बाप्पा जेमतेम पंधरवड्यावर येउन ठेपलेले आहेत. त्यामुळे सद्ध्या साफसफाई, आवराआवरीमधे संध्याकाळ आणि जमेल तेवढा वेळ निघुन जातोय. घर आवरायला एवढा वेळ लागतो का वगैरे छापाचे प्रश्ण विचारु नये. आमच्याकडे घर आवरणे हा कार्यक्रम घर शिफ्ट करणे ह्याच्याएवढाचं किंबहुना त्याहुन मोठा असतो. माळ्यावरच्या फक्त गणपतीमधे/ दिवाळीमधे वगैरे लागणार्या वस्तु काढत असताना आमच्या मातोश्रींच्या नजरांना उंची पुरत नसली तरी त्या तिकडच्या मागच्या कोपर्यामधल्या पोत्यामधली कढई आणि त्यामधे ठेवलेली पंचामृताची पंचपळी किंवा तांब्याची मोठी ताम्हनं बरोबर दिसलेली असतात. मग त्या किमान ७५-८० वर्षं जुन्या कढईबरोबरचं त्याहुन जुन्या आईच्या आज्जीच्या म्हणजे माझ्या पणजीच्या आठवणीही येतात. त्या कढईच्या कानावरुन कधीकाळी पणजीचा आणि त्यानंतर माझ्या आज्जीचा सुरुकुतलेला हात फिरलेला असतो तिथे मातोश्रींचे हात थबकतात. महाग झालेल्या आणि नं चिरलेल्या कांद्यातला अमोनिया मातोश्रींच्या डोळ्यामधे जाउन पाणी यायला लागतं. एवढा वेळ चाललेलं वरुन ती ताटं काढ, हा डिनरसेट तिकटे सरकव वगैरे (अत्यावश्यक) सुचना स्वयंपाकघरामधे गायब होतात. हा नित्यक्रम गेली कित्येक वर्षं अगदी नं चुकता चालत आलेला आहे.
दोन दिवसांपुर्वी हा वर्षानुवर्षं चालत आलेला उपक्रम करत असतानाचं आमच्याकडच्या एका फुटक्या सोलर कुकरमधे निमुट पडुन असणारी माझी कोणेएकेकाळची कॉलेजमधली मिसेस कॅप्टन जॅक स्पॅरो दिसली. गेल्या काही वर्षांमधे अगदीचं विस्मरणामधे गेली होती. किंबहुना ती घरामधे असेल हे ही मी विसरुन गेलेलो होतो. आतमधे काय काय आहे हे बघायसाठी सहज खाली काढली आणि अंगणामधे नेउन झाडायला सुरुवात केली. बॅग तशी जड लागत होती म्हणजे आतमधे वस्तु असणार हे तर उघड होतं. बॅगेवरच्या साठलेल्या धुळीमधली काही धुळ साफ केली आणि बॅग घेउन परत घरामधे गेलो. जमिनीवर बसकण मारली आणि हलकीचं एक-एक चेन उघडुन आतमधला माल-मसाला बघायला सुरुवात केली. तत्कालिन पी.एम.टी.चा २००८ सालचा विद्यार्थी पास (च्यामारी त्या फोटोमधल्या सारखं परत दिसायला रादर त्या दिवसांमधे परत जायला काय वाटेल ते करायची तयारी आहे), कॉलेजचं शेवटच्या वर्षांचं ओळखपत्र, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या परिक्षेचं फाटलेलं प्रवेशपत्र, फ्रेंडशिप बँड्स, स्टीलची फुटपट्टी वगैरे काय काय निघालं त्यातुन. तो कप्पा संपवुन जरा दुसर्या कप्प्याकडे वळालो.
दुसरा कप्पा उघडला. काही कागदपत्रांच्या पार चुरगळलेल्या छायाप्रती होत्या. त्याखाली उत्खनन केल्यावर हाताला प्लॅस्टिकची केस लागली. उपसुन बाहेर काढली तर हातात चक्कं आलं एक सी.डी.चं जुनं फोल्डर आणि त्यामधे जवळपास वीसएक जुन्या सी.डी.ज आणि दोन हेवनवासी झालेल्या बुटेबल फ्लॉपीज सापडल्या. विंडोज ९५, ९८ आणि विंडोज २००० सर्वर एडिशन च्या बुटेबल सीडीज सापडल्या. फोल्डरची अजुन एक-दोन पानं उलटल्यावर हाताला लागला काही वर्षांपुर्वी विस्मरणामधे गेलेल्या काही गाण्यांच्या सी.डी.ज. हाताला लागल्या. सुमारे २००३-०४ मधे राईट केलेल्या. त्यावेळी साधे सी.डी. रायटर्स सर्रास उपलब्ध नसायचे. त्यामुळे एका मित्राच्या गाण्यांची सी.डी. दुसर्याच्या हार्डडिस्कमधे कॉपी करुन नंतर ती हार्डडिस्क चौथ्याच्या (श्रीमंत चौथेसाहेब ह्यांच्याकडे त्यावेळी पेंटीयम-३ का पेंटियम-४ चा अत्याधुनिक संगणक होता. ;))घरी नेउन त्याच्या मिनतवार्या करुन, त्याला हरबर्याच्या झाडावर चढवुन सी.डी. राईट करायचा काळ होता तो. वरती Favorite Superhits-04 वगैरे लिहिलेलं नावं पाहुन ती सी.डी. उलटी केलेली. चकचकीत बाजु बर्यापैकी चकचकीत आहे हे बघुन पटकन डिव्हीडी रायटर ड्राईव्हमधे टाकली. सी.डी. रॉमचा आवाज हळुहळु वाढत जातो आणि नंतर एकदम बंद होतो असं चार पाच वेळा झालं तरी सी.डी. रिड व्हायला तयार नाही. शेवटी सी.डी. चक्क साबणाने धुतली, वाळवली आणि परत ड्राईव्हमधे टाकली. ह्यावेळी चक्क ऑटोरनमधे विनअँपचा ओळखीचा पॉपअप आला. दिल खुश हो गया जी.
विनअँप वर अधिरपणे डबलक्लिक केलं गेलं आणि कानावर सेनहैजर्स चढवले गेले. मिनिटभर हँग होउन नंतर विनअँप ओपन झालं. प्लेलिस्ट वर एक नजर टाकताच एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आली. ही सी.डी. म्हणजे त्या काळामधली होती ज्या काळामधे मी नुकतीचं इंग्रजी गाणीसुद्धा ऐकायला सुरुवात केलेली होती. ह्या सी.डी. मधे हिंदी, मराठी आणि इंग्रजी गाण्यांची अतिशय चविष्ट खिचडी आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे गाण्यांची सुरुवात सुर मधल्या "आ भी जा, आ भी जा" गाण्यानी झाली. व्वा!! व्हायोलिन आणि लकी अलीचा आवाज ऐकुन काय वाटलय म्हणुन सांगतो. विनअँप शफल ला टाकुन इकडे मिपावर ऑनलाईन आलो. इकडे दोन-चार ठिकाणी प्रतिसाद देतोय नं देतोय पर्यंत विनअँपने एकेकाळचं फँटसी असणारं १९४२- अ लव्ह स्टोरी मधलं कुछ ना कहो, कुछ भी ना कहो हे गाणं सुरु केलं. मी आमच्या भडजी मित्रवर्यांना किंवा ना"खु"न काकांना काहितरी काडीसारु खरड लिहित होतो. ते गाणं सुरु झालं आणि बॅकस्पेसच्या किवर जे बोट दाबुन धरलं ते थेट आख्खा प्रतिसाद खोडला आणि मिपावरुन चक्क "गमन" केलं. ते गाणं जवळजवळ ७-८ वेळा ऐकलं. एचडीमधे डाउनलोडवलं आणि परत परत ऐकलं आणि आत्ताही ऐकतोय. (ओसीडी).
असं म्हणतात किंवा मला असं वाटतं किंवा माझी अशी समजुत आहे की तरुण वयामधे जेव्हा कधी माणुस प्रेमामधे पडतो किंवा त्याला कोणीतरी आवडायला लागतं (तिलाही हेच्चं अॅप्लाय होतं पण मी सद्ध्या प्रथमपुरुषी एकवचनी मधे लिहिणारे) तेव्हा तो (निरर्थक) अत्मरंजनामधे गुंग व्हायला लागतो. ते मै हुं ना मधे दाखवलयं तसं ती समोर आली की डोक्यात व्हायोलिन, गिटार वगैरे वाजायला लागतात. (देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार हे गाणं अपवाद, हे गाणं प्रेमात पडण्यापेक्षा दहिहंडीच्या बाराव्या मजल्यावरुन पडण्यासाठी जास्तं शोभुन दिसतं असं वैयक्तिक मत आहे.). त्यातुन मी पडलो "मुंगेरिलाल के हसिन सपने" छाप साधा भोळा सज्जन इत्यादी सद्गुणांनी नटलेला मुलगा. होपलेसली रोमँटिक म्हणावा असा. स्वप्नं पडायला आजपर्यंत कधी झोपायला लागलेलं नाही. जिधर टैम मिला उधर सपने देखना शुरु! असो. अवांतर होतय जास्तं.
तरुण वयामधे प्रत्येकजण कधीनाकधीतरी प्रेमात पडतोच. ती पेश्शल व्यक्ती समोर आली की डोक्यामधे "ऑर्चेस्ट्रा" सुरु होतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिला मागणी घालण्यासाठीचे वेगवेगले सिनारियोज (फिरलेल्या आणि अंध) डोक्यामधे सुरु होतात. ती प्रेयसी असती तर काय काय केलं असतं (गैरसमज नकोत, फक्त डोळ्यात तुझ्या पाहतो मी गीत चांदण्यांचे किंवा वैचारिक चावटपणाची परिसीमा म्हणुन फार फारतर हे चिंचेचे झाड, दिसशी तु नवतरुणी काश्मिरी पलीकडे प्रतिभा जात नाही वगैरे छाप रोमँटिक गोष्टी) त्याची दृष्य डोळ्यांसमोर उभी रहायला लागतात. अस्मादिक ह्या सर्व बहुगुणांनी नटलेले असल्याने प्रेमात पडणं (आणि भरपुर लागुन घेणं) अत्यंत अपरिहार्य होतं. ;)
आपण एखाद्या व्यक्तीला मागणी कशी घालु ह्याविषयी प्रत्येकाच्या काही कल्पना ठरलेल्या असतात. गद्धेएकविशीमधे माझ्याही काही रोमँटिक कल्पना होत्याच रादर अजुनही आहेत. ह्या माझ्या कल्पनेचा एक अविभाज्य भाग म्हणजे हे १९४२-अ लव्ह स्टोरी मधलं 'कुछ ना कहो, कुछ भी ना कहो' हे गाणं. (कुमार सानु _/\_).
आपण एखाद्या छान गर्दीच्या ठिकाणी असावं. ती समोर यावी, आपल्याकडे बघुन 'कातिल' हसावी. अचानक पाउस भरुन यावा. तिनेही तेवढ्या गर्दीमधे जराहि नजर नं हटवता आपल्याकडेचं एकटक बघत रहावं. आपण एखाद्या मंत्रचळ (स्पेलबाउंड) लागलेल्या माणसाप्रमाणे हलकचं तिच्याकडे जायला निघावं. आपण जसं जसं तिच्या जवळ जाउ तसं तसं तिच्या स्मितहास्याचं रुपांतर गालावर लाली चढवणार्या लज्जेमधे व्हावं. तिच्या गालावर चढलेली लाली बघुन आपण अजुन वेडं व्हावं. ;). नकळत त्याचं धुंदीमधे पुढे जाउन आपण तिचा हात हातामधे घ्यावा. आणि आपण तिला मागणी घालायच्या वेळीच जादुने बॅकग्राउंडला हे गाणं सुरु व्हावं. ;)
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो क्या केहेना है, क्या सुनना है मुझको पता है, तुमको पता हैतिनी आपण काहीही नं बोलता आपल्या मनामधलं ओळखावं. काहि नं बोलता,गर्दीची पर्वा नं करता आपल्याला पटकन येउन बिलगावं. अगदी मुकपणेचं आपल्याला होकार द्यावा. सगळी गर्दी आपल्याकडे बघत असावी आणि त्याचं क्षणी भरुन आलेला पाउस कोसळायला सुरुवात व्हावी.
समय का ये पल, थमसा गया है और इस पल मे, कोई नही है बस एक मै हुं, बस एक तुम हो कुछ ना कहो, कुछ भी ना कहोतो एक क्षण कायमचा अजरामर व्हावा. आजुबाजुच्या त्या गर्दीचं अस्तित्व त्या झंझावाती पावसाने म्हणा किंवा त्या गोड क्षणाच्या गोडव्यामधे विरघळुन जावं. फक्त ती आणि मी आणि बाजुची अतिशय धुसर झालेली गर्दी. तिचा दुसराही हात नकळत आपल्या हाती यावा आणि एका अत्यंत लयबद्ध अश्या सालसा ला सुरुवात व्हावी.
सुलगी सुलगी सांसे, बेहेकी बेहेकी धडकन मेहेके मेहेके शाम के साये, पिघले पिघले तन मन;) ;) ;) णो एक्सप्लेणेशण!!! ;) ;) ;) ह्युमन माईंड नोज नो लिमिट्स. अपनी अकड लगाओ ;) ;)!!! ह्या सगळ्या कल्पना परत मनामधे पुनरुज्जीवीत झाल्या गाणं ऐकुन. नॉस्टॅल्जिक विचारांनी मनावर कब्जा घ्यायच्या आतचं आमच्या अत्यंत चलकटह विनअँपनी पुढचं गाणं सुरु केलं ते होतं "सच केह रहा है दिवाना, दिल दिल ना किसी से लगाना" ;). त्यानंतर मग मात्र "तनहा दिल तनहा सफर", "भुल जा" वगैरे शानकृत गानी लागायला लागली शफलवर. It's like universe giving signs for giving up life long dream. :/ हेचं ते भारी वालं गाणं (ज्यांना चित्रपटांमधल्या चुंबनदृष्यांची अॅलर्जी आहे त्यांनी व्हीडीओ फाट्यावर मारावा) रच्याकने. त्याच सी.डी.मधे देवांग पटेलची पिछाडी पे कुत्ता काटा, अय्यय्या सु सु सु सु वगैरे गाणी सापडली आणि गेलेला मुड परत मिळाला. अजुनही काही अशीचं रोमँटिक गाणी सापडली. त्याविषयी परत कधीतरी मुड आला लिहायचा की :) विस्कळीतअव्यवस्थित (-कॅप्टन जॅक स्पॅरो-)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
18151
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
सावकाशीनं वाचतो!
आँ? संपादनाचे अधिकार हायती
In reply to सावकाशीनं वाचतो! by दमामि
नोप. हल्ली म्या पहिला छाप
In reply to आँ? संपादनाचे अधिकार हायती by यशोधरा
कायबी सांगता यीना आजकाल!
In reply to नोप. हल्ली म्या पहिला छाप by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यांच्या काही कथांवर मी "छान
In reply to नोप. हल्ली म्या पहिला छाप by कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्त लिहिलंय. अगदी
_/\_ _/\_ _/\_
कुछ ना कहो....
सहमत. १९४२ अ लव्ह स्टोरी हा
In reply to कुछ ना कहो.... by मुक्त विहारि
+१
In reply to सहमत. १९४२ अ लव्ह स्टोरी हा by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक अत्यंत काड्यासारु प्रतिसाद
In reply to +१ by अन्या दातार
मूळ लेखाला
In reply to एक अत्यंत काड्यासारु प्रतिसाद by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुळीच 'विस्कळीत अव्यवस्थित' वगैरे नाहीये...
कं लिवलंय, कं लिवलंय!
अगदी अगदी. ८० च्या दशकातली
In reply to कं लिवलंय, कं लिवलंय! by आदूबाळ
अपवाद म्हणजे मोहित चौहान,
In reply to अगदी अगदी. ८० च्या दशकातली by कॅप्टन जॅक स्पॅरो
लेखन आवडले. माझ्या जुन्या
खासच!
पंचवीशी सरुन दोन वर्षं झाली.
In reply to खासच! by प्यारे१
मस्तच
छान लिहिलंय! आवडलं :)
वाह वाह
अगदी प्रतिकात्मक म्हणावं असं कथन.
भा हा री ही ही.
का लि !
आयड्या नै बॉ. रोमँटिक आहे
In reply to का लि ! by चौकटराजा
मस्त...
आवडल. (नस्तेलॉजीक) जेपी
छान लिहीलंय..
अहो ती मिक्स सी.डी. होती. पार
In reply to छान लिहीलंय.. by नीलमोहर
विश्वास ठेवा अगर नका ठेउ
In reply to अहो ती मिक्स सी.डी. होती. पार by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाबा तेव्हा सी.डी. राईट करणं
In reply to विश्वास ठेवा अगर नका ठेउ by अन्या दातार
हो. अगदी अगदी.
In reply to बाबा तेव्हा सी.डी. राईट करणं by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to हो. अगदी अगदी. by अभ्या..
@ कॅप्टन
In reply to अहो ती मिक्स सी.डी. होती. पार by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक गाना डॉट कॉम नावाने एव्हरग्रीन धागा बनवावा
गाण्याचे बोल देणे हा
In reply to एक गाना डॉट कॉम नावाने एव्हरग्रीन धागा बनवावा by मारवा
असं वाटतं नाही. कारण आंजां
In reply to गाण्याचे बोल देणे हा by एस
त्या सर्वच संस्थळांवर
In reply to असं वाटतं नाही. कारण आंजां by कॅप्टन जॅक स्पॅरो
@स्वॅप्सः पूर्वी आंजा वगैरे
In reply to त्या सर्वच संस्थळांवर by एस
तुमच्या गप्पांमुळे त्या
In reply to @स्वॅप्सः पूर्वी आंजा वगैरे by मांत्रिक
मीही लिहून ठेवत असे. ती गाणी
In reply to तुमच्या गप्पांमुळे त्या by मांत्रिक
अगदी सहमत! आज प्रत्येक गोष्ट
In reply to मीही लिहून ठेवत असे. ती गाणी by एस
मस्तं. खूप छान लिहिलय. आवडलं.
वाह वाह चिमण राव जमलंय
चिमण्राव, लैच भारी बगा.
कॅटवुमनच्या आठवणीनी हळवा
In reply to चिमण्राव, लैच भारी बगा. by बॅटमॅन
खूप छान लिहिलंय
लै भारी, चिमणराव !
निरर्थक नसलेलं आत्मरंजन. :)
अत्मरंजन****
In reply to निरर्थक नसलेलं आत्मरंजन. :) by प्रचेतस
मायला त्या ऑटोकम्प्लीटच्या.
In reply to अत्मरंजन**** by कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्त! वाटले नव्हते या
शीर्षकातलं निरर्थक अत्मरंजन
काढायला सांगतो. =))
In reply to शीर्षकातलं निरर्थक अत्मरंजन by प्यारे१
साबास, सरदार खुस हुआ! ;)
In reply to काढायला सांगतो. =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
वा सीजेएस!
तेव्हा वर्तमानपत्र की मासिक्
In reply to वा सीजेएस! by बोका-ए-आझम
चित्रपट मात्र दणकून आपटला
In reply to तेव्हा वर्तमानपत्र की मासिक् by प्यारे१
हो. विधु विनोद चोप्रानं
In reply to चित्रपट मात्र दणकून आपटला by एस
खामोश, परिंदा
In reply to हो. विधु विनोद चोप्रानं by प्यारे१
मनिषा कोईराला दिल से रे आणि
In reply to तेव्हा वर्तमानपत्र की मासिक् by प्यारे१
संजय लीला भन्सालीच्या
In reply to मनिषा कोईराला दिल से रे आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
खामोशीची गाणीदेखील एकदम सुरेल
In reply to संजय लीला भन्सालीच्या by बोका-ए-आझम
बाहोंके दरमियाँ विसरलं का भो?
In reply to संजय लीला भन्सालीच्या by बोका-ए-आझम
वैयक्तिक!!
In reply to तेव्हा वर्तमानपत्र की मासिक् by प्यारे१
असहमतीबद्दल सहमत आहोत.
In reply to वैयक्तिक!! by अन्या दातार
आयी हैं देखने, झीलों के आईने,
तुही यत्ता कंची?
In reply to आयी हैं देखने, झीलों के आईने, by स्पंदना
रिमझिम रिमझिम च्या ओळी विसरलो
In reply to आयी हैं देखने, झीलों के आईने, by स्पंदना