✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कुछ ना कहो...<3 ;)

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Fri, 08/28/2015 - 22:29  ·  लेख
लेख
बाप्पा जेमतेम पंधरवड्यावर येउन ठेपलेले आहेत. त्यामुळे सद्ध्या साफसफाई, आवराआवरीमधे संध्याकाळ आणि जमेल तेवढा वेळ निघुन जातोय. घर आवरायला एवढा वेळ लागतो का वगैरे छापाचे प्रश्ण विचारु नये. आमच्याकडे घर आवरणे हा कार्यक्रम घर शिफ्ट करणे ह्याच्याएवढाचं किंबहुना त्याहुन मोठा असतो. माळ्यावरच्या फक्त गणपतीमधे/ दिवाळीमधे वगैरे लागणार्‍या वस्तु काढत असताना आमच्या मातोश्रींच्या नजरांना उंची पुरत नसली तरी त्या तिकडच्या मागच्या कोपर्‍यामधल्या पोत्यामधली कढई आणि त्यामधे ठेवलेली पंचामृताची पंचपळी किंवा तांब्याची मोठी ताम्हनं बरोबर दिसलेली असतात. मग त्या किमान ७५-८० वर्षं जुन्या कढईबरोबरचं त्याहुन जुन्या आईच्या आज्जीच्या म्हणजे माझ्या पणजीच्या आठवणीही येतात. त्या कढईच्या कानावरुन कधीकाळी पणजीचा आणि त्यानंतर माझ्या आज्जीचा सुरुकुतलेला हात फिरलेला असतो तिथे मातोश्रींचे हात थबकतात. महाग झालेल्या आणि नं चिरलेल्या कांद्यातला अमोनिया मातोश्रींच्या डोळ्यामधे जाउन पाणी यायला लागतं. एवढा वेळ चाललेलं वरुन ती ताटं काढ, हा डिनरसेट तिकटे सरकव वगैरे (अत्यावश्यक) सुचना स्वयंपाकघरामधे गायब होतात. हा नित्यक्रम गेली कित्येक वर्षं अगदी नं चुकता चालत आलेला आहे. दोन दिवसांपुर्वी हा वर्षानुवर्षं चालत आलेला उपक्रम करत असतानाचं आमच्याकडच्या एका फुटक्या सोलर कुकरमधे निमुट पडुन असणारी माझी कोणेएकेकाळची कॉलेजमधली मिसेस कॅप्टन जॅक स्पॅरो दिसली. गेल्या काही वर्षांमधे अगदीचं विस्मरणामधे गेली होती. किंबहुना ती घरामधे असेल हे ही मी विसरुन गेलेलो होतो. आतमधे काय काय आहे हे बघायसाठी सहज खाली काढली आणि अंगणामधे नेउन झाडायला सुरुवात केली. बॅग तशी जड लागत होती म्हणजे आतमधे वस्तु असणार हे तर उघड होतं. बॅगेवरच्या साठलेल्या धुळीमधली काही धुळ साफ केली आणि बॅग घेउन परत घरामधे गेलो. जमिनीवर बसकण मारली आणि हलकीचं एक-एक चेन उघडुन आतमधला माल-मसाला बघायला सुरुवात केली. तत्कालिन पी.एम.टी.चा २००८ सालचा विद्यार्थी पास (च्यामारी त्या फोटोमधल्या सारखं परत दिसायला रादर त्या दिवसांमधे परत जायला काय वाटेल ते करायची तयारी आहे), कॉलेजचं शेवटच्या वर्षांचं ओळखपत्र, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या परिक्षेचं फाटलेलं प्रवेशपत्र, फ्रेंडशिप बँड्स, स्टीलची फुटपट्टी वगैरे काय काय निघालं त्यातुन. तो कप्पा संपवुन जरा दुसर्‍या कप्प्याकडे वळालो. दुसरा कप्पा उघडला. काही कागदपत्रांच्या पार चुरगळलेल्या छायाप्रती होत्या. त्याखाली उत्खनन केल्यावर हाताला प्लॅस्टिकची केस लागली. उपसुन बाहेर काढली तर हातात चक्कं आलं एक सी.डी.चं जुनं फोल्डर आणि त्यामधे जवळपास वीसएक जुन्या सी.डी.ज आणि दोन हेवनवासी झालेल्या बुटेबल फ्लॉपीज सापडल्या. विंडोज ९५, ९८ आणि विंडोज २००० सर्वर एडिशन च्या बुटेबल सीडीज सापडल्या. फोल्डरची अजुन एक-दोन पानं उलटल्यावर हाताला लागला काही वर्षांपुर्वी विस्मरणामधे गेलेल्या काही गाण्यांच्या सी.डी.ज. हाताला लागल्या. सुमारे २००३-०४ मधे राईट केलेल्या. त्यावेळी साधे सी.डी. रायटर्स सर्रास उपलब्ध नसायचे. त्यामुळे एका मित्राच्या गाण्यांची सी.डी. दुसर्‍याच्या हार्डडिस्कमधे कॉपी करुन नंतर ती हार्डडिस्क चौथ्याच्या (श्रीमंत चौथेसाहेब ह्यांच्याकडे त्यावेळी पेंटीयम-३ का पेंटियम-४ चा अत्याधुनिक संगणक होता. ;))घरी नेउन त्याच्या मिनतवार्‍या करुन, त्याला हरबर्‍याच्या झाडावर चढवुन सी.डी. राईट करायचा काळ होता तो. वरती Favorite Superhits-04 वगैरे लिहिलेलं नावं पाहुन ती सी.डी. उलटी केलेली. चकचकीत बाजु बर्‍यापैकी चकचकीत आहे हे बघुन पटकन डिव्हीडी रायटर ड्राईव्हमधे टाकली. सी.डी. रॉमचा आवाज हळुहळु वाढत जातो आणि नंतर एकदम बंद होतो असं चार पाच वेळा झालं तरी सी.डी. रिड व्हायला तयार नाही. शेवटी सी.डी. चक्क साबणाने धुतली, वाळवली आणि परत ड्राईव्हमधे टाकली. ह्यावेळी चक्क ऑटोरनमधे विनअँपचा ओळखीचा पॉपअप आला. दिल खुश हो गया जी. विनअँप वर अधिरपणे डबलक्लिक केलं गेलं आणि कानावर सेनहैजर्स चढवले गेले. मिनिटभर हँग होउन नंतर विनअँप ओपन झालं. प्लेलिस्ट वर एक नजर टाकताच एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आली. ही सी.डी. म्हणजे त्या काळामधली होती ज्या काळामधे मी नुकतीचं इंग्रजी गाणीसुद्धा ऐकायला सुरुवात केलेली होती. ह्या सी.डी. मधे हिंदी, मराठी आणि इंग्रजी गाण्यांची अतिशय चविष्ट खिचडी आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे गाण्यांची सुरुवात सुर मधल्या "आ भी जा, आ भी जा" गाण्यानी झाली. व्वा!! व्हायोलिन आणि लकी अलीचा आवाज ऐकुन काय वाटलय म्हणुन सांगतो. विनअँप शफल ला टाकुन इकडे मिपावर ऑनलाईन आलो. इकडे दोन-चार ठिकाणी प्रतिसाद देतोय नं देतोय पर्यंत विनअँपने एकेकाळचं फँटसी असणारं १९४२- अ लव्ह स्टोरी मधलं कुछ ना कहो, कुछ भी ना कहो हे गाणं सुरु केलं. मी आमच्या भडजी मित्रवर्यांना किंवा ना"खु"न काकांना काहितरी काडीसारु खरड लिहित होतो. ते गाणं सुरु झालं आणि बॅकस्पेसच्या किवर जे बोट दाबुन धरलं ते थेट आख्खा प्रतिसाद खोडला आणि मिपावरुन चक्क "गमन" केलं. ते गाणं जवळजवळ ७-८ वेळा ऐकलं. एचडीमधे डाउनलोडवलं आणि परत परत ऐकलं आणि आत्ताही ऐकतोय. (ओसीडी). असं म्हणतात किंवा मला असं वाटतं किंवा माझी अशी समजुत आहे की तरुण वयामधे जेव्हा कधी माणुस प्रेमामधे पडतो किंवा त्याला कोणीतरी आवडायला लागतं (तिलाही हेच्चं अ‍ॅप्लाय होतं पण मी सद्ध्या प्रथमपुरुषी एकवचनी मधे लिहिणारे) तेव्हा तो (निरर्थक) अत्मरंजनामधे गुंग व्हायला लागतो. ते मै हुं ना मधे दाखवलयं तसं ती समोर आली की डोक्यात व्हायोलिन, गिटार वगैरे वाजायला लागतात. (देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार हे गाणं अपवाद, हे गाणं प्रेमात पडण्यापेक्षा दहिहंडीच्या बाराव्या मजल्यावरुन पडण्यासाठी जास्तं शोभुन दिसतं असं वैयक्तिक मत आहे.). त्यातुन मी पडलो "मुंगेरिलाल के हसिन सपने" छाप साधा भोळा सज्जन इत्यादी सद्गुणांनी नटलेला मुलगा. होपलेसली रोमँटिक म्हणावा असा. स्वप्नं पडायला आजपर्यंत कधी झोपायला लागलेलं नाही. जिधर टैम मिला उधर सपने देखना शुरु! असो. अवांतर होतय जास्तं. तरुण वयामधे प्रत्येकजण कधीनाकधीतरी प्रेमात पडतोच. ती पेश्शल व्यक्ती समोर आली की डोक्यामधे "ऑर्चेस्ट्रा" सुरु होतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिला मागणी घालण्यासाठीचे वेगवेगले सिनारियोज (फिरलेल्या आणि अंध) डोक्यामधे सुरु होतात. ती प्रेयसी असती तर काय काय केलं असतं (गैरसमज नकोत, फक्त डोळ्यात तुझ्या पाहतो मी गीत चांदण्यांचे किंवा वैचारिक चावटपणाची परिसीमा म्हणुन फार फारतर हे चिंचेचे झाड, दिसशी तु नवतरुणी काश्मिरी पलीकडे प्रतिभा जात नाही वगैरे छाप रोमँटिक गोष्टी) त्याची दृष्य डोळ्यांसमोर उभी रहायला लागतात. अस्मादिक ह्या सर्व बहुगुणांनी नटलेले असल्याने प्रेमात पडणं (आणि भरपुर लागुन घेणं) अत्यंत अपरिहार्य होतं. ;) आपण एखाद्या व्यक्तीला मागणी कशी घालु ह्याविषयी प्रत्येकाच्या काही कल्पना ठरलेल्या असतात. गद्धेएकविशीमधे माझ्याही काही रोमँटिक कल्पना होत्याच रादर अजुनही आहेत. ह्या माझ्या कल्पनेचा एक अविभाज्य भाग म्हणजे हे १९४२-अ लव्ह स्टोरी मधलं 'कुछ ना कहो, कुछ भी ना कहो' हे गाणं. (कुमार सानु _/\_). आपण एखाद्या छान गर्दीच्या ठिकाणी असावं. ती समोर यावी, आपल्याकडे बघुन 'कातिल' हसावी. अचानक पाउस भरुन यावा. तिनेही तेवढ्या गर्दीमधे जराहि नजर नं हटवता आपल्याकडेचं एकटक बघत रहावं. आपण एखाद्या मंत्रचळ (स्पेलबाउंड) लागलेल्या माणसाप्रमाणे हलकचं तिच्याकडे जायला निघावं. आपण जसं जसं तिच्या जवळ जाउ तसं तसं तिच्या स्मितहास्याचं रुपांतर गालावर लाली चढवणार्‍या लज्जेमधे व्हावं. तिच्या गालावर चढलेली लाली बघुन आपण अजुन वेडं व्हावं. ;). नकळत त्याचं धुंदीमधे पुढे जाउन आपण तिचा हात हातामधे घ्यावा. आणि आपण तिला मागणी घालायच्या वेळीच जादुने बॅकग्राउंडला हे गाणं सुरु व्हावं. ;)
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो क्या केहेना है, क्या सुनना है मुझको पता है, तुमको पता है
तिनी आपण काहीही नं बोलता आपल्या मनामधलं ओळखावं. काहि नं बोलता,गर्दीची पर्वा नं करता आपल्याला पटकन येउन बिलगावं. अगदी मुकपणेचं आपल्याला होकार द्यावा. सगळी गर्दी आपल्याकडे बघत असावी आणि त्याचं क्षणी भरुन आलेला पाउस कोसळायला सुरुवात व्हावी.
समय का ये पल, थमसा गया है और इस पल मे, कोई नही है बस एक मै हुं, बस एक तुम हो कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
तो एक क्षण कायमचा अजरामर व्हावा. आजुबाजुच्या त्या गर्दीचं अस्तित्व त्या झंझावाती पावसाने म्हणा किंवा त्या गोड क्षणाच्या गोडव्यामधे विरघळुन जावं. फक्त ती आणि मी आणि बाजुची अतिशय धुसर झालेली गर्दी. तिचा दुसराही हात नकळत आपल्या हाती यावा आणि एका अत्यंत लयबद्ध अश्या सालसा ला सुरुवात व्हावी. a
सुलगी सुलगी सांसे, बेहेकी बेहेकी धडकन मेहेके मेहेके शाम के साये, पिघले पिघले तन मन
;) ;) ;) णो एक्सप्लेणेशण!!! ;) ;) ;) ह्युमन माईंड नोज नो लिमिट्स. अपनी अकड लगाओ ;) ;)!!! ह्या सगळ्या कल्पना परत मनामधे पुनरुज्जीवीत झाल्या गाणं ऐकुन. नॉस्टॅल्जिक विचारांनी मनावर कब्जा घ्यायच्या आतचं आमच्या अत्यंत चलकटह विनअँपनी पुढचं गाणं सुरु केलं ते होतं "सच केह रहा है दिवाना, दिल दिल ना किसी से लगाना" ;). त्यानंतर मग मात्र "तनहा दिल तनहा सफर", "भुल जा" वगैरे शानकृत गानी लागायला लागली शफलवर. It's like universe giving signs for giving up life long dream. :/ हेचं ते भारी वालं गाणं (ज्यांना चित्रपटांमधल्या चुंबनदृष्यांची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी व्हीडीओ फाट्यावर मारावा) रच्याकने. त्याच सी.डी.मधे देवांग पटेलची पिछाडी पे कुत्ता काटा, अय्यय्या सु सु सु सु वगैरे गाणी सापडली आणि गेलेला मुड परत मिळाला. अजुनही काही अशीचं रोमँटिक गाणी सापडली. त्याविषयी परत कधीतरी मुड आला लिहायचा की :) विस्कळीतअव्यवस्थित (-कॅप्टन जॅक स्पॅरो-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रेमकाव्य
मुक्तक
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
18101 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

अत्मरंजन****

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 23:00 नवीन
अत्मरंजन**** सूद्दलेकणाच्या चुका नकोत :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मायला त्या ऑटोकम्प्लीटच्या.

प्रचेतस
Sun, 08/30/2015 - 00:16 नवीन
मायला त्या ऑटोकम्प्लीटच्या. मी 'अत्म' असंच लिवलेलं. गूगलबाबाने 'आत्म' केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त! वाटले नव्हते या

तुमचा अभिषेक
Sun, 08/30/2015 - 00:45 नवीन
मस्त! वाटले नव्हते या गाण्यावरचाच लेख असेल मात्र शीर्षक वाचून धागा उघडताना हे गाणे गुणगुणतच उघडला आणि.... आता लेख वाचतो सावकाशीने :)
  • Log in or register to post comments

शीर्षकातलं निरर्थक अत्मरंजन

प्यारे१
Sun, 08/30/2015 - 00:47 नवीन
शीर्षकातलं निरर्थक अत्मरंजन काढावं अशी विनंती. ही फुटकळ जिलेबी नाही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

काढायला सांगतो. =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 08/30/2015 - 07:35 नवीन
काढायला सांगतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

साबास, सरदार खुस हुआ! ;)

प्यारे१
Sun, 08/30/2015 - 13:30 नवीन
साबास, सरदार खुस हुआ! ;) -अमराठी ;) प्यारेगब्बर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वा सीजेएस!

बोका-ए-आझम
Sun, 08/30/2015 - 20:44 नवीन
१९४२ अ लव्ह स्टोरी आला आणि त्याची गाणी गाजली,पण ते पाहायला पंचमदा हयात नव्हते हई नियतीने केलेली क्रूर थट्टा आहे. कुमार सानूचा सानुनासिक आवाजही अपीलींग वाटावा असं पंचमदांचं संगीत आणि आयुष्यात सर्वात सुंदर दिसलेली मनीषा कोईराला हे मारडाला काँबिनेशन आहे. बाकी चित्रपट यथातथाच होता. मध्यंतराआधी लव्हस्टोरी आणि नंतर १९४२.
  • Log in or register to post comments

तेव्हा वर्तमानपत्र की मासिक्

प्यारे१
Sun, 08/30/2015 - 21:09 नवीन
तेव्हा वर्तमानपत्र की मासिक्/पाक्षिक्/वीकली मध्ये आलेल्या लेखामध्ये १९४२ अ लव स्टोरीच्या संगीतानं चित्रपटसृष्टीमध्ये पुन्हा एकदा सुरेल आणि सार्थ संगीताला पुनरुज्जीवन दिलं असं लिहीलेलं आठवतंय. वैयक्तिक आरडींच्या तुलनात्मक वाद्यबंबाळ किंवा थोड्या धांगडधिंग्याच्या संगीत रचनांपेक्षा १९४२ चं संगीत अत्यंत कर्णमधुर होतं. हे त्यांच्या बाबत झालं. तर अखिल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तेव्हा दलाल, राजाबाबू आणि तत्सम गोविंदापट, मिथुनपटातल्या कमरेखालच्या शब्दरचना आणि नाचकामानं ऊत आणला होता. 'सरकायलो खटीयां जाडा लगे' सारख्या नाचगाण्यांमधून करिष्मा आपल्या खानदानाचं नाव अटकेपार आपल्या गावाकडं नेत होती आणि सो़ज्वळ आयेशा जुल्का सुद्धा 'अटरिया पे लोटन कबुतर' वगैरे म्हणत होती. तेव्हा १९४२ नं आपल्या संगीतानं मेलोडीयस संगीत आणि गोड दिसणारी मनिषा आणली होती. एक लडकी को देखा तो, कुछ ना कहो, रिमझिम रिमझिम आणि सगळीच गाणी मैलाचे दगड म्हणून गणली जायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

चित्रपट मात्र दणकून आपटला

एस
Sun, 08/30/2015 - 23:22 नवीन
चित्रपट मात्र दणकून आपटला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हो. विधु विनोद चोप्रानं

प्यारे१
Sun, 08/30/2015 - 23:59 नवीन
हो. विधु विनोद चोप्रानं चित्रपट दिग्दर्शित केला की चित्रपट पडतो असा समज आहे. दिग्दर्शन दुसऱ्याकडं दिलेले दणक्या चाललेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

खामोश, परिंदा

बोका-ए-आझम
Mon, 08/31/2015 - 01:33 नवीन
हे अपवाद. हे चालले होते. १९४२ पण अगदी सुपरफ्लाॅप वगैरे नव्हता गेला. एकलव्य मात्र धन्यवाद होता. तो पडणारच होता. पण राजू हिरानी ही विधू विनोदने बाॅलिवूडला दिलेली देणगी म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मनिषा कोईराला दिल से रे आणि

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 08/31/2015 - 06:55 नवीन
मनिषा कोईराला दिल से रे आणि १९४२ अ लव्ह स्टोरी मधे प्रचंड छान दिसलेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

संजय लीला भन्सालीच्या

बोका-ए-आझम
Mon, 08/31/2015 - 10:01 नवीन
खामोशी द म्युझिकलमध्ये पण. आज मै उपर आसमां नीचे किंवा ये दिल सुन रहा है - ही गाणी बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खामोशीची गाणीदेखील एकदम सुरेल

यशोधरा
Mon, 08/31/2015 - 10:04 नवीन
खामोशीची गाणीदेखील एकदम सुरेल आणि श्रवणीय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बाहोंके दरमियाँ विसरलं का भो?

प्यारे१
Mon, 08/31/2015 - 11:27 नवीन
बाहोंके दरमियाँ विसरलं का भो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

वैयक्तिक!!

अन्या दातार
Mon, 08/31/2015 - 11:51 नवीन
वैयक्तिक आरडींच्या तुलनात्मक वाद्यबंबाळ किंवा थोड्या धांगडधिंग्याच्या संगीत रचनांपेक्षा १९४२ चं संगीत अत्यंत कर्णमधुर होतं. हे त्यांच्या बाबत झालं.
ठळक अक्षरातील मजकुराबद्दल लैच असहमत. आरडीचे म्युजिक स्ट्रॅटेजिक असते. अगदी बॅकग्राऊंड स्कोअरसहित. बर्‍याच वाद्यांचा चित्रिकरणाशी काहीनाकाही संबंध येतोच येतो. त्यामुळे आरडीच्या म्युजिकला वाद्यबंबाळ वा धांगडधिंगा म्हणू नका प्लिज प्यारेबुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

असहमतीबद्दल सहमत आहोत.

प्यारे१
Mon, 08/31/2015 - 11:53 नवीन
असहमतीबद्दल सहमत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आयी हैं देखने, झीलों के आईने,

स्पंदना
Mon, 08/31/2015 - 05:09 नवीन
आयी हैं देखने, झीलों के आईने, बालों को खोले घटाएं राहे धुवां, धुवां, जायेंगे हम कहा, आओ यही पे रह जाए या ओळी अश्या २५ वीतच मनावर कोरल्या गेल्या. अजूनही त्या मागच सौंदर्य तसच अबाधित आहे.त्यआम लेख सुंदरच!! रच्याकन "त्या कढया पुढच्या धणिनीला त्यामागच्या ओलाव्यासकट जपायला लावा. आईच्या न कापलेल्या कांद्याच परिमार्जन होइल.
  • Log in or register to post comments

तुही यत्ता कंची?

बॅटमॅन
Mon, 08/31/2015 - 14:00 नवीन
या ओळी अश्या २५ वीतच मनावर कोरल्या गेल्या.
म्हणजे १२ वीनंतर किती वर्षे शिकलात म्हणायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

रिमझिम रिमझिम च्या ओळी विसरलो

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/01/2015 - 22:56 नवीन
रिमझिम रिमझिम च्या ओळी विसरलो होतो :) धनिण मिळाली की हा तुमचा प्रतिसाद नक्की दाखवेन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

सुंदर लेख.वाचताना आपोआप गाणी

अजया
Mon, 08/31/2015 - 07:01 नवीन
सुंदर लेख.वाचताना आपोआप गाणी मनात वाजायला लागली!यातली सर्वच गाणी त्यातल्या ताल सूर आणि गीतातल्या शब्दांमुळे अजूनही पाठ आहेत हा शोध लागला!!
  • Log in or register to post comments

रिमझिम रिमझिम

बोका-ए-आझम
Mon, 08/31/2015 - 10:11 नवीन
रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम भीगी भीगी रुत में तुम हम हम तुम हो चलते है चलते है बजता है जलतरंग पेड की छत पे जब मोतियों जैसा जल बरसे। बूंदोंकी ये झडी लायी है वो घडी जिसके लिये हम तरसे॥ बादल की चादरें ओढे है वादियां सारी दिशाएं सोयी है। सपनों के गांव मे भीगी सी छांव में दो आत्माएं खोयी है॥ आयी है देखने झीलों के आईने बालों को खोले घटाएं। राहे धुअां धुआं जायेंगे हम कहां आओ यही रह जाएं॥ यातलं शेवटचं कडवं चित्रपटात नाहीये.
  • Log in or register to post comments

सुन्दर लेख कॅप्ट्न

gogglya
Mon, 08/31/2015 - 12:45 नवीन
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बाकी असे एखादे जुने गाणे अवचित सापडले आणी भुतकाळात मन रमले की जणु संगीत परीस सापडल्याचा भास होतो.
  • Log in or register to post comments

:) सहमत.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 08/31/2015 - 15:18 नवीन
:) सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

विनअँप वर अधिरपणे डबलक्लिक

मदनबाण
Mon, 08/31/2015 - 15:48 नवीन
विनअँप वर अधिरपणे डबलक्लिक केलं गेलं आणि कानावर सेनहैजर्स चढवले गेले. विनअअँप वापरुन जमाना झाला रे.... काय दिवस होते ते ! आता प्लेअर बदलला... पण सेनहैजर्स रॉक्स ! :) वेळ मिळाल्यास आणि जमल्यास सहीतले गाणं मात्र ऐक हो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }
  • Log in or register to post comments

छान लेख. वाचून छान वाटले.

हेमंत लाटकर
Tue, 09/01/2015 - 09:36 नवीन
छान लेख. वाचून छान वाटले.
  • Log in or register to post comments

जियो मस्त लिहिल आहेस,, आपली

पियुशा
Tue, 09/01/2015 - 13:27 नवीन
जियो मस्त लिहिल आहेस,, आपली आवड्ती गाणी त्याच्या सी. डी बनवने हा आवडता उद्योग गाणे आठवुन आठवुन फुल स्केपेच्या पानावर लिस्टा बन्वने मग त्या लाय्ब्ररि वाल्याला देने एखाद दोन गाण ओरिजिनल न मिळ्याल्यामुळे तो रिमिक्स भरायचा मग उगा त्यावर खेकसणे आनी घरी ऐकुन हेच रिमिक्स गाणे १० दा ऐकने , आता मोब्ल्यामुळे गेले ते दिवस राहिल्या त्या .........
  • Log in or register to post comments

अगदी अगदी. हे झालं फक्तं सी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/01/2015 - 22:55 नवीन
अगदी अगदी. हे झालं फक्तं सी.डी.जचं. फितवाल्या कॅसेट्स किती रेकॉर्ड केल्या, तोडल्या मोडल्या ह्याला गणतीचं नाही. एक गणपतीच्या पुजेची कॅसेट होती. तिच्यामधे ओम केशवाय नम: नंतर थेट इ-ष्टाईलमे रेहेने का इष्टाईल मे रेहेनेका गाणं रेकॉर्ड केलेलं आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

=))

यशोधरा
Tue, 09/01/2015 - 23:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हाहाहा, त्या वेळचे रेट्स पण

स्रुजा
Wed, 09/02/2015 - 02:41 नवीन
हाहाहा, त्या वेळचे रेट्स पण भारी असायचे कॅसेटस चे. एक गाणं दोन रुपयाला का काय. शिवाय हिंदी ईंग्लिश गाण्यांवर रेट बदलायचा. आता सगळं यु ट्युब वर असतं, मजा नाही ती. तुम्ही लेख अगदी दिलखुश लिहिलाय.. अशी खुप गाणी आणि त्या बरोबर काय काय आठवायचं ते आठवलं :) रूठ ना जाना हे १९४२ मधलं पण अगदी मुलायम गाणं आहे. अक्षरशः पिसासारखं हवेत तरंगल्यासारखं हळूवार म्हणलंय ते गाणं. आर डीं चा मास्टर स्ट्रोक. संगीत दिग्दर्शक ब्रिलियंट असला की कुमार सानु पण चांगलं गाणं म्हणुन जातो आणि चित्रपट दिग्दर्शक चांगला असला की शाहरुख पण स्वदेस मधे "कलाकार" वाटतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही कॅसेट रेकॉर्ड करायला कधी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/02/2015 - 06:49 नवीन
नाही कॅसेट रेकॉर्ड करायला कधी पैसे नाही दिले कोणाला. ते सगळे उपद्व्याप स्पॅरो गृहोद्योग पायरेट लिमिटेड मधे करण्यात आलेले. शानची बहुतेक गाणी त्यावेळेला रेकॉर्ड केलेली. त्यावेळेला रेडिओ मिर्ची नवीन आलेली आणि माझ्याकडच्या टेपरेकॉर्डरला रेडिओवरुन माईकशिवाय रेकॉर्डिंग करता यायचं नाही. थेट माईक लाउन रेकॉर्ड केलं तर बाहेरचा नॉईज सुद्धा रेकॉर्ड व्हायचा म्हणुन एका छोट्या बॉक्समधे रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवलेला. नॉइज आयसोलेशनसाठी बॉक्समधे उश्या भरलेल्या असायच्या. कॅसेटच्या खाली एक स्लॉट असतो रेकॉर्ड लॉक साठी. तो स्लॉट उघडा असेल तर टेपरेकॉर्डर मधलं रेकॉर्डिंग मेकॅनिजम चालु व्हायचं नाही. त्यासाठी मग तो स्लॉट बारिक लाकडाचे तुकडे वगैरे चिकटवुन बंद करायचो. बाबांच्या किशोर कुमारच्या गाण्यांच्या कॅसेट्सचे "रेकॉर्ड्स" मीचं मोडले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

:-)

जुइ
Wed, 09/02/2015 - 08:10 नवीन
लोल! होपलेसली रोमँटिक एकदम ;-)
  • Log in or register to post comments

बाप्पा यायला आठवडा आहे

बोका-ए-आझम
Fri, 08/18/2017 - 08:15 नवीन
आणि त्यामुळे हा लेख वरती अाणतोय. कुणीतरी या चिमणरावांना लिहायला लावा!
  • Log in or register to post comments

तुम्ही पण लिहिलेत तर चालेल की

जेम्स वांड
Fri, 08/18/2017 - 08:23 नवीन
तुम्ही पण लिहिलेत तर चालेल की हो मोसादकार __/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नको. सद्ध्या मी लिहिलं की

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 08/18/2017 - 16:45 नवीन
नको. सद्ध्या मी लिहिलं की संपादित तरी होतं नाहितर तत्परपणे वाचनमात्रं होतं. तरी अजुन आयडी कसा शाबुत राहिलाय ते कळत नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा