एकाहून एक श्रवणीय गाणी उल्लेखली गेली होती.
  • Log in or register to post comments

अगदी प्रतिकात्मक म्हणावं असं कथन.

अर्धवटराव
Sat, 08/29/2015 - 03:29 नवीन
:)
  • Log in or register to post comments

भा हा री ही ही.

यशोधरा
Sat, 08/29/2015 - 06:09 नवीन
भा हा री ही ही.
  • Log in or register to post comments

का लि !

चौकटराजा
Sat, 08/29/2015 - 09:16 नवीन
का लि म्हण्जी काय लिवलंय !! लै खास ! पिंची मधे पाउस नाही पण पंचम ने ओलावा आणलाय ही कामेंट एकदम फिट ! बाकी त्यो सालसा हाय काय ...." आमच्या मतं ( आणि मतिप्रमाणं ) वॉल्टझ आहे. असंच ललित लेखन लिहित जावा.
  • Log in or register to post comments

आयड्या नै बॉ. रोमँटिक आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 09:41 नवीन
आयड्या नै बॉ. रोमँटिक आहे एवढं खरं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मस्त...

चांदणे संदीप
Sat, 08/29/2015 - 10:08 नवीन
मस्त लिहिलय! असच कधीतरी वर्षातून एकदा वगैरे अडगळीला हात लागून गुप्त खजिन्याचा मार्ग सापडतो आणि त्यावरून गेल असता आपलाच लपविलेला, विस्मृतीत गेलेला खजिना सापडतो! मग निदान त्या वेळेपुरत तरी आपण खूप श्रीमंत होऊन जातो. दुस-या कशाचीही गरज भासत नाही! पोटमाळा वगैरेंच्या सफाईचा सफाईने त्रास चुकवणारा Sandy
  • Log in or register to post comments

आवडल. (नस्तेलॉजीक) जेपी

जेपी
Sat, 08/29/2015 - 10:25 नवीन
आवडल. (नस्तेलॉजीक) जेपी
  • Log in or register to post comments

छान लिहीलंय..

नीलमोहर
Sat, 08/29/2015 - 11:11 नवीन
'१९४२' ची सर्वच गाणी अप्रतिम.. कविता कृष्णमूर्ती यांचं 'प्यार हुआ चुपकेसे' आणि लता मंगेशकर यांचं 'कुछ ना कहो' जास्त आवडतात. पण 'कुछ ना कहो' नंतर देवांग पटेल म्हणजे जरा टू मच हं :) काय ती गाणी त्याची, अर्थात त्याने चेहर्‍यावर स्माईल मात्र येतं आजही.. त्याचं 'ए राजू..हो जाना बाजू' ऑफिसमधील ऑल टाईम फेव्हरेट आहे इतरही गाणी अधूनमधून आठवण झाली की वाजवत असतात.
  • Log in or register to post comments

अहो ती मिक्स सी.डी. होती. पार

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 12:08 नवीन
अहो ती मिक्स सी.डी. होती. पार खिचडी सी.डी. होती. =)) विश्वास ठेवा अगर नका ठेउ त्यामधे मै तो रस्ते से जा रहा था भेलपुरी खा रहा था पण आहे. =)) त्याच सी.डी. मधे तोच चंद्रमा नभात सुद्धा आहे. टोट्टल वेडी सी.डी. आहे ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

विश्वास ठेवा अगर नका ठेउ

अन्या दातार
Sat, 08/29/2015 - 14:22 नवीन
विश्वास ठेवा अगर नका ठेउ त्यामधे मै तो रस्ते से जा रहा था भेलपुरी खा रहा था पण आहे. =)) त्याच सी.डी. मधे तोच चंद्रमा नभात सुद्धा आहे.
लैच लोल =)) =)) =)) दिसलं गाणं की भर, दिसलं गाणं की भर याचे उत्तम उदाहरण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

बाबा तेव्हा सी.डी. राईट करणं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 08/30/2015 - 00:12 नवीन
बाबा तेव्हा सी.डी. राईट करणं हा प्रकार बराचं रेअर असायचा. तु Nero वापरलयस का नाही माहिती नाही. त्यामधे रायटिंग क्यु मधे जश्या जश्या फाईल्स अ‍ॅडवत जासील तशी तशी सी.डी. मधे किती जागा राहिलीये ते दाखवणारी एक लाल पट्टी असायची. लोक ही फाइल बसत नाही का मग हि दुसरी टाक असं टाकुन ७०० एम.बी. जागा भरुन टाकायचे =)) हल्ली आता १-२ टी.बी. नॉर्मल झालाय डेटा ट्रान्सफर. ती लिमिटेड जागेमधे असे उद्योग करायची पण एक मजा होती रे. Sigh!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हो. अगदी अगदी.

अभ्या..
Sun, 08/30/2015 - 14:16 नवीन
हो. अगदी अगदी. मस्त लिहिलेस ज्याकोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

नाखु
Mon, 08/31/2015 - 11:45 नवीन
असला जबरी प्रकार कॅसेटीच्या जमान्यात केलेला आहे. अगदी मराठी-हिंदी साठीही !!!! "हे गाव लई न्यारं नतर पुढचे गाणे "दो और दो पांच" चे टाकून ट्रीपमध्ये सगळ्यांना फेफरे आणण्याचे पुण्यकार्य पाठीशी आहे! कॅसेट खजाना कालच आवराआवरीत कोपरा बदल झाला इअतकेच. सरभेसळवाला सांजधारा-छायागीत्प्रेमी नाखुस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@ कॅप्टन

नीलमोहर
Mon, 08/31/2015 - 10:41 नवीन
सगळ्यांचं तसंच असंतय बघा :) माझाही मोबाईलचा म्युझिक प्लेअर उघडला की अशी काही यादी दिसते, बाबाजी की बूटी बचके बक्षी बघ उघडूनि दार अंतरंगातला देव घावंल का, किंवा, ज्युरासिक पार्क परवरदिगार (बालगंधर्व) पटाखा गुड्डी पण बॅकअपमध्ये म्हणजे एमपी३ प्लेअर, पीसी, लॅपटॉप आणि सीडीजमध्ये मात्र गाणी व्यवस्थित वर्गीकरण करून ठेवलेली असतात जसेकी हिंंदी, इंग्लिश, मराठी, त्याखाली चित्रपट, अल्बम, त्यात परत जुनी ,मिड, नवीन, लेटेस्ट इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एक गाना डॉट कॉम नावाने एव्हरग्रीन धागा बनवावा

मारवा
Sat, 08/29/2015 - 11:31 नवीन
सुंदर लेख गाण्याच सुंदर वर्णन ! संपादक मंडळाला एक विनंती एक गाना डॉट कॉम नावाचा सदाहरीत प्रकारातला धागा बनवावा. त्यात सर्वांनी आपापली आवडती गाणी ( शक्यतो पुर्ण लिरीक्स सहीत ) द्यावीत त्यातील सौंदर्यस्थळे उलगडुन दाखवावीत, आपल्या त्या गाण्याशी जुडलेल्या आठवणी इतर माहीती शेअर करावी शक्यतो गाण्याची लिंक ही द्यावी. एक छान कलेक्शन होउन जाइल. लेखासाठी पुनश्च धन्यवाद
  • Log in or register to post comments

गाण्याचे बोल देणे हा

एस
Sun, 08/30/2015 - 10:01 नवीन
गाण्याचे बोल देणे हा प्रताधिकारभंग होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

असं वाटतं नाही. कारण आंजां

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 08/30/2015 - 10:03 नवीन
असं वाटतं नाही. कारण आंजां वरती लिरिक्स देणार्‍या शेकडो साईट्स आहेत. गाणी विनामोबदला डाउनलोड करणं किंवा शेअर करणं हा कॉपीराईटचा भंग असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

त्या सर्वच संस्थळांवर

एस
Sun, 08/30/2015 - 11:30 नवीन
त्या सर्वच संस्थळांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते कुणी ठरवल्यास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

@स्वॅप्सः पूर्वी आंजा वगैरे

मांत्रिक
Sun, 08/30/2015 - 11:40 नवीन
@स्वॅप्सः पूर्वी आंजा वगैरे नव्हते तेव्हा गाण्यांची विशेष आवड असणारे लोक त्यांना आवडलेल्या गाण्याचे लिरिक एखाद्या वहीत लिहून ठेवत. अशा वह्यांना खूप प्रसिद्धी व मागणी असे तेव्हा. माझ्या आईने अशीच एक जुन्या प्रसिद्ध मराठी गीतांची वही तयार केलेली होती जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी. दुर्दैवाने ती वही हरवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

तुमच्या गप्पांमुळे त्या

मांत्रिक
Sun, 08/30/2015 - 11:44 नवीन
तुमच्या गप्पांमुळे त्या जुन्या आठवणींत परत रमून जायला झालं. ती वही हरवल्याचं समजलं तेव्हा खूप हळहळलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मीही लिहून ठेवत असे. ती गाणी

एस
Sun, 08/30/2015 - 13:27 नवीन
मीही लिहून ठेवत असे. ती गाणी अद्याप तोंडपाठ आहेत. नंतरनंतर गाण्यांचे बोल लक्षात ठेवणे बंद केले, कारणः 'स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा!'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

अगदी सहमत! आज प्रत्येक गोष्ट

मांत्रिक
Sun, 08/30/2015 - 13:34 नवीन
अगदी सहमत! आज प्रत्येक गोष्ट सेवेला हजर आहे. पण तो पूर्वीचा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र गायब झालाय आता. पूर्वी व्हीसीआर म्हणून प्रकार होता. कधीतरी दिवाळी आणि मे महिन्यात आणला जाणारा. बापरे, तो आणला रे आणला की शेजारचे सगळे लोक न बोलवता जमणार हे नक्कीच! आम्ही लहान मुलांनी एकदा हट्ट करून करून बंद दरवाजा नामक भुताटकी चित्रपट आणला होता. रात्री १०.०० नंतर सगळ्यांची जेवणखाण झाल्यावर लावला. काय तो इफेक्ट म्हणायचा रे देवा. बरेच महिने आम्ही रात्रीचं वरच्या खोलीत एकटं जाणं टाळत असू. अशा प्रसंगी मग त्या हट्टानं आणलेल्या चित्रपटाच्या नावानं उद्धार होत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मस्तं. खूप छान लिहिलय. आवडलं.

पद्मावति
Sat, 08/29/2015 - 12:12 नवीन
मस्तं. खूप छान लिहिलय. आवडलं.
  • Log in or register to post comments

वाह वाह चिमण राव जमलंय

अद्द्या
Sat, 08/29/2015 - 12:24 नवीन
वाह वाह चिमण राव जमलंय अगदी
  • Log in or register to post comments

चिमण्राव, लैच भारी बगा.

बॅटमॅन
Sat, 08/29/2015 - 15:44 नवीन
चिमण्राव, लैच भारी बगा. नव्वदच्या दशकातली गाणी आणि एकेक अत्मरंजने आठवून दिल एवढाएवढासा झाला.....
  • Log in or register to post comments

कॅटवुमनच्या आठवणीनी हळवा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 17:11 नवीन
कॅटवुमनच्या आठवणीनी हळवा झालास कै रे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खूप छान लिहिलंय

पैसा
Sat, 08/29/2015 - 18:29 नवीन
खूप छान लिहिलंय. मात्र कुमार सानुची काही मोजकीच गाणी छान म्हणण्यासारखी वाटतात. १९४२ लव्हस्टोरीमधली तशी आहेत नक्कीच.
  • Log in or register to post comments

लै भारी, चिमणराव !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/29/2015 - 22:00 नवीन
लै भारी, चिमणराव ! यानिमित्तने ८० च्या दशकात (मिळेल ते कॉपी) केलेल्या तीनेकशे ऑडिओ कॅसेट्सची आठवण आली ! कधीतरी बघायला पाहिजेत कढून किती फंगस साठले आहे ते :)
  • Log in or register to post comments

निरर्थक नसलेलं आत्मरंजन. :)

प्रचेतस
Sat, 08/29/2015 - 22:04 नवीन
निरर्थक नसलेलं आत्मरंजन. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा