✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

आ
आशु जोग यांनी
Tue, 03/25/2014 - 13:48  ·  लेख
लेख
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
37903 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

१६ मे पर्यंत थांबा

क्लिंटन
Tue, 03/25/2014 - 13:51 नवीन
सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील :)
  • Log in or register to post comments

मला वाटलं ९० च्या दशकातील आणि

बंडा मामा
Wed, 03/26/2014 - 23:57 नवीन
मला वाटलं ९० च्या दशकातील आणि अजून कुठली कुठली आकडेवारी गोळा करुन हे आधीच सांगता येतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

नाही हो तुम्हाला वाटेल ते खरं!

मैत्र
गुरुवार, 03/27/2014 - 10:27 नवीन
काही तरी काय बंडा मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

असं काही नाही, आपण ज्या

बंडा मामा
गुरुवार, 03/27/2014 - 16:10 नवीन
असं काही नाही, आपण ज्या बाबाची भक्ती करतो त्याची आकडेवारी इकडून तिकडून गोळा करुन आपले पुस्तकी ज्ञान थोडे पाजळले की भाबडा भक्तगण डोलायला लागतो आणि आपण सेल्फ प्रोक्लेम्ड गुरू बनायला मोकळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

जसे तुम्ही बनले आहात

मंदार दिलीप जोशी
Fri, 03/28/2014 - 09:54 नवीन
जसे तुम्ही बनले आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

न्हाय न्हाय ! त्ये काय अजुन

गब्रिएल
Tue, 04/01/2014 - 13:21 नवीन
न्हाय न्हाय ! त्ये काय अजुन गुरु बिरु नाय बन्लेत. बंडामामा, संक्शी आनि नेभळे लय परयत्न करू र्‍हायले काय्बाय येडाचाळा करून गुरु बनाय्चा. पन मिपावर लय बेर्की लोकं हाय्त. लई मार पड्ला बेचार्‍याना. आसतं येकायेकाच नशीब :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

सध्या भाजपात एनडीएत आलेल्या

नानासाहेब नेफळे
Tue, 03/25/2014 - 14:08 नवीन
सध्या भाजपात एनडीएत आलेल्या व्यक्ती.. जगदंबिका पाल(४० वर्षे काँग्रेसी) रामविलास पासवान( लोजपा) रामदास आठवले (युपीएतला एक जुना सहकारी पक्ष,आरपीआय) सतपाल महाराज (चाळीस वर्षें काँग्रेसी) येदुयुरप्पा (जमीन घोटाळ्यातला भाजपनेच हकालपट्टी केलेला मुख्यमंत्री.) मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे.
  • Log in or register to post comments

*धाग्याची जाहीरात

माहितगार
Tue, 03/25/2014 - 15:22 नवीन
निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

मोदी येवोत अथवा कोणीही!

आयुर्हित
Tue, 03/25/2014 - 14:12 नवीन
मोदी येवोत अथवा कोणीही! आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध व जास्तीत जास्त नागरिक सुविधा हव्यात. भ्रष्टाचार, महागाई, वीज व इंधन बिल कमीत कमी हवे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP),राष्ट्रीय उत्पादन क्षमता (National Productivity)जास्त कसे होईल सर्व स्तरांवरचे प्रदूषण कमी करण्याचे सक्षम पर्याय शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आत्महत्या रोखता आल्या पाहिजेत. नदीजोड प्रकल्प, गावागावात पोचणारे रस्ते, अन्न धान्याची नासाडी रोखणे व या सर्वात नागरिकांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय!
  • Log in or register to post comments

अन घटकाभर धरा, झाला तुमचा

बॅटमॅन
Tue, 03/25/2014 - 14:20 नवीन
अन घटकाभर धरा, झाला तुमचा मोदी पंतप्रधान..त्यानं काय होणारे? सर्कारी हपिसांतला भ्रष्टाचार थांबणारे? गल्लोगल्लीचे दीडदमडीचे नगरसेवक अन त्यांचे पित्ते नंगानाच करायचे थांबणारेत? डॉल्बीच्या भिंती उभ्या करून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....
  • Log in or register to post comments

या प्रतिसादात मोदींऐवजी रागा

क्लिंटन
Tue, 03/25/2014 - 14:26 नवीन
या प्रतिसादात मोदींऐवजी रागा/केजु किंवा कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नो डौट धागा मोदीबद्दल आहे

बॅटमॅन
Tue, 03/25/2014 - 14:29 नवीन
नो डौट :) धागा मोदीबद्दल आहे म्हणून ते नाव टाकले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

भ्रष्टाचार नाही कमी झाला तरी

मराठी कथालेखक
Tue, 03/25/2014 - 15:58 नवीन
भ्रष्टाचार नाही कमी झाला तरी पायाभूत सुविधांचा विकास जास्त होईल, उद्योगधंदे वाढतील, बेकारी कमी होईल. हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ब्याटम्यान, आपण वास्तव

नानासाहेब नेफळे
Tue, 03/25/2014 - 14:27 नवीन
ब्याटम्यान, आपण वास्तव सांगितलत.
  • Log in or register to post comments

मोदी येणे अवघड आहे

प्रसाद गोडबोले
Tue, 03/25/2014 - 14:31 नवीन
मोदी येणे अवघड आहे
  • Log in or register to post comments

बाकी पासवान हा भारतीय

संपत
Tue, 03/25/2014 - 14:44 नवीन
बाकी पासवान हा भारतीय राजकारणाचा खरा चेहरा आहे. गुजरात दंगलीमुळे नाराज होऊन रालोआ सोडणारे पण पासवान आणि आता मोदींच्या गळ्यात गळा घालणारे पण पासवान, मोदी आता पक्षात नवीन आलेल्या लोकांना अडवाणी समर्थकांच्या जागी उभे करत आहेत ही चाल ते लोक निवडून आले तर चांगली आहे पण त्यामुळे अंतर्गत बंडाळी पण वाढली आहे. त्यामुळे फासे कसे पडतात ते बघायचे.
  • Log in or register to post comments

बट्ट्मन

विटेकर
Tue, 03/25/2014 - 14:57 नवीन
यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. भारतीय म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक भारतीयाला वाटत असतेच !हल्ली परदेशी प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणूनमोदी पंतप्रधान झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गांधीजींच्यामागे जाणारे भारतीय / महाराजांच्यामागे जाणारे मावळे हे तत्कालीन अत्यंत निराशाजनक परिस्थितीतही आपली निष्ठा टिकवून ठाम उभे राहीले आणि विजयी झाले. ताकद शस्त्रात नसते तर ती चालवणाराच्या हातात आणि मानसिकतेत असते. मोदीच असे नव्हे तर कोणी ही एक ताठ कण्याचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. ( मी गांधीजी / महाराज यांची तुलना मोदी यांच्याशी करतोय असा कोणी गैरसमज करुन घेऊ नये , मी फक्त सक्षम नेता काय करु शकतो याचे उदाहरण दिले आहे, तो अंतर्गत तसेच बाह्य शत्रुंना पुरुन उरतो. असेच उदाहरण प्रभु रामचंद्राचे देखील आहे वानरांना घेऊन त्याने बलाढ्य रावणाचा पराभव केला ..)
  • Log in or register to post comments

भगवान करो अन तुमची बात सच

बॅटमॅन
Tue, 03/25/2014 - 15:01 नवीन
भगवान करो अन तुमची बात सच निकलो! पण सध्या तरी इतके आशावादी रहावे असे वाटत नै. असो, घोडामैदान जवळच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

...

आशु जोग
Wed, 08/26/2015 - 13:22 नवीन
पटतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

पाकेस्तान ने कुरापत काढली ,

हाडक्या
Wed, 08/26/2015 - 14:54 नवीन
पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !
यात कै बदल मित्र हो ? मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.
म्हणजे नक्की काय व्हायला हवं होतं आणि ते होत आहे का ? अथवा जैसे थे आहे अजून तरी?
कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.
हे मान्य पण सद्य स्थिती काय सांगतेय याबद्दल, ते जाणून घ्यायला आवडेल. ("वाट पहा आणि पहा" चे सल्ले कोणी द्यायला येऊ नयेत. आम्ही अजाईल पद्धतीवर विश्वास ठेवतो त्यमुळे तसे प्रतिसाद फाट्यावर मारले जातील.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

थोडे बदल

गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2015 - 15:57 नवीन
मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती. ज्या गोष्टींवर डल्ब्यू.पी.आय ठरतो (आणि ज्यावर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर अवलंबून असतात) त्यात डाळी आणि भाज्यांपेक्षा इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि त्या सगळ्यांचा ओव्हरऑल परिणाम ऋण आहे. डॉलर भाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या २-३ दिवसात रूपया जास्त कोसळला. आणि काही महिन्यात जर अमेरिकन फेडने व्याजाचे दर वाढवले तर रूपया आणखी कोसळू शकेल. हाडक्या, तुम्ही तसे करणार नाही याची खात्री आहे पण इतर कोणीही "मग मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही असेच बाह्य घटक जबाबदार होते" असे म्हणत अंगावर येऊ नये ही विनंती. मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhem-a-temporary-phenomenon-macroeconomic-fundamentals-better-now-raghuram-rajan/articleshow/48674957.cms . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही. तिसरे म्हणजे पाकिस्तानविषयीचे धोरण म्हणाल तर इंग्लंडमधील डेली मेल या पेपरातील ही लिंक बघा-- http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2785698/Islamabad-shocked-Indian-Army-launches-massive-retaliation-border-firing-confident-PM-Modi-promises-right-soon.html आणि हो ही बातमी ऑर्गनायझर, विवेक, कमल संदेश किंवा तरूण भारत मध्ये आलेली नाही. तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे. हा ग्रुप भारताने काश्मीर प्रश्न यु.एन कडे नेल्यानंतर स्थापन केला गेला होता.या ग्रुपच्या दिल्लीतील ऑफिसला जागा खाली करायचेही आदेश मोदी सरकारनेच दिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे

अनुप ढेरे
गुरुवार, 08/27/2015 - 12:15 नवीन
महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती.
अगदी! सीपीआय पण ३-४% आहे. जो बराच अ‍ॅक्सेप्टेबल आहे. हा लेख वाचनीय आहे. http://indianexpress.com/article/opinion/columns/no-proof-required-why-inflation-fell/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

म विसरलात का?

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 08/27/2015 - 12:24 नवीन
'म' विसरलात का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

:)

अनुप ढेरे
गुरुवार, 08/27/2015 - 13:20 नवीन
:) अरर्.. कॉपीपेस्टच्या डुलक्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

महागाईतल्या म ला गायब कराल तर

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/27/2015 - 12:33 नवीन
महागाईतल्या म ला गायब कराल तर... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

संपादक काका, हसता काय?

अनुप ढेरे
गुरुवार, 08/27/2015 - 13:21 नवीन
संपादक काका, हसता काय? दुरुस्तं करा की राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असु दे हो ढेरे साहेब.. तसं ही

अस्वस्थामा
गुरुवार, 08/27/2015 - 14:11 नवीन
असु दे हो ढेरे साहेब.. तसं ही ते "म" शिवाय जास्त यथार्थ वाटतंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मनमोहन पंतप्रधान असताना

हाडक्या
गुरुवार, 08/27/2015 - 15:19 नवीन
मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhe... . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही.
हे पूर्णतः मान्य.. ! याबद्दल दुमत होण्याचे कसलेच कारण नाही. परंतु जसे तुम्हाला दोष दिसले आणि ते तुम्ही ते मांडलेत तो प्रांजळपणा अनेक समर्थकांना अपमान असल्यासारखा वाटतो आणि मुख्य कारण हे "सरकार बदलल्यावर सगळे बदलणार, विजिगिषु चैतन्य निर्माण होणार, खरोखरच्या सुधारणा येऊन देश महासत्ता होणार" असा जो ओव्हर-नाईट बदलांच्या अपे़क्षांचा लोकांनीच केलेला डोंगर हे आहे. कोणतेही सरकार आले तरी असे बदल लगेचच (ओव्हर नाईट) शक्य नाहीत आणि यात गेल्या सरकारची भलामण नाही की नव्या सरकारवर टिका नाही. हे आपले समाज वास्तव आहे आणि त्यास स्वीकारण्यास बरेच अंध समर्थक ( ते आप असो अथवा भाजपा अथवा इतर कोणताही पक्ष) अजिबातच तयार नसतात. देशास आवश्यक धोरणे ठरवणे, त्याकडे योग्य दिशेत वाटचाल होणे आणि धोरणांचा पाठपुरावा, मुलभूत बदलांची आस आणि लोकांचा सत्ता सहभागाबरोबरच पुढच्या पिढीसाठी सुदृढ, पोषक समाज निर्मिती या महत्त्वाच्या पण कमी ग्लॅमरस गोष्टींकडे जोवर लोकांचे दुर्लक्ष होत आहे तोवर अशा "सेविअर" मानसिकतेस काहीही करु शकत नाही.
तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे.
डेली मेल रद्दड पेपर आहे त्यास बाजूस ठेवू. भारतातील कोणत्याही पेपरपेक्षा "डॉन" पत्रकारितेत उजवा आहे असं वाटतं. तुम्ही सांगितलेल्या बातमीत (मला आठवतंय त्या प्रमाणे) त्यांनी पाकिस्तानवर गोळीबार "झालाच" आहे आणि भारताचा असा "तथाकथित दावा" आहे, म्हणून दोघांनीही तक्रार केल्याचं म्हटलं आहे. भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 08/27/2015 - 15:45 नवीन
भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी.
पाकिस्तानच्या पहिल्यापासूनच असे दावे करत आहे की. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे की भारताने केलेल्या गोळीबाराविरूध्द पाकिस्तानने यु.एन च्या एजन्सीकडे धाव घेतली हा आहे. आणि ही बातमी मिंटसारख्या भारतीय पेपरातही आलीच होती. http://www.livemint.com/Politics/HshGr5iGhoXo4p2V1EabXK/Pak-targets-40-BoPs-with-mortar-shells-3-injured.html आम्हाला भारताने मारले म्हणून पाकिस्तानने यु.एन किंवा अन्य कोणत्या एजन्सीकडे तक्रार करायचे प्रसंग फार आलेले नाहीत हे पण नक्कीच. माझ्या आठवणीत ऑगस्ट १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानचे विमान पाडले म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. भारताच्या म्हणण्यानुसार हे विमान भारतात घुसखोरी करत होते म्हणून ते कच्छमध्ये पाडले तर पाकिस्तानचे म्हणणे होते की त्या विमानावर भारताने ते विमान पाकिस्तानी हद्दीत असताना हल्ला केला होता. पाकिस्तान हा खटला हरले होते. २००० साली मटामध्ये विठ्ठलराव गाडगीळांनी लेख लिहिला होता त्यात इतर १-२ प्रसंगी पाकिस्तानने भारताविरूध्द आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती असे लिहिले होते हे आठवते.हे खटले नक्की कोणते होते हे आता लक्षात नाही.पण माझ्या आठवणीप्रमाणे हे खटले लष्करी कारणावरून नव्हते.कारगीलच्या वेळीही नवाझ शरीफ अमेरिकेला रवाना झाले होते आणि मध्यस्थीची गळ घातली होती. लष्करी कारणावरून पाकिस्तान असे रडत दुसरीकडे कधी जाईल? जेव्हा जोरदार चोप मिळेल तेव्हाच. आपण आपल्या दिवट्या शेजार्‍याला तितके तरी ओळखतोच. १९७१ मध्ये असा जोरदार चोप मिळून इतरांकडे धाव घ्यायच्या आतच युध्द संपले. काश्मीर प्रश्नावरून यु.एन. मानवाधिकार आयोगापुढे वगैरे तक्रार नेणे ही काही लष्करी मार मिळाल्यानंतरची धाव नाही. याव्यतिरिक्त पाकिस्तानने "भारताने आम्हाला मारले" म्हणून यु.एन कडे किंवा यु.एस कडे धाव घेतल्याची इतर उदाहरणे चटकन डोळ्यासमोर येत नाहीत. तेव्हा पाकिस्तानने अशी धाव घेणे यातच बरेच काही आले की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

हे मान्यच पण तो माझ्या

हाडक्या
गुरुवार, 08/27/2015 - 15:48 नवीन
हे मान्यच पण तो माझ्या प्रतिसादात कमी प्रायोरिटीचा पुरवणी मुद्दा होता हो, तुम्ही पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेत म्हणायचे (ह.घ्या).. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

(No subject)

आशु जोग
Tue, 03/25/2014 - 15:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

भाजपा नवे मित्र ????

चौकटराजा
Tue, 03/25/2014 - 17:16 नवीन
सगळे बरोबर आहे पण भाजपाला नवे मित्र मिळतील ????? अशक्य ! खरे तर भाजपा व काँग्रेस यानीच किमान कार्यक्रम घेऊन सरकार स्थापावयास हवे. पण एकमेकाना पांण्यात पहाणार्‍या पण जनलोकपाल बद्द्ल एकमेकाना उंदीर मांजर साक्ष असणार्‍या या गुरू शिष्याना कोण समजावणार ...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

भाजप काय किंवा काँग्रेस काय,

नानासाहेब नेफळे
Tue, 03/25/2014 - 17:33 नवीन
भाजप काय किंवा काँग्रेस काय, दोघेही किमान समान कार्यक्रमावरच एकत्र सत्ता चालवत असतात. लोकांना हे लक्षात आलेले नाही, त्यांना काय ,राजकीय सभेत आरोप प्रत्यारोपाची मैफल ऐकवली कि लगेच त्यांचा विश्वास बसतो कि भाजप व काँग्रेस भिन्न आहेत .एकमेकांना शिव्या घालायच्या परंतु अंबानीच्या व अदाणीच्या बाबतीत' समान' कार्यक्रम हे दोघेही राबवत आले आहेत. बहुतांश घोटाळे मिडीयाने बाहेर काढलेत, कॅगनेच 2G व कोळसा घोटाळा बाहेर काढला, पण याचे श्रेय लाटायला मात्र भाजप पूढे... यांनी त्यांच्या प्रातःस्मरणीय प्रखर राष्ट्रवादाचे, पवित्र आचरणाचे,अखंड भारतभुचे, रामराज्याचे तंबोरे इतकी वर्षं खाजवुनही यांच्या मैफीलींमधून काही देशउन्नतीच्या तारा आजपर्यंत छेडल्या गेल्या नाहीत,' दक्ष', राहुन कुठे 'दुर्लक्ष' करायचे याचे चांगले प्रक्षिशण घेऊनच हे संघिष्ट लोक राजकारणात येत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

गेट वेल सून.

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 18:05 नवीन
गेट वेल सून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

म्हणूनच वाराणसीतुन मोदी आणि

बंडा मामा
Wed, 03/26/2014 - 23:21 नवीन
म्हणूनच वाराणसीतुन मोदी आणि अमेठीतुन राहुल गांधी हरले तर एक कडक चपराक ह्या पारंपारीक पक्षांना मिळेल. दिल्लीत मिळाली तशी. तो पर्यंत येड्डीयुरप्पा, अशोक चव्हाण, रामलुलु, ए.राजा हेच लोक निवडणुका खरेदी करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

...

आशु जोग
Wed, 08/26/2015 - 12:52 नवीन
खरं नाही ठरलं याचा आनंद आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

हा Chyren म्हणजे मोदीच असतील

मराठी कथालेखक
Tue, 03/25/2014 - 16:00 नवीन
हा Chyren म्हणजे मोदीच असतील का ? http://www.worldwarthird.com/htm/per_nostradamus.htm
  • Log in or register to post comments

मग काय

संचित
Mon, 04/14/2014 - 18:39 नवीन
Image removed. साक्षात अनिरुद्ध बापुनी लिहिल आहे ते पुस्तक. खोट कस असणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

हाण तिच्या आयला....

बाबा पाटील
Tue, 03/25/2014 - 16:14 नवीन
माणस वास्तवात का जगत नाहित्,एन.डी.ए च्या एकुन जागांची कुणी बेरिज करुन सांगेल का रे ?
  • Log in or register to post comments

एन डी ए = एकूण जागाची बेरीज

विजुभाऊ
गुरुवार, 03/27/2014 - 11:33 नवीन
एन डी ए = एकूण जागाची बेरीज ५०२ एन डी ए = न दिसलेली आघाडी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

उत्तर

विकास
Tue, 03/25/2014 - 16:25 नवीन
खरेच मोदी येतील का ? नाही. राहूल गांधीच आम आदमीचा चॉईस रहाणार आहे! ढोल-ताशे तयार ठेवा! :)
  • Log in or register to post comments

हम्म

चिरोटा
Tue, 03/25/2014 - 17:22 नवीन
ह्या लिस्टमधील कोणीही पंतप्रधान झाला तरी हरकत नाही. http://www.linkedin.com/pub/dir/Arvind/Modi किंवा http://in.linkedin.com/pub/narendra-kejriwal/1b/673/a41
  • Log in or register to post comments

राहूल मोदी

विकास
Tue, 03/25/2014 - 19:33 नवीन
राहूल मोदी, मोदी इंटरनॅशनलचे मालक यांच्या अनुल्लेखाबद्दल निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

सगल्यानि मतदान करा मग नक्कि

अम्रुता आफले
Tue, 03/25/2014 - 17:30 नवीन
सगल्यानि मतदान करा मग नक्कि येतिल मोदि .
  • Log in or register to post comments

मोदी पंतप्रधान व्हावेत हि

मालोजीराव
Tue, 03/25/2014 - 17:31 नवीन
मोदी पंतप्रधान व्हावेत हि इच्छा …पण त्यांनी पंतप्रधान होऊन देशाचा गुजरात करण्यापेक्षा देशाचा महाराष्ट्र करावा
  • Log in or register to post comments

+१००

राही
Tue, 03/25/2014 - 18:29 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

देशाचा महाराष्ट्र करावा?

अर्धवटराव
Tue, 03/25/2014 - 19:18 नवीन
कुठल्या दशकातला राजे ? बारामतीकर काकांच्या वेळचा वा त्या अगोदरचा म्हणाल तर बरच आहे...अन्यथा आजच्या महाराष्ट्राची स्थिती काळजी करावी अशीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

मालक कौतुक राज्यकर्त्यांच

मालोजीराव
Wed, 03/26/2014 - 13:03 नवीन
मालक कौतुक राज्यकर्त्यांच नाहीच… अशोक चव्हाण,धाकटे साहेब यांच्यासारखे माती करणारे राजकारणी असूनसुद्धा उद्योजक,शेतकरी बांधवांनी महाराष्ट्राला सतत अग्रेसर ठेवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

देशाचा महाराष्ट्र करायचा तर

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 13:10 नवीन
देशाचा महाराष्ट्र करायचा तर अगोदर देशातल्या विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

हे म्हणजे तुमी फेडरल फ्रंट

ऋषिकेश
Wed, 03/26/2014 - 13:33 नवीन
हे म्हणजे तुमी फेडरल फ्रंट सारखे बोलून र्‍हायले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा