Skip to main content

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 25/03/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38066
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by बंडा मामा

काही तरी काय बंडा मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना?

In reply to by मैत्र

असं काही नाही, आपण ज्या बाबाची भक्ती करतो त्याची आकडेवारी इकडून तिकडून गोळा करुन आपले पुस्तकी ज्ञान थोडे पाजळले की भाबडा भक्तगण डोलायला लागतो आणि आपण सेल्फ प्रोक्लेम्ड गुरू बनायला मोकळे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

न्हाय न्हाय ! त्ये काय अजुन गुरु बिरु नाय बन्लेत. बंडामामा, संक्शी आनि नेभळे लय परयत्न करू र्‍हायले काय्बाय येडाचाळा करून गुरु बनाय्चा. पन मिपावर लय बेर्की लोकं हाय्त. लई मार पड्ला बेचार्‍याना. आसतं येकायेकाच नशीब :)

सध्या भाजपात एनडीएत आलेल्या व्यक्ती.. जगदंबिका पाल(४० वर्षे काँग्रेसी) रामविलास पासवान( लोजपा) रामदास आठवले (युपीएतला एक जुना सहकारी पक्ष,आरपीआय) सतपाल महाराज (चाळीस वर्षें काँग्रेसी) येदुयुरप्पा (जमीन घोटाळ्यातला भाजपनेच हकालपट्टी केलेला मुख्यमंत्री.) मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे.

मोदी येवोत अथवा कोणीही! आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध व जास्तीत जास्त नागरिक सुविधा हव्यात. भ्रष्टाचार, महागाई, वीज व इंधन बिल कमीत कमी हवे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP),राष्ट्रीय उत्पादन क्षमता (National Productivity)जास्त कसे होईल सर्व स्तरांवरचे प्रदूषण कमी करण्याचे सक्षम पर्याय शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आत्महत्या रोखता आल्या पाहिजेत. नदीजोड प्रकल्प, गावागावात पोचणारे रस्ते, अन्न धान्याची नासाडी रोखणे व या सर्वात नागरिकांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय!

अन घटकाभर धरा, झाला तुमचा मोदी पंतप्रधान..त्यानं काय होणारे? सर्कारी हपिसांतला भ्रष्टाचार थांबणारे? गल्लोगल्लीचे दीडदमडीचे नगरसेवक अन त्यांचे पित्ते नंगानाच करायचे थांबणारेत? डॉल्बीच्या भिंती उभ्या करून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

In reply to by बॅटमॅन

भ्रष्टाचार नाही कमी झाला तरी पायाभूत सुविधांचा विकास जास्त होईल, उद्योगधंदे वाढतील, बेकारी कमी होईल. हे ही नसे थोडके.

बाकी पासवान हा भारतीय राजकारणाचा खरा चेहरा आहे. गुजरात दंगलीमुळे नाराज होऊन रालोआ सोडणारे पण पासवान आणि आता मोदींच्या गळ्यात गळा घालणारे पण पासवान, मोदी आता पक्षात नवीन आलेल्या लोकांना अडवाणी समर्थकांच्या जागी उभे करत आहेत ही चाल ते लोक निवडून आले तर चांगली आहे पण त्यामुळे अंतर्गत बंडाळी पण वाढली आहे. त्यामुळे फासे कसे पडतात ते बघायचे.

यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. भारतीय म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक भारतीयाला वाटत असतेच !हल्ली परदेशी प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणूनमोदी पंतप्रधान झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गांधीजींच्यामागे जाणारे भारतीय / महाराजांच्यामागे जाणारे मावळे हे तत्कालीन अत्यंत निराशाजनक परिस्थितीतही आपली निष्ठा टिकवून ठाम उभे राहीले आणि विजयी झाले. ताकद शस्त्रात नसते तर ती चालवणाराच्या हातात आणि मानसिकतेत असते. मोदीच असे नव्हे तर कोणी ही एक ताठ कण्याचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. ( मी गांधीजी / महाराज यांची तुलना मोदी यांच्याशी करतोय असा कोणी गैरसमज करुन घेऊ नये , मी फक्त सक्षम नेता काय करु शकतो याचे उदाहरण दिले आहे, तो अंतर्गत तसेच बाह्य शत्रुंना पुरुन उरतो. असेच उदाहरण प्रभु रामचंद्राचे देखील आहे वानरांना घेऊन त्याने बलाढ्य रावणाचा पराभव केला ..)

In reply to by आशु जोग

पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !
यात कै बदल मित्र हो ? मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.
म्हणजे नक्की काय व्हायला हवं होतं आणि ते होत आहे का ? अथवा जैसे थे आहे अजून तरी?
कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.
हे मान्य पण सद्य स्थिती काय सांगतेय याबद्दल, ते जाणून घ्यायला आवडेल. ("वाट पहा आणि पहा" चे सल्ले कोणी द्यायला येऊ नयेत. आम्ही अजाईल पद्धतीवर विश्वास ठेवतो त्यमुळे तसे प्रतिसाद फाट्यावर मारले जातील.)

In reply to by हाडक्या

मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती. ज्या गोष्टींवर डल्ब्यू.पी.आय ठरतो (आणि ज्यावर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर अवलंबून असतात) त्यात डाळी आणि भाज्यांपेक्षा इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि त्या सगळ्यांचा ओव्हरऑल परिणाम ऋण आहे. डॉलर भाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या २-३ दिवसात रूपया जास्त कोसळला. आणि काही महिन्यात जर अमेरिकन फेडने व्याजाचे दर वाढवले तर रूपया आणखी कोसळू शकेल. हाडक्या, तुम्ही तसे करणार नाही याची खात्री आहे पण इतर कोणीही "मग मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही असेच बाह्य घटक जबाबदार होते" असे म्हणत अंगावर येऊ नये ही विनंती. मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayh… . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही. तिसरे म्हणजे पाकिस्तानविषयीचे धोरण म्हणाल तर इंग्लंडमधील डेली मेल या पेपरातील ही लिंक बघा-- http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2785698/Islamaba… आणि हो ही बातमी ऑर्गनायझर, विवेक, कमल संदेश किंवा तरूण भारत मध्ये आलेली नाही. तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे. हा ग्रुप भारताने काश्मीर प्रश्न यु.एन कडे नेल्यानंतर स्थापन केला गेला होता.या ग्रुपच्या दिल्लीतील ऑफिसला जागा खाली करायचेही आदेश मोदी सरकारनेच दिले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती.
अगदी! सीपीआय पण ३-४% आहे. जो बराच अ‍ॅक्सेप्टेबल आहे. हा लेख वाचनीय आहे. http://indianexpress.com/article/opinion/columns/no-proof-required-why-…

In reply to by गॅरी ट्रुमन

:) अरर्.. कॉपीपेस्टच्या डुलक्या!

In reply to by गॅरी ट्रुमन

मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhe... . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही.
हे पूर्णतः मान्य.. ! याबद्दल दुमत होण्याचे कसलेच कारण नाही. परंतु जसे तुम्हाला दोष दिसले आणि ते तुम्ही ते मांडलेत तो प्रांजळपणा अनेक समर्थकांना अपमान असल्यासारखा वाटतो आणि मुख्य कारण हे "सरकार बदलल्यावर सगळे बदलणार, विजिगिषु चैतन्य निर्माण होणार, खरोखरच्या सुधारणा येऊन देश महासत्ता होणार" असा जो ओव्हर-नाईट बदलांच्या अपे़क्षांचा लोकांनीच केलेला डोंगर हे आहे. कोणतेही सरकार आले तरी असे बदल लगेचच (ओव्हर नाईट) शक्य नाहीत आणि यात गेल्या सरकारची भलामण नाही की नव्या सरकारवर टिका नाही. हे आपले समाज वास्तव आहे आणि त्यास स्वीकारण्यास बरेच अंध समर्थक ( ते आप असो अथवा भाजपा अथवा इतर कोणताही पक्ष) अजिबातच तयार नसतात. देशास आवश्यक धोरणे ठरवणे, त्याकडे योग्य दिशेत वाटचाल होणे आणि धोरणांचा पाठपुरावा, मुलभूत बदलांची आस आणि लोकांचा सत्ता सहभागाबरोबरच पुढच्या पिढीसाठी सुदृढ, पोषक समाज निर्मिती या महत्त्वाच्या पण कमी ग्लॅमरस गोष्टींकडे जोवर लोकांचे दुर्लक्ष होत आहे तोवर अशा "सेविअर" मानसिकतेस काहीही करु शकत नाही.
तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे.
डेली मेल रद्दड पेपर आहे त्यास बाजूस ठेवू. भारतातील कोणत्याही पेपरपेक्षा "डॉन" पत्रकारितेत उजवा आहे असं वाटतं. तुम्ही सांगितलेल्या बातमीत (मला आठवतंय त्या प्रमाणे) त्यांनी पाकिस्तानवर गोळीबार "झालाच" आहे आणि भारताचा असा "तथाकथित दावा" आहे, म्हणून दोघांनीही तक्रार केल्याचं म्हटलं आहे. भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी. असो.

In reply to by हाडक्या

भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी.
पाकिस्तानच्या पहिल्यापासूनच असे दावे करत आहे की. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे की भारताने केलेल्या गोळीबाराविरूध्द पाकिस्तानने यु.एन च्या एजन्सीकडे धाव घेतली हा आहे. आणि ही बातमी मिंटसारख्या भारतीय पेपरातही आलीच होती. http://www.livemint.com/Politics/HshGr5iGhoXo4p2V1EabXK/Pak-targets-40-… आम्हाला भारताने मारले म्हणून पाकिस्तानने यु.एन किंवा अन्य कोणत्या एजन्सीकडे तक्रार करायचे प्रसंग फार आलेले नाहीत हे पण नक्कीच. माझ्या आठवणीत ऑगस्ट १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानचे विमान पाडले म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. भारताच्या म्हणण्यानुसार हे विमान भारतात घुसखोरी करत होते म्हणून ते कच्छमध्ये पाडले तर पाकिस्तानचे म्हणणे होते की त्या विमानावर भारताने ते विमान पाकिस्तानी हद्दीत असताना हल्ला केला होता. पाकिस्तान हा खटला हरले होते. २००० साली मटामध्ये विठ्ठलराव गाडगीळांनी लेख लिहिला होता त्यात इतर १-२ प्रसंगी पाकिस्तानने भारताविरूध्द आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती असे लिहिले होते हे आठवते.हे खटले नक्की कोणते होते हे आता लक्षात नाही.पण माझ्या आठवणीप्रमाणे हे खटले लष्करी कारणावरून नव्हते.कारगीलच्या वेळीही नवाझ शरीफ अमेरिकेला रवाना झाले होते आणि मध्यस्थीची गळ घातली होती. लष्करी कारणावरून पाकिस्तान असे रडत दुसरीकडे कधी जाईल? जेव्हा जोरदार चोप मिळेल तेव्हाच. आपण आपल्या दिवट्या शेजार्‍याला तितके तरी ओळखतोच. १९७१ मध्ये असा जोरदार चोप मिळून इतरांकडे धाव घ्यायच्या आतच युध्द संपले. काश्मीर प्रश्नावरून यु.एन. मानवाधिकार आयोगापुढे वगैरे तक्रार नेणे ही काही लष्करी मार मिळाल्यानंतरची धाव नाही. याव्यतिरिक्त पाकिस्तानने "भारताने आम्हाला मारले" म्हणून यु.एन कडे किंवा यु.एस कडे धाव घेतल्याची इतर उदाहरणे चटकन डोळ्यासमोर येत नाहीत. तेव्हा पाकिस्तानने अशी धाव घेणे यातच बरेच काही आले की नाही?

In reply to by गॅरी ट्रुमन

हे मान्यच पण तो माझ्या प्रतिसादात कमी प्रायोरिटीचा पुरवणी मुद्दा होता हो, तुम्ही पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेत म्हणायचे (ह.घ्या).. :D

In reply to by आशु जोग

सगळे बरोबर आहे पण भाजपाला नवे मित्र मिळतील ????? अशक्य ! खरे तर भाजपा व काँग्रेस यानीच किमान कार्यक्रम घेऊन सरकार स्थापावयास हवे. पण एकमेकाना पांण्यात पहाणार्‍या पण जनलोकपाल बद्द्ल एकमेकाना उंदीर मांजर साक्ष असणार्‍या या गुरू शिष्याना कोण समजावणार ...?

In reply to by चौकटराजा

भाजप काय किंवा काँग्रेस काय, दोघेही किमान समान कार्यक्रमावरच एकत्र सत्ता चालवत असतात. लोकांना हे लक्षात आलेले नाही, त्यांना काय ,राजकीय सभेत आरोप प्रत्यारोपाची मैफल ऐकवली कि लगेच त्यांचा विश्वास बसतो कि भाजप व काँग्रेस भिन्न आहेत .एकमेकांना शिव्या घालायच्या परंतु अंबानीच्या व अदाणीच्या बाबतीत' समान' कार्यक्रम हे दोघेही राबवत आले आहेत. बहुतांश घोटाळे मिडीयाने बाहेर काढलेत, कॅगनेच 2G व कोळसा घोटाळा बाहेर काढला, पण याचे श्रेय लाटायला मात्र भाजप पूढे... यांनी त्यांच्या प्रातःस्मरणीय प्रखर राष्ट्रवादाचे, पवित्र आचरणाचे,अखंड भारतभुचे, रामराज्याचे तंबोरे इतकी वर्षं खाजवुनही यांच्या मैफीलींमधून काही देशउन्नतीच्या तारा आजपर्यंत छेडल्या गेल्या नाहीत,' दक्ष', राहुन कुठे 'दुर्लक्ष' करायचे याचे चांगले प्रक्षिशण घेऊनच हे संघिष्ट लोक राजकारणात येत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

म्हणूनच वाराणसीतुन मोदी आणि अमेठीतुन राहुल गांधी हरले तर एक कडक चपराक ह्या पारंपारीक पक्षांना मिळेल. दिल्लीत मिळाली तशी. तो पर्यंत येड्डीयुरप्पा, अशोक चव्हाण, रामलुलु, ए.राजा हेच लोक निवडणुका खरेदी करणार.

In reply to by आशु जोग

खरं नाही ठरलं याचा आनंद आहे

माणस वास्तवात का जगत नाहित्,एन.डी.ए च्या एकुन जागांची कुणी बेरिज करुन सांगेल का रे ?

खरेच मोदी येतील का ? नाही. राहूल गांधीच आम आदमीचा चॉईस रहाणार आहे! ढोल-ताशे तयार ठेवा! :)

मोदी पंतप्रधान व्हावेत हि इच्छा …पण त्यांनी पंतप्रधान होऊन देशाचा गुजरात करण्यापेक्षा देशाचा महाराष्ट्र करावा

In reply to by मालोजीराव

कुठल्या दशकातला राजे ? बारामतीकर काकांच्या वेळचा वा त्या अगोदरचा म्हणाल तर बरच आहे...अन्यथा आजच्या महाराष्ट्राची स्थिती काळजी करावी अशीच आहे.

In reply to by अर्धवटराव

मालक कौतुक राज्यकर्त्यांच नाहीच… अशोक चव्हाण,धाकटे साहेब यांच्यासारखे माती करणारे राजकारणी असूनसुद्धा उद्योजक,शेतकरी बांधवांनी महाराष्ट्राला सतत अग्रेसर ठेवलं.

In reply to by मालोजीराव

देशाचा महाराष्ट्र करायचा तर अगोदर देशातल्या विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे.

मोदी पंतप्रधान बनणे खुप अवघड आहे. राहुल गांधीकडे पंतप्रधान पद पर्याय नाही म्हणून जाईल अशी शक्यता आहे. मात्र वर्शाच्या आत परत निवडणुका होतील.

पण आआपमुळे जो मोदींचा प्रचार चाललाय, त्यामुळे बरेचसे कुंपणावरचे मतदार एव्हाना एका कुठल्यातरी बाजुला झुकले असतील. त्याचा फायदा आआप आणि भाजप, दोघांनाहि होईल. आआपला जास्त कारण त्यांना या निवडणुकीत गमवण्यासारखं काहि नाहि. काँग्रेसचं भवितव्य एव्हाना फ्रीझ झालं असेल. त्यांच्या संभाव्य मतदारांची संख्या निवडणुकींपर्यंत तरी फारशी वाढणार वा घटणार नाहि. पण प्रॉबॅबिलिटीच काढायची झाली तर मोदिंचे चान्सेस सर्वात जास्त आहेत असं वाटतं

संपादकांना सतत त्रास देणारा धागा काढल्यापद्धल धागाकर्त्याचा निषेध! अनावश्यक प्रतिसाद लवकरात लवकर उडवण्यापद्धल संपादकांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन!

>>> मोदी खरच पंतप्रधान बनतील का ! एप्रिल-मे २०१४ च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनण्याची शक्यता खूपच कमी आहे. माझ्या अंदाजानुसार भाजपला १९०-२०० व रालोआला २२५ च्या आसपास जागा मिळतील व काँग्रेसला १२०-१३० व संपुआला १४०-१५० जागा मिळतील. रालोआला बहुमतासाठी अंदाजे ५० जागा कमी पडतील. अशा परिस्थितीत २-३ शक्यता आहेत. (१) मोदींऐवजी अडवाणी/स्वराज्/जेटली अशांपैकी कोणाचे नाव पुढे करून तथाकथित निधर्मी पक्षांचा (तॄणमूल काँग्रेस, बिजद इ.) पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करायचे. हा पर्याय मोदींना फारसा आवडणार नाही कारण पक्षातच पर्यायी नेतृत्व उभे राहते जे भविष्यात त्रासदायक ठरेल. भाजपला देखील हा पर्याय फारसा आवडणार नाही कारण हे सरकार काही काळ चालून परत निवडणुका झाल्यास परत काँग्रेसच्या जागा वाढून भविष्यात त्रासच होणार. परंतु अडवाणी, स्वराज इ. ची महत्वाकांक्षा थोपवून धरणे अवघड आहे. (२) सरकार स्थापन न करता विरोधी पक्षात बसणे. हा पर्याय मोदींसाठी व पर्यायाने भाजपसाठी चांगला ठरेल. कारण १९९६ प्रमाणे तिसर्‍या आघाडीचा कोणतरी पंतप्रधान होऊन एक अस्थिर व कडबोळे सरकार स्थापन होईल जे फार थोडा काळ टिकेल आणि ते पडून मध्यावधी निवडणुका झाल्यावर भाजपसाठी अजून चांगली परिस्थिती असेल. १९९८ मध्ये भाजप व २००५ मध्ये बिहारमध्ये संजद-भाजप युतीला असाच फायदा झाला होता. (३) तिसर्‍या आघाडीचे काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे (१९९६ प्रमाणे) किंवा मीराकुमार/सुशीलकुमार शिंदे इ. दलित नेत्याचे नाव पुढे आणून काँग्रेसने तिसर्‍या आघाडीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे. हे सरकार अत्यंत अस्थिर व अल्पकालीन असेल. भाजपसाठी पर्याय (१) आत्मघात ठरेल. पर्याय (२)/(३) हेच योग्य ठरतील.

आम आदमी पार्टीचा तरूण चेहरा, जनतेचे तारणहार, आणि सार्‍या भारतवर्षाची एकमेव आशा* असलेले धडाडीचे नेते श्री. अरविंद केजरीवाल यांनी खास लोकाग्रहास्तव वाराणसीतून निवडणूक लढणार असे जाहीर केले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन! त्यांनी स्पष्टपणे म्हणले आहे की खासदार होणे महत्वाचे नाही तर मोदींना हरवणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा! गंगेत घोड न्हालं! ;) * आशाच... लता नाही कारण तीचे मोदींनी पंप्र व्हावे असे स्वप्न आहे. :angry:

माझ्या सारख्या सामान्य त्रस्त मुंबईकराना मोदीनां पंतप्रधान पेक्षा रेल्वे मंत्री पदावर पाहायला जास्त आवडेल , विकास झालाय कि नाही झालाय ते फक्त रेल्वेच्या कामावरूनच स्‍पस्ट कळते. इतर विकासांचे नुसते कागदी आलेख असतात . ते उलटे -सुलटे करून पहिले तरी काही केल्या समजत नाही . *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: एक शंका मोदी जर भारताचे पंतप्रधान झाले तर अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणाला त्यचा ताप होईल का? म्हणजेच युद्धाच्या संभावना वाढतील का? अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणातील लोकांना सुद्धा ते भारताचे पंतप्रधान पदावर नसावे असे वाटत असेल का ? *nea* *NO* *NO*

.

आपच्या उदयामुळे मोदी पंतप्रधान बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही पक्षाला निर्णायक बहुमत मिळण्याचे दिवस गेले आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मोदी पंतप्रधान बनण्याचा धोका वाटत नाही. म्हणजे आप पुढे मोदी पंतप्रधान होणे हा धोका नसून वरदान ठरेल असे म्हणायचे आहे का? :)

मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे. तुम्ही मोदी यांना टोपण म्हणालात ! निष्षेध !

माझ्या मते मोदी पंतप्रधान होणार नाहीत. १. मोदींच्या पोलरायजेशनमुळे मायनॉरिटी कधीच मते देणार नाही. २. त्यांनी विवाहीत असुन आपल्या पत्नीला नाकारल्याने महिलांमधे त्यांची ढासळत चाललेली लोकप्रियता. (त्यात भर म्हणून भाजपची एकूणच बुरसट सनतानी विचारांची एक प्रतिमा. प्रमोद मुतालिक प्रकरण इ.) ३. मोदींच्या मिनिअन्सनी जिथे तिथे घातलेला धुमाकुळ. अर्वाच्य शिवीगाळ, फेकूगिरी करणारी फोटोशॉप केलेली पोस्टर्स, फुगवलेले आकडे इ.इ. ज्यामुळे दुरावत असलेला मॉडरेट इंटरनेट सॅव्ही ग्रुप. (ज्यांची मते आआप नक्की मिळवणार आणि चुरशीच्या लढतींमधे भाजपा उमेदवार पडणार) ४. त्यात भर म्हणून स्वत: मोदी करत असलेली बेताल विधाने, जसे की केजरीवाल हे पाकिस्तानी एजंट आहेत वगैरे ५. मोदींचा नुसताच सभा घेण्यावर भर, कठीण प्रश्नांना सामोरे न जाण्याचा निर्णय. ६. भाजपातील अंतर्गत बंडाळी. गडकरी, अडवाणी, सुषमा स्वराज, जसवंत सिंघ, मुरली मनोहर इ.इ. अनेक भाजपा नेत्यांशी बिघडलेले त्यांचे संबंध वरील कारणांमुळे पंतप्रधान होणे तर सोडाच, वाराणसीतुन लाजिरवाणा पराभवास सामोरे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

एके ४९ म्हणजेच अरविंद केजरीवाल. त्यांनी नुकताच एक नव्या पक्ष स्थापन केला असून पक्षाच्या वेबसाईटवर त्यांनी भारताचा भाग असलेले काश्मीर सरळ पाकिस्तानला देऊन टाकले आहे. ज्यांनी देशाला दुभागण्याचे काम केले, ते देश कसा सांभाळणार असा प्रश्न विचारत केजरीवाल हे पाकिस्तानचे एजंट आणि भारताचे शत्रू असल्याचा अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला साभार:केजरीवाल पाकिस्तानचे एजंट- नरेंद्र मोदी यात चुकीचे काय आहे बंडा मामा!